ISRO URSC Bharti 2026: इस्रो मध्ये भरती! 10वी + ITI आणि ड्रायव्हर, लगेच इथून अर्ज करा

ISRO URSC Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजेच ISRO अंतर्गत येणारे U R Rao Satellite Centre (URSC), बेंगळुरू हे उपग्रह तंत्रज्ञानासाठी इस्रोचे प्रमुख केंद्र आहे. INSAT, IRS, NavIC यांसारख्या उपग्रह प्रणाली आणि Chandrayaan-1, Mars Orbiter Mission, Chandrayaan-3, Aditya-L1, Astrosat सारख्या जगप्रसिद्ध मोहिमांमध्ये URSC चा मोठा वाटा आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेने आता Technician-B, Heavy Vehicle Driver-A, Light Vehicle Driver-A आणि Staff Car Driver-A या पदांच्या एकूण 61 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती जाहिरात क्र. URSC:04:2026 (दिनांक 24.10.2026) अंतर्गत होत आहे.

या भरतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे यासाठी Graduation ची गरज नाही. 10वी पास + ITI असलेले उमेदवार Technician-B साठी आणि 10वी पास + ड्रायव्हिंगचा अनुभव असलेले उमेदवार ड्रायव्हर पदांसाठी अर्ज करू शकतात. केंद्र सरकारची कायमस्वरूपी स्वरूपाची नोकरी, चांगला पगार आणि ISRO सारख्या संस्थेत काम करण्याची संधी, त्यामुळे ITI धारक आणि अनुभवी ड्रायव्हर्ससाठी ही खरोखर सुवर्णसंधी आहे.

ISRO URSC Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती संस्थाU R Rao Satellite Centre (URSC), ISRO, अंतरिक्ष विभाग, भारत सरकार
जाहिरात क्रमांकURSC:04:2026 (दिनांक 24.10.2026)
पदाचे नावTechnician-B, Heavy Vehicle Driver-A, Light Vehicle Driver-A, Staff Car Driver-A
एकूण जागा61 (Technician-B – 46, Drivers – 15)
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणबेंगळुरू (URSC), हसन (MCF) / भारतात कुठेही ISRO केंद्रात
निवड प्रक्रियालेखी परीक्षा / CBT + Skill Test
पगार₹19,900 ते ₹21,700 प्रति महिना + भत्ते
वयोमर्यादा18 ते 35 वर्षे
अर्ज सुरू24 ऑक्टोबर 2026 (सायं. 5:00)
शेवटची तारीख13 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:55)
अधिकृत वेबसाइटisro.gov.in / ursc.gov.in

ISRO URSC Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

या भरतीमध्ये एकूण 61 जागा आहेत. यापैकी Technician-B च्या 46 जागा आणि ड्रायव्हर पदांच्या 15 जागा आहेत.

Technician-B (पद क्र. 01 ते 08)

पद क्र.ट्रेडजागाप्रवर्गनिहाय जागा
01Electronics Mechanic / Technician Power Electronics Systems / Mechanic Consumer Electronics Appliances / Instrument Mechanic / Mechanic Industrial Electronics24UR-16, ST-01, OBC-02, EWS-05
02Fitter08UR-04, ST-01, OBC-01, EWS-02
03Electrician04UR-03, SC-01
04Refrigeration & Air-Conditioning (R&AC)05UR-03, SC-01, EWS-01
05Turner01UR-01
06Machinist02UR-01, EWS-01
07Motor Vehicle Mechanic01UR-01
08Electroplater01UR-01
एकूण46

ड्रायव्हर पदे (पद क्र. 09 ते 11)

पद क्र.पदाचे नावजागाप्रवर्गनिहाय जागा
09Light Vehicle Driver-A03UR-02, SC-01
10Staff Car Driver-A02UR-02 (DoS साठी)
11Heavy Vehicle Driver-A10UR-06, OBC-02, SC-01, EWS-01
एकूण15

MCF, हसन साठीच्या जागा

  • Electrician च्या 4 पैकी 1 UR व 1 SC जागा MCF (Master Control Facility), हसन साठी आहे.
  • R&AC च्या 5 पैकी 1 UR जागा MCF, हसन साठी आहे.
  • Heavy Vehicle Driver-A च्या 10 पैकी 2 UR जागा MCF, हसन साठी आहेत, त्यापैकी 1 जागा माजी सैनिकासाठी राखीव आहे.

