IAS Selection Process: कलेक्टर बनण्यासाठी काय करावे लागते? शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम

IAS Selection Process: आजच्या या आर्टिकल मध्ये आपण IAS अधिकारी कसे बनायचे? याची सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

कलेक्टर होण्यासाठी वेगवेगळे पात्रता निकष सरकारद्वारे लावण्यात आले आहेत, त्याची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

कलेक्टर म्हणजेच IAS बनण्यासाठी स्पर्धा परीक्षा UPSC ची तयारी करावी लागते, जे उमेदवार UPSC ची तयारी करत आहेत त्यांच्या साठी या आर्टिकल मध्ये महत्वाची अशी माहिती मी दिली आहे.

एकदा ही माहिती नक्की शेवट पर्यंत वाचा, जेणेकरून तुम्हाला तुमचे कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल.

IAS Selection Process In Marathi

IAS officer पोस्ट साठी उमेदवारांना UPSC ची परीक्षा देणे अनिवार्य असते. जर यूपीएससी मध्ये उमेदवार पास झाला, तर त्याला IAS बनाता येते.

त्यासाठी पात्र उमेदवारांची निवड ही प्रत्यक्ष UPSC द्वारे शासनामार्फत केली जाते. जर उमेदवार कलेक्टर पोस्ट साठी योग्य पात्र असेल तरच उमेदवाराची निवड केली जाते.

IAS officer बनण्यासाठी 4 स्टेज मध्ये निवड प्रक्रिया राबवली जाते, त्याची सविस्तर माहिती आपण खाली Separate Section मध्ये घेणार आहोत.

IAS Elegibility Criteria Qualification

कलेक्टर बनण्यासाठी शासनाने काही पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार शैक्षणिक पात्रता, वयाची अट मेडिकल आणि शारीरिक स्टॅंडर्ड हे जारी करण्यात आले आहेत. त्याची माहिती तुम्ही खाली दिलेल्या Separate Points द्वारे जाणून घेऊ शकता.

👨‍🏫 Education Qualification

कलेक्टर होण्यासाठी अर्जदार उमेदवार हा किमान ग्रॅज्युएशन बॅचलर पदवी प्राप्त असावा, जर उमेदवाराची ग्रॅज्युएशन झाले नसेल तर तो उमेदवार IAS साठी UPSC Exam देऊ शकणार नाही.

तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही यूपीएससीची तयारी करू शकता आणि ज्यावेळी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तेव्हा तुम्ही यूपीएससी साठी अर्ज करून तुम्ही परीक्षेला Enroll करू शकता.

🏋️ Physical Qualification

कलेक्टर होण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही Specific शारीरिक पात्रतेची आवश्यकता नाही, परंतु उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आणि Fit असावा. जेणेकरून उमेदवार कलेक्टर स्वरूपात त्याची ड्युटी पूर्ण Capability ने करु शकेल.

🔞 Age Limit

कलेक्टर होण्यासाठी वयाची अट ही देण्यात आली आहे त्यामध्ये मुख्य स्वरूपात वयाची अट ही 21 ते 32 वर्षे आहे. यात प्रवर्गानुसार आणि उमेदवारानुसार वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आलेली आहे. त्याची सविस्तर माहिती तुम्ही खाली दिलेल्या टेबलच्या आधारे जाणून घेऊ शकता.

प्रवर्गवयोमर्यादा
General21 ते 32 वर्षे
OBC21 ते ३५ वर्षे
SC/ST21 ते ३७ वर्षे
Physically disabled (Blind, Deaf-mute, Orthopedically handicapped)21 ते ४२ वर्षे
Ex-serviceman discharged after 5 years dutyGeneral: 21 ते ३७ वर्षे
OBC: 21 ते 40 वर्षे
SC/ST: 21 ते ४२ वर्षे

IAS UPSC Exam Syllabus

कलेक्टर होण्यासाठी अर्जदार उमेदवाराला यूपीएससीची परीक्षा द्यावी लागते, त्यामध्ये दोन परीक्षा असतात एक म्हणजे Prelims आणि दुसरी म्हणजे Mains.

या दोन्ही पेपर मध्ये उमेदवाराला पास होणे अनिवार्य असते, दोन्ही पेपर झाल्यानंतर मुलाखतीद्वारे आणि मेडिकल टेस्ट अखेर उमेदवार निवडले जातात.

