Indian Bank Apprentice Bharti 2026: इंडियन बँकेत भरती! 1500 जागा, ग्रॅज्युएशन पास मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

Indian Bank Apprentice Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, स्टायपेंड, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

इंडियन बँक ही चेन्नई येथे मुख्यालय असलेली भारतातील एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील (Public Sector) बँक आहे. या बँकेने Apprentices Act, 1961 अंतर्गत आर्थिक वर्ष 2026-27 साठी देशभरात तब्बल 1500 Apprentice जागांसाठी अधिकृत जाहिरात 04 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी 70 जागा आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिने बँकेत प्रत्यक्ष काम शिकण्याची संधी मिळणार असून दरमहा ₹15,000 पर्यंत स्टायपेंड दिला जाणार आहे.

ज्या उमेदवारांनी 01 एप्रिल 2022 नंतर कोणत्याही शाखेतून पदवी (Graduation) पूर्ण केली आहे आणि ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी ही भरती अत्यंत उपयुक्त आहे. IBPS, SBI Clerk किंवा PO ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ही चांगली संधी आहे.

Indian Bank Apprentice Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती संस्थाइंडियन बँक (Indian Bank)
पदाचे नावApprentice (अप्रेंटिस)
एकूण जागा1500
महाराष्ट्रासाठी जागा70
अर्ज पद्धतOnline
कायदाApprentices Act, 1961
ट्रेनिंग कालावधी12 महिने
नोकरी ठिकाणनिवडलेल्या राज्यातील Indian Bank शाखा
निवड प्रक्रियाOnline परीक्षा + स्थानिक भाषा चाचणी (LLPT)
स्टायपेंड₹12,300 ते ₹15,000 प्रति महिना
अर्ज सुरू05 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख25 नोव्हेंबर 2026
अधिकृत वेबसाइटindianbank.bank.in

Indian Bank Apprentice Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

या भरतीमध्ये देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून एकूण 1500 जागा आहेत.

प्रवर्गानुसार एकूण जागा

SCSTOBCEWSURएकूण
252823481426761500

यापैकी PwBD (दिव्यांग) उमेदवारांसाठी VI – 12, HI – 12, OH – 13 आणि ID – 11 जागा राखीव आहेत.

महाराष्ट्रासाठी जागा (70)

SCSTOBCEWSURएकूण
761873270

👉 महाराष्ट्रातील 70 जागांपैकी 1 जागा HI (कर्णबधिर) आणि 1 जागा OH (अस्थिव्यंग) उमेदवारांसाठी आहे.

महाराष्ट्रातील जिल्हे: अहिल्यानगर (अहमदनगर), अकोला, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.

राज्यनिहाय एकूण जागा

राज्य / UTजागाराज्य / UTजागा
आंध्र प्रदेश85मणिपूर2
अरुणाचल प्रदेश1मेघालय1
आसाम30नागालँड2
बिहार80दिल्ली (NCT)32
चंदीगड2ओडिशा42
छत्तीसगड10पुदुचेरी9
गोवा2पंजाब45
गुजरात35राजस्थान40
हरियाणा32तमिळनाडू270
हिमाचल प्रदेश6तेलंगणा46
जम्मू आणि काश्मीर3त्रिपुरा1
झारखंड60उत्तर प्रदेश285
कर्नाटक35उत्तराखंड20
केरळ44पश्चिम बंगाल145
मध्य प्रदेश65महाराष्ट्र70

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.

⚠️ नोट: पदसंख्या तात्पुरती (Tentative) आहे, बँकेच्या गरजेनुसार ती कमी किंवा जास्त होऊ शकते.

Indian Bank Apprentice Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) किंवा केंद्र सरकारने मान्य केलेली समकक्ष पात्रता पूर्ण केलेली असावी.

👉 पदवी 01.04.2022 ते 01.11.2026 या कालावधीत उत्तीर्ण झालेली असावी (दोन्ही दिवस धरून).

👉 पदवीचा Final Result 01.11.2026 किंवा त्यापूर्वी जाहीर झालेला असावा आणि त्याचा पुरावा विद्यापीठाकडून सादर करावा लागेल.

⚠️ ज्यांचा निकाल अजून लागलेला नाही असे Final Year विद्यार्थी या भरतीसाठी पात्र नाहीत.

⚠️ 01 एप्रिल 2022 पूर्वी पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.

Indian Bank Apprentice Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02.11.1998 ते 01.11.2006 या दरम्यान झालेला असावा (दोन्ही दिवस धरून).

