RRB NTPC Bharti 2024: भारतीय रेल्वेमध्ये विविध जागांसाठी मोठी भरती निघाली आहे, रेल्वेमध्ये जर जॉब पाहिजे असेल तर लगेच या भरतीसाठी अर्ज करून टाका
ही संधी पुन्हा येणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर भारतीय रेल्वे भरतीसाठी फॉर्म भरा. ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
तब्बल 11,558 रिक्त जागा रेल्वे मार्फत सोडण्यात आले आहेत, या सर्व रिक्त जागा RRB NTPC Bharti 2024 अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
ग्रॅज्युएशन पास उमेदवारांना मोठी नामी संधी आहे, सोबतच याच उमेदवारांना भरतीसाठी प्राधान्य देखील दिले जाणार आहे. अर्ज सुरू झाले आहेत त्यामुळे लवकर फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला देखील रेल्वेत जॉब करता येईल.
RRB NTPC Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे |
रिक्त जागा | 11,558 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 29,200 रु. |
वयाची अट | 18 ते 33, 36 वर्षे |
भरती फी | साधारण प्रवर्ग :- ₹500/- [मागासवर्ग :- ₹250/-] |
RRB NTPC Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर | 1736 |
स्टेशन मास्टर | 994 |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 3144 |
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट | 1507 |
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट | 732 |
Total | 8113 |
पदाचे नाव | पद संख्या |
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) | 2022 |
अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट | 361 |
ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट | 990 |
ट्रेन्स क्लर्क (लिपिक) | 72 |
Total | 3445 |
RRB NTPC Bharti 2024 Education Qualification
पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, याची माहिती खाली दिली आहे.
पदाचे नाव | शिक्षण |
कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर | पदवीधर |
स्टेशन मास्टर | पदवीधर |
गुड्स ट्रेन मॅनेजर | पदवीधर |
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट | पदवीधर, संगणकावर इंग्रजी/ हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक. |
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट | पदवीधर, संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक. |
पदाचे नाव | शिक्षण |
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण |
अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग |
ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग |
ट्रेन्स क्लर्क (लिपिक) | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण |
RRB NTPC Bharti 2024 Last Date
टप्पा 1 | 20 ऑक्टोबर 2024 |
टप्पा 2 | 20 ऑक्टोबर 2024 |
RRB NTPC Bharti 2024 Apply Online
रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे.
स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिली आहे ती माहिती फॉलो करा आणि त्या प्रकारे फॉर्म भरा.
भरतीचा फॉर्म | Apply Online (1) Apply Online (2) |
जाहिरात | Download करा (1) Download करा (2) |
- सुरुवातीला तुम्हाला भारतीय रेल्वेच्या रिक्रुटमेंट पोर्टल वर जायचे आहे.
- तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी केल्यावर लॉगिन करायचा आहे.
- लॉगिन करून झाल्यानंतर रेल्वे भरती चा फॉर्म उघडेल.
- तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे ते पद निवडा.
- फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरा.
- जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- भरतीसाठी लागणारी परीक्षा फी कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड मार्फत भरा.
- फॉर्म बरोबर भरला आहे का याची खात्री करा आणि त्यानंतर अर्ज सबमिट करून टाका.
RRB NTPC Bharti 2024 Selection Process
भारतीय रेल्वेची भरती ही टप्प्यानुसार होणार आहे, यामध्ये अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे असणार आहे.
- लेखी परीक्षा
- मेडिकल तपासणी
- अंतिम यादी
- निवड
ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे, त्यांना सुरुवातीला परीक्षा द्यायची आहे, परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना मेडिकल तपासणीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी बनवली जाईल, यादी मध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना भारतीय रेल्वे भरतीसाठी रिक्त जागांवर निवडले जाईल.
नवीन भरती अपडेट:
- North Central Railway Recruitment 2024, उत्तर मध्य रेल्वेत 10वी पास वर भरती, लगेच फॉर्म भरा
- ECGC Recruitment 2024, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन मध्ये ग्रॅज्युएशन पास भरती! लगेच अर्ज करा
RRB NTPC Bharti 2024 FAQ
Who is eligible for RRB NTPC Bharti?
भारतीय रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची शिक्षण ही किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असावे, सोबतच बारावी पास उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
How to apply for RRB NTPC Bharti 2024?
भारतीय रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे. अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.
What is the last date of RRB NTPC Bharti 2024 Applications?
रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही काहीशी वेगळी आहे. यामध्ये दोन भरती होणार आहेत, त्या दोन्ही भरतींची तारीख ही वर आर्टिकल मध्ये सांगितली आहे.