Bank of India Bharti 2026: बँक ऑफ इंडियामध्ये 779 जागांची मेगा भरती! पगार ₹1,20,940 रुपये, लगेच इथून अर्ज करा

Bank of India Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

Bank of India ही देशातील एक आघाडीची Public Sector Bank असून हिचे Head Office मुंबईत आहे. या बँकेने आता Credit Officers (GBO Stream) पदांसाठी तब्बल 779 जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. यामध्ये MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV अशा तीन वेगवेगळ्या Scale मधील पदांचा समावेश असून पगार थेट ₹1.20 लाखांपर्यंत जातो. ही Banking क्षेत्रातील अत्यंत आकर्षक संधी आहे.

Graduation पूर्ण करून Credit/Finance क्षेत्रात अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी तसेच CA, CMA, CS, CFA पात्रताधारक उमेदवारांसाठी ही भरती विशेष उपयुक्त आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Bank of India Bharti 2026: संपूर्ण माहिती

घटकतपशील
भरती संस्थाBank of India (BOI)
पदाचे नावCredit Officer (GBO Stream)
एकूण जागा779
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
निवड प्रक्रियाOnline परीक्षा + मुलाखत
पगार₹64,820 ते ₹1,20,940 (Scale नुसार)
अर्ज सुरू30.06.2026
शेवटची तारीख20.07.2026
परीक्षा तारीखस्वतंत्रपणे जाहीर होणार
अधिकृत वेबसाइटwww.bankofindia.bank.in

Bank of India Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

एकूण 779 जागांपैकी 475 जागा या मागील भरती प्रक्रिया (Project 2025-26/01) मधील रिक्त जागा आहेत.

पद / Scaleजागा
Credit Officer – MMGS-II677
Credit Officer – MMGS-III61
Credit Officer – SMGS-IV41
एकूण779

प्रवर्गनिहाय जागा (Category Wise)

प्रवर्गजागा
SC118
ST59
OBC205
EWS80
GEN317

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD (HI/VI/OC/ID) उमेदवारांसाठी लागू आहे.

⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.

Bank of India Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

Credit Officer – MMGS-II (677 जागा)

  • कोणत्याही शाखेतील Graduation 60% गुणांसह (SC/ST/OBC/PWBD साठी 55%)
  • किंवा CA / CMA-ICWA / CS / CFA
  • सोबत 2 वर्षांची Post-Graduation डिग्री (Commerce/Banking/Finance/Management) किंवा MBA/PGDBM/CA/CFA/CMA-ICWA
  • किमान 3 वर्षांचा Officer म्हणून अनुभव, त्यापैकी 2 वर्षे MSME/Commercial Credit प्रक्रियेतील असणे आवश्यक

Credit Officer – MMGS-III (61 जागा)

  • Graduation 60% गुणांसह (SC/ST/OBC/PWBD साठी 55%) किंवा CA/CMA-ICWA/CS/CFA
  • किमान 5 वर्षांचा Officer अनुभव, त्यापैकी 3 वर्षे Credit Processing मध्ये

Credit Officer – SMGS-IV (41 जागा)

  • Graduation 60% गुणांसह (SC/ST/OBC/PWBD साठी 55%) किंवा CA/CMA-ICWA/CS/CFA
  • किमान 7 वर्षांचा Officer अनुभव, त्यापैकी 4 वर्षे Credit Processing मध्ये

👉 SC/ST/OBC/PwBD उमेदवारांना 5% सवलत मिळेल.

⚠️ CGPA/OGPA असल्यास ते Percentage मध्ये Convert करूनच Online Application मध्ये भरावे लागेल.

Bank of India Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

वयाची गणना 01.06.2026 नुसार केली जाईल.

पदवयोमर्यादा
MMGS-II25 ते 32 वर्षे
MMGS-III28 ते 38 वर्षे
SMGS-IV32 ते 45 वर्षे

प्रवर्गनिहाय वयोमर्यादा सवलत

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
SC/ST+5 वर्ष
OBC (Non-creamy layer)+3 वर्ष
PwBD+10 वर्ष
माजी सैनिक (Ex-Servicemen)+5 वर्ष
1984 दंगल प्रभावित+5 वर्ष

⚠️ वयाची गणना 01.06.2026 नुसार केली जाईल.

