Vanrakshak & Vansevak bharti 2025: नमस्कार मित्रांनो! स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे! महाराष्ट्र वन विभागामार्फत एकूण 14,000+ वनसेवक व वनरक्षक पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती Maharashtra Vansevak bharti 2025 अंतर्गत होणार असून लवकरच याबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. वन विभागात नोकरीची संधी ही निसर्गप्रेमी आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.
महाराष्ट्र वन विभाग (MAHA Forest) हे पर्यावरण संवर्धन आणि जंगल सुरक्षा यासाठी कार्यरत असलेले एक महत्त्वाचे शासकीय संस्थान आहे. राज्यातील विविध वनक्षेत्रांमध्ये वनरक्षक पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत विभागात वनरक्षकसाठी 1664 पदे रिक्त असल्याची माहिती आहे, आणि ही भरती त्यासाठीच नवे उमेदवार निवडण्यासाठी होणार आहे.
जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि निसर्ग व वन्यजीवनामध्ये काम करण्याची आपली आवड असेल, तर ही भरती तुमच्यासाठीच आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया फक्त ऑनलाइन पद्धतीने mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून होणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांची तयारी ठेवावी.
🟢 या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला संपूर्ण लेख जरूर वाचा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Maharashtra Vanrakshak & Vansevak bharti 2025: Complete Recruitment Details : भरतीची माहिती
घटक | माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | महाराष्ट्र वन विभाग (Maharashtra Forest Department) |
पदाचे नाव | वनरक्षक (Forest Guard) |
एकूण पदसंख्या | 12,991 पदे (सद्यस्थितीत 2138 पदे तत्काळ भरणे अपेक्षित) |
पोस्टिंगचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्रातील विविध वनवृत्त कार्यालयांमध्ये |
वेतनश्रेणी (Pay Scale) | वनसेवक: ₹15,000 पासून ₹47,600 पर्यंत वनरक्षक :S-7: ₹21,700 – ₹69,100 + DA व इतर भत्ते (7वा वेतन आयोगानुसार) |
गट | गट-क (Group-C) |
अर्ज फी (Application Fee) | सामान्य – ₹1000 मागास वर्ग – ₹900 |
भरती प्रक्रिया प्रकार | ऑनलाइन अर्ज (Online Application) |
Vanrakshak & Vansevak bharti 2025: Posts & Vacancies: पदे आणि उपलब्ध जागा
महाराष्ट्र वन विभागामार्फत एकूण 12,991 वनसेवक पदांची भरती होणार आहे. खाली विभागनिहाय जागांची सविस्तर माहिती दिली आहे:
विभागाचे नाव | पदसंख्या |
---|---|
नागपूर | 1,852 |
ठाणे | 1,568 |
छत्रपती संभाजीनगर | 1,535 |
गडचिरोली | 1,423 |
कोल्हापूर | 1,286 |
अमरावती | 1,188 |
धुळे | 931 |
नाशिक | 887 |
चंद्रपूर | 845 |
पुणे | 811 |
यवतमाळ | 665 |
एकूण पदसंख्या | 12,991 |
Vansevak Bharti 2025: पदे आणि उपलब्ध जागा
क्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा ( अंदाजे ) |
---|---|---|
1 | वनसेवक (Vansevak) | 1600+ |
Vanrakshak & Vansevak bharti 2025: Eligibility & Qualifications: पात्रता आणि आवश्यक शिक्षण
वनसेवक भरती 2025 साठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत:
आवश्यक शैक्षणिक अर्हता |
---|
१२वी उत्तीर्ण (Science / Maths / Geography / Economics पैकी किमान एक विषय असणे आवश्यक) |
१०वी उत्तीर्ण (Secondary School Certificate – SSC) |
१०वी उत्तीर्ण + सक्षम शासकीय वैद्यकीय अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक |
वाचणे, लिहिणे आणि बोलणे आवश्यक |
अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सर्व पात्रता पूर्ण केलेली असावी |
वनसेवक / वनरक्षक भरती 2025: शारीरिक पात्रता
वनरक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
🧍♂️ सामान्य शारीरिक मापदंड
मापदंड | पुरुष उमेदवार | महिला उमेदवार |
---|---|---|
किमान उंची (से.मी.) | १63 | १५5-157 |
छातीचा घेर (से.मी.) | ७१ (न फुगवता) / ७६ (फुगवून) | लागू नाही |
वजन | वय व उंचीनुसार वैद्यकीय निकषांनुसार योग्य प्रमाणात |
👣 अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी सवलत
मापदंड | पुरुष उमेदवार | महिला उमेदवार |
---|---|---|
किमान उंची (से.मी.) | १५२.५ | १५२.५ |
छातीचा घेर (से.मी.) | ७९ (न फुगवता) / ८४ (फुगवून) | लागू नाही |
वजन | वय व उंचीनुसार वैद्यकीय निकषांनुसार योग्य प्रमाणात |
👁️ दृष्टी चाचणी निकष
प्रकार | अधिक चांगला डोळा | वाईट डोळा |
---|---|---|
दूरदृष्टी | 6/6 किंवा 6/9 | 6/12 किंवा 6/18 |
जवळील दृष्टी | J.9 | J.99 |
टीप: उमेदवाराच्या प्रत्येक डोळ्यात पूर्ण दृश्य क्षेत्र असणे आवश्यक आहे.
