Gram sevak Selection Process: ग्रामसेवक पदासाठी उमेदवारांची निवड कशी होते? कोणकोणते पात्रता निकष असतात? ग्रामसेवक होण्यासाठी काय करावे लागते? या संबंधी सविस्तर माहिती या लेखात मी दिली आहे.
जर तुम्ही ग्राम सेवक होण्यासाठी तयारी करत आहात, तर तुमच्या साठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. एक शब्द पण सोडू नका, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक माहिती वाचून काढा.
महत्वाची अशी कामाची माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांना देखील हे आर्टिकल नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पण ग्राम सेवक होण्यासाठी काय करावे लागते? याची माहिती मिळून जाईल.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Gram sevak Bharti Information In Marathi
ग्रामसेवक पदासाठी ज्या वेळी राज्य सरकार द्वारे भरती निघेल, तेव्हा सुरुवातीला अर्जदार उमेदवारांना Gram Sevak Bharti 2024 साठी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
तुम्ही केवळ ग्राम सेवक पदासाठी तयारी केली, अभ्यास केला सर्व काही माहिती मिळवली पण भरती निघाल्यावर अर्जच केला नाही, तर त्याचा काय फायदा. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला ग्राम सेवक पदासाठी भरती निघाली आहे का, याची माहिती असणे आवश्यक आहे.
जेव्हा ग्राम सेवक भरती निघेल, तेव्हा आपण आपल्या Naukrivalaa Site वर त्या संबंधी Job अपडेट देणार आहोतच, पण तुम्हाला देखील Up to Date राहावे लागेल.
Gram sevak Qualification Details
ग्रामसेवक भरतीसाठी राज्य शासनाद्वारे काही पात्रता निकष जारी केलेले आहेत, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा निकष या सर्व बाबी समाविष्ट आहेत. या दोन्ही Qualification Criteria ची माहिती खाली Separate Section मध्ये दिली आहे. माहिती महत्वाची आहे, उमेदवार निवडला जाणार की नाही हे या निकषांवर अवलंबून असते, त्यामुळे काळजीपूर्वक आर्टिकल वाचा.
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Gram sevak Education Details (शैक्षणिक पात्रता निकष)
- अर्जदार उमेदवाराने बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे, तसेच 12वी मध्ये उमेदवाराला 60 टक्के पेक्षा जास्त गुण असावेत.
- उमेदवार हा जर पदवीधर असेल, तर वरील निकष त्यांना लागू असणार नाहीत.
- जर उमेदवाराने कृषी क्षेत्रातील पदवी मिळवली असेल, तर उमेदवाराला प्राधान्य दिले जाऊ शकते.
- परंतु कोणत्याही क्षेत्रातील पदवी धारक ग्राम सेवक भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
- जर उमेदवार पदवीधर असेल तर उमेदवाराला टक्केवारीची अट लागू असणार नाही, पदवीधर उमेदवार Gram sevak Bharti 2024 साठी थेट फॉर्म भरू शकतात.
Gram sevak Age Limit (वयोमर्यादा निकष)
- ग्रामसेवक पदासाठी महाराष्ट्र शासनाने ठराविक अटी लावून दिल्या आहेत, त्यामध्ये वयाची अट अट ही प्रमुख आहे.
- जे उमेदवार ग्रामसेवक पदासाठी अर्ज करू इच्छितात त्यांचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- तसेच अर्जदार उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 38 वर्ष असावे, केवळ 18 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात.
- ग्रामसेवक भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वरील अटी लागू आहेत, परंतु जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील असाल तर तुम्हाला वयोमर्यादा निकषांमध्ये शिथिलता देण्यात येते.
- ज्यावेळी शासनाद्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल, त्यावेळी जाहिरातीमध्ये वयोमर्यादा निकष आणि मागासवर्गीय उमेदवारांना देण्यात येणारी शिथिलता नमूद असते. तुम्ही Notification PDF मधून त्याची माहिती जाणून घेऊ शकता.
Gram sevak Exam Details
Gram sevak Selection Process
ग्रामसेवक भरतीसाठी एकूण 200 मार्काची लेखी परीक्षा असते, यामध्ये एकूण 5 विषय असतात, प्रश्नांची संख्या ही शंभर असते आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क दिले जातात, त्यानुसार पेपर 200 मार्काचा असतो.
ग्रामसेवक भरतीसाठी परीक्षा ही Negative Marking System नुसार नाहीये, जरी एखादा प्रश्न चुकला तर त्यासाठी अधिकचे मार्क कट केले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण पेपर सोडवता येणार आहे, यामुळे तुमच्या Passing ची शक्यता वाढण्यास मदत होते.