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
SC / ST+5 वर्ष
OBC (Non-Creamy Layer)+3 वर्ष
PwBD+10 वर्ष
1984 दंगलग्रस्त व्यक्ती+5 वर्ष
विधवा, घटस्फोटित आणि कायदेशीररीत्या विभक्त, पुनर्विवाह न केलेल्या महिलाGeneral/EWS – 35 वर्षांपर्यंत, OBC – 38 वर्षांपर्यंत, SC/ST – 40 वर्षांपर्यंत

👉 SC/ST/OBC उमेदवारांना PwBD किंवा 1984 दंगलग्रस्त यापैकी फक्त एका प्रवर्गाची सवलत एकत्रितपणे मिळू शकते.

⚠️ वयाची गणना 01.11.2026 नुसार केली जाईल.

Indian Bank Apprentice Bharti 2026: स्टायपेंड (Stipend)

ही नियमित नोकरी नसून Apprenticeship आहे, त्यामुळे पगाराऐवजी दरमहा स्टायपेंड मिळतो.

शाखेचा प्रकारएकूण स्टायपेंड (दरमहा)बँकेचा हिस्सासरकारचा हिस्सा
Metro / Urban शाखा₹15,000₹8,850₹6,150
Rural / Semi Urban शाखा₹12,300₹6,150₹6,150

अतिरिक्त फायदे

❌ Apprentice ला स्टायपेंड व्यतिरिक्त कोणताही भत्ता (DA, HRA इ.) मिळणार नाही.

❌ EPF आणि ESI लागू नाही.

✅ ट्रेनिंग दरम्यान अपघात झाल्यास Employee’s Compensation Act, 1923 नुसार बँकेकडून भरपाई दिली जाते.

✅ प्रत्येक महिना पूर्ण झाल्यावर 1 Casual Leave मिळते आणि बँकेच्या सर्व सुट्ट्या लागू होतात.

👉 सरकारी बँकेत 12 महिने प्रत्यक्ष काम शिकत असताना स्टायपेंड मिळवण्याची ही पदवीधरांसाठी चांगली संधी आहे.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India भरती आहे आणि महाराष्ट्रासाठी स्वतंत्र 70 जागा आहेत. महाराष्ट्राच्या जागांसाठी अर्ज केल्यास मराठी ही स्थानिक भाषा असेल.

महाराष्ट्रात खालील शहरांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत: छत्रपती संभाजीनगर, मुंबई / नवी मुंबई / ठाणे / MMR, नागपूर, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, अहिल्यानगर आणि धुळे.

⚠️ एक उमेदवार फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करू शकतो.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. उलट विधवा, घटस्फोटित आणि विभक्त महिलांना वयोमर्यादेत विशेष सवलत देण्यात आली आहे.

Indian Bank Apprentice Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

1️⃣ Online परीक्षा (Objective Multiple Choice)

विषयप्रश्नगुण
Reasoning Aptitude1515
Computer Knowledge1010
English Language2525
Quantitative Aptitude2525
General Awareness (Banking Industry विशेष संदर्भासह)2525
एकूण100100

👉 परीक्षेचा एकूण कालावधी 60 मिनिटे आहे.

👉 English सोडून इतर विषयांचा पेपर बँक ठरवेल त्या प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल.

👉 विषयनिहाय (Sectional) किमान गुणांची अट नाही, फक्त एकूण (Aggregate) किमान गुण बँक ठरवेल. SC/ST/OBC/PwBD उमेदवारांना यात 5% सवलत आहे.

👉 जाहिरातीत Negative Marking बाबत कोणताही उल्लेख नाही.

👉 Merit List राज्यनिहाय आणि प्रवर्गनिहाय लावली जाईल. Cut-off वर गुण समान असल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल.

👉 परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांत झाल्यास गुणांचे Normalization (Equi-percentile पद्धत) केले जाईल.

2️⃣ स्थानिक भाषा चाचणी (LLPT)

Online परीक्षा पास झाल्यानंतर निवडलेल्या राज्याच्या स्थानिक भाषेची (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) चाचणी होईल. महाराष्ट्रासाठी ही भाषा मराठी आहे.

👉 ज्यांच्याकडे 8वी, 10वी किंवा 12वी मध्ये ती भाषा शिकल्याचे मार्कशीट / प्रमाणपत्र आहे, त्यांना ही चाचणी द्यावी लागणार नाही.

3️⃣ Interview (बँकेच्या निर्णयावर)

Interview घ्यायचा की नाही हे पूर्णपणे बँकेच्या निर्णयावर अवलंबून आहे.

4️⃣ Medical Fitness

अंतिम निवडीपूर्वी उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या पात्र (Medically Fit) असणे आवश्यक आहे.

Indian Bank Apprentice Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / OBC / EWS₹800 + GST
SC / ST / PwBD₹175 + GST

👉 फी Online पद्धतीने (Debit Card / Credit Card / Internet Banking) भरावी लागेल.

👉 फी Non-refundable आहे.

👉 Online Payment चे बँक Transaction Charges उमेदवाराला भरावे लागतील.

Indian Bank Apprentice Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ अलीकडचा पासपोर्ट साईज रंगीत फोटो (20 KB ते 50 KB)

✔️ स्वाक्षरी (10 KB ते 20 KB, Capital Letters मध्ये नको)

✔️ डाव्या अंगठ्याचा ठसा (20 KB ते 50 KB)

✔️ हाताने लिहिलेले इंग्रजी Declaration (50 KB ते 100 KB)

✔️ NATS 2.0 पोर्टलचा Enrolment ID

✔️ Graduation मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र आणि 01.11.2026 पूर्वी निकाल लागल्याचा पुरावा

✔️ जन्मतारखेचा पुरावा

✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST, लागू असल्यास)

✔️ OBC Non-Creamy Layer प्रमाणपत्र (01.04.2026 किंवा त्यानंतरचे)

✔️ EWS Income & Asset Certificate (FY 2025-26 उत्पन्नावर आधारित)

✔️ PwBD Certificate / UDID Card (लागू असल्यास)

✔️ स्थानिक भाषेचा विषय असलेले 8वी / 10वी / 12वी मार्कशीट (LLPT सूट हवी असल्यास)

✔️ फोटो ओळखपत्र (PAN, Aadhaar, Voter ID, Passport, Driving License इ.)

हाताने लिहायचे Declaration खालीलप्रमाणे आहे:

“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

Indian Bank Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ NATS 2.0 वर 100% Profile बंधनकारक

बँकेत अर्ज करण्यापूर्वी nats.education.gov.in या Apprenticeship पोर्टलवर नोंदणी करून Profile 100% पूर्ण असणे आवश्यक आहे. Profile अपूर्ण असल्यास बँकेत अर्ज करता येणार नाही.

❗ आधी Apprenticeship केली असेल तर अपात्र

ज्या उमेदवारांनी यापूर्वी कुठेही Apprenticeship केली आहे, सध्या करत आहेत किंवा स्वतःच्या चुकीमुळे Apprenticeship मध्येच रद्द झाली आहे, ते अर्ज करू शकत नाहीत.

❗ 1 वर्षाचा अनुभव असेल तर अपात्र

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त नोकरीचा अनुभव असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत.

❗ फक्त एकाच राज्यासाठी एकच अर्ज

एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास फक्त शेवटचा पूर्ण (valid) अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि इतर अर्जांची फी जप्त होईल.

❗ जिल्हा बँक ठरवणार

अर्ज करताना राज्यातील 3 जिल्ह्यांची पसंती देता येते आणि रहिवासी जिल्ह्याला पहिले प्राधान्य मिळते. मात्र अंतिम जिल्हा बँक जागांच्या उपलब्धतेनुसार ठरवेल.

❗ ट्रेनिंगनंतर नोकरीची हमी नाही

12 महिन्यांची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर बँकेत कायमस्वरूपी किंवा कंत्राटी नोकरी देण्याचे कोणतेही बंधन बँकेवर नाही.

❗ मध्येच सोडल्यास 1 महिन्याचा स्टायपेंड दंड

Apprenticeship मध्येच सोडायची असल्यास फक्त महिन्याच्या शेवटी सोडता येते आणि 1 महिन्याचा स्टायपेंड Termination Cost म्हणून भरावा लागतो. तिमाहीच्या मध्ये न सांगता सोडल्यास (Drop-out / Abscond) त्या तिमाहीत मिळालेला सर्व स्टायपेंड परत करावा लागतो. मात्र दुसरी नोकरी मिळाल्यास (Appointment Order दाखवून) किंवा वैद्यकीय कारणाने सोडल्यास दंड नाही.

❗ Certificate साठी 338 दिवसांपेक्षा जास्त हजेरी

Certificate of Proficiency (COP) मिळवण्यासाठी 12 महिन्यांत 338 दिवसांपेक्षा जास्त Paid Days असणे आवश्यक आहे. एकावेळी जास्तीत जास्त 4 Casual Leave घेता येतात.

❗ OBC प्रमाणपत्राची तारीख

OBC Non-Creamy Layer प्रमाणपत्र 01 एप्रिल 2026 किंवा त्यानंतर जारी केलेले असावे. Creamy Layer मधील OBC उमेदवारांनी General म्हणून अर्ज करावा.

❗ Capital Letters मधील स्वाक्षरी चालणार नाही

स्वाक्षरी आणि Declaration Capital Letters मध्ये असल्यास अर्ज बाद होईल. Declaration इंग्रजीतच आणि स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले असावे.

❗ Ex-Servicemen साठी भरती नाही

माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक यांना या Apprenticeship मध्ये घेतले जाणार नाही आणि त्यांच्यासाठी कोणतेही आरक्षण नाही.

❗ Union मध्ये सहभाग नाही

ट्रेनिंग दरम्यान कोणत्याही Union मध्ये सामील होण्यास किंवा Union स्थापन करण्यास मनाई आहे.

❗ Ration Card ओळखपत्र म्हणून चालणार नाही

परीक्षेच्या वेळी Ration Card आणि Learner Driving License हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत.

Indian Bank Apprentice Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

nats.education.gov.in या पोर्टलवर नोंदणी करा आणि आपला Profile 100% पूर्ण करा. Enrolment ID जपून ठेवा.

Step 2

indianbank.bank.in च्या Careers पेजवर किंवा NATS पोर्टलवर जाऊन “Engagement of Apprentices in Indian Bank – 2026” या लिंकवर क्लिक करा.

Step 3

“Click here for New Registration” वर क्लिक करून नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल टाका. Provisional Registration Number आणि Password लिहून ठेवा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details
  • Category Information
  • राज्य, 3 जिल्ह्यांची पसंती आणि स्थानिक भाषा

Step 5

फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेले Declaration Upload करा. Webcam किंवा मोबाईलवरून Live Photo सुद्धा काढावा लागेल.

Step 6

Preview तपासून “Complete Registration” करा आणि Application Fee भरा.

Step 7

e-Receipt आणि अर्जाची Print घ्या.

⚠️ Final Submit केल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.

Indian Bank Apprentice Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • सरकारी बँकेत 12 महिने प्रत्यक्ष कामाचा (On-the-Job Training) अनुभव
  • दरमहा ₹12,300 ते ₹15,000 स्टायपेंड
  • ट्रेनिंगनंतर NATS पोर्टलवर डिजिटल Certificate of Proficiency (COP)
  • बँकिंग कामकाजाची प्रत्यक्ष माहिती, जी IBPS / SBI Clerk आणि PO परीक्षांच्या तयारीसाठी उपयोगी ठरते
  • आपल्या राज्यात आणि शक्यतो रहिवासी जिल्ह्यातच ट्रेनिंगची संधी

Indian Bank Apprentice Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • 2022 ते 2026 दरम्यान पदवी पूर्ण केलेले कोणत्याही शाखेचे उमेदवार
  • बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे पदवीधर
  • IBPS, SBI Clerk / PO परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी
  • ज्यांना अजून नोकरीचा 1 वर्षापेक्षा जास्त अनुभव नाही असे Freshers

Indian Bank Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
जाहिरात प्रसिद्ध04 नोव्हेंबर 2026
अर्ज सुरू05 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख (अर्ज, Edit आणि फी)25 नोव्हेंबर 2026
पात्रतेसाठी Cut-off तारीख01 नोव्हेंबर 2026
परीक्षा तारीखलवकरच जाहीर होईल
Admit Cardपरीक्षेपूर्वी जाहीर होईल

Indian Bank Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्ज इथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Indian Bank Apprentice Bharti 2026: FAQs

Indian Bank Apprentice साठी पात्रता काय आहे?

कोणत्याही शाखेतील पदवी, जी 01.04.2022 ते 01.11.2026 या कालावधीत उत्तीर्ण झालेली असावी.

Indian Bank Apprentice Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

एकूण 1500 जागा आहेत, त्यापैकी महाराष्ट्रासाठी 70 जागा आहेत.

वयोमर्यादा किती आहे?

01.11.2026 रोजी 20 ते 28 वर्षे. SC/ST ला 5, OBC ला 3 आणि PwBD ला 10 वर्षांची सवलत आहे.

स्टायपेंड किती मिळेल?

Metro / Urban शाखेत ₹15,000 आणि Rural / Semi Urban शाखेत ₹12,300 दरमहा.

निवड प्रक्रिया काय आहे?

100 गुणांची 60 मिनिटांची Online परीक्षा, त्यानंतर स्थानिक भाषा चाचणी (LLPT) आणि Medical Fitness. Interview बँकेच्या निर्णयावर अवलंबून आहे.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, महाराष्ट्रासाठी 70 जागा आहेत आणि स्थानिक भाषा मराठी आहे.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, महिला उमेदवार अर्ज करू शकतात. विधवा, घटस्फोटित आणि विभक्त महिलांना वयोमर्यादेत विशेष सवलत आहे.

अर्ज फी किती आहे?

General / OBC / EWS साठी ₹800 + GST आणि SC / ST / PwBD साठी ₹175 + GST.

ट्रेनिंगनंतर बँकेत कायम नोकरी मिळते का?

नाही. Apprenticeship पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्याचे कोणतेही बंधन बँकेवर नाही.

शेवटची तारीख कधी आहे?

25 नोव्हेंबर 2026 ही Online अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे.

इतर भरती अपडेट्स

Leave a comment