Magel Tyala Shettale Yojana 2024: मागेल त्याला शेततळे मिळणार, सरकार देणार 75 हजार रुपये अनुदान! लगेच फायदा घ्या

Magel Tyala Shettale Yojana 2024: महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली एक अभिनव अशी कृषी योजना म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना, या योजनेद्वारे अर्जदार पात्र व्यक्तींना त्यांच्या शेतात शेततळे बनवण्यासाठी सरकार द्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे.

तब्बल 75,000 रुपया पर्यंत अनुदान महाराष्ट्र शासन शेततळे बनवण्यासाठी देत आहे. तुम्ही जर तुमच्या शेतात शेततळे बनवू इच्छित असाल तर लगेच या Magel Tyala Shettale Yojana साठी अर्ज सादर करा, जेणेकरून तुम्ही पण या योजनेचा फायदा घेऊ शकाल.

मागेल त्याला शेततळे योजना साठी कोणते व्यक्ती पात्र असणार? लाभ किती कसा मिळणार? अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती या लेखात मी दिली आहे, कृपया तुम्हाला जर शेततळे हवे असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि ज्या सूचना या लेखात दिल्या आहेत त्यानुसार अर्ज सादर करा.

Magel Tyala Shettale Yojana 2024

योजनेचे नावMagel Tyala Shettale Yojana
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
उद्देशशेतकऱ्यांना शेततळे बनवण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Magel Tyala Shettale Yojana Elegibility Criteria

मागेल त्याला शेततळे योजना साठी राज्य सरकारने काही पात्रता निकष लावले आहेत, त्यानुसार जे व्यक्ती हे निकष पूर्ण करतील त्यांना महाराष्ट्र शासनाद्वारे शेतात शेततळे बनवण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत.

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • शेतकऱ्याच्या नावे किमान 60 गुंठे 1 एकर पर्यंत शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही शेततळे किंवा सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • शेतकरी हा दारिद्र्य रेषेखालील किंवा आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील असेल तर त्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
  • ज्येष्ठता यादी नुसार प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य या प्रमाणे निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Magel Tyala Shettale Yojana Benefits

मागेल त्याला शेततळे योजना द्वारे गरीब शेतकऱ्याला शेतात पाण्याची सुविधा उपलब्ध होईल, याद्वारे शेतकरी त्याच्या शेतीला पाणी देऊन चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकतो. मागेल त्याला शेततळे योजनेद्वारे मिळणारे फायदे हे खूप सारे आहेत, ते तुम्ही पुढीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

  • शेतकऱ्याला त्याच्या शेतात शेततळे बनवण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
  • आगोदर शेततळे बनवण्यासाठी 50 हजार दिले जायचे, आता ती रक्कम वाढून 75,000 हजार रुपये करण्यात आली आहे.
  • शेततळे बनवण्यासाठी मिळणारी आर्थिक मदत ही थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. DBT द्वारे पैसे सरकार द्वारे पाठवले जाणार आहेत, त्यामुळे याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

Magel Tyala Shettale Yojana Document List

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • शेतजमिनीचा सातबारा उतारा
  • कुटुंबाची शिधापत्रिका
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • अर्जदार व्यक्तीचे प्रतिज्ञा पत्र
  • कुटुंबात आत्महत्या झाली असेल तर, वारस प्रमाणपत्र
  • कास्ट सर्टिफिकेट
  • चालू मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो

Magel Tyala Shettale Yojana Application Form (Apply Online)

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्याला ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी शेतकरी aaplesarkar.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतो.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती आणि स्टेप्स खालीलप्रमाणे असणार आहेत.

  1. सुरुवातीला तुम्हाला Magel Tyala Shettale Yojana चा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे.
  2. त्यासाठी तुम्ही https://aaplesarkar.maharashtra.gov.in या साईट वर जाऊन अर्ज करू शकता. पहिल्यांदा तुम्हाला याच वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
  3. अधिकृत पोर्टल वर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, Registration करणे अनिवार्य आहे, त्याशिवाय अर्ज करता येणार नाही.
  4. एकदा नोंदणी पूर्ण झाली की मग तुम्हाला पोर्टल वर लॉगिन करून मागेल त्याला शेततळे योजना साठीचा पर्याय निवडायचा आहे.
  5. तुमच्या समोर Magel Tyala Shettale Yojana Application Form Open होईल, तो फॉर्म तुम्हाला सुरुवातीला काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती योग्यरीत्या अचूक पद्धतीने टाकायची आहे.
  6. फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्र देखील जोडायचे आहेत, कागदपत्रे हे सॉफ्ट कॉपी स्वरूपात असावेत. डॉक्युमेंट फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत त्यामुळे हार्ड कॉपी चालणार नाही. तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तयार करावी लागेल.
  7. कागदपत्रे आणि इतर माहिती फॉर्ममध्ये भरून झाल्यावर, तुम्हाला एकदा तुमच्या शेतीची आणि सातबारा संबंधित आवश्यक माहिती देखील चेक करायची आहे. एखादी बाब चुकली असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे. फॉर्म पूर्णपणे व्हेरिफाय केल्यानंतर मगच सबमिट करायचा आहे.

एकदा फॉर्म सबमिट केला मग नंतर त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची एडिट करता येणार नाही, बदल करता येणार नाहीत. त्यामुळे सबमिट करण्यापूर्वी त्याची आवश्यक ती काळजी घ्यावी.

Magel Tyala Shettale Yojana Application FAQ

Who Is eligible for Magel Tyala Shettale Yojana?

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी राज्यातील सर्व शेतकरी अर्ज दाखल करण्यास पात्र असणार आहेत, फक्त त्यासाठी काही अटी सांगण्यात आल्या आहेत. जे शेतकरी या अटी पूर्ण करतील त्यांना कोणत्याही अडचणी शिवाय योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि योजनेचा लाभ घेता येईल.

How to apply for Magel Tyala Shettale Yojana?

मागील त्याला शेततळे योजनेसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्जासाठी उमेदवाराला आपले सरकार या अधिकृत पोर्टल वर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल वरून किंवा कम्प्युटर वरून देखील, मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर तुम्ही या योजनेसाठी कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता.

What are the benefits of the Magel Tyala Shettale Yojana?

Magel Tyala Shettale Yojana द्वारे यापूर्वी अर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत शेततळे बांधण्यासाठी केली जात होती, त्यात आता 25 हजारांची भर करण्यात आली आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी 75 हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार द्वारे केली जाणार आहे.

Leave a comment