IAF Agniveervayu Musician Bharti 2024: भारतीय हवाई दलात संगीतकार पदासाठी भरती! 10 वी पास वर नोकरी मिळणार

IAF Agniveervayu Musician Bharti 2024: भारतीय हवाई दलामध्ये संगीतकार या पदासाठी भरती निघाली आहे, अद्याप पदसंख्या निर्दिष्ट करण्यात आलेली नाही. लवकरच अर्ज सुरू होणार आहेत, जर तुम्ही या भरती साठी इच्छुक असाल तर या पोस्ट मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.

IAF Agniveervayu Musician Bharti 2024 संबंधी एक विशेष बाब म्हणजे, या भरती साठी उमेदवार हा 10 वी पास जरी असला तरी त्याला फॉर्म भरता येणार आहे. दहावी सोबत उमेदवाराने संगीत शिकलेले असणे अनिवार्य आहे, सोबत त्या संबंधीचे अनुभव प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

IAF Agniveervayu Musician Bharti 2024

पदाचे नावMusician
रिक्त जागाअद्याप पदसंख्या निर्दिष्ट करण्यात आलेली नाही
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी30,000 रुपये प्रति महिना पर्यंत
वयाची अट16 ते 20 वर्षे
भरती फी100 रुपये

IAF Agniveervayu Musician Bharti 2024 Education Qualification

IAF Agniveervayu Musician Bharti साठी Education Qualification Details आपण या Section मध्ये पाहणार आहोत.

Air Force मध्ये संगीतकार होण्यासाठी शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी SSC परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
  • उमेदवाराने संगीत शिकलेले असावे.
  • उमेदवाराने संगीतात डिप्लोमा किंवा कोर्स पूर्ण केलेला असावा.
  • उमेदवाराकडे संगीत अनुभव प्रमाणपत्र असावे.

IAF Agniveervayu Musician Bharti 2024 Physical Qualification

Agniveervayu Musician Bharti साठी उंची आणि छाती हे दोन शारीरिक पात्रता चाचणी निकष असणार आहेत.

पुरुषमहिला
उंची162 सेमी 152 से.मी.
छाती 77 से.मी (किमान 05 सेमी फुगवून)लागू नाही

PFT चाचणी साठी शारीरिक टेस्ट खालीलप्रमाणे असणार आहे:

Testपुरुषमहिला
1.6 किमी रनिंग7 मिनिट8 मिनिट
Testपुरुष
10 Push-Ups1 मिनिट
10 Sit-Ups1 मिनिट
20 Squats1 मिनिट
Testमहिला
10 Sit-Ups1 मिनिट 30 सेकंद
15 Squats1 मिनिट

IAF Agniveervayu Musician Bharti 2024 Application Form Process

ऑनलाईन स्वरूपात या भरती साठी अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाईन अर्ज हे दिनांक 22 मे पासून सुरू होणार आहेत. अद्याप अर्जाची लिंक Activate करण्यात आलेली नाहीये.

अधिकृत वेबसाईटभेट द्या
भरतीची जाहिरातयेथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरु होण्याची तारीख22 मे 2024
अर्ज बंद होण्याची तारीख05 जून 2024
मेळाव्याची तारीख03 ते 12 जुलै 2024

Online Application Process

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून भरतीची जाहिरात वाचायची आहे, त्यानंतर ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • तुम्ही Agnipathvayu या अधिकृत वेबसाईट वर पोहचाल, तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी पोर्टल वर Sign in करायचे आहे, नोंदणी पूर्ण झाल्यावर Login करायचे आहे.
  • लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर IAF Agniveervayu Musician Bharti 2024 साठी सादर करावयाचा ऑनलाईन फॉर्म Open होईल.
  • फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे, यामधे उमेदवारांना त्यांची वैयक्तिक माहिती, शालेय शैक्षणिक माहिती अशी Information भरायची आहे.
  • माहिती भरताना काळजीपूर्वक प्रत्येक Information Add करायची आहे, चूक होऊ द्यायची नाही, वेळ जास्त लागला तर हरकत नाही फॉर्म चुकू देऊ नका.
  • त्यानंतर जे कागदपत्रे विचारले आहेत, ते सर्व फॉर्म मध्ये अपलोड करा, Soft Copy मध्ये Documents असावेत.
  • शेवटी एकदा Agniveervayu Musician Bharti Form तपासून Verify करून घ्या, माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर मग फॉर्म सबमिट करुन टाका.

IAF Agniveervayu Musician Bharti 2024 Selection Process

Agniveervayu Musician Bharti साठी उमेदवारांची निवड ही मेळाव्याद्वारे होणार आहे, यामधे एकूण निवडीचे टप्पे हे तीन असणार आहेत.

1) Music Instrument Playing Test

अर्जदार भरती साठी वरील निकाषाद्वारे पात्र असेल तर त्याला Music Instrument Playing Test साठी सुरुवातीला बोलावले जाईल. या टेस्ट मध्ये उमेदवाराला Instrument Play करावे लागतील, जर उमेदवार Instrument Play करू शकला तर त्याला या टेस्ट मध्ये पास केले जाणार आहे.

2) English Written Test

दुसऱ्या टप्प्यात Music Instrument Playing Test मध्ये पास झालेल्या उमेदवारांना बोलावले जाणार आहे. English Test ही Objective Type स्वरुपात असणार आहे. English Written Test मध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, जे उमेदवार उत्तीर्ण होतील केवळ त्यांना पुढील टप्प्यात पाठवले जाणार आहे.

3) Physical Fitness Test (PFT)

ही शेवटची टेस्ट असणार आहे, या Physical Fitness Test द्वारे उमेदवार Final केले जाणार आहेत, त्यामुळे या टेस्ट मध्ये पास होणे गरजेचे आहे.

शारीरिक चाचणी टेस्ट मध्ये रनिंग, Push Ups, Sit Ups, Squats हे करावे लागणार आहेत, याची महिती वर Physical Qualification मध्ये देण्यात आली आहे.

शेवटी जे उमेदवार या तिन्ही टेस्ट मध्ये पास होतील, त्यांचे Final Selection Merit List द्वारे केले जाणार आहे. ज्यांचे नाव या लिस्ट मध्ये येईल त्यांना Musician Job Post साठी Joining Latter पाठवले जाईल.

IAF Agniveervayu Musician Bharti 2024 FAQ

Who is eligible for IAF Agniveervayu Musician Bharti 2024?

IAF Agniveervayu Musician Bharti साठी उमेदवार हा किमान 10 वी पास असणे गरजेचे आहे, सोबत उमेदवाराला संगीताचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे.

How to apply for IAF Agniveervayu Musician Bharti Online?

ऑनलाईन स्वरूपात IAF Agniveervayu Musician Bharti साठी अर्ज हा अधिकृत वेबसाईट वरून सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी इतर कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही, त्यामुळे अर्ज करताना काळजी घ्यायची आहे.

What is the age limit of Agniveervayu Musician Bharti?

IAF Agniveervayu Musician Bharti साठी वयाची अट ही 16 ते 20 वर्षे आहे, उमेदवार हा 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 या दरम्यान जन्मलेला असावा.

What is the Monthly Salary of an Agniveervayu Musician?

Agniveervayu Musician पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला महिन्याला 30 हजार रुपये एवढा पगार दिला जातो. यामध्ये वेतन श्रेणी ही कमी जास्त होऊ शकते, हे सर्वस्वी उमेदवाराच्या अनुभवावर आणि Skills वर अवलंबून आहे.

2 thoughts on “IAF Agniveervayu Musician Bharti 2024: भारतीय हवाई दलात संगीतकार पदासाठी भरती! 10 वी पास वर नोकरी मिळणार”

Leave a comment