Bank of India Bharti 2026: पगार (Salary)

ScalePay Scale
MMGS-II₹64,820 – 93,960
MMGS-III₹85,920 – 1,05,280
SMGS-IV₹1,02,300 – 1,20,940

अतिरिक्त फायदे

Basic Pay व्यतिरिक्त DA, HRA, Medical Allowance, PF/Pension आणि इतर Banking क्षेत्रातील प्रमाणित Allowances मिळतात.

👉 ही Banking क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून उमेदवार अर्ज करू शकतात. Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Ahilyanagar आणि इतर शहरांमधून परीक्षा देता येऊ शकते.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही.

Bank of India Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

1️⃣ Online Examination

  • एकूण 125 गुण, Composite वेळ 120 मिनिटे
विषयप्रश्नगुण
English Language (Qualifying)2525
Professional Knowledge100100
  • English Language फक्त Qualifying स्वरूपाची असेल, Merit List मध्ये त्याचे गुण मोजले जाणार नाहीत
  • किमान Qualifying गुण: General/EWS साठी 35%, SC/ST/OBC/PWD साठी 5% सवलत
  • ⚠️ Negative Marking आहे — चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण कापले जातील

2️⃣ Interview

  • एकूण 100 गुण
  • Qualifying गुण: General/EWS साठी 50%, SC/ST/OBC/PWD साठी 45%

3️⃣ Final Merit List

Online Exam आणि Interview दोन्ही झाल्यास Weightage 70:30 (Exam:Interview) राहील. फक्त Interview झाल्यास त्याच आधारे Merit List तयार होईल.

Bank of India Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / EWS / Others₹850
SC / ST / PwBD₹175

👉 फी Online पद्धतीने भरावी लागेल (Debit/Credit Card, Net Banking, UPI, Wallet). 👉 फी Non-refundable आहे.

Bank of India Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र
✔️ Graduation / PG मार्कशीट आणि प्रमाणपत्रे
✔️ जन्मतारखेचा पुरावा
✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी लागू असल्यास)
✔️ EWS Income & Asset Certificate (लागू असल्यास)
✔️ PwBD Certificate (लागू असल्यास)
✔️ अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate)
✔️ No Objection Certificate - NOC (सध्या Govt/PSU मध्ये कार्यरत असल्यास)
✔️ Valid Photo ID Proof

Bank of India Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ अनुभव अनिवार्य आहे

ही पूर्णपणे Fresher-friendly भरती नाही. MMGS-II साठी किमान 3 वर्षे, MMGS-III साठी 5 वर्षे आणि SMGS-IV साठी 7 वर्षे Officer म्हणून अनुभव अनिवार्य आहे, त्यातील ठराविक वर्षे MSME/Commercial Credit प्रक्रियेतील असणेही गरजेचे आहे.

❗ Security Deposit भरावी लागेल

निवड झाल्यास MMGS-II साठी ₹2,00,000 आणि MMGS-III/IV साठी ₹3,00,000 Security Deposit भरावी लागते, जी 3 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावरच परत मिळते. 3 वर्षांपूर्वी बँक सोडल्यास ही रक्कम जप्त होते.

❗ Percentage मध्ये सूट नाही

59.99% गुण असतील तरी ते 60% पेक्षा कमी मानले जातील — Fraction Round Off केला जाणार नाही.

❗ Bank of India मध्ये आधी याच पदावर काम केलेले पात्र नाहीत

जे उमेदवार यापूर्वी Bank of India मध्ये याच पदावर काम करून गेले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

❗ एकच अर्ज करावा

एका उमेदवाराने एकच Application भरावे. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास फक्त शेवटचा Valid अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि आधीच्या अर्जांची फी जप्त होईल.

❗ भारतात कुठेही Posting होऊ शकते

बँक निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कुठेही Posting/Transfer करू शकते, त्यामुळे यासाठी तयार असणाऱ्यांनीच अर्ज करावा.

Bank of India Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

अधिकृत वेबसाइट www.bankofindia.bank.in ला भेट द्या.

Step 2

‘CAREER’ विभागात जाऊन “Recruitment of Credit Officers in GBO Stream” या लिंकवर क्लिक करा.

