Top 5 Study Abroad Scholarships After 12th: पूर्ण ट्युशन फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च मिळेल! अर्ज प्रक्रिया, फायदे आणि पात्रता!

Top 5 Study Abroad Scholarships After 12th. 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. मात्र शिक्षणाचा खर्च, राहणीमान, आणि प्रवास यामुळे हे स्वप्न अपूर्णच राहतं. पण काही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था आणि सरकारकडून दिल्या जाणाऱ्या Fully Funded Scholarshipsमुळे आता हे स्वप्न साकार होऊ शकतं.

या लेखामध्ये आपण अशाच टॉप 5 फुल्ली फंडेड स्कॉलरशिप्सची माहिती पाहणार आहोत, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रवास, राहणीमान याचे सर्व खर्च कव्हर करून दिल्या जातात. या स्कॉलरशिप्समुळे तुम्हाला जपान, कॅनडा, कोरिया आणि युके सारख्या देशांमध्ये नामांकित विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी मिळू शकते.

या स्कॉलरशिप्ससाठी पात्रता काय आहे? फायदे कोणते मिळतात? अर्ज कसा करायचा? निवड कशी होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत. त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा आणि योग्य तयारी करून तुमचं करिअर ग्लोबल लेव्हलवर घ्या!

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Top 5 Fully Funded Study Abroad Scholarships After 12th – माहिती

स्कॉलरशिप नाव देश फायदे
MEXT Scholarshipजपानट्यूशन फी, मासिक भत्ता, विमान भाडे
Lester B. Pearson Scholarshipकॅनडाट्यूशन फी, पुस्तके, राहणीमान
GKS Undergraduate Scholarshipदक्षिण कोरियापूर्ण शिक्षण, सेटलमेंट अलाऊन्स, प्रवास भत्ता
Reach Oxford ScholarshipUKट्यूशन फी, राहणीमान, प्रवास खर्च
UCL Global Undergraduate ScholarshipUKपूर्ण/अर्धवट ट्यूशन फी, जीवनावश्यक खर्च

1. MEXT Scholarship (Japan) – जपानी सरकारकडून फुल्ली फंडेड स्कॉलरशिप

MEXT Study Abroad Scholarships in Japan: पात्रता कोणासाठी आहे?

  • उमेदवार 12वी पास असावा (कला/विज्ञान/वाणिज्य)
  • वय मर्यादा: 17 ते 25 वर्षे
  • उत्तम शैक्षणिक रेकॉर्ड आवश्यक
  • इंग्रजी किंवा जपानी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक

MEXT Study Abroad Scholarships फायदे: MEXT स्कॉलरशिपचे लाभ

  • पूर्ण ट्यूशन फी
  • मासिक जीवनावश्यक भत्ता
  • राउंड ट्रिप विमान भाडे
  • निवास व विमा सुविधा

MEXT Study Abroad Scholarships How to Apply? : MEXT साठी कसे अर्ज करावे?

  1. जपानी दूतावासाच्या संकेतस्थळावर अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
  2. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा.
  3. इंग्रजी/जपानी भाषेतील लेखी परीक्षा व मुलाखतीसाठी तयारी ठेवा.
  4. अर्ज इतर कोणत्याही शिष्यवृत्तीला अर्ज केल्याशिवाय असावा.

MEXT Study Abroad Scholarships Selection Process: MEXT मधील निवड कशी होते?

  • प्राथमिक निवड: लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी
  • अंतिम निवड: मुलाखत
  • अंतिम मान्यता: जपानी सरकारमार्फत स्कॉलरशिप मंजुरी
  • Lester B. Pearson International Scholarship (Canada) – युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो कडून उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप

2. GKS Undergraduate Scholarship (South Korea) – कोरियन सरकारकडून फुल फंडेड स्कॉलरशिप

GKS Study Abroad Scholarships in South Korea: GKS म्हणजे काय?

  • उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा (80% पेक्षा जास्त गुण)
  • वय: 25 वर्षांखाली
  • कोरियन किंवा इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक
  • भारतीय नागरिक असावा

GKS Undergraduate Scholarship Benefit: GKS स्कॉलरशिपच्या सुविधा

  • ट्यूशन फी पूर्णपणे माफ
  • मासिक भत्ता (KRW 900,000)
  • सेटलमेंट allowance (KRW 200,000)
  • राउंड ट्रिप विमान तिकीट
  • कोरियन भाषेचं 1 वर्षाचं ट्रेनिंग

GKS Undergraduate Scholarship How to Apply? : GKS साठी अर्ज कसा करावा?

