MUCBF Bharti 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन लिमिटेड मध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव बँकेद्वारे या भरती संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जर तुम्हाला या को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये नोकरी मिळवायचे असेल, तर ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती मी आर्टिकल मध्ये दिली आहे. कृपया आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार लगेच फॉर्म भरून टाका.
MUCBF Bharti 2024
पदाचे नाव | कनिष्ठ लिपिक |
रिक्त जागा | 12 |
नोकरीचे ठिकाण | बृहन्मुंबई & पुणे शहर |
वेतन श्रेणी | 20,760 रुपये |
वयाची अट | 22 ते 35 वर्षे |
भरती फी | ₹1121/- |
MUCBF Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
कनिष्ठ लिपिक | 12 |
MUCBF Bharti 2024 Education Qualification
कनिष्ठ लिपिक पदासाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक मध्ये भरती निघाली असून या पदासाठी बँकेद्वारे शैक्षणिक पात्रता देखील ठरवली आहे.
उमेदवार हा किमान पदवीधर असावा, सोबत त्याने एमएस-सीआयटी किंवा समतुल्य कम्प्युटर कोर्स केलेला असावा.
MUCBF Bharti 2024 Age Limit
को-ऑपरेटिव बँक भरतीसाठी वयाची अट देखील सांगण्यात आली आहे, त्यानुसार जर उमेदवार या वयोमर्यादा अटीमध्ये येत असतील तरच त्यांना अर्ज करता येणार आहे.
कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्जदार उमेदवारांचे वय हे 22 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे वय जर 22 पेक्षा कमी असेल किंवा 35 पेक्षा जास्त असेल तर अशा उमेदवारांना फॉर्म भरताना नाही. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना कोणत्याही स्वरूपाची सूट देण्यात आलेली नाही, त्यामुळे वयोमर्यादा ही सर्वांसाठी सारखीच असणार आहे.
MUCBF Bharti 2024 Apply Online
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना को-ऑपरेटिव बँकेच्या अधिकृत रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्यायची आहे आणि तिथून फॉर्म भरायचा आहे, याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे.
ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 26 नोव्हेंबर 2024 |
- सुरुवातीला अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- पोर्टलवर पोहोचल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
- त्यानंतर लॉगिन करा.
- पुढे Apply Now या बटणावर क्लिक करा.
- भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा.
- जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- भरतीची परीक्षा फी भरून घ्या.
- त्यानंतर भरतीचा अर्ज तपासा आणि फॉर्म सबमिट करा.
MUCBF Bharti 2024 Selection Process
या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्यांना खालील प्रमाणे सिलेक्शन प्रोसेस द्वारे निवडले जाणार आहे.
- ऑफलाइन परीक्षा
- कागदपत्रे पडताळणी
- मुलाखत
- मेरिट लिस्ट आणि अंतिम निवड
ज्या उमेदवारांनी भरतीसाठी फॉर्म भरले आहेत त्यांना सुरुवातीला ऑफलाइन स्वरूपात परीक्षा द्यावी लागेल, परीक्षा दिल्यानंतर जे उमेदवार पास होतील त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल आणि नंतर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर त्यांना मुलाखतीसाठी देखील बोलावले जाईल.
आणि शेवटी उमेदवारांच्या परीक्षेतील आणि मुलाखतीच्या एकूण गुणांची बेरीज करून 100 गुणांपैकी ज्या उमेदवारांना जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत, त्यांना महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी निवडले जाईल.
नवीन भरती अपडेट:
- North Western Railway Bharti 2024: उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये 10वी, ITI पास वर भरती, लगेच फॉर्म भरा
- TMB Bharti 2024: तमिळनाडू मर्कंटाईल बँकेत पदव्युत्तर पदवी वर भरती, बँकेत नोकरी, लगेच फॉर्म भरा
- Indian Army MES Bharti 2024: भारतीय सैन्य दलात 41,822 पदांची मेगा भरती, जाणून घ्या
MUCBF Bharti 2024 FAQ
Who is eligible for MUCBF Bharti?
पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल.
How to apply for MUCBF Bharti 2024?
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक भरती साठी अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे.
What is the last date to apply for MUCBF Bharti 2024?
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 नोव्हेंबर 2024 आहे