Step 3

‘APPLY ONLINE’ वर क्लिक करून ‘New Registration’ निवडा आणि Name, Email, Mobile Number भरून Registration पूर्ण करा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details
  • Category Information
  • Experience Details

Step 5

Photograph, Signature, Left Thumb Impression आणि Handwritten Declaration ठरलेल्या Specifications प्रमाणे Upload करा.

Step 6

Application Fee Online पद्धतीने भरा.

Step 7

Application Form Preview करून ‘Complete Registration’ वर क्लिक करा आणि Print काढून ठेवा.

Bank of India Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • Public Sector Bank मधील Officer Level पद
  • आकर्षक पगार आणि Allowances
  • Job Security
  • Promotion Policy नुसार Higher Grade मध्ये संधी
  • All India Exposure आणि Career Growth

Bank of India Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • Commerce/Finance/Banking क्षेत्रातील Post-Graduate उमेदवार
  • CA, CMA-ICWA, CS, CFA पात्रताधारक
  • MSME/Commercial Credit क्षेत्रात आधीच अनुभव असणारे Banking Professionals
  • सध्या Private Bank किंवा NBFC मध्ये काम करून Government Bank मध्ये जाऊ इच्छिणारे उमेदवार

Bank of India Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू30.06.2026
शेवटची तारीख20.07.2026
परीक्षा तारीखस्वतंत्रपणे जाहीर होणार
Admit Cardपरीक्षेपूर्वी वेबसाइटवर उपलब्ध होणार

Bank of India Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Bank of India Bharti 2026: FAQs

Credit Officer पदासाठी पात्रता काय आहे?

कोणत्याही शाखेतील Graduation 60% गुणांसह (SC/ST/OBC/PWBD साठी 55%) किंवा CA/CMA-ICWA/CS/CFA, सोबत Scale नुसार 3 ते 7 वर्षांचा Credit/Banking अनुभव आवश्यक आहे.

किती जागा आहेत?

एकूण 779 जागा आहेत — MMGS-II साठी 677, MMGS-III साठी 61 आणि SMGS-IV साठी 41.

वयोमर्यादा किती आहे?

MMGS-II साठी 25-32 वर्षे, MMGS-III साठी 28-38 वर्षे आणि SMGS-IV साठी 32-45 वर्षे (01.06.2026 नुसार).

पगार किती आहे?

₹64,820 पासून ते ₹1,20,940 पर्यंत, Scale नुसार वेगवेगळा आहे.

निवड प्रक्रिया काय आहे?

Online परीक्षा (125 गुण) आणि त्यानंतर Interview (100 गुण) — Weightage 70:30.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, ही All India भरती असल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार सहज अर्ज करू शकतात.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, या भरतीत कोणताही Gender Restriction नाही.

फ्रेशर्स अर्ज करू शकतात का?

नाही, या पदासाठी किमान 3 वर्षांचा Officer अनुभव अनिवार्य आहे, त्यामुळे Freshers साठी ही भरती नाही.

शेवटची तारीख कधी आहे?

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2026 आहे.

Application Fee किती आहे?

General/EWS साठी ₹850 आणि SC/ST/PwBD साठी ₹175.

इतर भरती अपडेट्स

RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेत 6565 जागांची मेगा भरती! 10वी/ITI/ग्रॅज्युएशन उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा (अर्ज करण्यास सुरवात)

MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 2619 जागांची भरती! गट-क सेवा संयुक्त पदे, लगेच इथून अर्ज करा

MPSC Tax Assistant Bharti 2026: MPSC मार्फत कर सहायक पदांची मोठी भरती! पगार ₹81,100 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

TCS B.Sc Ignite Hiring 2026: टीसीएस मध्ये B.Sc/BCA उमेदवारांसाठी भरती! लगेच इथून अर्ज करा

RTO AMVI Bharati 2026: सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांची मोठी भरती! पगार ₹1.22 लाखांपर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Mazagon Dock Apprentice Bharti 2026: माजगाव डॉकमध्ये 495 जागांची मेगा भरती! 8वी/10वी/ITI पास लगेच इथून अर्ज करा

SSC CGL Bharti 2026: SSC मार्फत 12,256 जागांची मेगाभरती! पगार ₹१,५१,१०० रुपये,लगेच इथून अर्ज करा

Indian Air Force Airmen Bharti 2026: हवाई दलात मेडिकल असिस्टंट पदांची भरती! फक्त Online परीक्षा, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment