HPCL Apprentice Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
HPCL (Hindustan Petroleum Corporation Limited) ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी केंद्र सरकारची महारत्न कंपनी आहे. Refining, Storage, Distribution आणि Marketing क्षेत्रात देशभर तिचे मोठे नेटवर्क आहे. HPCL च्या Marketing Division ने Apprentices Act, 1961 नुसार Graduate Apprentice Trainee (Engineering) पदांसाठी भरती जाहीर केली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 64 जागा राखीव आहेत.
Civil, Mechanical, Electrical किंवा Instrumentation शाखेतून Engineering पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. Interview नाही, फक्त Merit आणि Document Verification वर आधारित Selection होणार आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
HPCL Apprentice Bharti 2026: संपूर्ण माहिती
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) – Marketing Division |
| पदाचे नाव | Graduate Apprentice Trainee (Engineering) |
| एकूण जागा | All India – सर्व राज्य मिळून (महाराष्ट्रात 64 जागा) |
| अर्ज पद्धत | Online (NATS 2.0 + HPCL Portal) |
| नोकरी ठिकाण | संबंधित राज्यातील Training Location |
| निवड प्रक्रिया | Merit List + Document Verification |
| पगार | ₹25,000/- प्रति महिना |
| अर्ज सुरू | 15-07-2026 |
| शेवटची तारीख | 31-07-2026 |
| अधिकृत वेबसाइट | jobs.hpcl.co.in |
HPCL Apprentice Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)
ही भरती All India Level वर असून प्रत्येक राज्यासाठी वेगळे Training Slots ठरवण्यात आले आहेत. काही महत्त्वाच्या राज्यांचे Training Slots खाली दिले आहेत:
| राज्य | Training Slots |
|---|---|
| महाराष्ट्र | 64 |
| उत्तर प्रदेश | 37 |
| गुजरात | 32 |
| तामिळनाडू | 20 |
| तेलंगणा | 19 |
| दिल्ली | 18 |
| राजस्थान | 17 |
| पंजाब | 16 |
| आंध्र प्रदेश | 15 |
| बिहार / हरियाणा / कर्नाटक / पश्चिम बंगाल | प्रत्येकी 14 |
| केरळ | 9 |
| छत्तीसगड | 8 |
| आसाम | 6 |
| मध्य प्रदेश | 10 |
👉 आरक्षण SC, ST, OBC-NC आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे, राज्यनिहाय आरक्षण धोरणानुसार.
⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते, हे HPCL च्या गरजेनुसार ठरेल.
HPCL Apprentice Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
Engineering Graduate (Civil / Mechanical / Electrical / Instrumentation)
- संबंधित शाखेतील Engineering Graduation पूर्ण असणे आवश्यक
- UR/OBC-NC उमेदवारांसाठी सर्व Semester/Year मिळून 60% Aggregate Marks
- SC/ST/PwBD (VH/HH/OH/MD) उमेदवारांसाठी 50% Aggregate Marks
👉 पदवी 01-09-2023 रोजी किंवा त्यानंतर पूर्ण झालेली असणे बंधनकारक आहे. त्याआधी पदवी पूर्ण झालेले उमेदवार पात्र नाहीत.
👉 सर्व पात्रता Board of Technical Education/UGC/AICTE किंवा तत्सम प्राधिकरणाकडून मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.
CGPA/GPA असणाऱ्या उमेदवारांसाठी
ज्या उमेदवारांच्या पदवीत CGPA/GPA किंवा Letter Grade दिलेला आहे, त्यांनी University/Institute च्या नियमानुसार Percentage मध्ये रूपांतर करून अर्जात नमूद करावे आणि त्यासंबंधीचे प्रमाणपत्र Document Verification वेळी सादर करावे.
⚠️ 49.99% हे 50% पेक्षा कमी समजले जाईल — फ्रॅक्शन Round Off होणार नाही.
HPCL Apprentice Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)
सर्वसाधारण वयोमर्यादा: किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे (31-07-2026 रोजी).
| प्रवर्ग | वयोमर्यादा सवलत |
|---|---|
| OBC-NC | +3 वर्ष |
| SC/ST | +5 वर्ष |
| PwBD (VH/HH/OH/MD) | +10 वर्ष |
⚠️ वयाची गणना 31-07-2026 नुसार केली जाईल.
HPCL Apprentice Bharti 2026: पगार (Salary)
Engineering Graduate Apprentice Trainee यांना ₹25,000/- प्रति महिना Stipend दिला जाईल.
