LIC Bima Sakhi Yojana: LIC मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आली आहे! LIC कडून बिमा सखी योजना सुरु करण्यात आली आहे ज्यामध्ये महिलांना काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना LIC सोबत काम करण्याची आणि चांगला पगार मिळवण्याची संधी दिली जाणार आहे. LIC सारख्या नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी उमेदवार फक्त 10वी पास असला तरी अर्ज करू शकतात. म्हणजेच ज्या महिलांनी कमी शिक्षण घेतलं आहे, त्यांच्यासाठीही ही एक उत्तम संधी आहे.
जर तुम्ही गृहिणी असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेत महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना LIC च्या विविध योजनांबद्दल लोकांना माहिती देण्याचे काम दिले जाईल. यासाठी योग्य मानधन (पगार) देखील मिळणार आहे.
या योजनेविषयी संपूर्ण माहिती पात्रता, अर्ज प्रक्रिया, फायदे आणि आवश्यक कागदपत्रे खालील पोस्टमध्ये सविस्तर दिली आहे. म्हणून ही माहिती पूर्ण वाचा आणि मगच अर्ज भरा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
LIC Bima Sakhi Yojana: Complete Scheme Details – योजनेची संपूर्ण माहिती
योजनेचे नाव | LIC बिमा सखी योजना (Bima Sakhi Scheme) |
संस्था | भारतीय जीवन विमा निगम (LIC of India) |
योजनेचा प्रकार | महिलांसाठी रोजगार व प्रशिक्षण योजना |
पदाचे नाव | बिमा सखी (Micro Insurance Agent – MCA) |
अर्हता | 10वी पास महिला उमेदवार अर्ज करू शकतात |
वयोमर्यादा | किमान 18 वर्षे ते कमाल 70 वर्षे |
कामाचे स्वरूप | LIC च्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवणे. |
स्टायपेंड (पगार) | 5000 – 7000 रु. |
कालावधी | 3 वर्षे |
कामगिरीची अट | दरवर्षी किमान 24 पॉलिसी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
LIC Bima Sakhi Yojana: Benefits (फायदे)
LIC Bima Sakhi Yojana अंतर्गत महिलांना LIC सोबत काम करण्याची संधी मिळते तसेच प्रशिक्षणासह निश्चित स्टायपेंड (पगार) आणि कमिशन देखील दिले जाते. या योजनेत कामगिरीनुसार दरवर्षी ठराविक अटी पूर्ण केल्यास महिलांना तीन वर्षांपर्यंत मानधन मिळते. तसेच प्रत्येक वर्षी ठराविक संख्येच्या पॉलिसी पूर्ण करणे आवश्यक असते. खाली या योजनेचे प्रमुख फायदे दिले आहेत:
- महिलांना LIC सोबत काम करताना आर्थिक स्वावलंबनाची संधी.
- प्रशिक्षणासह दरमहा स्टायपेंड मिळतो.
- 10वी पास महिलांना अर्जाची संधी.
- प्रत्येक वर्षी ठराविक पॉलिसी पूर्ण केल्यास पुढील वर्षाचे स्टायपेंड सुरू राहते.
- LIC सारख्या मोठ्या संस्थेत अनुभव मिळण्याची आणि भविष्यात अधिक कमाईची संधी.
खालील तक्त्यात LIC बिमा सखी योजनेचे मुख्य फायदे आणि स्टायपेंडचे तपशील दिले आहेत.
किमान पॉलिसी | प्रत्येक वर्षी किमान 24 पॉलिसी पूर्ण करणे आवश्यक. |
पहिल्या वर्षातील कमिशन | बोनस कमिशन वगळता किमान ₹48,000/- कमिशन. |
वर्ष | स्टायपेंड |
---|---|
पहिले वर्ष | ₹7,000/- प्रतिमाह |
दुसरे वर्ष | ₹6,000/- प्रतिमाह (पहिल्या वर्षातील किमान 65% पॉलिसी इन-फोर्स असल्यास) |
तिसरे वर्ष | ₹5,000/- प्रतिमाह (दुसऱ्या वर्षातील किमान 65% पॉलिसी इन-फोर्स असल्यास) |
LIC Bima Sakhi Yojana: Eligibility – पात्रता आणि आवश्यक अटी
LIC बिमा सखी योजना ही विशेषतः महिलांसाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना LIC मध्ये मायक्रो इन्शुरन्स एजंट (MCA) म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पात्रता आणि अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
पात्रता / अट | तपशील |
---|---|
लिंग (Gender) | फक्त महिला उमेदवारांना अर्ज करता येईल. |
शैक्षणिक पात्रता | किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
वयोमर्यादा | किमान 18 वर्षे आणि कमाल 70 वर्षे (शेवटच्या वाढदिवसाप्रमाणे) |
नागरिकत्व | भारतीय नागरिक असणे आवश्यक. |
कामाचा प्रकार | LIC च्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवणे, नोंदणी करणे व पॉलिसी विक्री करणे. |
अपात्रता अटी | विद्यमान LIC एजंट, LIC कर्मचारी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. |
अनुभव | नाही, परंतु विमा क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. |
अर्जदाराचा स्वभाव | संवाद कौशल्य चांगले असावे, लोकांशी संपर्क ठेवण्याची आवड असावी आणि जबाबदारीने काम करण्याची तयारी असावी. |
LIC Bima Sakhi Yojana: Important Links – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
LIC Bima Sakhi Yojana: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
- प्रथम तुम्हाला वर दिलेल्या LIC च्या अधिकृत वेबसाइट लिंकवर क्लिक करायचं आहे – LIC Bima Sakhi Yojana
- वेबसाइट उघडल्यावर “Bima Sakhi Scheme” साठीचा Application Form दिसेल, तो उघडा.
