Mukhyamantri Yojna Doot 2024: 50 हजार जागांची मेगाभरती महाराष्ट्र शासनाकडून जाहीर!

Mukhyamantri Yojna Doot 2024: Yojna Doot 2024 या योजनेत महाराष्ट्रात 50 हजार योजनादूतांची मेगाभरती आता महाराष्ट्र शासन करणार आहे आणि त्यासंबंधी शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. यासाठी शासनाकडून 300 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ह्या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, तसेच या योजनांची प्रसिद्धी करणे व या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्यभरातून सुमारे ५०,००० योजनादूत या योजनेमधून निवडले जाणार आहेत

या योजनेत निवड कशी होईल? काम काय असेल? पगार किती मिळेल? याची सर्व माहिती ह्या आर्टिकल मधे मी सविस्तरपणे दिलेली आहे. त्यामुळे खाली दिलेली सगळी माहिती नीट वाचून घ्या.

Mukhyamantri Yojna Doot 2024

योजनेचे नावMukhyamantri Yojna Doot 2024
योजनेची सुरुवातऑगस्ट 2024
उद्देशशासनाच्या योजना घरोघरी पोहोचविणे
लाभार्थीसर्व महाराष्ट्रातील रहिवासी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Mukhyamantri Yojna Doot 2024 Work

कामे :-

निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची सर्व माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे बंधनकारक असणार आहे.

योजनादूतांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाची समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील.

योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचे स्वतःच्या स्वार्थासाठी अथवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे आणि गैरवर्तन देखील करणार नाहीत असे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे.

Mukhyamantri Yojna Doot 2024 Salary

पगार – १० हजार रू.महिना ( प्रवास भत्ता आणि इतर सर्व भत्तेसहित)
म्हणजे ह्याच १० हजार मधे तुमच्या प्रवासाचा खर्च आणि इतर खर्च सुद्धा असेल.

तसेच निवड झालेल्या उमेदवारांचा ०६ महिन्यांसाठीचा करार केला जाणार आहे आणि ६ महिने काम सोडता येणार नाही. या करारामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी सुविधांचा लाभ देखील दिला जाणार नाही याची सर्व अर्जदारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Yojna Doot 2024 Eligibility

पात्रता :-

१) वयोमयादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
२) शिक्षण पात्रता – कोणत्याही शाखेचा वकमान पदवीधर.
3) संगणक ज्ञान आवश्यक .
4) उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक.
5) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
6) उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.

Mukhyamantri Yojna Doot 2024 Documents

कागदपत्र :-

2) आधारकार्ड
3) पदवी पास कागदपत्रे/ प्रमाणपत्र इ.
4) रहिवासी दाखला.(सक्षम यंत्रणेने वदलले)
5) वयक्तिक बँक खाते पासबुक.
6) पासपोर्ट साईज फोटो .
7) हमीपत्र.(ऑनलाईन अजासोबतच्या नमुन्यामधील)

Mukhyamantri Yojna Doot 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :-

Mukhyamantri Yojna Doot 2024

Mukhyamantri Yojna Doot Online Apply

ऑनलाइन अर्ज लवकरच सुरू होतील. अर्ज सुरु झाल्यावर लगेच ह्या आर्टिकल मधे अपडेट केलं जाईल आणि तशी सूचना दिली जाईल.

Important Links

योजना PDFDownload करा

इतर भरती :

Ratnagiri DCC Bharti 2024: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10 वी पास वर भरती! येथून लगेच अर्ज करा
IOCL Apprentice Bharti 2024: इंडियन ऑइल कंपनीमध्ये 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा
ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात बंपर भरती! 10 वी पास वर नोकरी, अर्ज करा

Leave a comment