Bandhkam Kamgar Scholarship Yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये आपण बांधकाम कामगार Scholership योजने विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र शासनाद्वारे बांधकाम विभाग अंतर्गत बांधकाम कामगार योजना राबवली जाते, त्या मध्येच बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी, मोठी शिष्यवृत्ती देखील दिले जाते.
बांधकाम कामगाराच्या मुलांना पहिली पासून ते पदवी पर्यंत, नव्हे तर ग्रॅज्युएशन होईपर्यंत मोठी आर्थिक मदत दिले जाते. या आर्थिक मदतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवता येतो.
बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कसा करायचा? याची सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.
जर तुम्हाला मुलगा किंवा मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी या योजनेद्वारे मोठा फायदा होऊ शकतो, त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचा, आणि तुमच्या मुलांना चांगल्या प्रतीचे शिक्षण देऊ करा, तेही शासनाच्या अभिनव अशा योजनेच्या माध्यमातून.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana
योजनेचे नाव | Bandhkam Kamgar Scholarship Yojana |
सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश | कामगाराच्या मुलांना शिक्षण मिळावे, शिक्षणासाठी त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करायला लागू नये. |
लाभ | बांधकाम कामगाराच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | ज्या लोकांनी बांधकाम कामगार योजना साठी अर्ज सादर केला आहे, अशा कामगारांचे मुले. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | mahabocw.in |
Bandhkam Kamgar Scholarship Yojana Qualification Details
बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसाठी राज्य शासनाने काही पात्रता निकष ठरवले आहेत, जे कामगार या निकषांनुसार पात्र असतील, त्यांच्या शाळकरी मुलांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.
- व्यक्ती हा बांधकाम कामगार असावा.
- अर्जदाराने बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज सादर केलेला असावा.
- अर्जदाराची मुलगी किंवा मुलगा शाळेत शिकत असावा.
- अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असावेत.
थोडक्यात वर सांगितलेले सर्व पात्रता निकष बांधकाम कामगारांना पूर्ण करणे आवश्यक आहेत, जर हे निकष पूर्ण झाले तरच बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती चा फायदा मिळणार आहे.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana Benifits
बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्ती उपयोजनेमध्ये वेगवेगळे लाभ आणि फायदे आहेत. जे अर्जदार बांधकाम कामगार आणि त्यांच्या मुलांना होणार आहेत.
शिष्यवृत्ती योजना अंतर्गत इयत्ता पहिली ते पदवी किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमापर्यंत निश्चीत अशी रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
इयत्ते नुसार किती स्कॉलरशिप मिळणार?
- बांधकाम कामगाराचे मुले शाळेत असतील तर इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत प्रत्येक वर्षा साठी प्रत्येकी 2,500 रुपये मिळणार आहेत.
- इयत्ता सातवी नंतर मुलांना आठवी ते दहावी साठी प्रती वर्षी तब्बल 5,000 रुपये मिळणार आहेत.
- बांधकाम कामगाराचा पाल्य इयत्ता 10 वी मध्ये गेल्यावर त्याला दहावी ते बारावी साठी 10,000 रुपये दिले जातात, फक्त एक अट आहे ती म्हणजे पाल्याने 10 वी तसेच 12 वी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण घेतलेले असावे.
- जर बांधकाम कामगाराचे पाल्य पदवी चे घेत असेल तर अशा वेळी त्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण होई पर्यंत प्रती वर्ष 20,000 रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते.
- बांधकाम कामगारांचे पाल्य जर मेडीकल कॉलेज मध्ये शिकत असेल तर अशा वेळी प्रती वर्ष 1,00,000 रुपये मिळतात.
- जर अभियांत्रिकी पदवीसाठी कामगाराचा पाल्य शिकत असेल तर त्याला प्रतिवर्ष 60,000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते.
तसेच जर बांधकाम कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर तिला पण शिष्यवृत्तीचे लाभ मिळणार आहेत. बांधकाम कामगाराच्या पाल्या प्रमाणे बांधकाम कामगाराच्या पत्नीला देखील, सर्व आर्थिक लाभ भेटणार आहेत.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana Documents
बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसाठी बांधकाम विभागाद्वारे काही आवश्यक असे कागदपत्रे सांगितले आहेत. हे कागदपत्रे उमेदवाराला या योजनेसाठी अर्ज सादर करताना द्यायचे आहेत.
- बांधकाम कामगाराच्या पाल्याचे शालेय उपस्थिती प्रमाणपत्र (75% उपस्थिती अनिवार्य आहे)
- शाळेचे किंवा विद्यापीठाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- बांधकाम कामगाराच्या पाल्यांचे आधार कार्ड
- स्वयंघोषणा प्रमाणपत्र
- रेशनकार्ड प्रत
वर सांगितलेले सर्व कागदपत्रे हे या Scholarship Yojana साठी आवश्यक आहेत, ज्यावेळी अर्ज सादर केला जातो तेव्हा हे कागदपत्रे देखील अर्जासोबत सादर करावे लागतात. हे कागदपत्रे Soft Copy आणि Hard Copy या दोन्ही स्वरूपात असावेत.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana Apply Online
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात करत सादर करता येतो, त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप चा वापर करून अर्ज करायचा आहे. योजनेसाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण फॉर्म भरू शकता, खाली दिलेल्या प्रक्रियेचा वापर करून सर्व ठिकाणी फॉर्म भरले जाऊ शकतात.
सर्वात प्रथम महाराष्ट्र बांधकाम विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, अधिकृत वेबसाईटची लिंक वर आपण दिली आहे, तरी पण तुम्ही थेट वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करू शकता.
वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम होम पेज वर construction worker apply online for claim हा ऑप्शन शोधायचा आहे. त्यांनतर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, त्या पेज मध्ये New Claim आणि Update Claim असे दोन पर्याय दिसतील, त्यापैकी New Claim या Option वर क्लिक करा.
तुमच्यासमोर Bandhkam Kamgar Scholarship Yojana Form Open होईल, सुरुवातीला तुम्हाला तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे.
त्यांनतर आवश्यक ती सर्व माहिती फॉर्म मध्ये भरायची आहे, सोबतच सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. आणि एकदा अर्ज हा तपासून घ्यायचा आहे.
त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे तुमचा Scholership साठीचा फॉर्म राज्य बांधकाम विभागाकडे सादर होईल.
विभागाद्वारे अर्जाची पडताळणी केली जाईल, आणि अर्ज योग्य असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, आणि तुमच्या बँक खात्यावर पाल्याच्या चालू शिक्षणानुसार पैसे पाठवले जातील.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana FAQ
बांधकाम कामगार योजनेसाठी कोण पात्र आहे?
जे लोक बांधकाम कामगार आहेत तेच बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र असणार आहेत.
बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसाठी कोण पात्र आहे?
बांधकाम कामगाराचे पाल्य मुलगा किंवा मुलगी जे चालू वर्षात शिकत आहेत.
बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजने अंतर्गत काय मिळते?
बांधकाम कामगाराच्या पाल्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते.
Majhi घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे म्हणून मला कामाची खूप गरज आहे
I am studying in bcs(computer science) 1st year also want to avail this scheme