Supreme Court Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये निघालेल्या भरती संबंधी सविस्तर अशी माहिती देणार आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये ज्युनियर कोर्ट अटेंडंट या पदाची भरती निघाली आहे, दहावी पास आणि पाककला डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना जॉब मिळण्याची मोठी आशंका आहे. सर्वात जास्त प्राधान्य हा, पाककला डिप्लोमा केलेल्या आणि तीन वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना दिला जाणार आहे.
ज्या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच अर्ज सादर करायचे आहेत. यासाठी सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरावा लागणार आहे. याची सविस्तर अशी माहिती स्टेप बाय स्टेप आर्टिकल मध्ये मी नमूद केली आहे. ती तुम्हाला वाचायची आहे आणि त्या प्रकारे फॉर्म भरायचा आहे.
ऑनलाइन स्वरूपातच अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म भरले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2024 आहे. त्यानंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे मुदत ध्यानात ठेवा आणि लवकर फॉर्म भरा.
Supreme Court Bharti 2024
पदाचे नाव | ज्युनियर कोर्ट अटेंडंट |
रिक्त जागा | 80 |
नोकरीचे ठिकाण | दिल्ली |
वेतन श्रेणी | 21,700 रू. महिना |
वयाची अट | 18 ते 27 वर्षे |
भरती फी | साधारण प्रवर्ग: 400 रुपये (SC/ST/PWD: 200 रुपये) |
Supreme Court Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) | 80 |
Total | 80 |
Supreme Court Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) | उमेदवार हा किमान 10वी पास असावा, त्याच्याकडे पाककला डिप्लोमा आणि सोबत 3 वर्षांचा अनुभव असावा. |
Supreme Court Bharti 2024 Table
Important Links | |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
Join Now | Telegram |
Important Dates | |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 सप्टेंबर 2024 |
परीक्षेची तारीख | अद्याप डेट आली नाही |
Supreme Court Bharti 2024 Apply Online
सुप्रीम कोर्ट भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे.
- सुरुवातीला तुम्हाला वर टेबलमध्ये दिलेल्या Apply Online या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल, तिथे तुम्हाला Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर सुप्रीम कोर्ट भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
- माहिती अचूक आणि बरोबर असणे आवश्यक आहे, चुकीची माहिती आढळली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे याची दक्षता घ्या आणि त्यानुसार फॉर्म भरा.
- भरतीचा फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर भरतीसाठी परीक्षा फी देखील भरायचे आहे, परीक्षा फी ही प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे. साधारण प्रवर्गातील उमेदवारांना चारशे रुपये फी भरायची आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना फक्त दोनशे रुपये फी भरायची आहे.
- फी भरून झाल्यावर तुम्हाला या भरतीचा फॉर्म एकदा तपासून घ्यायचा आहे. माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यास, तुम्हाला फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.
Supreme Court Bharti 2024 Selection Process
सुप्रीम कोर्ट भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही तीन स्तरावर केली जाणार आहे. यामध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांचे स्किल तपासले जाणार आहेत, आणि शेवटी इंटरव्यू घेऊन अर्जदार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- Written Test
- Skill Test
- Interview
- Merit List
सुरुवातीला ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज सादर केला आहे त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेत जे उमेदवार पात्र होतील त्यांना स्किल्स टेस्ट साठी बोलावले जाईल, त्यानंतर शेवटी अर्जदार उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि जे उमेदवार पदासाठी योग्य वाटतील त्यांची निवड समितीद्वारे केली जाईल.
- RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये 12 वी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा
- ITBP Constable Bharti 2024: 10 वी, 12 वी, ITI पास वर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती! अर्ज करा
Supreme Court Bharti 2024 FAQ
Who is eligible for Supreme Court Bharti 2024?
सुप्रीम कोर्ट भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची शिक्षण हे किमान दहावीपर्यंत झालेले असावे, सोबतच अर्जदार उमेदवारांनी स्वयंपाकाचा डिप्लोमा केलेला असावा आणि त्यांना किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.
How to apply for Supreme Court Bharti 2024?
सुप्रीम कोर्ट भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिकृत पोर्टल मधूनच अर्ज करायचा आहे, याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप स्वरूपात आर्टिकल मध्ये दिली आहे.
What is the last date of Supreme Court Bharti 2024?
सुप्रीम कोर्ट भरती 2024 साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ दिले जाणार नाही, त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत लवकर फॉर्म भरून घ्या.
1 thought on “Supreme Court Bharti 2024: सुप्रीम कोर्टात 10वी पास वर भरती! नोकरीची संधी, लगेच फॉर्म भरा”