पगाराचे विभाजन
- ₹20,500/- HPCL कडून थेट दिले जातील
- ₹4,500/- भारत सरकारकडून DBT Scheme नुसार थेट अपरेंटिसच्या खात्यात जमा होतील
👉 ही Apprenticeship असल्यामुळे कोणतेही Housing Allowance किंवा इतर Benefits दिले जाणार नाहीत — फक्त निश्चित Stipend मिळेल.
👉 ही PSU क्षेत्रातील चांगल्या Stipend ची Apprenticeship संधी मानली जाते, आणि भविष्यातील Recruitment साठी उपयुक्त Experience देते.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.
ही All India Recruitment आहे आणि महाराष्ट्रासाठी खास 64 Training Slots राखीव ठेवण्यात आले आहेत — जे इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत. Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Ahilyanagar आणि इतर शहरांमधील उमेदवार अर्ज करू शकतात आणि Training साठी महाराष्ट्र राज्याचा पर्याय निवडू शकतात.
मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?
✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही.
HPCL Apprentice Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)
1️⃣ Merit List तयार करणे
Eligibility Criteria आणि Qualifying Percentage नुसार Merit तयार केली जाईल.
2️⃣ Document Verification
Training Slots च्या तुलनेत 1:5 प्रमाणात उमेदवारांना Document Verification साठी बोलावले जाईल. Shortlist झालेल्या उमेदवारांना Registered Email वर कळवले जाईल.
3️⃣ Final Merit List
Document Verification मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम Merit List तयार होईल.
4️⃣ Apprenticeship Contract + Medical + Police Verification
Merit नुसार उमेदवाराला NATS Website वर Tri-partite Apprenticeship Contract Accept करावा लागेल, तसेच विहित नमुन्यातील Medical Certificate आणि Police Verification सादर करावी लागेल.
❌ Interview घेतला जाणार नाही.
⚠️ Document Verification साठी कोणतेही TA/DA दिले जाणार नाही.
HPCL Apprentice Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
✔️ फोटो आणि स्वाक्षरी ✔️ 10वी प्रमाणपत्र ✔️ Engineering Graduation ची सर्व Semester/Year ची मार्कशीट ✔️ CGPA/GPA असल्यास Percentage Conversion Certificate ✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NC लागू असल्यास) ✔️ PwBD Certificate (लागू असल्यास) ✔️ NATS 2.0 Portal वर Registration Confirmation ✔️ Medical Certificate (विहित नमुन्यात)
HPCL Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐
❗ NATS 2.0 Registration अनिवार्य
केवळ National Apprenticeship Training Scheme (NATS 2.0) Portal वर Registered आणि Board of Apprenticeship Training (BOAT) कडून Approved असलेल्या उमेदवारांचाच विचार केला जाईल. साधे HPCL Portal Registration पुरेसे नाही.
❗ Work Experience असलेले Not Eligible
ज्या उमेदवारांना 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त Work Experience आहे, ते या भरतीसाठी पात्र नाहीत.
❗ आधीच Apprenticeship Contract असल्यास Disqualify
जर उमेदवार सध्या इतर कुठल्याही संस्थेमध्ये Apprenticeship करत असेल किंवा त्याचा/तिचा NATS Portal वर आधीच Apprenticeship Contract असेल, तर तो/ती अर्ज करण्यास पात्र नाही. Joining नंतर हे आढळल्यास Apprenticeship त्वरित Terminate होईल आणि Stipend सुद्धा दिला जाणार नाही.
❗ Job ची कोणतीही Guarantee नाही
HPCL कडून Apprenticeship पूर्ण झाल्यानंतर Permanent किंवा Temporary Job देण्याची कोणतीही Assurance दिली जात नाही. मात्र भविष्यातील Recruitment मध्ये Age Relaxation आणि CBT Exam मध्ये 5% Extra Marks चा फायदा मिळू शकतो.
❗ Multiple Application Reject
एका उमेदवाराने फक्त एकच Application भरायचा आहे. एकापेक्षा जास्त Application आढळल्यास दोन्ही Reject केले जातील.
❗ State Preference बदलता येणार नाही
उमेदवार Training साठी फक्त एकाच राज्याचा पर्याय निवडू शकतो आणि एकदा Submit केल्यानंतर तो बदलता येणार नाही. राज्यांतर्गत कोणत्याही Location वर Posting होऊ शकते.
❗ चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई
Pseudo/Fake Email ID वापरल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास कायद्यानुसार कारवाई होऊ शकते आणि Candidature रद्द केली जाईल.