🩺 वैद्यकीय तपासणी
- सर्व शारीरिक पात्रतेचे प्रमाणपत्र शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा नियुक्त वैद्यकीय तज्ञांकडून देण्यात येईल.
- पुढील बाबी तपासल्या जातील:
- तिरळेपणा
- रंग व रात आंधळेपणा
- फेंगाडे गुडघे
- सपाट पाय
- त्वचेचे व छातीचे रोग
- नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करणाऱ्या उमेदवारांना काही शारीरिक पात्रतेमध्ये शिथिलता दिली जाईल.
✅ उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी तयारी करताना वर नमूद केलेल्या सर्व शारीरिक पात्रता अटी पूर्ण असणे अत्यावश्यक आहे.
Vanrakshak & Vansevak bharti 2025: Age Limit & Relaxations: वयोमर्यादा आणि सवलती
🔢 वयोमर्यादा तपशील (किमान व कमाल वय)
अनुक्रमांक | प्रवर्ग / घटक | किमान वय | कमाल वय |
---|---|---|---|
1 | सर्वसाधारण (अमागास) | 18 वर्षे | 27 वर्षे |
2 | मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ. | 18 वर्षे | 32 वर्षे |
3 | प्राविण्यप्राप्त खेळाडू (अमागास) | 18 वर्षे | 32 वर्षे |
प्राविण्यप्राप्त खेळाडू (मागास) | 18 वर्षे | 37 वर्षे | |
4 | माजी सैनिक (अमागास) | 18 वर्षे | 27 + सैनिकी सेवा + 3 वर्षे |
माजी सैनिक (मागास) | 18 वर्षे | 32 + सैनिकी सेवा + 3 वर्षे | |
5 | प्रकल्पग्रस्त | 18 वर्षे | 45 वर्षे |
6 | भूकंपग्रस्त | 18 वर्षे | 45 वर्षे |
7 | पदवीधर अंशकालीन कर्मचारी | 18 वर्षे | 55 वर्षे |
8 | रोजंदारी मजूर | 18 वर्षे | 55 वर्षे |
विशेष सूचना:
- सर्व उमेदवारांनी वयोमर्यादा संबंधित आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे भरतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
- वयाची गणना अंतिम अर्जाच्या दिनांकाच्या आधारे केली जाईल.
Vanrakshak and Vansevak bharti 2025: Selection Process & Exam Pattern: निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
🌲 वनसेवक / वनरक्षक भरती 2025: निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
✅ 1) निवड प्रक्रियेचे टप्पे:
- ऑनलाईन स्पर्धा परीक्षा (CBT)
- कागदपत्र तपासणी
- शारीरिक मोजमाप चाचणी
- धावण्याची (शारीरिक क्षमता) चाचणी
- अंतिम गुणवत्ता यादी
💻 2) ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test – CBT)
घटक | तपशील |
---|---|
एकूण गुण | 120 गुण |
प्रश्नांची संख्या | 60 प्रश्न |
प्रत्येक प्रश्नाचे गुण | 2 गुण |
परीक्षा कालावधी | 2 तास |
परीक्षा स्वरूप | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQ) |
किमान पात्रतेचे गुण | 45% (54 गुण) |
📝 विषयवार गुणवाटप:
विषय | गुण |
---|---|
मराठी | 30 |
सामान्य ज्ञान | 30 |
बौद्धिक चाचणी | 30 |
गणितीय चाचणी | 30 |
एकूण | 120 गुण |
📘 सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम:
- महाराष्ट्राचा भूगोल
- सामाजिक इतिहास
- वन आणि पर्यावरण
- हवामान, जैवविविधता
- चालू घडामोडी
📄 3) कागदपत्र तपासणी:
- मूळ कागदपत्रांची तपासणी (वयोमर्यादा, आरक्षण, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र इ.)