  1. Indian Embassy किंवा University Track द्वारे अर्ज: दोन मार्ग उपलब्ध आहेत – दूतावास मार्ग (Embassy Track) आणि युनिव्हर्सिटी मार्ग (University Track)
  2. अर्ज फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे कोरियन दूतावासात किंवा संबंधित युनिव्हर्सिटीत सादर करावीत
  3. SOP (Statement of Purpose), Recommendation Letters, Academic Certificates आवश्यक

GKS Undergraduate Scholarship Selection Process: GKS मधील निवड कशी होते?

  • Embassy/University द्वारे प्राथमिक छाननी
  • डॉक्युमेंट स्क्रूटनी आणि मुलाखत
  • अंतिम मान्यता National Institute for International Education (NIIED) कडून

3. Reach Oxford Scholarship (UK) – ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची गरीब व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप

Reach Oxford Scholarship पात्रता (Eligibility Details)

  • उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी
  • उच्च शैक्षणिक गुणवत्ता आवश्यक
  • स्वत:च्या देशात उच्च शिक्षण घेणे अशक्य असावे (राजकीय/सामाजिक/आर्थिक कारणांमुळे)
  • Oxford University च्या UG कोर्ससाठी अर्ज केलेला असावा

Reach Oxford Abroad Scholarships Benefits : Reach Oxford चे लाभ काय आहेत?

  • पूर्ण ट्यूशन फी माफ
  • वार्षिक राहणीमान भत्ता
  • एकदा ये-जा प्रवास भत्ता (UK-India)
  • 3 ते 4 वर्षांच्या संपूर्ण कोर्ससाठी ही स्कॉलरशिप लागू

Reach Oxford Study Abroad Scholarships How to Apply? : Reach Oxford साठी कसा अर्ज कराल?

  1. Oxford University मध्ये UCAS द्वारे UG कोर्ससाठी अर्ज करा (सामान्य अर्ज विंडोमध्ये)
  2. निवड झाल्यानंतर विशेष स्कॉलरशिप अर्ज फॉर्म भरावा लागतो (January पर्यंत)
  3. आर्थिक गरज, शैक्षणिक माहिती आणि Recommendation Letters यांची पूर्तता आवश्यक

Reach Oxford Study Abroad Scholarships Selection Process: Reach Scholarships Oxford निवड पद्धती

  • Oxford admission टीमकडून मुलाखत/प्रोफाइल समीक्षा
  • आर्थिक गरज + शैक्षणिक गुणवत्ता यावर आधारित निवड
  • अंतिम मंजुरी Scholarship Committee मार्फत

4. UCL Global Undergraduate Scholarship (UK) – University College London कडून गरजू आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी संधी

UCL Global Undergraduate Scholarship (UK) पात्रता (Eligibility Criteria)

  • उमेदवार 12वी पास असावा
  • घरात आर्थिकदृष्ट्या अडचणी असाव्यात (Low-Income Background)
  • UCL मध्ये UG कोर्ससाठी अर्ज केलेला असावा
  • इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक

UCL Global Undergraduate Scholarship (UK) Benefit: UCL कडून मिळणारे लाभ

  • पूर्ण किंवा अर्धवट ट्यूशन फी माफी
  • राहणीमान खर्चासाठी अतिरिक्त सहाय्य (काही निवडक विद्यार्थ्यांसाठी)
  • वर्षानुवर्षे शिष्यवृत्तीचा लाभ

Study Abroad Scholarships How to Apply: UCL साठी अर्ज करण्याची पद्धत

  1. UCAS द्वारे UCL च्या पदवी अभ्यासक्रमात अर्ज करा
  2. UCL Global Undergraduate Scholarship Application Portal वर लॉगिन करून अर्ज करा
  3. वैयक्तिक माहिती, आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक रेकॉर्ड आणि SOP आवश्यक

UCL Global Undergraduate Abroad Scholarships Selection Process: UCL स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया

  • आर्थिक गरज व शैक्षणिक गुणवत्ता यावर आधारित निवड
  • स्कॉलरशिप टीमकडून डॉक्युमेंट स्क्रूटनी व प्रोफाइल मूल्यांकन
  • निवड झाल्यानंतर ईमेलद्वारे कळवले जाते

5. Lester B. Pearson International Scholarship (Canada) – युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो कडून उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप

Lester B. Pearson International Scholarship पात्रता (Eligibility)

  • 12वी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी
  • शैक्षणिकदृष्ट्या उज्वल आणि लीडरशिप स्किल्स असणारे विद्यार्थी
  • समाजासाठी योगदान देणाऱ्या उपक्रमांमध्ये भाग घेतलेला असावा
  • केवळ University of Toronto मध्ये शिकण्यासाठीच लागू

Study Abroad Scholarships फायदे: Pearson Scholarship Benefit

  • ट्यूशन फी पूर्णपणे माफ
  • पुस्तके व शैक्षणिक साहित्याचा खर्च
  • राहणीमान व निवास खर्च
  • 4 वर्षांच्या संपूर्ण पदवी शिक्षणाचा खर्च कव्हर

