Swadhar Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये आपण Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana संबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
राज्य शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या या अभिनव अशा योजने मार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक सहाय्यता स्कॉलरशिप च्या स्वरूपात अर्जदार विद्यार्थ्यांना मिळते.
या योजनेला Swadhar Maharashtra Scholarship Yojana असे देखील म्हंटले जाते, या योजनेच्या माध्यमातून 10 वी, 12 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस आर्थिक मदत मिळते, जेणेकरून गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना देखील शिक्षण घेता येईल.
यासोबतच जे विद्यार्थी Degree चे शिक्षण घेत आहेत, म्हणजे पदवी शिक्षण (B.A, B.Com, B.Sc) तसेच जे विद्यार्थी डिप्लोमा कोर्स करत आहेत, त्यांच्यासाठी आणि जे विद्यार्थी Professional Course करत आहेत, उदाहरणार्थ CA, CS, CMA तर अशा सर्व विद्यार्थ्यांना देखील Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra चा लाभ मिळणार आहे.
Swadhar Yojana द्वारे मिळणारी स्कॉलरशिप रक्कम ही 51,000 रुपये एवढी आहे, म्हणजे वर सांगितलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी एवढी आर्थिक मदत मिळणार आहे. ही मदत शैक्षणिक वर्षानुसार अर्जदार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana साठी कोणते विद्यार्थी पात्र असणार? आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार? स्कॉलरशिप ची रक्कम कशी मिळणार? स्वाधार योजने साठी अर्ज कसा करायचा? अशी सर्व महत्त्वाची माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे. जर तुम्ही या योजनेसाठी इच्छुक असाल, तर कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या, आणि सांगितल्या प्रमाणे Swadhar Yojana Apply Online अर्ज सादर करा.
Swadhar Yojana Maharashtra 2024
योजनेचे नाव | Swadhar Yojana Maharashtra |
सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश | गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी अर्थ सहाय्य करणे. |
लाभार्थी | महाराष्ट्रातील अनुसुचित जाती, जमाती नवबौध्द समाजातील शिक्षण घेणारे विद्यार्थी. |
लाभ | शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी 51,000 रुपये एवढी आर्थिक मदत करणे. |
अधिकृत संकेतस्थळ | sjsa.maharashtra.gov.in |
Swadhar Yojana Maharashtra Qualification Details (स्वाधार योजना पात्रता निकष)
स्वाधार योजना महाराष्ट्र साठी राज्य सरकारने काही पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार या पात्रता निकषांमध्ये जे विद्यार्थी किंवा अर्जदार येतील त्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे.
स्वाधार योजना पात्रता निकष:
- स्वाधार योजनेसाठी अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी नागरिक असला पाहिजे.
- राज्यातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि नवबौध्द समाजातील विद्यार्थीच केवळ या स्वाधार योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- तसेच अर्जदार उमेदवार हा इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, डिप्लोमा, प्रोफेशनल कोर्स यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा, तसेच तो चालू वर्षात शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्याचे प्रवेश हा Regular Student या स्वरूपात झालेला असावा. मुक्त विद्यापीठातून प्रवेश घेतलेला विद्यार्थी या स्वाधार योजने साठी पात्र असणार नाही.
- अर्जदाराने मागील शैक्षणीक वर्षात किमान 60% टक्के एवढे गुण मिळवलेले असावेत, दिव्यांग विद्यार्थ्यांना 20% गुणांची सूट देण्यात आली आहे, त्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात केवळ 40% टक्के एवढे मार्क मिळालेले असावेत.
- अर्जदार कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे, म्हणजे विद्यार्थी हा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील असावा.
थोडक्यात वरील प्रमाणे आधारी योजनेसाठी पात्रता निकष स्पष्ट करता येतील, जे उमेदवार हे निकष पूर्ण करतील केवळ अशाच विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
Swadhar Yojana Maharashtra Benifits (स्वाधार योजना लाभ आणि फायदे)
स्वाधार योजनेचे बरेचसे फायदे आहेत, यामध्ये आर्थिक फायद्या सोबतच शिक्षणासाठी देखील मोठा लाभ होणार आहे. गरिबांना देखील उच्च शिक्षण या योजनेच्या माध्यमातून घेता येणार आहे.
- पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या माध्यमातून शिक्षणासाठी तब्बल 51,000 रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे.
- अनुदान रक्कमेच्या माध्यमातून विद्यार्थी हॉस्टेल चा खर्च, जेवणाचा खर्च, शिक्षणाची फी वैगेरे देऊ शकेल.
- यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, याचा विद्यार्थ्यांना सोबतच त्यांच्या पालकांना पण मोठा फायदा होणार आहे.
- या अनुदान स्कॉलरशिप च्या माध्यमातून आर्थिक अडचणी दूर करता येणार आहेत, त्यामुळे विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन रोजगार मिळवून आपल्या कुटुंबाला चांगल्या रीतीने सांभाळू शकेल, जबाबदारी घेऊ शकेल.
Swadhar Yojana Maharashtra Document List (स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे)
स्वाधार योजनेसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यामुळे स्वाधार योजना फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे, जर कागदपत्रे सादर केले नाही, तर विद्यार्थ्याचा अर्ज हा स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे अर्जासोबत आवश्यक हे खाली सांगितलेले कागदपत्रे डॉक्युमेंट जोडा.
स्वाधार योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
- स्वाधार योजना फॉर्मचा अर्ज नमुना
- इयत्ता 10 वी पास प्रमाणपत्र (मार्कशीट)
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टीसी)
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांच्या वडिलांचा (पालकांचा) जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट)
- विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याचे दिव्यांग प्रमाणपत्र
- चालू आर्थिक वर्षातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (2.5 लाखा पेक्षा कमी असावे)
- विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक (झेरॉक्स प्रत)
- विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहत नसल्याचे शपथपत्र
- विद्यार्थ्याचे रहिवासी प्रमाणपत्र
- घोषणापत्र (विद्यार्थ्यांच्या आई – वडिलांचे)
- विद्यार्थी ज्या शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकत आहे, तेथील प्राध्यापक, किंवा मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र
- विद्यार्थ्याचे कुटुंब BPL धारक असेल तर फायदा
थोडक्यात वर जे कागदपत्रे सांगितले आहेत ते सर्व कागदपत्रे स्वाधार योजनेच्या फॉर्म सोबत जोडायचे आहेत. त्यानंतरच अर्ज सादर करायचा आहे, अन्यथा वर सांगितल्या प्रमाणे स्वाधार योजनेचा तुमचा फॉर्म Approved होणार नाही.
Swadhar Yojana Maharashtra Application Form (स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा)
स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा सुविधा उपलब्ध नाही. उमेदवार अर्जदारांना ऑफलाईन स्वरूपात स्वतः कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा फॉर्म सादर करावा लागतो.
योजनेसाठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज दिला आहे, स्वाधार योजना फॉर्म PDF Download करण्यासाठी येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अर्ज Download करून घ्या.
अर्ज डाऊनलोड केल्यानंतर अर्जा मध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे, माहिती अचूक स्वरूपाची असावी, अर्ज अचूक स्वरूपात सादर करणे अपेक्षित आहे.
अर्जामध्ये सुरुवातीला तुमचे नाव, पत्ता, Personal Information विचारली जाईल, त्यांनतर इतर माहिती विचारली जाईल. ती सर्व माहिती तुम्हाला भरणे अनिवार्य आहे. माहिती भरल्याशिवाय अर्ज सादर करू नका.
फॉर्म हा योग्य रित्या भरून झाल्यावर, स्वाधार योजना फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. वर दिलेले सर्व कागदपत्रे असावेत, सोबतच काही वेळा इतर कागदपत्रे देखील विचारले जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला कार्यालयात जाऊन एकदा चौकशी करून घ्यायची आहे.
स्वाधार योजनेचा फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर त्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाजकल्याण कार्यालयात जाऊन तिथे हा स्वाधार योजनेचा अर्ज सादर करायचा आहे, सोबत कागदपत्रे जोडायला विसरू नका.
समाज कल्याण कार्यालयात स्वाधार योजनेचा अर्ज दिल्यानंतर, कार्यालयातील अधिकाऱ्याद्वारे तुमच्या स्वाधार योजनेच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. कागदपत्रांची पडताळणी देखील केले जाईल, त्यानंतर तुम्ही जर स्वाधार योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
Swadhar Yojana Maharashtra FAQ
स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
स्वाधार योजना महाराष्ट्र साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध नाही, उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा लागेल.
स्वाधार योजना साठी कोण पात्र आहे?
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नव बौद्ध समाजातील विद्यार्थी पात्र असणार आहेत.
स्वाधार योजना अंतर्गत किती रुपये मिळणार?
स्वाधार योजनेद्वारे पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 51,000 रुपये दिले जाणार आहेत.
Job
College