SSC CGL Selection Process: SSC CGL साठी पात्र उमेदवारांची निवड कशी होते? या संबंधी माहिती आजच्या या लेखात मी सविस्तर रित्या दिली आहे. तुम्ही जर CGL अंतर्गत नोकरी मिळवू इच्छित असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी मोठी कामाची असणार आहे.
या आर्टिकल मध्ये आपण SSC CGL Selection Process ची माहिती तर घेणार आहोतच, सोबत CGL साठी कोणते उमेदवार पात्र असणार? शैक्षणिक पात्रता, शारीरिक निकष काय असणार? आणि अभ्यासक्रम काय आहे? अशी सर्व माहिती घेणार आहोत.
SSC CGL Selection Process In Marathi
SSC CGL Selection Process साठी सुरुवातीला अर्जदार उमेदवाराला SSC CGL Bharti निघाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
अर्ज हा सादर केल्यानंतर पदा नुसार SSC CGL Selection Process पार पडते. सर्वसाधारण पणे मुख्य स्वरूपाच्या सर्व जॉब पोस्ट साठी SSC CGL Selection Process सारखीच आहे.
तुम्हाला जर याची पूर्ण A to Z माहिती पाहिजे असेल, तर या लेखात खाली शेवटून दुसऱ्या Section मध्ये Separate SSC CGL Selection Process ची Headline दिली आहे. तेथून तुम्ही निवड प्रक्रिया सविस्तर रित्या जाणून घेऊ शकता.
SSC CGL Qualification Details
SSC CGL भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे वेगवेगळे पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र असे उमेदवारच या भरतीसाठी फॉर्म सादर करू शकणार आहेत.
👨🏫 Education Qualification
स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएशन आणि बॅचलर्स डिग्री ची आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांना किमान ग्रॅज्युएशन अथवा बॅचलर डिग्री करणे अनिवार्य आहे.
🏋️ Physical Qualification
शारीरिक पात्रतेमध्ये उमेदवाराची उंची, छाती, वजन सोबतच 1600 मीटर चालणे/ 1 किलो मीटर चालणे, 8 किलोमीटर सायकलिंग/ 3 किलो मीटर सायकलिंग या बाबी समाविष्ट आहेत. याची माहिती तुम्ही सविस्तर रित्या खाली दिलेल्या टेबलच्या आधारे जाणून घेऊ शकता.
Criteria | पुरुष | महिला |
---|---|---|
उंची | 157.5 सेमी | 152 सेमी |
छाती | 81 सेमी | – |
वजन | – | 48 Kg |
Criteria | पुरुष |
---|---|
१६०० मीटर चालणे | 15 मिनिटे |
8 किलो मीटर सायकलिंग | 30 मिनिटे |
Criteria | महिला |
---|---|
1 किलो मीटर चालणे | 20 मिनिटे |
3 किलो मीटर सायकलिंग | 25 मिनिटे |
🔞 Age Limit
भरतीसाठी वयाची अट देखील पदानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. याची पण माहिती तुम्ही खाली दिलेल्या टेबलच्या आधारे जाणून घेऊ शकता.
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
Junior Statistical Officer | 32 वर्षा पर्यंत |
Assistant Audit Officer | 30 वर्षा पर्यंत |
Assistant Accounts Officer | 30 वर्षा पर्यंत |
Inspector of Income Tax | 30 वर्षा पर्यंत |
Inspector, (Central Excise) | 30 वर्षा पर्यंत |
Inspector | 30 वर्षा पर्यंत |
Assistant | 30 वर्षा पर्यंत |
Assistant/ Superintendent | 30 वर्षा पर्यंत |
Divisional Accountant | 30 वर्षा पर्यंत |
Sub-Inspector/ Junior Intelligence Officer | 30 वर्षा पर्यंत |
Assistant Enforcement Officer | 30 वर्षा पर्यंत |
Sub Inspector | 30 वर्षा पर्यंत |
Assistant Section Officer | 20 ते 30 वर्षा पर्यंत |
Sub Inspector | 20 ते 30 वर्षा पर्यंत |
Auditor | 18 ते 27 वर्षे |
Accountant | 18 ते 27 वर्षे |
Accountant/ Junior Accountant | 18 ते 27 वर्षे |
Postal Assistant/ Sorting Assistant | 18 ते 27 वर्षे |
Senior Secretariat Assistant/ Upper Division Clerks | 18 ते 27 वर्षे |
Senior Administrative Assistant | 18 ते 27 वर्षे |
Tax Assistant | 18 ते 27 वर्षे |
Sub-Inspector | 18 ते 27 वर्षे |
Upper Division Clerks | 18 ते 27 वर्षे |
SSC CGL Exam Syllabus
SSC CGL Bharti Syllabus भरतीसाठी दोन पेपर होणार आहेत, त्यामध्ये पहिला पेपर MCQ Objective Type असणार आहे. दुसऱ्या पेपर मध्ये एकूण 4 Sub Paper आहेत, जे उमेदवाराला Crack करायचे आहेत, दोन्हीही पेपर हे ऑनलाइन स्वरूपात कॉम्प्युटर वर घेतले जाणार आहेत.