- अर्ज फॉर्ममध्ये तुमचं नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती योग्य प्रकारे भरा.
- नंतर आवश्यक कागदपत्रे जसे की वयाचा पुरावा, पत्ता पुरावा आणि शैक्षणिक प्रमाणपत्र या जोडायच्या आहेत.
- सर्व माहिती नीट तपासल्यानंतर ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
- तुमचा अर्ज LIC Recruitment Department कडे पाठवला जाईल, पात्रता अटी पूर्ण असल्यास तुमची निवड होईल.
- निवड झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षांचा प्रशिक्षण कालावधी मिळेल, या कालावधीत तुम्हाला स्टायपेंड (मानधन) दिले जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही LIC एजंट म्हणून काम करू शकता, पदवीधर महिलांना पुढे Development Officer होण्याचीही संधी मिळू शकते.
इतर योजना
Aai Karj Yojana 2025: महिलांसाठी व्यवसायासाठी 15 लाख कर्ज, फक्त मुद्दल फेडा, व्याज नाही! अर्ज लगेच करा!
BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती मोफत ट्रेनिंग प्रोग्राम बार्टी मार्फत आणि 72,000 रु. आर्थिक मदत, महिना 10 हजार ! Apply Online
Mahajyoti Tab Registration 2025: 10वी पास मुलांसाठी फ्री टॅब, 6GB डेटा आणि CET/NEET/JEE कोचिंग – सर्व मोफत! लवकर अर्ज करा!
Chief Minister Fellowship 2025: पदवी पास तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप 2025 कार्यक्रमांतर्गत सुवर्णसंधी! पगार ₹61,500 महिना!
Mahajyoti Military Bharti 2025: महाज्योती कडून 10वी पास तरुणांसाठी मोफत आर्मी प्रशिक्षण योजना! ट्रेनिंग सोबत ७२ हजार रु.!
Maharashtra Apprenticeship Promotion Scheme 2025: महाराष्ट्रातील अप्रेंटिसशिप करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ₹42,000 पर्यंतचा आर्थिक लाभ! त्वरित अर्ज करा!
PM Internship Yojana 2024: केंद्र सरकार द्वारे मेगा भरती, 10वी पास अर्ज करा
Anand Dighe Divyang Yojana: धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024, महिन्याला 3 हजार रुपये मिळणार
LIC Bima Sakhi Yojana: FAQ
LIC बिमा सखी योजना म्हणजे काय?
ही LIC (भारतीय जीवन विमा निगम) द्वारे सुरु केलेली एक विशेष योजना आहे, ज्यामध्ये महिलांना मायक्रो इन्शुरन्स एजंट (Bima Sakhi) म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. या माध्यमातून महिलांना रोजगार, प्रशिक्षण आणि मानधन मिळते.
LIC बिमा सखी योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?
या योजनेसाठी केवळ महिला उमेदवार अर्ज करू शकतात, उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण आणि 18 ते 70 वर्ष वयोगटातील असावा.
LIC बिमा सखी योजनेअंतर्गत पगार (Stipend) किती मिळतो?
प्रत्येक वर्षी स्टायपेंड हे कमी जास्त होते, यात 5 ते 7 हजार रुपये महिना पगार पडतो.
LIC बिमा सखी योजना पूर्ण वेळ नोकरी आहे का?
नाही, ही पूर्ण वेळ नोकरी नाही. ही एक स्टायपेंड आधारित प्रशिक्षण योजना आहे ज्यात महिलांना LIC सोबत एजंट स्वरूपात काम करण्याची संधी दिली जाते.
LIC बिमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया कशी आहे?
अर्ज ऑनलाईन भरायचा आहे, LIC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून Submit करावे.