ITBP Constable Bharti 2024: 10 वी, 12 वी, ITI पास वर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती! अर्ज करा

ITBP Constable Bharti 2024: नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये भरती निघाली आहे, जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामार्फत या भरती संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, या भरतीसाठी एकूण 330 जागा सोडण्यात आल्या आहेत.

विशेष बाब म्हणजे ही भरती दहावी, बारावी, आणि आयटीआय वर केली जाणार आहे. म्हणजे जे उमेदवार दहावी पास बारावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण असतील त्यांना भरतीसाठी मुख्य प्राधान्य दिले जाणार आहे.

अजून एक भारी गोष्ट म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांसोबतच सर्व प्रवर्गातील महिलांना फी मध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. साधारण प्रवर्गातील उमेदवारांना केवळ शंभर रुपये फी आकारले जाणार आहे. नाममात्र फी आहे त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांना अर्ज करताना कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही.

या ITBP Constable Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया अशा सर्व महत्वाच्या बाबी आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. माहिती महत्वाची अशी आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार फॉर्म भरा.

ITBP Constable Bharti 2024

पदाचे नावकॉन्स्टेबल
रिक्त जागा330
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी81,100 रू. महिना
वयाची अट18 ते 23, 25, 27 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: 100 रुपये (SC/ST/PWD/महिला: फी नाही)

ITBP Constable Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
कॉन्स्टेबल (Carpenter)7121,700 ते 69,100 रु.
कॉन्स्टेबल (Plumber)5221,700 ते 69,100 रु.
कॉन्स्टेबल (Mason)6421,700 ते 69,100 रु.
कॉन्स्टेबल (Electrician)1521,700 ते 69,100 रु.
हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)0925,500 ते 81,100 रु.
कॉन्स्टेबल (Animal Transport)11521,700 ते 69,100 रु.
कॉन्स्टेबल (Kennelman)0421,700 ते 69,100 रु.
Total330

ITBP Constable Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
कॉन्स्टेबल (Carpenter)10वी उत्तीर्ण, ITI (Carpenter)
कॉन्स्टेबल (Plumber)10वी उत्तीर्ण, ITI (Plumber)
कॉन्स्टेबल (Mason)10वी उत्तीर्ण, ITI (Mason)
कॉन्स्टेबल (Electrician)10वी उत्तीर्ण, ITI (Electrician)
हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)12वी उत्तीर्ण, पॅरा व्हेटर्नरी कोर्स/ डिप्लोमा प्रमाणपत्र
कॉन्स्टेबल (Animal Transport)10वी उत्तीर्ण
कॉन्स्टेबल (Kennelman)10वी उत्तीर्ण

ITBP Constable Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFपद क्र. 1 ते 4: Download करा
पद क्र. 5 ते 7: Download करा
भरतीचा फॉर्मApply Online
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख12 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 सप्टेंबर 2024
परीक्षेची तारीखअद्याप डेट आली नाही

ITBP Constable Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मध्ये ऑनलाईन अर्ज येथून करा त्या लिंक वर क्लिक करायचा आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इंडो तिबेटियन पोलीस दलाच्या अधिकृत पोर्टलवर पोहोचाल.
  • तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नंतर लॉगिन करून Apply Now हा पर्याय निवडायचा आहे.
  • तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल फॉर्ममध्ये दिलेली माहिती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या.
  • माहिती वाचल्यानंतर जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक अचूक स्वरूपात भरा.
  • माहिती चुकीची टाकू नका, पुढे पडताळणी वेळी चूक आढळल्यास तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
  • फॉर्म भरल्यानंतर आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा, कागदपत्रे अपलोड करणे झाल्यावर पुढे तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे.
  • परीक्षा फी केवळ साधारण प्रवर्गातील पुरुषांना आकारली जाणार आहे, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार आणि सर्व महिलांना फी माफ असणार आहे.
  • फी भरून झाल्यावर तुम्हाला तुम्ही भरलेला फॉर्म एकदा तपासायचा आहे, माहिती बरोबर असल्याची खात्री करायची आहे.
  • एकदा खात्री झाली आणि माहिती अचूक असल्याचे स्पष्ट झाले, तर तुम्हाला फॉर्म खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करून फॉर्म सादर करायचा आहे.

ITBP Constable Bharti 2024 Selection Process

इंडो तिबेटियन पोलीस भरतीसाठी उमेदवारांची निवड टप्प्यानुसार केली जाणार आहे, निवड प्रक्रियेत stages असणार आहेत जे उमेदवार या सर्व स्टेजमध्ये पात्र होतील किंवा त्यांना कॉन्स्टेबल पदाची नोकरी मिळवता येईल.

  • शारीरिक चाचणी (PET)
  • शारीरिक तपासणी (PST)
  • लेखी परीक्षा
  • ट्रेड टेस्ट
  • मेरिट लिस्ट
  • कागदपत्रे पडताळणी
  • ऑफर लेटर जॉईनिंग

शारीरिक चाचणी परीक्षा:

ITBP Constable Bharti 2024  Physical Test

पहिल्या 4 पदासाठी लेखी परीक्षेचे विवरण:

ITBP Constable Bharti 2024 Exam Syllbus 1

उर्वरित पदांसाठी लेखी परीक्षेचे विवरण:

ITBP Constable Bharti 2024 Exam Syllbus 2

सुरुवातीला तुम्हाला दोन स्तरावर शारीरिक चाचण्या द्याव्या लागतील, नंतर पोलिस दला मार्फत लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर तुमच्या ट्रेड नुसार टेस्ट घेतली जाईल, शेवटी जे उमेदवार पात्र होतील त्यांची मेरिट लिस्ट बनवली जाईल. त्यानंतर शेवटी उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी करून त्यांना जॉइनिंग लेटर पाठवले जाईल.

Mukhyamantri Yojna Doot 2024: 50 हजार जागांची मेगाभरती महाराष्ट्र शासनाकडून जाहीर!
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10 वी पास वर भरती! येथून लगेच अर्ज करा

ITBP Constable Bharti 2024 FAQ

Who is eligible for ITBP Constable Bharti 2024?

इंडो तिबेटियन पोलीस दल भरतीसाठी अर्जदार उमेदवार हे किमान दहावी, बारावी आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच वयाची अट आणि इतर देखील अटी आहेत त्या तुम्ही आर्टिकल मध्ये जाणून घेऊ शकता.

How to apply for ITBP Constable Bharti 2024?

इंडो तिबेटियन भरती साठी ऑनलाइन स्वरूपात त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल मध्ये मी दिली आहे, ती पाहून तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून फॉर्म भरू शकता.

What is the last date of ITBP Constable Bharti 2024?

इंडो तिबेटियन कॉन्स्टेबल भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2024 आहे, मुदतवाढ मिळेल किंवा नाही याचा विचार आता करू नका, वेळ आहे तोपर्यंत अर्ज करून टाका.

Leave a comment