PwBD (दिव्यांग) जागा

  • पद क्र. 01: 02 जागा PwBD (VH) – त्यात 1 backlog, 01 जागा PwBD (OH), 01 backlog जागा PwBD (ASD)
  • पद क्र. 02 (Fitter): 01 जागा PwBD (HH)
  • पद क्र. 03 (Electrician): URSC च्या 2 पैकी 01 backlog जागा PwBD (ASD)
  • पद क्र. 04 (R&AC): URSC च्या 4 पैकी 01 backlog जागा PwBD (HH)

माजी सैनिक (Ex-Servicemen) जागा

  • Technician-B मध्ये URSC च्या 21 जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.
  • Light Vehicle Driver-A मध्ये 02 आणि Heavy Vehicle Driver-A मध्ये 06, अशा एकूण 08 जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.
  • माजी सैनिकांसाठी राखीव URSC च्या 29 जागांपैकी 24 जागा backlog आहेत. योग्य माजी सैनिक न मिळाल्यास या जागा संबंधित प्रवर्गातील उमेदवारांमधून भरल्या जातील.

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.

⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.

ISRO URSC Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

Technician-B (पद क्र. 01 ते 08)

उमेदवार 10वी (SSLC / SSC / Matriculation) पास असावा आणि त्याच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये NCVT कडून ITI / NTC / NAC असणे आवश्यक आहे.

👉 ITI चा ट्रेड पदानुसारच असावा. उदा. Fitter पदासाठी Fitter ट्रेड, Electrician पदासाठी Electrician ट्रेड.

Light Vehicle Driver-A आणि Staff Car Driver-A (पद क्र. 09, 10)

  • 10वी पास किंवा समतुल्य
  • Light Vehicle Driver म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव
  • हलक्या वाहनाचा (LMV) वैध ड्रायव्हिंग लायसन्स
  • Karnataka Motor Vehicle Act ची इतर कोणतीही अट जॉइनिंगपासून 3 महिन्यांच्या आत पूर्ण करावी लागेल

Heavy Vehicle Driver-A (पद क्र. 11)

  • 10वी पास किंवा समतुल्य
  • एकूण 5 वर्षांचा अनुभव, त्यापैकी किमान 3 वर्षे Heavy Vehicle Driver म्हणून आणि उरलेला अनुभव Light Motor Vehicle चालवण्याचा
  • वैध HVD लायसन्स आणि कायद्याने आवश्यक असल्यास Public Service Badge

👉 Public Service Badge ज्या राज्यात अनिवार्य नाही, त्या राज्यातील उमेदवारांनी Karnataka मध्ये जॉइन केल्यापासून 3 महिन्यांत ही अट पूर्ण करावी लागेल.

❌ निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत. फक्त परीक्षा पास झालेले उमेदवारच पात्र आहेत.

ISRO URSC Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

सर्व पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे.

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
OBC+3 वर्षे (फक्त OBC साठी राखीव जागांवर)
SC / ST+5 वर्षे (फक्त SC/ST साठी राखीव जागांवर)
PwBD, माजी सैनिक, केंद्र सरकारी कर्मचारी, गुणवंत खेळाडूभारत सरकारच्या नियमानुसार
विधवा, घटस्फोटित महिला, पतीपासून न्यायालयीन विभक्त व पुनर्विवाह न केलेल्या महिलाभारत सरकारच्या नियमानुसार

👉 ज्या पदासाठी जागा राखीव नाहीत, तिथे SC/ST/OBC/EWS उमेदवारांना UR उमेदवारांप्रमाणेच अर्ज करावा लागेल आणि कोणतीही वयोमर्यादा सवलत मिळणार नाही.

⚠️ वयाची गणना 13 नोव्हेंबर 2026 नुसार केली जाईल.

ISRO URSC Bharti 2026: पगार (Salary)

पदाचे नावPay Levelपगार
Technician-BLevel 3₹21,700 प्रति महिना + भत्ते
Light Vehicle Driver-A / Staff Car Driver-A / Heavy Vehicle Driver-ALevel 2₹19,900 प्रति महिना + भत्ते

अतिरिक्त फायदे

  • National Pension System (NPS) / Unified Pension Scheme (UPS)
  • मोफत वाहतूक सुविधा (Transport Allowance ऐवजी)
  • मर्यादित निवास सुविधा (HRA ऐवजी)
  • कॉम्प्युटर खरेदी आणि घर बांधकामासाठी Advance
  • Leave Travel Concession (LTC)
  • Group Insurance
  • सवलतीच्या दरातील कॅन्टीन
  • कर्मचारी व पात्र अवलंबितांसाठी वैद्यकीय योजना

👉 ही केंद्र सरकारच्या ISRO सारख्या प्रतिष्ठित संस्थेतील सुरक्षित आणि चांगल्या सुविधांची सरकारी नोकरी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातील भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

👉 जाहिरातीनुसार लेखी परीक्षा / CBT बेंगळुरू किंवा भारतातील विविध शहरांमध्ये होईल. मात्र परीक्षा केंद्रांची नेमकी यादी अजून जाहीर झालेली नाही.

