LG Scholarship Program 2024: पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 1 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LG Scholarship Program 2024: आजच्या या लेखात मी तुम्हाला LG द्वारे सुरु करण्यात आलेली Scholership योजना काय आहे? याचा फायदा कोणाला आणि कसा मिळणार? पात्रता निकष/ शैक्षणिक पात्रता काय आहेत? याची सविस्तर माहिती सांगणार आहे.

LG Scholarship Program 2024 अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यता दिली जाणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना वार्षिक स्वरुपात शिक्षणासाठी आर्थिक मदत LG द्वारे केली जाणार आहे. तब्बल 1 लाख रुपया पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

जे अर्जदार विद्यार्थी पदवीधर आहेत त्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा फायदा घेता येणार आहे, पण जर तुम्ही अजून तुमचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले नसेल तरी देखील तुम्ही दुसऱ्या मार्गाने या LG Scholarship Program चा फायदा घेऊ शकता, नव्हे तर तुम्हाला LG द्वारे वर्षाला 1,00,000 लाख रुपये देखील मिळतील.

LG Scholarship Program 2024

योजनेचे नावLG Scholarship Program 2024
योजनेची सुरुवातLG India
उद्देशगुणवंत आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे
लाभार्थीसर्व पदवीधर आणि पदवीचे शिक्षण चालू असलेले विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

LG Scholarship Program 2024 Eligibility

LG Scholarship Program 2024 साठी LG द्वारे काही पात्रता निकष जारी केले आहेत, त्यानुसार जे विद्यार्थी पात्र असतील केवळ त्यांना या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे.

  • अर्जदार विद्यार्थी हा किमान पदवीधर असावा.
  • विद्यार्थी चालू वर्षात पदवीचे शिक्षण घेत असावा.
  • जर विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षात असेल तर त्याला मागील वर्षी बारावी बोर्ड परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळालेले असावेत.
  • जर उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या पदवी वर्षात शिकत असतील तर त्याला मागील पदवीच्या वर्षात किमान 60 टक्के मिळालेले असणे अनिवार्य आहे.
  • सोबत अर्ज करणारा विद्यार्थी हा मेहनती शिकाऊ आणि हुशार गुणवंत असावा.
  • फक्त Buddy4Study आणि LG Electronics India Private Limited मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख पेक्षा कमी असावे.
  • जर जास्त अर्ज करण्यात आले तर केवळ गुणवंत आणि मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • या शिष्यवृत्ती साठी केवळ ठराविक कॉलेज मधील विद्यार्थी पात्र असणार आहेत, कॉलेज ची पहिली लिस्ट प्रसिद्ध झाली आहे, दुसरी लिस्ट अद्याप आलेली नाही.

LG Scholarship Program 2024 Benefits

अर्ज सादर केलेल्या आणि पात्र अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी एका वर्षाला 1 लाख रुपये दिले जाणार आहेत. पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्ती रक्कमेचा वापर केवळ Academic-related expenses साठी करू शकणार आहेत.

LG Scholarship Program 2024 Application Form Process

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 मे २०२४
  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या येथून ऑनलाईन अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. एकदा तुम्ही पेज वर गेलात कि तेथे तुम्हाला Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
  3. पुढे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, एकदा नोंदणी करून झाली कि मग तुमच्या समोर शिष्यवृत्तीचा फॉर्म येईल.
  4. तुम्हाला त्या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक योग्य प्रकारे भरून घ्यायचे आहे.
  5. माहिती भरून झाल्यावर तुम्हाला आवश्यक ते सर्व कागपत्रे अपलोड करायचे आहेत.
  6. त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म तपासून पहायचा आहे, आणि त्यानंतर अर्ज सबमिट करून टाकायचा आहे.

थोडक्यात तुम्ही वरील प्रमाणे LG Scholarship Program 2024 साठी तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता, जर तुम्ही शैक्षणिक आणि इतर बाबी मध्ये पात्र व्हाल तर तुम्हाला या शिष्यवृत्ती साठी निवडले जाईल.

LG Scholarship Program 2024 FAQ

Who is eligible for the LG Scholarship Program 2024?

LG Scholarship Program 2024 साठी पदवीधर आणि पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. यासाठी काही इतर निकष देखील लागू करण्यात आले आहेत त्याची माहिती तुम्ही वर लेखातून घेऊ शकता.

How to Apply for the LG Scholarship Program 2024?

LG Scholarship Program साठी ऑनलाईन स्वरुपात buddy4study या पोर्टल वरून अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही स्वरुपात अर्ज करता येणार नाही.

What are the Benefits of the LG Scholarship Program 2024?

LG Scholarship Program 2024 द्वारे गुणवंत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी एका वर्षाला 1 लाख रुपये एवढी मोठी आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे.

4 thoughts on “LG Scholarship Program 2024: पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 1 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a comment