Mahajyoti Tab Registration 2025. Resiter Here! महाराष्ट्र सरकारच्या महाज्योती संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी सुरू करण्यात आली आहे. Mahajyoti Tab Registration 2025 अंतर्गत 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना Free Tab, दररोज 6GB इंटरनेट, आणि JEE, NEET, MHT-CET परीक्षांसाठी मोफत कोचिंग दिलं जाणार आहे.
हा कार्यक्रम महाराष्ट्रातील OBC, SBC, VJNT आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी सायन्स स्ट्रीममध्ये 11वीसाठी प्रवेश घेत आहेत आणि शैक्षणिकदृष्ट्या पात्र आहेत, त्यांनी जरूर यासाठी ऑनलाइन अर्ज करावा.
शेवटची तारीख आहे 20 जुलै 2025 मुदतवाढ झालेली आहे.
या लेखात आपण जाणून घेणार आहोत Mahajyoti Tab Registration 2025 Online Process, Eligibility, Documents, Selection Process, आणि इतर महत्वाची माहिती – त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Mahajyoti Free Tablet Yojna 2025 Overview – महाज्योती टॅब नोंदणी 2025 माहिती
तपशील | माहिती |
---|---|
योजनेचे नाव | Mahajyoti Tab Registration 2025 |
सुरू केले | महाराष्ट्र शासन व महाज्योती संस्था |
लाभार्थी | 10वी पास विद्यार्थी (OBC, SBC, VJNT वर्गातील) |
मुख्य उद्दिष्ट | विद्यार्थ्यांना मोफत टॅब, कोचिंग व इंटरनेट सुविधा देणे |
कोर्स | MHT-CET, JEE, NEET Pre-Coaching (2026 बॅचसाठी) |
अर्ज पद्धत | Online अर्ज मोबाईल नंबरच्या आधारे |
इंटरनेट सुविधा | दररोज 6GB डेटा (टॅबमध्ये) |
निवड निकष | 10वी चे गुण व वर्ग/category |
संपर्क | mahajyotingp@gmail.com / 0712-2870120, 2870121 |
How to Apply for Mahajyoti Free Tablet Yojna 2025 – महाज्योती टॅब नोंदणी कशी करावी?
Mahajyoti Tab Registration 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज अर्ज करू शकता:
✅ Step-by-Step Registration Process:
- Official Website Visit करा:
सर्वप्रथम mahajyoti.org.in या वेबसाइटला भेट द्या.

- Application लिंक ओपन करा:
मुख्य पेजवर “MHT-CET/JEE/NEET Batch 2026 Training” लिंकवर क्लिक करा. - Mobile Number Verify करा:
“Register” वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि OTP द्वारे व्हेरिफाय करा.
- Application Form भरा:
मोबाइल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये तुमचं नाव, पत्ता, श्रेणी, शिक्षणाचे तपशील भरावेत.

- 10वी चे मार्क, वर्ष व टक्केवारी द्या:
शैक्षणिक माहितीमध्ये तुमचे 10वी चे निकाल भरावा लागेल.

- Documents Upload करा:
फॉर्म भरल्यानंतर Aadhar, जात प्रमाणपत्र, 10वी मार्कशीट, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र इत्यादी स्कॅन करून अपलोड करावे. - फॉर्म Review करा आणि Submit करा:
सर्व माहिती भरल्यानंतर एकदा रिव्ह्यू करा आणि “Submit” बटण क्लिक करा.

- Acknowledgment मिळवा:
Registration पूर्ण झाल्यावर तुम्हाला SMS/Email द्वारे Confirmation मिळेल.
Mahajyoti Tab Registration 2025 Apply Link – महाज्योती टॅब रजिस्ट्रेशन 2025 महत्वाच्या लिंक
घटक | लिंक/माहिती |
Mahajyoti Tab Registration 2025 Official Website | इथे क्लिक करा |
PDF Notification / सूचना पत्रक | इथे डाउनलोड करा |
Online Application Link (Register with Mobile Number) | इथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Top Engineering Colleges in Pune – पुण्यातील टॉप कॉलेज Fee, Placements Admission Process! येथे पाहा!
Important Dates – Mahajyoti Free Tablet Yojna 2025 Schedule – महाज्योती टॅब रजिस्ट्रेशन 2025 महत्वाच्या तारखा
Details | तारीख |
---|---|
🟢 ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 मे 2025 |
🔴 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 जुलै 2025 |
Selection Process of Mahajyoti Tab Registration 2025 – निवड प्रक्रिया काय आहे?
Mahajyoti Tab Yojana अंतर्गत विद्यार्थ्यांची निवड 10वी च्या टक्केवारी व श्रेणी (Category) वर आधारित असेल.
📌 निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
- Eligibility Criteria पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील.
- त्यानंतर, Category wise Merit List तयार केली जाईल.
- शैक्षणिक पात्रता – शहरी भागासाठी 70% व ग्रामीण भागासाठी 60% पेक्षा जास्त गुण आवश्यक.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना SMS/Email द्वारे माहिती दिली जाईल.
- योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना Free Tab + Daily Internet + Coaching Classes मिळतील.
Mahajyoti Tab Registration 2025 Reservation Details – महाज्योती टॅब नोंदणी 2025 मध्ये आरक्षणाचे तपशील
🔹 आरक्षण :
सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे आहे :
अ.क्र. | सामाजिक प्रवर्ग | टक्केवारी |
---|---|---|
1 | इतर मागास वर्ग (OBC) | 59% |
2 | निरधीसुचती जमाती – अ (VJ-A) | 10% |
3 | भटक्या जमाती – ब (NT-B) | 8% |
4 | भटक्या जमाती – क (NT-C) | 11% |
5 | भटक्या जमाती – ड (NT-D) | 6% |
6 | विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 6% |
एकूण | 100% |
इतर भरती
Pune Top 20 Engineering Colleges Cutoff 2024: MHT-CET & JEE Details Branchwise आणि Categorywise!
Mahajyoti Tab Registration 2025 FAQs
Mahajyoti Free Tablet Yojna 2025 साठी कोण अर्ज करू शकतो?
महाज्योती टॅब नोंदणी 2025 साठी महाराष्ट्र राज्यातील OBC, NT, VJNT, आणि SBC प्रवर्गातील 10वी pass विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच, विद्यार्थी 11वी सायन्स शाखेत प्रवेश घेतलेला असावा आणि ग्रामीण भागातील किमान 60% किंवा शहरी भागातील 70% गुण आवश्यक आहेत.
Mahajyoti Tab Registration 2025 साठी अर्ज कुठे करायचा?
महाज्योती टॅब नोंदणी 2025 साठी अधिकृत वेबसाइट https://neet.mahajyoti.org.in/ या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करताना मोबाईल नंबरची OTP द्वारे पडताळणी करावी लागते.
Mahajyoti Tab Registration 2025 अंतर्गत काय फायदे मिळतात?
या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, दररोज 6GB इंटरनेट डेटा, तसेच CET, JEE, NEET 2026 साठी ऑनलाइन कोचिंग व मार्गदर्शन मिळते.
Mahajyoti Tab Registration 2025 ची अंतिम तारीख काय आहे?
महाज्योती टॅब नोंदणी 2025 ची अंतिम तारीख अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाते. विद्यार्थी वेळेत अर्ज करण्यासाठी वेबसाइटवर नियमित भेट देणे गरजेचे आहे.
3 thoughts on “Mahajyoti Tab Registration 2025: 10वी पास मुलांसाठी फ्री टॅब, 6GB डेटा आणि CET/NEET/JEE कोचिंग – सर्व मोफत! लवकर अर्ज करा!”