⚠️ Skill Test मात्र फक्त बेंगळुरूमध्येच होईल, त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांना Skill Test साठी बेंगळुरूला जावे लागेल.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. उलट जाहिरातीत स्पष्टपणे सांगितले आहे की सरकारला लिंग-संतुलित कर्मचारीवर्ग हवा आहे, त्यामुळे महिला आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांना अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

ISRO URSC Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

1️⃣ Screening

अर्जामध्ये दिलेल्या शैक्षणिक गुण आणि इतर निकषांवर आधारित सुरुवातीला Screening होईल. फक्त Screening मध्ये निवड झालेल्या उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.

2️⃣ लेखी परीक्षा / CBT

3️⃣ Skill Test (फक्त qualifying स्वरूपाची)

4️⃣ Document Verification

❌ जाहिरातीत Interview चा कोणताही उल्लेख नाही.

Technician-B परीक्षा पॅटर्न

परीक्षातपशील
लेखी परीक्षा80 MCQ प्रश्न, 1.5 तास
मार्किंगबरोबर उत्तराला +1, चुकीच्या उत्तराला −0.33
अभ्यासक्रमITI ट्रेडच्या Curriculum वर आधारित
Skill Test100 गुण, Qualifying स्वरूप
प्रवर्गलेखी परीक्षा पासिंगSkill Test पासिंग
Unreserved32/8050/100
Reserved (पद राखीव असल्यासच)24/8040/100

👉 लेखी परीक्षेतील गुणांवर 1:5 प्रमाणात (किमान 10 उमेदवार) Skill Test साठी निवड होईल.

👉 लेखी परीक्षा व शैक्षणिक गुण समान आल्यास NAC धारक उमेदवारांना प्राधान्य मिळेल.

Driver पदांसाठी परीक्षा पॅटर्न

लेखी परीक्षा 100 MCQ प्रश्नांची, 120 मिनिटांची (2 तास) असेल.

भागविषयप्रश्न
Part AMotor Vehicles Act, 198850
Part B8वी स्तराचे इंग्रजी15
Part C10वी स्तराचे अंकगणित15
Part Dसामान्य ज्ञान20
एकूण100

सविस्तर अभ्यासक्रम:

  • Part A: Motor Vehicles Act ची विविध कलमे, ड्रायव्हर लायसन्सिंग, वाहन नोंदणी, Transport वाहनांचे नियंत्रण, Traffic नियंत्रण, वाहन विमा, गुन्हे-दंड-प्रक्रिया, अनिवार्य वाहतूक चिन्हे, अपघात दावे आणि Accident Claims Tribunal
  • Part B: Synonyms, Antonyms, योग्य क्रियापदाचा वापर, रिकाम्या जागा भरणे
  • Part C: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, गुणोत्तर, सरासरी
  • Part D: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, Who is Who, भारतातील राज्ये व राजधान्या, भारताचा भूगोल

⚠️ Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण कापले जातील.

👉 पास होण्यासाठी Part A मध्ये 50% आणि Part B, C, D मध्ये एकत्रित 50% गुण आवश्यक आहेत. राखीव पदांवर राखीव प्रवर्गाला पासिंग गुणांमध्ये 25% सवलत मिळेल.

👉 Skill Test (Driving Test) 100 गुणांची असेल आणि पास होण्यासाठी 60 गुण आवश्यक आहेत. Skill Test मध्ये कोणत्याही प्रवर्गाला सवलत नाही.

👉 लेखी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांमधून 1:10 प्रमाणात Skill Test साठी निवड होईल.

ISRO URSC Bharti 2026: अर्ज फी

या भरतीची फी पद्धत थोडी वेगळी आहे. सुरुवातीला सर्व उमेदवारांना ₹500 भरावे लागतील आणि लेखी परीक्षेला हजर राहिल्यास रक्कम परत मिळेल.

