Mukhyamantri Annapurna Yojana: वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार! जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Mukhyamantri Annapurna Yojana संबंधी सविस्तर अशी माहिती देणार आहे. जर तुम्हाला मोफत गॅस मिळवायचा असेल तर माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि जस सांगितल आहे तसा अर्ज करा.

महाराष्ट्र शासनाद्वारे ही अभिनव अशी योजना सुरू करण्यात आली आहे, या योजनेच्या माध्यमातून गृहिणींना स्वयंपाकासाठी मोफत गॅस दिला जाणार आहे. प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार? कागदपत्रे कोणते लागणार? अर्ज कसा करायचा? अटी आणि शर्ती काय आहेत? मोफत गॅस कसा मिळणार? अशी सर्व माहिती आर्टिकलमध्ये मी दिली आहे. उपयुक्त आणि महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन आहे, Miss करू नका, ताबडतोब ॲक्शन घ्या आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आर्टिकल वाचा.

Mukhyamantri Annapurna Yojana

Yojana NameMukhyamantri Annapurna Yojana
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा उद्देशगरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर देणे
लाभवर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडर
लाभार्थीराज्यातील महिला

Mukhyamantri Annapurna Yojana पात्रता निकष

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी महाराष्ट्र शासनांद्वारे काही अटी आणि शर्ती सोबत पात्रता निकष जारी केले आहेत. या पात्रता निकषांमध्ये ज्या महिला येतील त्यांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ भेटणार आहे.

  • अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  • महिलेच्या नावाने कुटुंबातील गॅस जोडणी असावी.
  • कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे.
  • महिला उज्वला योजना किंवा माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाव्यात.
  • 14.2 Kg वजन असलेल्या गॅस सिलेंडर असेल तरच Mukhyamantri Annapurna Yojana चा लाभ मिळणार.

या ज्या वर अटी दिल्या आहेत, त्यामध्ये जर महिला येत असतील तर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे. जर महिलेच्या कुटुंबामध्ये कोणी आयकरदाता असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये असेल तर अशा महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटणार नाही.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभ

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.
  • लाभार्थी महिला या महिन्याला केवळ एकच गॅस सिलेंडर घेऊ शकतात.
  • वर्षातून घेतलेल्या तीन गॅस सिलेंडर वर शंभर टक्के सबसिडी दिली जाणार आहे.

थोडक्यात वरील प्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभ आणि फायदे सांगता येतील. एक मुख्य बाब म्हणजे जर महिला या उज्वला योजनेच्या लाभार्थी असतील किंवा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. आणि त्यांनाच तीन गॅस सिलेंडर मोफत स्वरूपात दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्जदार महिलांना काही कागदपत्रे सादर करावी लागतात, ती कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करताना देणे आवश्यक आहे. अनिवार्य स्वरूपात कागदपत्रांची आवश्यकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणार आहे, त्यामुळे खाली जी लिस्ट दिली आहे त्यानुसार सर्व कागदपत्रे तयार ठेवा, आणि योजनेसाठी अर्ज करताना ही कागदपत्र सोबत घेऊन जा आणि सादर करून टाका.

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • अर्जदार महिलेचे पॅन कार्ड
  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • महिलेचा पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

हे जे कागदपत्रे सांगितले आहेत ते तुम्हाला हार्ड कॉपी स्वरूपात आणि सॉफ्ट कॉपी या दोन्ही रूपाने तयार करून ठेवायचे आहेत. ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा असेल तर सॉफ्ट कॉपीची कागदपत्र लागणार आहेत, आणि जर ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा असेल तर हार्ड कॉपी स्वरूपाची कागदपत्रे सादर करावे लागतात.

Mukhyamantri Annapurna Yojana Registration

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी शासनाद्वारे अधिकृत पोर्टल सुरू केले जाणार आहे, अद्याप या योजनेसाठी कोणत्याही स्वरूपाची वेबसाईट अथवा पोर्टल किंवा मोबाईल ॲप सुरू केलेला नाहीये.

सध्याला आपले सरकार सेतू सुविधा केंद्र मध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करायचा आहे. सेतू केंद्र चालकाद्वारे तुमचा फॉर्म भरला जाईल, वर जे आवश्यक कागदपत्र सांगितले आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत आणि ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरून घ्यायचा आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana FAQ

Who is eligible for Mukhyamantri Annapurna Yojana?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना साठी केवळ महाराष्ट्रातील गरीब महिला अर्ज करू शकणार आहेत, परंतु यासाठी पण काही निकष आहेत जे वर आर्टिकल मध्ये सविस्तर स्वरूपात सांगितले आहेत.

How to apply for Mukhyamantri Annapurna Yojana?

Mukhyamantri Annapurna Yojana साठी Online Form हा अधिकृत वेबसाईट वरून भरायचा आहे, परंतु सध्या या योजनेचे पोर्टल आले नाही त्यामुळे सध्याला सेतू सुविधा केंद्रावर या योजनेचे फॉर्म भरले जात आहेत.

What are the benefits of Mukhyamantri Annapurna Yojana?

Mukhyamantri Annapurna Yojana द्वारे गरीब महिलांना दरवर्षी मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत. तीन सिलेंडर साठी 100% सबसिडी दिली जाणार आहे.

1 thought on “Mukhyamantri Annapurna Yojana: वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार! जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a comment