मुख्य बाब म्हणजे ग्राम सेवक भरती साठीचा पेपर हा MCQ Objective Type स्वरुपात असतो, त्यामुळे तुम्हाला जास्त लेखी स्वरूपात Descriptive Questions सोडवावे लागत नाहीत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतात, त्यापैकी तुम्हाला कोणताही एक पर्याय निवडायचा असतो.
विषय | प्रश्नांची संख्या | एकूण मार्क |
---|---|---|
मराठी | 15 | 30 मार्क |
इंग्रजी | 15 | 30 मार्क |
अंकगणित व बुद्धिमत्ता | 15 | 30 मार्क |
सामान्य ज्ञान | 15 | 30 मार्क |
कृषी आणि तांत्रिक | 40 | 80 मार्क |
100 प्रश्न | 200 मार्क |
Gram sevak Selection Process
ग्रामसेवक भरती अंतर्गत अर्जदार उमेदवारांची निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे असणार आहे. यामधे काही टप्पे देण्यात आले आहेत, त्यानुसार जे उमेदवार या सर्व स्टेज मध्ये उत्तीर्ण होतील केवळ त्यांना ग्राम सेवक पदावर नियुक्ती मिळणार आहे.
- सुरुवातीला अर्जदार उमेदवारांची पात्रता तपासली जाते, या संबंधी पात्रता निकष वर आर्टिकल मध्ये मी नमूद केले आहेत.
- पात्रता तपासून झाल्यावर उमेदवारांना Gram Sevak Bharti साठी राबवली जाणारी लेखी परीक्षा द्यावी लागते.
- परीक्षेत पास झाल्यावर पुढे उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी केली जाते, यामधे जर Verification दरम्यान काही Invalid Information आढळली तर अशा उमेदवारांना तात्काळ बाद केले जाते.
- जर उमदेवार या कागदपत्रे पडताळणी मध्ये पास होतील, त्यांची Vacancy नुसार मेरिट लिस्ट काढली जाते.
- मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल केवळ अशाच उमेदवारांना ग्राम सेवक पदासाठी निवडले जाईल.
- Talathi Selection Process: तलाठी कसे बनायचे? पात्रता निकष, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया
- IAS Selection Process: कलेक्टर बनण्यासाठी काय करावे लागते? शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम
- IPS Selection Process: IPS बनण्यासाठी काय करावे लागते? निवड कशी होते? पात्रता काय असते? पाहून घ्या माहिती
- Top Career Options After 12th – AI/ML, Data Science या क्षेत्रांतील १२वी नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय!
- NCL Bharti 2025: ITI पास तरुणांसाठी नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये भरती! पगार ₹35,000 पासून!
- Vanrakshak & Vansevak bharti 2025: 12वी आणि 10वी पासवर वनसेवक व वनरक्षक भरती 2025 जाहीर! 14,000+ जागांची मेगाभरती!
- Chief Minister Fellowship 2025: पदवी पास तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप 2025 कार्यक्रमांतर्गत सुवर्णसंधी! पगार ₹61,500 महिना!
- IGR Maharashtra Bharti 2025: 10वी पास साठी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई भरती! पगार ₹15,000 – ₹47,600 + अन्य भत्ते!
- SJVN Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी SJVN लिमिटेड मध्ये भरती! पगार ₹1.60 लाख पर्यंत!
- MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025: MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती! पगार ₹56,000-₹1,77,000!
Gram sevak Selection Process FAQ
Who is eligible for Gram sevak Bharti?
ग्रामसेवक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांनी किमान बारावी किंवा पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे. ग्राम सेवक भरती पात्रता निकष सविस्तरपणे वर आर्टिकल मध्ये नमूद केले आहेत.
How to apply for Gram sevak Post?
ग्रामसेवक पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरता येतो. त्यासाठी तुम्हाला जाहिराती मध्ये दिलेल्या माहिती नुसार अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक देखील Notification मध्ये दिली जाते.
What is the age limit for Gram sevak Post?
ग्रामसेवक पदासाठी वयाची अट ही 18 ते 38 वर्षे आहे, म्हणजे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे किमान 18 ते जास्तीत जास्त 38 वर्षे असावे.
1 thought on “Gram sevak Selection Process: ग्राम सेवक निवड कशी होते? शिक्षण, वय, पगार? संपूर्ण माहिती इथे बघा!”