Talathi Selection Process: तलाठी कसे बनायचे? पात्रता निकष, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया

Talathi Selection Process: आजच्या या आर्टिकल मध्ये आपण तलाठी कसे बनायचे यासंबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच तलाठी या पदासाठी पात्रता निकष काय आहेत हे पण आपण या आर्टिकल मध्ये नमूद केले आहे.

जर तुमचे स्वप्न तलाठी बनण्याची आहे किंवा तुम्ही तलाठी या पदासाठी तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अशी माहिती आहे. काळजीपूर्वक या लेखामध्ये दिलेली प्रत्येक बाब वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला तलाठी भरती आणि निवड प्रक्रिया संबंधी सविस्तर माहिती मिळून जाईल.

Talathi Selection Process In Marathi

महाराष्ट्रामध्ये तलाठी पदावर नियुक्त होण्यासाठी अनेक तरुण तयारी करतात, परंतु काही तरुणांना तलाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड कोणत्या निकषांच्या आधारे होते याचीच माहिती नसते.

आर्टिकल मध्ये मी या सर्व बाबी सविस्तर रित्या सांगितल्या आहेत, महत्त्वाची माहिती आहे एक शब्द पण सोडू नका, आर्टिकल च्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक माहिती वाचा.

तलाठी भरतीसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते, आणि त्याद्वारेच उमेदवारांची तलाठी या पदासाठी निवड केली जाते. यासाठी इतर कोणत्याही स्वरूपाची अट लावण्यात आलेली नाही.

Talathi Bharti Qualification Details

तलाठी या पदासाठी महाराष्ट्र शासनाने काही पात्रता निकष जारी केले आहेत, त्यानुसार जे उमेदवार या पात्रता निकषांमध्ये येतील केवळ त्यांनाच तलाठी या पदासाठी अर्ज सादर करता येणार आहे.

तलाठी या पदासाठी शैक्षणिक पात्रता तसेच वयाची अट या दोन मुख्य बाबी पात्रता निकषांमध्ये दिलेल्या आहेत. याची सविस्तर माहिती तुम्ही खाली दिलेल्या पॉईंट्स च्या आधारे जाणून घेऊ शकता.

👨‍🏫 Education Qualification

तलाठी पदासाठी अर्जदार उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन डिग्री मिळवलेला असावा. तसेच उमेदवाराने कम्प्युटरचा (MS-CIT) कोणताही कोर्स केलेला असावा, सोबतच उमेदवाराला मराठी आणि हिंदी या भाषांचे चांगले ज्ञान असावे.

🔞 Age Limit

तलाठी बनण्यासाठी उमेदवाराची वय हे किमान एकोणवीस वर्षे ते 40 वर्षे असावे, जर उमेदवार 19 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर तो तलाठी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार नाही. सोबतच उमेदवाराची वय जर 40 पक्षांच्या जास्त असेल तरी देखील तो तलाठी पदासाठी अर्ज करू शकणार नाही.

केवळ मागासवर्गीय SC, ST, OBC आणि इतर प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 19 ते 45 वर्षे वयाची अट असणार आहे.

Talathi Writeen Exam Syllabus

तलाठी भरतीसाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम हा एकूण चार विषयांमध्ये असणार आहे, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी.

यामध्ये सर्व पेपर साठी प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातात, प्रती प्रश्न 2 मार्क असतात, म्हणजे एकूण 100 प्रश्न आणि त्यांचे एकूण गुण मार्क्स 200 होतात.

तलाठी परीक्षेसाठी Negative Marking System असणार आहे, म्हणजे चुकीच्या प्रश्नासाठी मार्क कट केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना विनंती आहे तुम्हाला जेवढे प्रश्न अचूक येतात तेवढेच सोडवा.

  • Exam Time – 2 घंटे
  • Difficulty Level – डिग्री Exam
विषयप्रश्नमार्क्स
मराठी2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी2550
100200

Talathi Selection Process

तलाठी भरती साठी उमेदवारांची निवड ही दोन स्टेज द्वारे केली जाणार आहे, यामध्ये पहिल्यांदा जेव्हा भरतीची नोटिफिकेशन जाहिरात निघाली तेव्हा उमेदवारांना स्वतःचे अर्ज सादर करायचे आहेत.

  • Writeen Exan (Online)
  • Interview
  • Document Verification

अर्ज सादर केल्यानंतर शासनाद्वारे आलेल्या अपडेट नुसार लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहे, लेखी परीक्षा ऑनलाईन सुरुवात पार पडणार आहे TCS किंवा इतर कोणत्याही Online Platform वर ही Exam Conduct केली जाणार आहे.

लेखी परीक्षा मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल, मुलाखत योग्यरीत्या पार पडल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे Document Verification होईल. जर उमेदवार या दोन्हीही स्टेजमध्ये पास झाले, तर त्यांना तलाठी पदासाठी नियुक्ती दिली जाईल.

Talathi Selection Process FAQ

Who is eligible for Talathi Bharti?

Talathi Bharti साठी अर्जदार उमेदवार हे किमान ग्रॅज्युएशन बॅचलर पदवी प्राप्त असावेत. जर उमेदवार ग्रज्युएट नसतील तर त्यांना तलाठी भरतीसाठी अर्ज सादर करता येणार नाही.

How to apply for Talathi Bharti?

Talathi Bharti साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा असतो, ज्यावेळी तलाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे.

What is the Age Limit of Talathi Post?

तलाठी पदासाठी जर उमेदवारांना अर्ज सादर करायचा असेल तर अर्जदार उमेदवाराचे वय किमान 19 वर्षे असणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त वय हे 40 वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षांची सूट वयोमर्यादा निकषांमध्ये देण्यात आलेली आहे.

What is the monthly salary of Talathi?

तलाठी पदासाठी शासनाद्वारे प्रत्येक महिन्याला 25,500 ते 81,100 रुपये एवढी Salary दिली जाते. अनुभवानुसार आणि कामानुसार व्यक्तीची सॅलरी पगार वाढू शकते.

2 thoughts on “Talathi Selection Process: तलाठी कसे बनायचे? पात्रता निकष, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया”

Leave a comment