HPCL Apprentice Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
Step 1
सर्वप्रथम NATS 2.0 Portal वर Registration करून BOAT कडून Approval घ्या.
Step 2
HPCL Apprentice Application Link वर जा: jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp
Step 3
“Sign up for New Registration” या Option वर क्लिक करून नोंदणी करा.
Step 4
Registration नंतर Login ID आणि Password तुमच्या Registered Email वर येईल, त्याने Login करा.
Step 5
Application Form भरा:
- Engineering Branch निवडा (Civil/Mechanical/Electrical/Instrumentation)
- Personal Details भरा आणि Validate करा
- Contact Details भरा (Correspondence + Permanent Address)
- State of Training निवडा (फक्त एकच पर्याय)
- Qualification Details भरा
Step 6
Passport Size Photo आणि Signature Upload करा.
Step 7
Preview मध्ये सर्व Details तपासा, Declaration वाचा, Checkbox टिक करा आणि Final Submit करा.
⚠️ Final Submit नंतर कोणतेही Changes स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
HPCL Apprentice Bharti 2026: Job Benefits
मुख्य फायदे
- Government/PSU कंपनीत Work Experience मिळण्याची संधी
- चांगला Monthly Stipend (₹25,000/-)
- Petroleum Sector मधील Practical Training
- भविष्यातील Recruitment साठी Age Relaxation चा फायदा
- CBT Exam मध्ये 5% Extra Marks चा फायदा (Apprenticeship पूर्ण केल्यास)
HPCL Apprentice Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?
- Civil, Mechanical, Electrical, Instrumentation Engineering Graduate उमेदवार
- 2023 नंतर Engineering पूर्ण केलेले आणि अजून Work Experience नसलेले Freshers
- PSU/Government Sector मध्ये Career सुरू करू इच्छिणारे विद्यार्थी
- भविष्यात HPCL किंवा इतर PSU मध्ये Permanent Recruitment साठी तयारी करणारे उमेदवार
HPCL Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 15-07-2026 |
| शेवटची तारीख | 31-07-2026 |
| Merit List | जाहीर होईल |
| Document Verification | जाहीर होईल |
HPCL Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Online अर्ज (15 जुलै २०२६ पासून सुरू) | इथे क्लिक करा |
| NATS 2.0 Registration | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
HPCL Apprentice Bharti 2026: FAQs
HPCL Apprentice Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
Civil/Mechanical/Electrical/Instrumentation Engineering मध्ये Graduation, UR/OBC-NC साठी 60% आणि SC/ST/PwBD साठी 50% Aggregate Marks आवश्यक आहेत. पदवी 01-09-2023 रोजी किंवा नंतर पूर्ण असावी.
HPCL Apprentice Bharti 2026 किती जागा आहेत?
All India Level वर भरती असून महाराष्ट्रासाठी 64 Training Slots उपलब्ध आहेत. इतर राज्यांमध्ये सुद्धा जागा आहेत.
वयोमर्यादा किती आहे?
18 ते 25 वर्षे (31-07-2026 नुसार). SC/ST ला 5 वर्ष, OBC-NC ला 3 वर्ष आणि PwBD ला 10 वर्ष सवलत आहे.
पगार किती आहे?
दरमहा ₹25,000/- Stipend मिळेल (₹20,500 HPCL कडून + ₹4,500 GOI कडून DBT Scheme नुसार).
निवड प्रक्रिया काय आहे?
Merit List आणि Document Verification (1:5 प्रमाणात) यावर आधारित Selection होईल. Interview घेतला जाणार नाही.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो आणि महाराष्ट्रासाठी 64 Training Slots राखीव आहेत.
महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात, कोणताही Gender Restriction नाही.
शेवटची तारीख कधी आहे?
31 जुलै 2026 ही Online Application साठी शेवटची तारीख आहे.
आधीच Apprenticeship करणारे उमेदवार अर्ज करू शकतात का?
नाही, ज्यांचा दुसऱ्या संस्थेत आधीच Apprenticeship Contract आहे किंवा जे 1 वर्ष किंवा जास्त Work Experience Holders आहेत, ते पात्र नाहीत.
Apprenticeship नंतर Permanent Job मिळेल का?
HPCL कडून याची कोणतीही Guarantee दिली जात नाही, मात्र भविष्यातील Recruitment मध्ये Age Relaxation आणि Extra Marks चा फायदा मिळू शकतो.
इतर भरती अपडेट्स