प्रवर्गभरायची फीलेखी परीक्षेला हजर राहिल्यास परत
General / OBC / EWS₹500₹400 परत (₹100 कापले जातील)
महिला / SC / ST / PwBD / माजी सैनिक₹500पूर्ण ₹500 परत

👉 फी Online पद्धतीने Bharatkosh पोर्टलवरून भरावी लागेल: Internet Banking, Debit Card, Credit Card (Domestic) किंवा UPI.

👉 Cash, Cheque, DD, Money Order किंवा IPO द्वारे फी स्वीकारली जाणार नाही.

⚠️ लेखी परीक्षेला गैरहजर राहिल्यास कोणताही रिफंड मिळणार नाही.

👉 पेमेंटचा सर्व्हिस चार्ज उमेदवाराला भरावा लागेल.

ISRO URSC Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ पासपोर्ट साईज फोटो (पांढरी पार्श्वभूमी, 6 महिन्यांपेक्षा जुना नसावा, 3.5 cm × 4.5 cm, JPG/JPEG, 100 KB ते 200 KB) ✔️ स्वाक्षरी (JPG/JPEG, 80 KB ते 150 KB) ✔️ 10वी प्रमाणपत्र / मार्कशीट ✔️ ITI / NTC / NAC प्रमाणपत्र (Technician-B साठी) ✔️ वैध ड्रायव्हिंग लायसन्स (Driver पदांसाठी) ✔️ ड्रायव्हिंग अनुभव प्रमाणपत्र (Driver पदांसाठी) ✔️ Public Service Badge (HVD साठी, लागू असल्यास) ✔️ जात प्रमाणपत्र – SC/ST/OBC (लागू असल्यास) ✔️ EWS Income & Asset Certificate (लागू असल्यास) ✔️ PwBD प्रमाणपत्र / UDID कार्ड (लागू असल्यास) ✔️ माजी सैनिक Discharge Certificate (लागू असल्यास) ✔️ NOC (सरकारी नोकरीत असल्यास) ✔️ वैध Email ID आणि मोबाईल नंबर ✔️ रिफंडसाठी बँक खात्याचे तपशील

ISRO URSC Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ अर्ज Submit केल्यानंतर Edit करता येणार नाही

एकदा अर्ज Submit केला की त्यात बदल करता येत नाही. चूक झाल्यास पुन्हा नवीन अर्ज करावा लागेल आणि फी भरलेला सर्वात नवीन अर्जच ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे Final Submit करण्यापूर्वी सर्व माहिती दोनदा तपासा.

❗ अनुभव लायसन्स मिळाल्यानंतरचाच ग्राह्य

ड्रायव्हर पदांसाठी लागणारा 3 किंवा 5 वर्षांचा अनुभव हा वैध लायसन्स मिळाल्याच्या तारखेनंतरचाच धरला जाईल. लायसन्सपूर्वीचा अनुभव मोजला जाणार नाही.

❗ खाजगी व्यक्तीचे अनुभव प्रमाणपत्र चालणार नाही

अनुभव प्रमाणपत्र फक्त सरकारी / निमसरकारी संस्था, नोंदणीकृत कंपनी, सोसायटी किंवा ट्रस्ट यांचेच चालेल. एखाद्या व्यक्तीकडे खाजगी ड्रायव्हर म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही.

❗ Part-time अनुभव मोजला जाणार नाही

अनुभवाची वर्षे मोजताना Part-time काम ग्राह्य धरले जाणार नाही.

❗ भारतात कुठेही पोस्टिंग आणि 24 तास Shift

निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग गरजेनुसार भारतातील कोणत्याही ISRO / DoS केंद्रात होऊ शकते. तसेच Round the clock shifts मध्ये काम करावे लागू शकते.

❗ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NOC अनिवार्य

केंद्र / राज्य सरकार, PSU किंवा स्वायत्त संस्थेत नोकरी करत असाल तर Skill Test वेळी मूळ NOC द्यावी लागेल. NOC नसल्यास Skill Test ला बसू दिले जाणार नाही, उमेदवारी रद्द होईल आणि प्रवास भत्ता (TA) सुद्धा मिळणार नाही.

❗ Email वरच येणार Hall Ticket

Hall Ticket / Call Letter फक्त Email वर पाठवले जाईल, कोणतीही Hard Copy येणार नाही. Spam / Junk Folder सुद्धा नियमित तपासा. Email ID किंवा मोबाईल नंबर बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही.

