NICL Bharti 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट क्लास थ्री या पदासाठी भरती निघाली आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी मार्फत या भरती संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.
जर तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता, फक्त ग्रॅज्युएशन पासवर ही भरती होणार आहे उच्च शिक्षण असेल तरीदेखील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 आहे, त्यामुळे जर इच्छा असेल तर त्वरा करा आणि लगेच फॉर्म भरा.
NICL Bharti 2024
पदाचे नाव | असिस्टंट |
रिक्त जागा | 500 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 39,000 रु. |
वयाची अट | 21 ते 30 वर्षे |
भरती फी | General/ OBC/ EWS: ₹850/- [SC/ ST/ ExSM: ₹100/-] |
NICL Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
असिस्टंट (क्लास III) | 500 |
Total | 500 |
NICL Bharti 2024 Education Qualification
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी केवळ एका पदावर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, यामध्ये असिस्टंट क्लास थ्री पदासाठी उमेदवारांची शिक्षण हे ग्रॅज्युएशन पर्यंत असणे आवश्यक आहे.
अर्जदार उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केले असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन पेक्षा कमी शिकलेले असाल किंवा दहावी बारावी डिप्लोमा केला असेल तर मात्र तुम्हाला संधी दिली जाणार नाही.
NICL Bharti 2024 Apply Online
नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 11 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा (Phase I) | 30 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा (Phase II) | 28 डिसेंबर 2024 |
- सुरुवातीला नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- तिथे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करा, त्यानंतर आयडी पासवर्ड द्वारे लॉगिन करा.
- करिअर पोर्टलचा डॅशबोर्ड उघडल्यानंतर तिथे तुम्हाला असिस्टंट क्लास थ्री पदाची एप्लीकेशन लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- भरतीचा ऑनलाइन फॉर्म उघडेल फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर परीक्षेसाठी जी परीक्षा फी सांगण्यात आली आहे ती भरून घ्या.
- परीक्षा फी भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पेमेंट मोडचा वापर करू शकता. या मध्ये फोन पे, गुगल पे, यू पी आय हे सर्व पर्याय उपलब्ध आहेत.
- एकदा का फी भरली की नंतर तुम्हाला या भरतीचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, तपासणी पूर्ण झाल्यानंतर चुक आढळली नसेल तर भरतीचा फॉर्म डायरेक्ट सबमिट करून टाकायचा आहे.
NICL Bharti 2024 Selection Process
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होणे गरजेचे आहे, यामध्ये प्रिलिमरी आणि मेन अशा दोन परीक्षा आहेत.
NICL Bharti Exam Phase 1:
NICL Bharti Exam Phase 2:
पूर्व परीक्षा ही 100 मार्काची होणार आहे तर मुख्य परीक्षा ही 200 मार्काची होणार आहे.
जे उमेदवार पूर्व परीक्षेमध्ये पास होतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल आणि जे मुख्य परीक्षेत पास होतील त्यांना रिजनल लैंग्वेज टेस्ट द्यावी लागेल. आणि त्या टेस्टच्या आधारे पात्र उमेदवार नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट क्लास थ्री पदासाठी निवडले जातील.
नवीन भरती अपडेट:
- PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा पास वर भरती, फॉर्म भरा
- GMC Kolhapur Bharti 2024: राजश्री शाहू महाराज महाविद्यालयात भरती, 10वी पास लगेच अर्ज करा
- ICDS Bharti 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती, ग्रॅज्युएशन पास अर्ज करा
NICL Bharti 2024 FAQ
Who is eligible for NICL Bharti 2024?
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे.
How to apply for NICL Bharti 2024?
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरूनच फॉर्म भरायचा आहे, अधिकृत पोर्टलची लिंक वर दिली आहे.
What is the last date to apply for NICL Bharti 2024?
एन आय सी एल भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात 11 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत फॉर्म भरायचा आहे. 11 नोव्हेंबर नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे आता सध्या वेबसाईट चांगल्या प्रकारे चालत आहे लगेच फॉर्म भरून घ्या.