- अनुपस्थित किंवा अपूर्ण कागदपत्रे असल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
📏 4) शारीरिक मोजमाप चाचणी (Physical Measurement Test – PMT):
घटक | पुरुष | महिला |
---|---|---|
उंची | किमान 163 से.मी. | किमान 150 से.मी. |
छाती (फक्त पुरुष) | 79 से.मी. न फुगवलेली, 84 से.मी. फुगवलेली | लागू नाही |
🏃♂️ 5) धावण्याची चाचणी (Physical Efficiency Test – PET):
👨🦱 पुरुष उमेदवार: 5 कि.मी. धावणे (३० मिनिटांत)
👩🦰 महिला उमेदवार: 3 कि.मी. धावणे (२५ मिनिटांत)
📊 गुणवाटप (पुरुष):
वेळ (मिनिटांत) | गुण |
---|---|
≤ 17 मिनिट | 80 |
>17 – 18 | 70 |
>18 – 19 | 60 |
>19 – 20 | 50 |
>20 – 21 | 45 |
>21 – 22 | 40 |
>22 – 23 | 35 |
>23 – 24 | 30 |
>24 – 25 | 25 |
>25 – 26 | 20 |
>26 – 27 | 12 |
>27 – 28 | 10 |
>28 – 29 | 5 |
>30 मिनिट | अपात्र |
📊 गुणवाटप (महिला):
वेळ (मिनिटांत) | गुण |
---|---|
≤ 12 मिनिट | 80 |
>12 – 13 | 70 |
>13 – 14 | 60 |
>14 – 15 | 50 |
>15 – 16 | 45 |
>16 – 17 | 40 |
>17 – 18 | 34 |
>18 – 19 | 30 |
>19 – 20 | 25 |
>20 – 21 | 20 |
>21 – 22 | 15 |
>22 – 23 | 10 |
>23 – 24 | 5 |
>25 मिनिट | अपात्र |
टीप: धावण्याच्या चाचणीपूर्वी उमेदवाराने डॉक्टरकडून ‘फिटनेस प्रमाणपत्र’ व स्वतःचे वचनपत्र सादर करणे आवश्यक आहे.
🏁 6) अंतिम गुणवत्ता यादी:
- ऑनलाईन परीक्षा (120 गुण) + धावण्याची चाचणी (80 गुण) = एकूण 200 गुण
- या आधारे गुणवत्तेनुसार यादी तयार केली जाईल.
- निवड व प्रतिक्षा यादी वनवृत्तनिहाय संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.
Note:
वनसेवक भरती 2025 मध्ये 1600+ नवीन पदांची भरती होणार असून ही पदे नुकतीच भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली आहेत. वनसेवक पदासाठीची निवड प्रक्रिया अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, कारण निवड प्रक्रिया व परीक्षा पद्धतीबाबतचा तपशील लवकरच अधिकृत अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे.
Vanrakshak & Vansevak bharti 2025: Important Dates & Deadlines – वनरक्षक भरती 2025: महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्ज सुरू होण्याची तारीख | लवकरच अपडेट होईल |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | लवकरच अपडेट होईल |
परीक्षा दिनांक | लवकरच अपडेट होईल |
प्रवेशपत्र (Hall Ticket) तारीख | लवकरच अपडेट होईल |
Maharashtra Vansevak bharti 2025: Important Links & Official Notification -: अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटक | लिंक/माहिती |
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची शॉर्ट जाहिरात | इथे डाउनलोड करा (लवकरच अपडेट होईल) |
Online अर्ज | इथे क्लिक करा (लवकरच अपडेट होईल) |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
What to Do After 12th? 12वी नंतर काय करायचं? Science, Commerce आणि Arts साठी करिअर मार्गदर्शक 2025!