❗ Karnataka Motor Vehicle Act ची अट

ड्रायव्हर पदांसाठी Karnataka राज्याच्या Motor Vehicle Act ची कोणतीही अतिरिक्त अट जॉइनिंगपासून 3 महिन्यांच्या आत पूर्ण करावी लागेल.

❗ HVD ला दोन्ही वाहने चालवावी लागतील

Heavy Vehicle Driver-A म्हणून निवड झाल्यास गरजेनुसार हेवी आणि लाइट दोन्ही प्रकारची वाहने चालवावी लागतील.

❗ जास्त शिक्षणाचा फायदा मिळणार नाही

किमान पात्रतेपेक्षा जास्त शिक्षण किंवा अनुभव असल्यास इतर पात्र उमेदवारांपेक्षा कोणतेही प्राधान्य मिळणार नाही.

❗ Biometric Verification

विविध टप्प्यांवर फोटो, अंगठ्याचा ठसा आणि IRIS Scan घेतले जातील. यात कोणतीही विसंगती आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.

❗ EWS प्रमाणपत्राची अट

EWS उमेदवारांनी वर्ष 2025-26 चे आणि आर्थिक वर्ष 2026-27 साठी वैध असलेले Income & Asset Certificate, जाहिरातीतील Annexure-A च्या नमुन्यातच द्यावे लागेल.

❗ PwBD साठी किमान 40% दिव्यांगता

किमान 40% संबंधित दिव्यांगता असलेल्या उमेदवारांनाच आरक्षण व सवलतीचा लाभ मिळेल. UDID कार्ड किंवा विहित नमुन्यातील दिव्यांगता प्रमाणपत्र आवश्यक आहे.

❗ बनावट नियुक्तीपत्रांपासून सावध

ISRO ने स्पष्टपणे सांगितले आहे की बनावट नियुक्तीपत्रे, बनावट वेबसाइट्स आणि दलालांपासून सावध राहा. कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी केल्यास उमेदवार थेट अपात्र ठरेल.

ISRO URSC Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in किंवा www.ursc.gov.in ला भेट द्या.

Step 2

Careers / Recruitment विभागात जाऊन जाहिरात क्र. URSC:04:2026 ची लिंक उघडा.

Step 3

Online Registration करा. मिळालेला Registration Number जपून ठेवा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details (10वी, ITI / लायसन्स आणि अनुभव)
  • Category Information
  • Email ID, मोबाईल नंबर आणि बँक खात्याचे तपशील

Step 5

फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्रे दिलेल्या साईजमध्ये Upload करा.

Step 6

Bharatkosh पेमेंट गेटवेवरून ₹500 Application Fee भरा.

Step 7

सर्व माहिती तपासून Final Submit करा आणि अर्जाची Print घ्या.

👉 NCS (National Career Service) पोर्टलवर नोंदणीकृत पात्र उमेदवार सुद्धा ISRO च्या Careers पेजवरून अर्ज करू शकतात.

ISRO URSC Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • ISRO सारख्या जगप्रसिद्ध अंतरिक्ष संस्थेत काम करण्याची संधी
  • केंद्र सरकारचा Pay Level 2 / 3 पगार आणि भत्ते
  • मोफत वाहतूक, निवास सुविधा आणि वैद्यकीय योजना
  • NPS / UPS पेन्शन लाभ
  • Technician-B साठी Merit Promotion Scheme, ज्यात पदोन्नती रिक्त जागांवर अवलंबून नसते
  • Job Security
  • All India Exposure / Career Growth

ISRO URSC Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • 10वी + ITI (Electronics, Fitter, Electrician, R&AC, Turner, Machinist, MV Mechanic, Electroplater) पास उमेदवार
  • अनुभवी हेवी आणि लाइट वाहन ड्रायव्हर्स
  • सध्या कंपनी, संस्था किंवा ट्रस्टमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणारे उमेदवार
  • Government Job ची तयारी करणारे ITI धारक
  • केंद्र सरकारची सुरक्षित नोकरी शोधणारे उमेदवार
  • माजी सैनिक (त्यांच्यासाठी मोठ्या संख्येने जागा राखीव)

ISRO URSC Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
जाहिरात दिनांक24 ऑक्टोबर 2026
अर्ज सुरू24 ऑक्टोबर 2026 (सायं. 5:00)
शेवटची तारीख13 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:55)
फी भरण्याची शेवटची तारीख13 नोव्हेंबर 2026
पात्रतेची निर्णायक तारीख13 नोव्हेंबर 2026
परीक्षा तारीखजाहीर होईल
Admit Cardपरीक्षेपूर्वी Email वर पाठवले जाईल

ISRO URSC Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
URSC वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

ISRO URSC Bharti 2026: FAQs

ISRO URSC Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

या भरतीमध्ये एकूण 61 जागा आहेत. त्यापैकी Technician-B च्या 46 जागा आणि ड्रायव्हर पदांच्या 15 जागा आहेत.

