केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली एक अभिनव अशी योजना म्हणजे PM Matru Vandana Yojana या योजने अंतर्गत देशातील सर्व गरोदर महिलांना 5,000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना साठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना, 3 हप्त्या मध्ये ही 5 हजाराची रक्कम देऊ केली जाते. याचा मूळ उद्देश गरोदर महिला आणि स्तनदा मातांना सकस आहार मिळावा त्यांचे आरोग्य चांगले राहावे, जन्मला येणारे बाळ निरोगी राहावे हा आहे.
मातृ वंदना योजना साठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत? अर्ज कसा करायचा आहे? लाभ कसा मिळणार? अशी सर्व महत्वाची माहिती या लेखात मी दिली आहे, जर तुम्ही गरोदर असाल, किंवा तुमच्या ओळखीत कोणी असेल तर त्यांना ही माहिती नक्की सांगा.
PM Matru Vandana Yojana Maharashtra
योजनेचे नाव | PM Matru Vandana Yojana |
योजनेची सुरुवात | केंद्र शासन |
उद्देश | गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य करणे |
लाभार्थी | गरोदर किंवा स्तनदा माता |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
PM Matru Vandana Yojana Elegibility Criteria
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना साठी शासनाने काही पात्रता निकष जारी केले आहेत, त्यानुसार ज्या महिला या पात्रता निकषात येतात त्यांना मातृवंदना योजनाचे प्रत्येकी पाच हजार रुपये शासनाद्वारे दिले जाणार आहे.
- महिलेचे वय हे 18 ते 55 वर्षे या दरम्यान असावे.
- महिलेचे किंवा तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- अर्जदार महिला ही गरोदर किंवा स्तनदा माता असावी
- अर्जदार महिला गरोदर राहिल्या नंतर 150 दिवसांनी योजनेसाठी नोंदणी करता येते.
PM Matru Vandana Yojana Benefits
महिला पहिल्यांदा गरोदर झाल्यापासून ते पहिल्या आपत्याच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यात 5 हजार रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते.
पहिला हप्ता | गरोदर असल्याची नोंद केल्यानंतर | 1,000 रुपये |
दुसरा हप्ता | 6 महिन्यानंतर तपासणी, सोनोग्राफी केल्यानंतर | 2,000 रुपये |
तिसरा हप्ता | बाळाचे जन्म नोंद प्रमाणपत्र काढल्यावर 14 आठवड्याचे प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर | 2,000 रुपये |
PM Matru Vandana Yojana Document List
- महिला आणि पतीचे सहमती पत्र
- पती पत्नीचे आधार कार्ड
- आधार लिंक असलेले बँक खाते पासबुक
- महिलेचा किंवा पतीचा चालू मोबाईल नंबर
थोडक्यात वर सांगितलेले सर्व कागदपत्रे हे PM Matru Vandana Yojana साठी अर्ज सादर करताना फॉर्म सोबत जोडावे लागतात.
PM Matru Vandana Yojana Application Form
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी तुम्ही आशा वर्कर, जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र, आरोग्य विभाग किंवा अंगणवाडी मध्ये संपर्क साधू शकता.
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला वर सांगितलेले सर्व कागदपत्रे घेऊन आशा वर्कर किंवा अंगणवाडी केंद्रात जायचे आहे.
- अंगणवाडी केंद्रात गेल्यानंतर तेथे तुम्हाला अंगणवाडी सेविकेला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी फॉर्म किंवा नोंदणी कशी करायची, याची माहिती विचारून घ्यायची आहे.
- अंगणवाडी सेविकांनी जो फॉर्म दिला आहे, तो फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. जी माहिती विचारली आहे ती सर्व Information टाकायची आहे.
- माहिती भरून झाल्यावर तुम्ही सोबत आणलेले सर्व कागदपत्रे फॉर्म ला जोडायचे आहेत, त्यानंतर तो फॉर्म तुम्हाला सबमिट करून टाकायचा आहे.
एकदा तुम्ही तुमचा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठीचा अर्ज सादर केला, की तुम्हाला योजनेचे लाभ सुरू होतील. यामधे एकूण तीन हप्ते 5000 रुपये रक्कमेचे तुमच्या बँक खात्यात जमा केली जातील.
नवीन सरकारी योजना:
- Majhi Kanya Bhagyashri Yojana: मुली असतील तर मिळणार 50,000 रुपये! संधी सोडू नका, अर्ज करा
- Yashwaantrao Chavan Gharkul Yojana: या लोकांना सरकार देत आहे, 1 लाख 30 हजार रुपये अनुदान! त्वरित अर्ज करा
- Sukanya Samrudhi Yojana: या मुलींना मिळत आहेत 5 लाख रुपये! तुम्हाला मिळतील का? चेक करा Free मध्ये
PM Matru Vandana Yojana FAQ
Who is eligible for PM Matru Vandana Yojana?
देशातील सर्व गरोदर आणि स्तनदा माता या PM Matru Vandana Yojana साठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकतात.
How to apply for PM Matru Vandana Yojana?
Matru Vandana Yojana साठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकता.
What is the benefits of PM Matru Vandana Yojana?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभ हे आर्थिक स्वरूपाचे आहेत, यामधे अर्जदार गरोदर महिलांना तीन टप्प्यात 1,000-2,000-2000 असे एकूण 5,000 रुपये दिले जातात.
3 thoughts on “PM Matru Vandana Yojana: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गरोदर महिलांना मिळत आहेत 5,000 रू. लगेच फायदा घ्या”