Union Bank of India Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये स्थानिक बँक अधिकारी एलबीओ या पदासाठी चांगली मेगा भरती निघाली आहे.
तब्बल 1500 रिक्त जागा सोडण्यात आले आहेत, जे उमेदवारांना बँकेमध्ये जॉब करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही चांगली सुवर्णसंधी आहे.
युनियन बँकेद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, सोबतच युनियन बँकेद्वारेच या भरती संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली गेली आहे.
या भरतीसाठी जर उमेदवाराचे शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालं असेल तर मोठा फायदा होणार आहे. कारण भरती प्रक्रिया कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांवर होणार आहे. ग्रॅज्युएशन उमेदवार असतील तर त्यांना चांगलं प्राधान्य दिले जाणार आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. अर्जदार उमेदवारांना आयबीपीएस पोर्टल वर जाऊन युनियन बँक भरती साठी अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 नोव्हेंबर 2024 आहे. 13 तारखेनंतर युनियन बँकेद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे आता संधी आहे लवकरात लवकर फॉर्म भरा.
Union Bank of India Bharti 2024
पदाचे नाव | स्थानिक बँक अधिकारी |
रिक्त जागा | 1500 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 85,920 रु. |
वयाची अट | 20 ते 30 वर्षे |
भरती फी | General/ OBC: ₹850/- [SC/ ST/ PWD:₹175/-] |
Union Bank of India Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
स्थानिक बँक अधिकारी (LBO) | 1500 |
Total | 1500 |
Union Bank of India Bharti 2024 Education Qualification
युनियन बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेल असणे आवश्यक आहे.
जर उमेदवाराने कोणतेही शाखेत पदवी मिळवली नसेल तर त्याला अर्ज करता येणार नाही, ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे.
ग्रॅज्युएट उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार आहे, सोबत जर उमेदवाराचे शिक्षण उच्च दर्जाचे झाले असेल म्हणजेच ग्रॅज्युएशन पेक्षा जास्त शिक्षण झाल असेल, तरीदेखील त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
Union Bank of India Bharti 2024 Apply Online
युनियन बँक भरतीसाठी आयबीपीएस द्वारे अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 13 नोव्हेंबर 2024 |
- सुरुवातीला तुम्हाला आयबीपीएस पोर्टलवर जायचं आहे.
- जर तुमचे आयबीपीएस पोर्टलवर अकाउंट असेल तर लॉगिन करायचा आहे, जर नसेल तर रजिस्ट्रेशन करायचा आहे.
- तुमच्यासमोर युनियन बँक भरती ऑनलाइन अर्ज लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- एक नवीन फॉर्म उघडेल फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- फॉर्ममध्ये माहिती भरून झाली की नंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- या भरतीसाठी युनियन बँकेद्वारे परीक्षा फी देखील आकारले जात आहे त्यामुळे तुम्हाला फी भरणे देखील आवश्यक आहे.
- फी भरून झाली की नंतर तुम्हाला भरतीचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, एखादी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करायची आहे.
- त्यानंतर पुढे फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे, आणि युनियन बँकेच्या सेलेक्शन कमिटीकडे फॉर्म सादर करायचा आहे.
Union Bank of India Bharti 2024 Selection Process
युनियन बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. सोबतच ऑनलाईन परीक्षा पार पडल्यानंतर उमेदवारांना इतर टेस्ट देखील द्यावे लागणार आहेत त्या अंतर्गतच त्यांना निवडले जाणार आहे.
जेव्हा उमेदवारांनी या भरतीसाठी फॉर्म भरला आहे त्यांना ऑनलाईन स्वरूपात परीक्षेसाठी बोलवले जाईल. ऑनलाइन परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना लॅंग्वेज प्रोफिसेंसी टेस्ट द्यायची आहे.
लॅंग्वेज टेस्टमध्ये जर उमेदवार पास झाले तर त्यांचे पर्सनल इंटरव्यू घेतले जातील, मुलाखतीमध्ये जर उमेदवार पदासाठी योग्य वाटले तरच सिलेक्शन कमिटी अशा उमेदवारांची निवड करणार आहे.
नवीन भरती अपडेट:
- Bank of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ग्रॅज्युएशन पास वर भरती, अर्ज करा
- AIASL Bharti 2024: एअर इंडिया मध्ये दहावी पास वर मेगा भरती, थेट मुलाखती वर निवड, लगेच अर्ज करा
- GMC Kolhapur Bharti 2024: राजश्री शाहू महाराज महाविद्यालयात भरती, 10वी पास लगेच अर्ज करा
Union Bank of India Bharti 2024 FAQ
Who is eligible for Union Bank of India Bharti 2024?
युनियन बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे.
How to apply for Union Bank of India Bharti 2024?
युनियन बँक ऑफ इंडिया भरतीसाठी आयबीपीएस पोर्टलवरून ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for Union Bank of India Bharti 2024?
युनियन बँक ऑफ इंडिया भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 नोव्हेंबर 2024 आहे.