Technician-B साठी पात्रता काय आहे?

10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये NCVT कडून ITI / NTC / NAC असणे आवश्यक आहे.

Heavy Vehicle Driver-A साठी किती अनुभव लागतो?

एकूण 5 वर्षांचा अनुभव लागतो, त्यापैकी किमान 3 वर्षे Heavy Vehicle Driver म्हणून आणि उरलेला अनुभव Light Motor Vehicle चालवण्याचा असावा. सोबत वैध HVD लायसन्स आवश्यक आहे.

Light Vehicle Driver-A साठी काय पात्रता आहे?

10वी पास, Light Vehicle Driver म्हणून 3 वर्षांचा अनुभव आणि हलक्या वाहनाचा वैध लायसन्स आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती आहे?

सर्व पदांसाठी 18 ते 35 वर्षे. SC/ST ला 5 वर्षे आणि OBC ला 3 वर्षे सवलत फक्त त्यांच्यासाठी राखीव जागांवरच मिळेल.

पगार किती आहे?

Technician-B साठी ₹21,700 प्रति महिना (Level 3) आणि ड्रायव्हर पदांसाठी ₹19,900 प्रति महिना (Level 2), त्यासोबत लागू भत्ते.

निवड प्रक्रिया काय आहे?

Screening, लेखी परीक्षा / CBT, Skill Test आणि Document Verification. Technician-B साठी Curriculum आधारित Skill Test आणि ड्रायव्हरसाठी Driving Test होईल.

Negative Marking आहे का?

हो. Technician-B परीक्षेत चुकीच्या उत्तराला 0.33 गुण आणि ड्रायव्हर परीक्षेत 0.25 गुण कापले जातील.

अर्ज फी किती आहे?

सर्व उमेदवारांना ₹500 भरावे लागतील. लेखी परीक्षेला हजर राहिल्यास General/OBC/EWS ला ₹400 परत मिळतील, तर महिला, SC, ST, PwBD आणि माजी सैनिकांना पूर्ण ₹500 परत मिळतील.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, ही All India भरती आहे. मात्र Skill Test फक्त बेंगळुरूमध्ये होईल.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, महिला उमेदवार अर्ज करू शकतात. जाहिरातीत महिला आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांना अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

शेवटची तारीख कधी आहे?

ऑनलाइन अर्जाची आणि फी भरण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:55) आहे.

इतर भरती अपडेट्स

RRB Isolated Bharti 2026: रेल्वेमध्ये भरती! पगार ₹44,900 पर्यंत, 10वी/१२वी/ग्रॅज्युएशन पास, लगेच इथून बघा

North Western Railway Bharti 2026: उत्तर पश्चिम रेल्वेत भरती! 2008 जागा, 10वी+ITI पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2026: एलआयसी हाउसिंग फायनान्स भरती! ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

RRB Station Master Bharti 2026: रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदांची भरती! पगार ₹35,400 पासून, ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, सर्व माहिती इथून बघा

EIL Bharti 2026: इंजिनियर्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती! लेखी परीक्षा नाही, B.E./B.Tech/B.Sc(Engg.) पास, लगेच इथून अर्ज करा

ISRO SDSC SHAR Bharti 2026: इस्रो मध्ये भरती! 10वी/ITI/Diploma आणि ग्रॅज्युएशन पास, लगेच इथून अर्ज करा

UCO Bank Apprentice Bharti 2026: युको बँकेत भरती! Apprentice, ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

BHEL Bharti 2026: भेल मध्ये भरती! पगार ₹६५,०००, 10वी/ITI पास, लगेच इथून अर्ज करा

CWC Bharti 2026: वखार महामंडळात परमनंट भरती! B.sc/ग्रॅज्युएशन पासवर, लगेच इथून अर्ज करा

Indian Army TES Bharti 2026: भारतीय सेनेत भरती! पगार ₹56,100 पासून, १२वी पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

CRPF Sports Quota Bharti 2026: CRPF स्पोर्ट कोटा भरती! पगार ₹81,100 पर्यंत, १०वी/१२वी पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment