IOB LBO Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
Indian Overseas Bank (IOB) ही भारत सरकारच्या मालकीची एक अग्रगण्य Public Sector Bank असून चेन्नई येथे तिचे मुख्यालय आहे आणि देशभर तसेच परदेशातही तिचे नेटवर्क पसरलेले आहे. आता IOB ने Local Bank Officer (LBO) पदासाठी तब्बल 250 जागांची भरती जाहीर केली आहे, ज्यामध्ये फक्त 4 राज्यांतील (तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात) उमेदवारांना संधी आहे, आणि यात महाराष्ट्रासाठी खास 50 जागा राखीव आहेत.
जे उमेदवार कोणत्याही शाखेतील Graduate आहेत आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छितात, अशा सर्वांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
IOB LBO Bharti 2026: संपूर्ण माहिती
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | Indian Overseas Bank (IOB) |
| पदाचे नाव | Local Bank Officer (LBO) – JMGS I |
| एकूण जागा | 250 |
| अर्ज पद्धत | Online |
| नोकरी ठिकाण | तामिळनाडू / कर्नाटक / महाराष्ट्र / गुजरात (अर्ज केलेले राज्य) |
| निवड प्रक्रिया | Online परीक्षा + Language Proficiency Test + मुलाखत |
| पगार | ₹48,480 (Basic) + DA/HRA/CCA |
| अर्ज सुरू | 08.08.2026 |
| शेवटची तारीख | 24.08.2026 |
| अधिकृत वेबसाइट | www.iob.bank.in |
IOB LBO Bharti 2026: एकूण जागा
राज्यनिहाय जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
| राज्य | भाषा | जागा | SC | ST | OBC | EWS | UR (GEN) |
|---|---|---|---|---|---|---|---|
| तामिळनाडू | तमिळ | 100 | 15 | 6 | 33 | 9 | 37 |
| कर्नाटक | कन्नड | 50 | 8 | 3 | 16 | 4 | 19 |
| महाराष्ट्र | मराठी | 50 | 7 | 4 | 15 | 5 | 19 |
| गुजरात | गुजराती | 50 | 6 | 5 | 16 | 4 | 19 |
| एकूण | — | 250 | 36 | 18 | 80 | 22 | 94 |
PwBD आरक्षण: VI-2, HI-2, OC-5, ID-3 (एकूण 12 जागा horizontal आरक्षण म्हणून)
👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.
⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते, तसेच काही राज्यांमध्ये Backlog जागांचा समावेश आहे.
IOB LBO Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील Graduation (Degree) पूर्ण असणे आवश्यक आहे
- अर्ज करतेवेळी उमेदवाराकडे वैध Mark-sheet / Degree Certificate असणे आवश्यक आहे आणि Graduation मधील टक्केवारी नमूद करावी लागेल
👉 पात्रतेसाठी cut-off date 01.08.2026 आहे.
IOB LBO Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे
- उमेदवाराचा जन्म 02.08.1996 ते 01.08.2006 (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा
| प्रवर्ग | वयोमर्यादा सवलत |
|---|---|
| SC/ST | +5 वर्ष |
| OBC (Non-Creamy Layer) | +3 वर्ष |
| PwBD | +10 वर्ष |
| 1984 दंगलग्रस्त | +5 वर्ष |
| माजी सैनिक (Ex-servicemen) | +5 वर्ष |
⚠️ वयाची गणना 01.08.2026 नुसार केली जाईल. 👉 एकापेक्षा जास्त प्रवर्गात सवलत लागू असल्यास SC/ST/OBC साठी जास्तीत जास्त 50 वर्षांपर्यंत cumulative सवलत मिळू शकते.
IOB LBO Bharti 2026: पगार (Salary)
Local Bank Officer (Scale I) पदासाठी Basic Pay: ₹48,480 (Pay Scale: 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920)
अतिरिक्त फायदे
- DA (Dearness Allowance)
- HRA (House Rent Allowance)
- CCA (City Compensatory Allowance)
- बँकेच्या नियमांनुसार इतर भत्ते
👉 ही Banking क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मानली जाते.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.
महाराष्ट्र राज्यासाठी खास 50 जागा राखीव आहेत आणि यासाठी मराठी भाषेचे ज्ञान (वाचन, लेखन, बोलणे) अनिवार्य आहे. जर उमेदवाराने 10वी किंवा 12वी मध्ये मराठी विषय घेतलेला नसेल, तर मुलाखतीपूर्वी Language Proficiency Test द्यावी लागेल.
⚠️ महत्त्वाचे: उमेदवार फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करू शकतो — तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र किंवा गुजरात यापैकी कोणतेही एक. एका राज्यासाठी अर्ज केल्यावर दुसऱ्या राज्यासाठी अर्ज करता येणार नाही.
मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?
✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही.
IOB LBO Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)
1️⃣ Online Examination
एकूण 140 प्रश्न, 200 गुण, 3 तास कालावधी:
| विषय | प्रश्न संख्या | गुण | माध्यम | कालावधी |
|---|---|---|---|---|
| Reasoning and Computer Aptitude | 30 | 60 | इंग्रजी व हिंदी | 60 मिनिटे |
| General/Economy/Banking Awareness | 40 | 40 | इंग्रजी व हिंदी | 30 मिनिटे |
| Data Analysis and Interpretation | 30 | 60 | इंग्रजी व हिंदी | 60 मिनिटे |
| English Knowledge | 40 | 40 | इंग्रजी | 30 मिनिटे |
| एकूण | 140 | 200 | — | 3 तास |
⚠️ प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा (Negative Marking) केले जातील. अनुत्तरित प्रश्नासाठी कोणताही दंड नाही.
👉 किमान पात्रता गुण: Unreserved साठी 35%, Reserved साठी 30% (एकत्रित).
2️⃣ Language Proficiency Test (LPT)
जर उमेदवाराने 10वी किंवा 12वी मध्ये अर्ज केलेल्या राज्याची स्थानिक भाषा (उदा. मराठी) विषय म्हणून घेतलेली नसेल, तर मुलाखतीपूर्वी ही चाचणी अनिवार्य आहे. यात अनुत्तीर्ण झाल्यास पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
3️⃣ Personal Interview
एकूण 100 गुणांची मुलाखत घेतली जाईल.
👉 किमान पात्रता गुण: Unreserved साठी 50%, Reserved साठी 45%.
अंतिम निवड
Online Exam आणि Interview यांचे गुणोत्तर 80:20 असेल. एकूण किमान पात्रता गुण Unreserved साठी 35% आणि Reserved साठी 30% आवश्यक आहेत. राज्यनिहाय आणि प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादीनुसार अंतिम निवड होईल.
IOB LBO Bharti 2026: अर्ज फी
| प्रवर्ग | फी |
|---|---|
| General / EWS / OBC | ₹850/- (GST सह) |
| SC / ST / PwBD | ₹175/- (केवळ Intimation Charges, GST सह) |
👉 फी Online पद्धतीने (Debit Card/Credit Card/Net Banking/UPI) भरावी लागेल. 👉 फी Non-refundable आहे आणि इतर कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी Adjust केली जाणार नाही.
IOB LBO Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
मुलाखतीच्या वेळी खालील मूळ कागदपत्रे आणि त्यांची self-attested photocopy सादर करणे बंधनकारक आहे:
✔️ Personal Interview Call Letter ची प्रिंटआउट ✔️ Online Application Form ची प्रिंटआउट ✔️ जन्मतारखेचा पुरावा (Birth Certificate / 10वी प्रमाणपत्र) ✔️ भाषा प्राविण्याचा पुरावा (10वी/12वी विषय प्रमाणपत्र) ✔️ Photo ID Proof (Aadhaar/PAN/Passport/Driving License/Voter ID) ✔️ Graduation मार्कशीट व प्रमाणपत्र ✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी लागू असल्यास) ✔️ EWS Income & Asset Certificate (लागू असल्यास) ✔️ PwBD Disability Certificate (लागू असल्यास) ✔️ अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास) ✔️ NOC (सरकारी/PSU नोकरीत असल्यास)
IOB LBO Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐
❗ फक्त एकाच राज्यासाठी अर्ज
उमेदवार फक्त एकाच राज्यासाठी (तामिळनाडू/कर्नाटक/महाराष्ट्र/गुजरात) अर्ज करू शकतो. एकदा अर्ज केल्यानंतर राज्य बदलता येणार नाही, त्यामुळे विचारपूर्वक राज्य निवडा.
❗ Service Bond बंधनकारक
निवड झालेल्या उमेदवारांना ₹2,00,000/- चा Financial Service Indemnity Bond भरावा लागेल आणि किमान 3 वर्षे सेवा देणे बंधनकारक आहे.
❗ 12 वर्षे त्याच राज्यात पोस्टिंग
निवड झालेल्या उमेदवाराला सुरुवातीची 12 वर्षे (किंवा SMGS-IV Grade पदोन्नती होईपर्यंत, जे आधी येईल) अर्ज केलेल्या राज्यातच पोस्टिंग दिली जाईल.
❗ Language Proficiency Test अनिवार्य
10वी/12वी मध्ये स्थानिक भाषा विषय नसल्यास LPT द्यावी लागेल, अन्यथा मुलाखतीला बसता येणार नाही आणि उमेदवारी रद्द होईल.
❗ Probation Period
निवड झालेल्या उमेदवारांना 2 वर्षांचा Probation Period (Active Service) असेल.
❗ Ration Card/Learner’s License अवैध
परीक्षेसाठी ओळखपत्र म्हणून Ration Card आणि Learner’s Driving License स्वीकारले जाणार नाहीत.
❗ अर्ज मागे घेता येणार नाही
एकदा अर्ज सादर केल्यावर तो मागे घेता येणार नाही आणि भरलेली फी परत मिळणार नाही.
IOB LBO Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
Step 1
www.iob.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Step 2
“Careers” पेजवर जाऊन “Recruitment of Local Bank Officers – 2026-27” या लिंकवर क्लिक करा.
Step 3
“Register Online” वर क्लिक करून प्रथम नोंदणी करा. Registration Number आणि Password नोंद करून ठेवा.
Step 4
Application Form भरा:
- Personal Details
- Educational Details
- Category Information
- राज्य निवड (एकच राज्य)
Step 5
फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र (Handwritten Declaration) अपलोड करा.
Step 6
Application Fee Online पद्धतीने भरा.
Step 7
Final Submit करून Application Form ची प्रिंट काढून ठेवा.
IOB LBO Bharti 2026: Job Benefits
मुख्य फायदे
- Public Sector Bank मध्ये स्थिर आणि सुरक्षित नोकरी
- चांगला पगार व भत्ते
- Pension/PF सुविधा
- करिअर ग्रोथ आणि पदोन्नतीच्या संधी
- Job Security
IOB LBO Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?
- कोणत्याही शाखेतील Graduate उमेदवार
- Banking क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी
- स्थानिक भाषेचे (मराठी/तमिळ/कन्नड/गुजराती) ज्ञान असणारे उमेदवार
- सरकारी बँकिंग नोकरीची तयारी करणारे विद्यार्थी
IOB LBO Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 08.08.2026 |
| शेवटची तारीख | 24.08.2026 |
| फी भरण्याची तारीख | 08.08.2026 ते 24.08.2026 |
| परीक्षा तारीख | लवकरच जाहीर होईल |
| Admit Card | परीक्षेपूर्वी जाहीर होईल |
IOB LBO Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Online अर्ज | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
IOB LBO Bharti 2026: FAQs
IOB LBO पदासाठी पात्रता काय आहे?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील Graduation पूर्ण असणे आवश्यक आहे.
किती जागा आहेत?
एकूण 250 जागा आहेत — तामिळनाडू 100, कर्नाटक 50, महाराष्ट्र 50, गुजरात 50.
वयोमर्यादा किती आहे?
किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे (जन्म 02.08.1996 ते 01.08.2006 दरम्यान).
पगार किती आहे?
Basic Pay ₹48,480 (Scale I) + DA/HRA/CCA असून एकूण Gross Salary त्यापेक्षा जास्त असते.
निवड प्रक्रिया काय आहे?
Online Examination → Language Proficiency Test (लागू असल्यास) → Personal Interview.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
हो, महाराष्ट्रासाठी खास 50 जागा असून मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात, कोणतेही Gender Restriction नाही.
शेवटची तारीख कधी आहे?
24.08.2026 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
एकापेक्षा जास्त राज्यांसाठी अर्ज करता येतो का?
नाही, उमेदवार फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करू शकतो.
Service Bond आहे का?
हो, निवड झालेल्या उमेदवारांना ₹2,00,000/- चा बॉण्ड भरून 3 वर्षे सेवा द्यावी लागते.
इतर भरती अपडेट्स
PDCC Bank Peon Bharti 2026: PDCC बँकेत शिपाई पदांसाठी भरती! 12वी पास मुले/मुली लगेच इथून अर्ज करा
PNB LBO Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेत भरती! पगार ₹85,920, Graduate पास, लगेच इथून अर्ज करा
HAL Bharti 2026: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती! पगार ₹1,60,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा
BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम भरती! Diploma पास मुल/मुली लगेच इथून अर्ज करा
RRB JE Bharti 2026: भारतीय रेल्वेत 4098 जागांची मेगा भरती! फक्त CBT परीक्षा, लवकरच अर्ज सुरू
Concentrix Recruitment 2026: Concentrix फ्रेशर्स Hiring! ग्रॅज्युएट मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा
ISRO Bharti 2026: इस्रो(ISRO) भरती 2026! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा
