IBPS RRB Bharti 2026: ग्रामीण बँक मध्ये मेगा भरती! 13,706 जागा, ग्रॅज्युएशन पास, लगेच इथून अर्ज करा

IBPS RRB Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने CRP RRBs-XV (Common Recruitment Process for Regional Rural Banks) अंतर्गत Officers (Scale I, II, III) आणि Office Assistants (Multipurpose) या पदांसाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. देशभरातील 28 Regional Rural Banks (Gramin Bank) मध्ये तब्बल 13,700+ जागांसाठी ही भरती निघाली आहे, ज्यात Maharashtra Gramin Bank चाही समावेश आहे.

पदवीधर उमेदवारांसाठी (Bachelor’s Degree) ही एक सुवर्णसंधी आहे. Office Assistant पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात, तर Officer पदांसाठी विशिष्ट अनुभव व शाखानिहाय पात्रता लागू आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IBPS RRB Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती संस्थाInstitute of Banking Personnel Selection (IBPS)
भरती नावCRP RRBs-XV
पदाचे नावOfficer Scale I, II, III आणि Office Assistant (Multipurpose)
एकूण जागा13,700+ (28 Regional Rural Banks मध्ये)
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणसंबंधित राज्यातील Regional Rural Bank (Gramin Bank)
निवड प्रक्रियाPrelim + Main / Single Exam + Interview (फक्त Officers साठी)
अर्ज सुरू01.09.2026
शेवटची तारीख21.09.2026
अधिकृत वेबसाइटwww.ibps.in

IBPS RRB Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

अधिकृत जाहिरातीच्या Annexure-I नुसार पदनिहाय एकूण जागा खालीलप्रमाणे आहेत (Tripura Gramin Bank च्या जागा अजून जाहीर झालेल्या नाहीत – NR):

पदएकूण जागा
Office Assistant (Multipurpose)8,183
Officer Scale-I (Assistant Manager)4,256
Officer Scale-II (General Banking Officer)666
Officer Scale-II (IT Officer)182
Officer Scale-II (CA)81
Officer Scale-II (Law Officer)46
Officer Scale-II (Treasury Manager)18
Officer Scale-II (Marketing Officer)16
Officer Scale-II (Agriculture Officer)38
Officer Scale-II एकूण1,047
Officer Scale-III (Senior Manager)220
एकूण जागा (सर्व मिळून)13,706

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे. ⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते; अंतिम जागा अधिकृत जाहिरातीनुसार गृहीत धराव्यात.

Gramin Bank Bharti 2026: राज्यनिहाय जागांचा तपशील

Office Assistant आणि Officer Scale-I साठी सर्वात जास्त जागा असलेली राज्ये:

राज्य / Gramin BankOffice AssistantOfficer Scale-I
Uttar Pradesh Gramin Bank1,200425
Telangana Grameena Bank750160
Andhra Pradesh Grameena Bank900400
Odisha Grameen Bank600375
Gujarat Gramin Bank510600
Bihar Gramin Bank500394
Madhya Pradesh Gramin Bank484252
Maharashtra Gramin Bank300150
Karnataka Grameena Bank279300
Kerala Grameena Bank35055

पूर्ण 28 राज्यांची राज्यनिहाय + प्रवर्गनिहाय (SC/ST/OBC/EWS/General) जागांची यादी अधिकृत जाहिरातीच्या Annexure-I मध्ये उपलब्ध आहे.

Maharashtra Gramin Bank Bharti 2026: महाराष्ट्रातील जागा

Maharashtra Gramin Bank (मुख्यालय: छत्रपती संभाजीनगर) मध्ये एकूण 500 जागा आहेत:

पदजागा
Office Assistant (Multipurpose)300
Officer Scale-I150
Officer Scale-II (सर्व मिळून)50
Officer Scale-III0
एकूण500

👉 Maharashtra साठी स्थानिक भाषा प्रावीण्य (Marathi) Officer Scale-I आणि Office Assistant पदासाठी अनिवार्य आहे.

IBPS RRB Bharti 2026: पगार (Salary)

⚠️ महत्त्वाची नोंद: अधिकृत CRP RRBs-XV जाहिरातीमध्ये कोणत्याही पदासाठी निश्चित Pay Scale जाहीर केलेला नाही. RRB मधील पगार हा NABARD/RRB च्या Bipartite Settlement नुसार ठरतो आणि तो निवड झाल्यानंतर स्वतंत्र Service Regulations द्वारे कळवला जातो. खाली दिलेले आकडे सध्याच्या Bipartite Settlement वर आधारित अंदाजे (Approximate) मासिक In-hand पगार आहेत:

पदअंदाजे मासिक In-hand पगार
Office Assistant (Multipurpose)₹35,000 – ₹37,000 (Basic Pay ₹24,050 पासून सुरू)
Officer Scale-I (Assistant Manager)₹60,000 – ₹61,000
Officer Scale-II (Manager)₹75,000 – ₹77,000
Officer Scale-III (Senior Manager)₹80,000 – ₹90,000

अतिरिक्त फायदे

Dearness Allowance (DA), House Rent Allowance (HRA), Special Allowance, Medical Facilities, NPS/Pension आणि इतर बँकिंग क्षेत्रातील प्रमाणित भत्ते लागू होतात.

👉 ही Banking क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची व स्थिर सरकारी नोकरी मानली जाते.
⚠️ वरील आकडे अंदाजे असून अचूक पगार निवड प्रक्रियेनंतर संबंधित RRB कडून कळवला जाईल.

IBPS RRB Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

Office Assistant (Multipurpose)

कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची Bachelor’s Degree आवश्यक. स्थानिक भाषेचे ज्ञान अनिवार्य.

Officer Scale-I (Assistant Manager)

कोणत्याही शाखेतील Bachelor’s Degree. Agriculture, Horticulture, Forestry, Veterinary Science, IT, Management, Law, Economics, Accountancy शाखेतील उमेदवारांना प्राधान्य.

Officer Scale-II (Generalist)

Bachelor’s Degree किमान 50% गुणांसह + बँक/वित्तीय संस्थेत Officer म्हणून 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.

Officer Scale-II (Specialist – IT/CA/Law/Treasury/Marketing/Agriculture)

प्रत्येक Specialist पदासाठी संबंधित शाखेतील पदवी (उदा. IT Officer साठी Electronics/Computer Science, CA साठी ICAI Membership, Law Officer साठी Law Degree) + 1-2 वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक.

Officer Scale-III (Senior Manager)

Bachelor’s Degree किमान 50% गुणांसह + बँक/वित्तीय संस्थेत किमान 5 वर्षांचा Officer अनुभव आवश्यक.

👉 सर्व पदांसाठी निकाल 21.09.2026 पूर्वी जाहीर झालेला असणे आवश्यक आहे.

IBPS RRB Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

वयाची गणना 01.09.2026 नुसार केली जाईल.

पदवयोमर्यादा
Office Assistant (Multipurpose)18 ते 28 वर्षे
Officer Scale-I18 (वर) ते 30 (खाली) वर्षे
Officer Scale-II21 (वर) ते 32 (खाली) वर्षे
Officer Scale-III21 (वर) ते 40 (खाली) वर्षे

वयोमर्यादा सवलत (Age Relaxation)

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
SC/ST+5 वर्ष
OBC (Non-Creamy Layer)+3 वर्ष
PwBD+10 वर्ष
Ex-Servicemen (ESM) – Office Assistantप्रत्यक्ष सेवा कालावधी + 3 वर्ष (DESM SC/ST साठी +8 वर्ष), कमाल 50 वर्षांपर्यंत
Ex-Servicemen Commissioned Officers – Officer पदे+5 वर्ष
विधवा/घटस्फोटीत/विभक्त महिला (फक्त Office Assistant)General/EWS साठी 35 वर्षांपर्यंत, OBC साठी 38 वर्षांपर्यंत, SC/ST साठी 40 वर्षांपर्यंत

⚠️ वयाची गणना 01.09.2026 नुसार केली जाईल.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच Maharashtra Gramin Bank मध्ये स्वतंत्रपणे 500 जागा राखीव आहेत, ज्यासाठी महाराष्ट्रातील स्थानिक भाषा (मराठी) प्रावीण्य आवश्यक आहे.

Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Chandrapur, Dhule, Jalgaon, Kolhapur, Latur, Mumbai, Nagpur, Nanded, Nashik, Navi Mumbai, Parbhani, Pune, Raigad, Sangli, Satara, Solapur, Thane या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. उलट विधवा/घटस्फोटीत/विभक्त महिलांना Office Assistant पदासाठी विशेष वयोमर्यादा सवलत दिली आहे.

IBPS RRB Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

Office Assistant आणि Officer Scale-I

1️⃣ Preliminary Exam — Reasoning (40 गुण) + Numerical/Quantitative Ability (40 गुण) = 80 गुण, 45 मिनिटे 2️⃣ Main Exam — Reasoning, Computer Knowledge, General Awareness, English/Hindi Language, Numerical Ability = 200 गुण, 120 मिनिटे 3️⃣ Office Assistant साठी Main Exam नंतर थेट Provisional Allotment; Officer Scale-I साठी Main नंतर Interview

Officer Scale-II आणि Scale-III

1️⃣ Single Level Exam (थेट, Prelim नाही) — General Banking/Scale-III साठी 200 गुण (120 मिनिटे), Specialist Cadre साठी 200 गुण (150 मिनिटे, Professional Knowledge Paper सह) 2️⃣ Interview

❗ प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा (Negative Marking) केले जातील. 👉 Exam आणि Interview यांचे Weightage 80:20 असे आहे (Officers साठी). 👉 Office Assistant साठी फक्त Main Exam – कोणताही Interview नाही.

IBPS RRB Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / OBC / EWS₹850 (GST सह)
SC / ST / PwBD₹175 (GST सह)
ESM / DESM (फक्त Office Assistant साठी)₹175 (GST सह)

👉 फी Online पद्धतीने भरावी लागेल. 👉 फी Non-refundable आहे. 👉 प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे फी भरावी लागेल.

IBPS RRB Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ फोटो आणि स्वाक्षरी ✔️ 10वी / 12वी प्रमाणपत्र (जन्मतारखेसाठी) ✔️ Graduation मार्कशीट व प्रमाणपत्र ✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC Non-Creamy Layer – लागू असल्यास) ✔️ EWS Income & Asset Certificate (लागू असल्यास) ✔️ PwBD Disability Certificate / UDID Card (लागू असल्यास) ✔️ Ex-Servicemen संबंधित प्रमाणपत्रे (लागू असल्यास) ✔️ अनुभव प्रमाणपत्र (Officer Scale-II व III साठी अनिवार्य)

Maharashtra Gramin Bank Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ 59.99% चालत नाही

Officer Scale-II व III साठी किमान 50% गुण अनिवार्य आहेत. टक्केवारीचा अपूर्णांक सोडला जातो, म्हणजे 49.99% हे 50% पेक्षा कमीच धरले जाईल.

❗ फक्त एकाच Officer पदासाठी अर्ज

उमेदवार Officer Scale-I, II किंवा III यापैकी फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. मात्र Office Assistant साठी वेगळा अर्ज करता येतो.

❗ NOC आवश्यक

सरकारी/निमसरकारी/PSU नोकरीत असलेल्या उमेदवारांना Interview च्या वेळी “No Objection Certificate” सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा उमेदवारी रद्द होऊ शकते.

❗ Interview Score गोपनीय

Interview पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना Main/Single Exam चे गुण कळवले जाणार नाहीत.

❗ Provisional Allotment ची वैधता

Allotment झाल्यापासून एक वर्षानंतर CRP आपोआप संपुष्टात येते.

❗ Centre बदलता येणार नाही

एकदा परीक्षा केंद्र निवडल्यानंतर बदलाची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही; IBPS कोणत्याही राज्याबाहेरचे केंद्रही देऊ शकते.

Gramin Bank Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

अधिकृत वेबसाइट www.ibps.in ला भेट द्या.

Step 2

“CRP RRBs-XV” या लिंकवर क्लिक करा (Office Assistant किंवा Officer Scale I/II/III निवडा).

Step 3

Online Registration करा (नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक टाकून).

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details
  • Category Information (SC/ST/OBC/EWS/PwBD/ESM)

Step 5

फोटो, स्वाक्षरी व आवश्यक Documents Upload करा.

Step 6

Application Fee Online पद्धतीने भरा.

Step 7

Final Submit करून अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

Maharashtra Gramin Bank Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • सरकारी बँकिंग क्षेत्रातील स्थिर नोकरी
  • Job Security
  • देशभरातील Regional Rural Banks मध्ये Posting संधी
  • Officer पदांसाठी Career Growth व Promotion संधी

IBPS RRB Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार
  • बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी
  • ग्रामीण भागात नोकरी करू इच्छिणारे उमेदवार
  • Banking/Finance/IT/Law/Agriculture क्षेत्रातील अनुभवी उमेदवार (Officer Scale-II/III साठी)

IBPS RRB Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
ऑनलाईन अर्ज सुरू01.09.2026
अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख21.09.2026
Edit WindowRegistration बंद झाल्यावर 2 दिवस
Pre-Exam Trainingनोव्हेंबर 2026
Preliminary Exam (Officer Scale-I / OA)नोव्हेंबर/डिसेंबर 2026
Preliminary Resultडिसेंबर 2026 / जानेवारी 2027
Main / Single Examडिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027
Main/Single Resultजानेवारी 2027
Interview (Officers)जानेवारी/फेब्रुवारी 2027
Provisional Allotmentफेब्रुवारी/मार्च 2027

IBPS RRB Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्ज (Office Assistant)इथे क्लिक करा
Online अर्ज (Officer Scale I/II/III)इथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IBPS RRB Bharti 2026: FAQs

IBPS RRB Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?

सर्व पदांसाठी कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची Bachelor’s Degree आवश्यक आहे. Officer Scale-II व III साठी अतिरिक्त अनुभव व 50% गुण अनिवार्य आहेत.

IBPS RRB Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

एकूण 13,706 जागा आहेत (Office Assistant: 8,183, Officer Scale-I: 4,256, Officer Scale-II: 1,047, Officer Scale-III: 220).

Maharashtra Gramin Bank Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

Maharashtra Gramin Bank मध्ये एकूण 500 जागा आहेत (Office Assistant: 300, Officer Scale-I: 150, Officer Scale-II: 50).

वयोमर्यादा किती आहे?

Office Assistant: 18-28 वर्षे, Officer Scale-I: 18-30 वर्षे, Officer Scale-II: 21-32 वर्षे, Officer Scale-III: 21-40 वर्षे (SC/ST/OBC/PwBD साठी सवलत लागू).

पगार किती आहे?

अधिकृत जाहिरातीत पगाराचा (Pay Scale) स्पष्ट उल्लेख नाही; ते संबंधित RRB च्या Officers/Employees Service Regulations नुसार निश्चित केले जाईल.

निवड प्रक्रिया काय आहे?

Office Assistant व Officer Scale-I साठी Preliminary + Main Exam; Officer Scale-II व III साठी थेट Single Level Exam + सर्व Officer पदांसाठी Interview.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, ही All India Recruitment आहे त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून अर्ज करता येतो.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. कोणताही Gender Restriction नाही.

शेवटची तारीख कधी आहे?

ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 21.09.2026 आहे.

इतर भरती अपडेट्स

Leave a comment