Amazon Future Engineer Scholarship and Internship: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर स्कॉलरशिप आणि इंटर्नशिप बद्दल माहिती सांगणार आहे.
ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मार्फत मुलींना दोन लाख रुपयांची स्कॉलरशिप दिली जाणार आहे. या स्कॉलरशिप साठी अंडर ग्रॅज्युएट डिग्री असणाऱ्या मुली फॉर्म भरू शकणार आहेत.
अंडर ग्रॅज्युएट डिग्री मध्ये कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग आणि इतर फिल्डमधील कोर्स करणाऱ्या मुलींना या स्कॉलरशिप चा लाभ भेटणार आहे. सोबतच पात्र मुलींना ॲमेझॉन मध्ये इंटेनशिप करण्याची संधी देखील या मार्फत दिली जाणार आहे.
Amazon Future Engineer Scholarship and Internship
स्कॉलरशिप चे नाव | Amazon Future Engineer Scholarship and Internship |
स्कॉलरशिप ची सुरुवात | Amazon Future Engineer |
उद्देश | उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | B.E, B.Tech / CS आणि IT स्त्रीम मध्ये शिक्षण घेणारे उमेदवार |
लाभ | 2 लाख रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Amazon Future Engineer Scholarship and Internship Elegibility Criteria
- या प्रोग्रॅम साठी केवळ मुलींना अर्ज करता येणार आहे.
- B.E, B.Tech / CS आणि IT स्त्रिम मध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या मुली अर्ज करू शकतात.
- मुलींचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असावे.
- सोबतच मुलींनी त्यांचे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे सीबीएससी बोर्ड मार्फत 2022 पूर्वीच केलेले असावे.
Amazon Future Engineer Scholarship Benefits
ॲमेझॉन फ्युचर इंजीनियरिंग स्कॉलरशिप मध्ये ज्या मुली पात्र झाले आहेत, आणि ज्यांची अर्ज स्वीकारले गेले आहेत त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ॲमेझॉन मार्फत स्कॉलरशिप द्वारे आर्थिक मदत केली जाते.
मुलींना एकूण 2 लाख रुपयांची आर्थिक मदत या प्रोग्रॅम द्वारे केली जाते. प्रतिवर्षी 50 हजार रुपये प्रमाणे ही मदत मुलींना मिळते.
Amazon Future Engineer Internship Benefits
ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मार्फत स्कॉलरशिप मध्ये पात्र झालेल्या मुलींना इंटर्नशिप करण्याची देखील संधी दिली जाते. यामध्ये दरम्यान मुलींना मोठ्या आयटी कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो, सोबतच मिळालेल्या अनुभवामुळे पुढे चालून नोकरीसाठी याचा खूप फायदा होतो.
Amazon Future Engineer Scholarship and Internship Apply Online
ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर स्कॉलरशिप आणि इंटर्नशिप प्रोग्रॅम साठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अर्जाची शेवटची तारीख | 30 ऑक्टोबर 2024 |
फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, तुम्ही खाली दिलेल्या स्टेप वापरून तुमचा फॉर्म भरू शकता.
- सुरुवातीला तुम्हाला ॲमेझॉन फ्युचर इंजीनियरिंग च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला Click Here To Apply वर क्लिक करायचे आहे.
- एक नवीन पेज उघडेल, तिथे तुम्हाला प्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून प्रोग्राम चा फॉर्म उघडायचा आहे.
- फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरायची आहे.
- आवश्यक जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर फॉर्म तपासायचा आहे, आणि शेवटी सबमिट करायचा आहे.
नवीन स्कॉलरशिप:
- HDFC Bank Parivartan Scholarship 2024: 1ली ते 12वी पास ITI डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ₹18,000 ची स्कॉलरशिप
- Aditya Birla Capital Scholarship 2024-25:9-12वी मधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 हजार स्कॉलरशिप मिळत आहे! लवकर अर्ज
Amazon Future Engineer Scholarship and Internship FAQ
Who is eligible for Amazon Future Engineer Scholarship and Internship?
ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर्स स्कॉलरशिप आणि इंटर्नशिप साठी इंजीनियरिंग चे शिक्षण घेणाऱ्या मुलींना अर्ज करता येणार आहे.
How to apply for Amazon Future Engineer Scholarship?
ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर स्कॉलरशिप साठी अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरता येतो.
How to enroll in Amazon Future Engineer Internship?
ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर स्कॉलरशिप साठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते.
What is the last date to apply for Amazon Future Engineer Scholarship and Internship?
ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग स्कॉलरशिप आणि इंटर्नशिप साठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर 2024 आहे.