Study Abroad Scholarships अर्ज प्रक्रिया: Pearson Scholarship How to Apply

  1. शाळेच्या माध्यमातून नामांकन: विद्यार्थ्याला त्याच्या शाळेने Lester B. Pearson स्कॉलरशिपसाठी नामांकित करणे आवश्यक आहे.
  2. University of Toronto मध्ये अर्ज: विद्यार्थ्याने युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटोच्या कोणत्याही UG कोर्ससाठी अर्ज करावा.
  3. Scholarship Application Link: विद्याथ्याला युनिव्हर्सिटीकडून स्कॉलरशिपसाठी स्पेशल लिंक मिळते, ज्या द्वारे तो अर्ज करू शकतो.
  4. अर्ज प्रक्रिया Online असून सर्व कागदपत्रे आणि Personal Essay आवश्यक आहे.

Pearson Study Abroad Scholarships Selection Process: Pearson Scholarship निवड प्रक्रिया

  • शाळेचा नामांकन पत्र आणि अर्ज यावर प्राथमिक स्क्रीनिंग होते
  • विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता, लीडरशिप पोटेन्शियल आणि समाजासाठी केलेल्या कामांची समीक्षा केली जाते
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना थेट युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटोमधील कोर्ससाठी प्रवेश दिला जातो

Top 5 Global Study Abroad Scholarships After 12th Apply Links-

स्कॉलरशिपचे नावदेशअर्ज लिंक
MEXT ScholarshipजपानApply Now
Lester B. Pearson ScholarshipकॅनडाApply Now
GKS Undergraduate Scholarshipदक्षिण कोरियाApply Now
Reach Oxford Scholarshipयुनायटेड किंगडम(UK)Apply Now
UCL Global Undergraduate Scholarshipयुनायटेड किंगडम
(UK)
Apply Now

इतर भरती

Top 10 Engineering Colleges in Pune – पुण्यातील टॉप कॉलेज Fee, Placements Admission Process! येथे पाहा!

Pune Top 20 Engineering Colleges Cutoff 2024: MHT-CET & JEE Details Branchwise आणि Categorywise!

Vanrakshak & Vansevak bharti 2025: 12वी आणि 10वी पासवर वनसेवक व वनरक्षक भरती 2025 जाहीर! 14,000+ जागांची मेगाभरती!

Top Career Options After 12th – AI/ML, Data Science या क्षेत्रांतील १२वी नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय!

CISF Sports Quota Bharti 2025: महाराष्ट्रातील 12वी पास खेळाडूंसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती! पगार ₹25,500-₹81,100/-

Top 5 Study Abroad Scholarships FAQs

12वी नंतर Study Abroad Scholarships साठी पात्रता काय असते?

12वी नंतर विदेशात शिक्षण घेण्यासाठी विविध Study Abroad Scholarships साठी पात्रता वेगवेगळी असते. पण बहुतांश स्कॉलरशिपसाठी उमेदवाराने 12वीत चांगले गुण मिळवलेले असावेत, इंग्रजी भाषा चाचणी (IELTS/TOEFL) दिलेली असावी आणि समाजसेवा, नेतृत्वगुण किंवा विशेष कौशल्य असलेले विद्यार्थीस प्राधान्य दिले जाते.

Study Abroad Scholarships साठी अर्ज कधी करावा लागतो?

विविध देशांतील Study Abroad Scholarships साठी अर्ज करण्याच्या तारखा वेगळ्या असतात. सहसा अर्ज प्रक्रिया 12वी नंतर लगेच सुरू होते. म्हणून, संबंधित अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट तपासणे महत्त्वाचे आहे.

Study Abroad Scholarships मध्ये संपूर्ण खर्च भरला जातो का?

होय, Fully Funded Study Abroad Scholarships मध्ये शिक्षण शुल्क, वसती, प्रवासखर्च, पुस्तके आणि काही वेळा मासिक भत्ता देखील समाविष्ट असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीशिवाय परदेशात शिक्षण घेता येते.

Study Abroad Scholarships साठी इंग्रजी टेस्ट लागते का?

होय, अनेक आंतरराष्ट्रीय Study Abroad Scholarships साठी IELTS, TOEFL किंवा तत्सम इंग्रजी भाषा चाचणी आवश्यक असते. ही पात्रता तपासण्यासाठी स्कॉलरशिपच्या अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

9 thoughts on “Top 5 Study Abroad Scholarships After 12th: पूर्ण ट्युशन फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च मिळेल! अर्ज प्रक्रिया, फायदे आणि पात्रता!”

Leave a comment