Anand Dighe Divyang Yojana: धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024, महिन्याला 3 हजार रुपये मिळणार

Anand Dighe Divyang Yojana: नमस्कार मित्रांनो आजच्या या योजना पोस्ट मध्ये मी तुम्हाला सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे अर्थ सहाय्य योजना संबंधी सविस्तर अशी माहिती सांगणार आहे.

महाराष्ट्र शासनाद्वारे ही अभिनव अशी योजना सुरू करण्यात आली आहे, राज्यातील जे दिव्यांग नागरिक आहेत त्यांना अर्थ सहाय्य करणे हा या योजनेमागील हेतू आहे.

या Anand Dighe Divyang Yojana अंतर्गत दिव्यांग नागरिकांना महिन्याला 3,000 रुपये एवढी राशी अर्थ सहाय्य स्वरूपात सरकार देणार आहे.

2024 पासून ते 2029 या पाच वर्षांसाठी ही आर्थिक मदत केली जाणार आहे, तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरता येणार आहे.

Anand Dighe Divyang Yojana 2024

Yojana Nameधर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा उद्देशदिव्यांग नागरिकांना आर्थिक सहाय्य करणे.
लाभमहिन्याला पात्रते नुसार 3,000 रुपये आर्थिक मदत.
लाभार्थीदिव्यांग नागरिक (मुंबई पर्यंत सीमित)

Anand Dighe Divyang Yojana Benefits

Anand Dighe Divyang Yojana

धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग नागरिकांना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. जे उमेदवार योजनेसाठी पात्र होतील केवळ त्यांनाच ही मदत केली जाणार आहे.

अपंगत्वलाभहप्ता
40 टक्के दिव्यांगमहिन्याला 1,000 रुपये6 महिन्यानंतर 6,000 रुपये
80 टक्के दिव्यांगमहिन्याला 3,000 रुपये6 महिन्यानंतर 18,000 रुपये

महिन्याला 3 हजार रुपये म्हणजे वर्षाचे 36 हजार रुपये दिव्यांग व्यक्तींना सरकार देणार आहे. ही योजना अजून पुढे पाच वर्षे चालू राहणार आहे, म्हणजे नागरिकांना एकूण पाच वर्षांचे एकत्रित असे 1,80,000 रुपये मिळणार आहेत.

Anand Dighe Divyang Yojana Elegibility Criteria

  • अर्जदार उमेदवार हा मुंबई महानगर हद्दीत राहणार असावा.
  • अर्जदाराकडे दिव्यांग प्रमाणपत्र असावे. (पिवळे किंवा निळे वैश्विक ओळखपत्र)
  • उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असावे.
  • उमेदवाराच्या कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असावे.
  • अर्जदाराची राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे.

Anand Dighe Divyang Yojana Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • रेशनकार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • स्वयंघोषणापत्र

Anand Dighe Divyang Yojana Table

अधिकृत वेबसाईटभेट द्या
भरतीचा फॉर्मDownload करा

Anand Dighe Divyang Yojana Application Form

आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेसाठी अर्जदार उमेदवारांना ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही.

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
  • सोबतच फॉर्म सोबत वर सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत.
  • कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला अधिकृत पत्त्यावर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय योजनेचा फॉर्म पोस्टाने किंवा स्वतः सादर करायचा आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना सुरू झाली आहे, मुंबईमधील नागरिकांना या योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा फॉर्म सादर करायचा आहे.

Anand Dighe Divyang Yojana FAQ

Who is eligible for Anand Dighe Divyang Yojana?

आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना साठी अर्जदार उमेदवार हे शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या दिव्यांग असणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही नागरिकाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, केवळ दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

How to apply for Anand Dighe Divyang Yojana?

आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना साठी उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अद्याप ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

What is the benefits of Anand Dighe Divyang Yojana?

धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग नागरिकांना महिन्याला तीन हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.

4 thoughts on “Anand Dighe Divyang Yojana: धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024, महिन्याला 3 हजार रुपये मिळणार”

Leave a comment