India Post GDS Result 2026: भारतीय डाक विभागाने GDS Online Engagement Schedule-I January 2026 अंतर्गत महाराष्ट्र सर्कलची पहिली मेरिट लिस्ट (List-1) जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उमेदवार अधिकृत PDF डाउनलोड करून आपला Registration Number तपासू शकतात. Maharashtra_DV_List1
ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना Document Verification (DV) साठी संबंधित विभागीय कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
India Post GDS Result 2026 भारतीय पोस्ट विभागामार्फत GDS Online Engagement Schedule-I January 2026 अंतर्गत ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीसाठी उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांच्या मेरिटच्या आधारे करण्यात आली आहे.
या मेरिट लिस्टमध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
भरती अंतर्गत पदे
Branch Postmaster (BPM)
Assistant Branch Postmaster (ABPM)
Dak Sevak
महाराष्ट्र सर्कलमधील विविध Division आणि Post Office साठी ही निवड करण्यात आली आहे.
India Post GDS Result 2026: DV साठी महत्वाची सूचना
GDS Result मध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी Document Verification (DV) साठी संबंधित विभागीय कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
महत्वाच्या सूचना
उमेदवारांनी मूळ कागदपत्रे आणि 2 फोटो कॉपी सेट सोबत आणणे आवश्यक आहे.
संबंधित Division Office मध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी.
23 मार्च 2026 पर्यंत Document Verification पूर्ण करणे आवश्यक आहे. Maharashtra_DV_List1
जर दिलेल्या तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी केली नाही तर उमेदवारी रद्द होऊ शकते.
India Post GDS Result 2026: मेरिट लिस्ट कशी तपासावी?
उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून आपला निकाल तपासू शकतात.
अधिकृत India Post GDS वेबसाइटला भेट द्या.
“GDS Result January 2026 – Maharashtra Circle List-1” या लिंकवर क्लिक करा.
Result PDF डाउनलोड करा.
PDF मध्ये Ctrl + F करून आपला Registration Number शोधा.