Tier 1 Exam:
विषय | प्रश्न | मार्क | पेपरचा वेळ |
General Intelligence and Reasoning | 25 | 50 | 1 घंटा (60 मिनिट) |
General Awareness | 25 | 50 | |
Quantitative Aptitude | 25 | 50 | |
English Comprehension | 25 | 50 | |
100 | 200 |
Tier 2 Exam:
Sections | Module | विषय | प्रश्न | मार्क | Weightage |
Section I | Module-I | Mathematical Abilities | 30 | 60*3 = 180 | 23% |
Module-II | Reasoning and General Intelligence | 30 | 23% | ||
Section II | Module-I | English Language and Comprehension | 45 | 70*3 = 210 | 35% |
Module-II | General Awareness | 25 | 19% | ||
Section III | Module-I | Computer Knowledge Test | 20 | 20*3 = 60 | Qualifying |
Module-II | Data Entry Speed Test | One Data Entry Task | Qualifying |
पेपर | सेक्शन | प्रश्न | मार्क्स | वेळ | |
Paper II | Statistics | 100 | 200 | 2 hours | |
Paper III | General Studies (Finance and Economics) | 100 | 200 | 2 hours |
Exam Paper | Exam Mode | Marks | |
---|---|---|---|
Tier 1 | MCQ Type प्रश्न | ऑनलाईन परीक्षा | 200 |
Tier 2 | Paper I – (Compulsory for all posts) Paper II – (Compulsory for all posts) Paper III – (Compulsory for only Statistical Investigator Gr. II & Compiler posts) Paper IV – (Compulsory for only Assistant Audit Officer and Assistant Accounts Officer posts) | ऑनलाईन परीक्षा | Varies depending on the paper |
SSC CGL Selection Process
SSC CGL भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या आधारावर केली जाणार आहे, सुरुवातीला परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन स्वरूपात भरती निघाल्यावर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
एकूण दोन Tier मध्ये परीक्षा होणार आहे, दोन्ही परीक्षा वर सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन स्वरूपात असणार आहेत. प्रत्येक पेपर 200 मार्काचा असणार आहे, पेपर नुसार प्रश्न आणि मार्क यामध्ये फरक पडणार आहे, पहिल्या पेपर साठी 200 मार्क 100 प्रश्नावर असतील, वेळ हा एक घंट्याचा असणार आहे.
दुसऱ्या पेपर मध्ये 3 Sub Paper आहेत, यामध्ये मार्क चे विभाजन हे Section आणि Module नुसार करण्यात आले आहे. त्याची सविस्तर माहिती तुम्ही वर Exam Syllabus या सेक्शन मध्ये पाहू शकता.
- Tier I Exam
- Tier II Exam
- Document Verification
- Merit List
वर सांगितलेल्या चार स्टेजद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या चारी स्टेजमध्ये जे उमेदवार पास होतील त्यांनाच मेरिट लिस्ट द्वारे निवडले जाणार आहे.
- IPS Selection Process: IPS बनण्यासाठी काय करावे लागते? निवड कशी होते? पात्रता काय असते? पाहून घ्या माहिती
- अग्निवीर वायू भरती निवड प्रक्रिया, कोणते उमेदवार पात्र असणार, जाणून घ्या माहिती
- SSC CHSL Selection Process: SSC CHSL निवड प्रक्रिया, 12 वी पास बघा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
SSC CGL Selection Process FAQ
Who is eligible for SSC CGL Bharti?
SSC CGL Bharti साठी उमेदवाराचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन अथवा बॅचलर्स डिग्री पर्यंत झालेले असावे. पदानुसार शिक्षणामध्ये बदल होऊ शकतो, भरतीनुसार तुम्हाला ते Verify करून घ्यावे लागेल.
How to apply for SSC CGL Bharti?
SSC CGL Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. भरतीमध्ये जी शेवटची तारीख दिली आहे त्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.
How will the SSC CGL Exam Conducted?
SSC CGL Exam ही ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे, एकूण दोन Tier मध्ये परीक्षा होणार आहेत. या दोन्ही Tier मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना निवडले जाणार आहे.
What is the age limit for SSC CGL Bharti?
SSC CGL Bharti साठी वयाची अट ही 18 ते 32 वर्षे आहे, यामध्ये उमेदवाराची किमान वय हे 18 वर्षे असावे आणि कमाल वय 32 वर्षे असावे. पदानुसार वयोमर्यादा निकष कमी जास्त होऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला वर लेखामध्ये दिलेल्या Age Limit Section मधील माहिती वाचावी लागेल.
2 thoughts on “SSC CGL Selection Process: निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, Physical, अभ्यासक्रम”