IAS UPSC Prelims Syllabus

Subjects:

Part I:

  • Current events of national and international importance.
  • History of India and Indian National Movement.
  • Indian and World Geography-Physical, Social, Economic Geography of India and the World.
  • Indian Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Public Policy, Rights Issues, etc.
  • Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector Initiatives, etc.
  • General issues on Environmental Ecology, Biodiversity, and Climate Change – that do not require subject specialization.
  • General Science

Part II:

  • Comprehension
  • Interpersonal skills including communication skills
  • Logical reasoning and analytical ability
  • Decision-making and problem-solving
  • General mental ability
  • Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation (charts, graphs, tables, data sufficiency, etc. – Class X level)
दोन अनिवार्य पेपरGeneral Studies Paper – I
General Studies Paper – II (CSAT)
एकूण प्रश्न GS Paper-I100
एकूण प्रश्न CSAT80
एकूण मार्क्स (400)GS Paper-I – 200 Marks
CSAT – 200 Marks
Negative Marking ⅓ for every wrong answer
एकूण वेळ (प्रत्येकी 2 घंटे)GS Paper – I: 2 घंटे (9:30 AM -11:30 AM)
CSAT: 2 घंटे (2:30 PM – 4:30 PM)

IAS UPSC Mains Syllabus

पेपरविषयमार्क्स
Paper – IEssay (can be written in the medium of the candidate’s choice)250
Paper – IIGeneral Studies – I (Indian Heritage & Culture, History & Geography of the World & Society)250
Paper – IIIGeneral Studies – II (Governance, Constitution, Polity, Social Justice & International Relations)250
Paper – IVGeneral Studies – III (Technology, Economic Development, Biodiversity, Security & Disaster Management)250
Paper – VGeneral Studies – IV (Ethics, Integrity & Aptitude)250
Paper – VIOptional Subject – Paper I250
Paper – VIIOptional Subject – Paper II250

IAS Selection Process

IAS अधिकारी बनण्यासाठी एकूण 4 स्टेज मध्ये निवड प्रक्रिया राबवली जाते, या तिन्ही स्टेजमध्ये उमेदवाराला पास होणे अनिवार्य असते. जर उमेदवार पास झाला उत्तीर्ण झाला तरच त्याला कलेक्टर या पोस्टसाठी नियुक्ती केली जाते.

  • IAS Prelims Exam
  • IAS Mains Exam
  • IAS Personality Test (Interview)
  • IAS Medical Test

मुलाखतीमध्ये उमेदवाराची Personality, Attitude, Suitability तपासली जाते. यावेळी Interview मध्ये विविध प्रश्न विचारले जातात त्यानुसार उमेदवाराला मार्क Distribute केले जातात.

मेडिकल टेस्ट मध्ये देखील उमेदवाराचे आरोग्य तपासले जाते, यामध्ये नवी दिल्ली येथे वेगवेगळ्या अधिकृत हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट घेतली जाते. मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवाराची Health तपासली जाते, जर उमेदवार पूर्णपणे निरोगी असेल तर मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवाराला पास केले जाते.

निवड प्रक्रियेतील सर्व स्टेज पूर्ण झाल्यानंतर जे उमेदवार पास झाले आहेत त्यांची All India Ranking काढली जाते, आणि त्यानुसार उमेदवार कलेक्टर या पदासाठी निवडले जातात.

IAS Selection Process FAQ

Who is eligible for the IAS UPSC Exam?

IAS UPSC Exam साठी ग्रॅज्युएशन आणि बॅचलर पदवीधर विद्यार्थी पात्र असणार आहे, ज्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले नाही त्यांना कलेक्टर या पदासाठी जी परीक्षा घेतली जाते त्यासाठी बसता येणार नाही.

How to apply for the IAS UPSC Exam?

IAS UPSC Exam साठी उमेदवार ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करू शकतात. जर तुम्हाला अर्ज कसा सादर करायचा याची माहिती नसेल, तर तुम्ही कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर जाऊन यूपीएससी साठी आपला फॉर्म भरू शकता.

What is the age limit for the IAS UPSC Exam?

IAS UPSC Exam साठी उमेदवारांची वय हे 21 ते 32 वर्षे असावे, किमान वय हे 21 असणे आवश्यक आहे तर कमाल वय हे 32 वर्षे आहे. परंतु प्रवर्गानुसार आणि उमेदवारानुसार वयोमर्यादा निकषांमध्ये शिथिलता करण्यात आले आहे त्याची सविस्तर माहिती व Age Limit या सेक्शनमध्ये दिली आहे.

1 thought on “IAS Selection Process: कलेक्टर बनण्यासाठी काय करावे लागते? शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम”

Leave a comment