Vanrakshak & Vansevak bharti 2025: Step-by-Step Application Process: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ अर्ज करण्याची पद्धत (Step-by-Step Process):
- फक्त ऑनलाईन अर्ज
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- कोणत्याही इतर माध्यमातून अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- एकाच वनवृत्तासाठी अर्ज
- उमेदवार फक्त एका वनवृत्तासाठीच अर्ज करू शकतो.
- अर्ज करताना वनवृत्ताची निवड काळजीपूर्वक करावी.
- संकेतस्थळावर लॉगिन करा
- अधिकृत वेबसाइट: www.mahaforest.gov.in
- “Recruitment” या टॅबवर क्लिक करा.
- जाहीरात काळजीपूर्वक वाचा.
- नोंदणी (Registration) प्रक्रिया
- “Registration” लिंकवर क्लिक करा.
- खालील माहिती भरावी:
- वैयक्तिक माहिती
- SSC रोल नंबर (गुणपत्रिकेवरील)
- सर्व माहिती नीट तपासून नोंदणी पूर्ण करा.
- यानंतर Login ID आणि Password ईमेल/एसएमएस द्वारे मिळेल.
- Login करून अर्ज भरा
- मिळालेल्या Login ID आणि Password चा वापर करून लॉगिन करा.
- “Post Selection” टॅबमध्ये जाऊन “Click here to fill the application” क्लिक करा.
- खालील माहिती भरा:
- Personal Details
- वनवृत्त निवड (फक्त एक)
- अनुसूचित जमातीसाठी जिल्ह्याची निवड (जर लागू असेल)
- इतर माहिती भरणे
- Additional Details
- Communication Details
- Qualification & Experience
📤 Documents Upload Information (टेबल स्वरूपात):
प्रकार | फॉर्मेट | Size Limit | विशेष सूचना |
---|---|---|---|
छायाचित्र (Photo) | .jpg / .jpeg | 50 KB ते 80 KB | पांढऱ्या पार्श्वभूमीवरील रंगीत पासपोर्ट फोटो |
स्वाक्षरी (Signature) | .jpg / .jpeg | 50 KB ते 80 KB | स्पष्ट आणि काळ्या शाईत स्वाक्षरी |
इतर कागदपत्रे (Docs) | .jpg / .jpeg / .pdf | 100 KB ते 300 KB | योग्य स्वरूपातील स्कॅन केलेली प्रत |
💳 शेवटी ऑनलाईन फी पेमेंट
- अर्जाची अंतिम पायरी म्हणजे फी भरणे.
- फी फक्त ऑनलाईन मोड द्वारे भरता येईल.
इतर भरती
NMMC Bharti 2025:12वी पास भरती नवी मुंबई महानगरपालिका मध्ये! पगार ₹81,100 रु.महिना!
CSIR CRRI Bharti 2025: केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 12वी पाससाठी भरती! पगार ₹81,000 पर्यंत!
Vanrakshak & Vansevak bharti 2025 संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
Vanrakshak & Vansevak bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा?
Vansevak bharti 2025 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने www.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “Recruitment” टॅबमध्ये दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जातील.
Vanrakshak & Vansevak bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
Vanrakshak & Vansevak bharti 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच काही वनवृत्तांमध्ये विशिष्ट शारीरिक मापदंडांची पूर्तता करणेही बंधनकारक आहे.
Vanrakshak & Vansevak bharti 2025 ची परीक्षा कधी होणार?
Vanrakshak & Vansevak bharti 2025 ची लेखी परीक्षा ऑगस्ट 2025 मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षेची नेमकी तारीख भरती प्रक्रियेच्या अधिकृत जाहीरातीनंतरच जाहीर केली जाईल.
Vanrakshak & Vansevak bharti 2025 मध्ये एका पेक्षा जास्त वनवृत्तासाठी अर्ज करू शकतो का?
नाही. Vanrakshak bharti 2025 साठी उमेदवार फक्त एका वनवृत्तासाठीच अर्ज करू शकतो. एकापेक्षा अधिक वनवृत्तांसाठी अर्ज केल्यास अर्ज फेटाळले जाऊ शकतात.