ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती, 10वी पास अर्ज करा

ITBP Bharti 2024: इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये भरती निघाली आहे, ITBP मार्फत या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या तीन पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे. 526 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, ज्या या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2024 आहे, उमेदवारांना या लास्ट डेट च्या आगोदर फॉर्म भरायचा आहे.

ITBP Bharti 2024

पदाचे नावसब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल
रिक्त जागा526
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी1,12,400 रुपये
वयाची अटपदानुसार
भरती फीपदानुसार

ITBP Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन
सब इंस्पेक्टर9221,12,400 रुपये
हेड कॉन्स्टेबल38381,100 रुपये
कॉन्स्टेबल5169,100 रुपये
एकूण जागा526

ITBP Bharti 2024 Fees

[SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

सब इंस्पेक्टरGeneral/OBC/EWS₹200/-
हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबलGeneral/OBC/EWS ₹100/-

ITBP Bharti 2024 Education Qualification

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये एकूण तीन पदांसाठी भरती निघाली आहे, या तिन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता मात्र भिन्न आहे.

पदाचे नावशिक्षण
सब इंस्पेक्टरB.Sc ( Physics, Chemistry and Mathematics / IT /Computer Science / Electronics and Communication / Electronics and Instrumentation ) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/Electrical / IT)
हेड कॉन्स्टेबल45% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ ITI (Electronics/ Electrical/ Computer) किंवा 10वी उत्तीर्ण+ डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/ IT/ Electrical)
कॉन्स्टेबल10वी उत्तीर्ण

ITBP Bharti 2024 Age Limit

पदाचे नाववयोमर्यादा
सब इंस्पेक्टर20 ते 25 वर्षे
हेड कॉन्स्टेबल18 ते 25 वर्षे
कॉन्स्टेबल18 ते 23 वर्षे

ITBP Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट14 डिसेंबर 2024
  • इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • वेबसाईट वर गेल्यानंतर तुमची नोंदणी करा, आणि नंतर लॉगिन करा.
  • भरतीचा फॉर्म उघडेल फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • परीक्षा फी भरून घ्या.
  • त्यानंतर अर्ज तपासा आणि मग शेवटी फॉर्म सबमिट करा.

ITBP Bharti 2024 Selection Process

ज्या उमेदवारांनी या भरती साठी फॉर्म भरले होते त्यांना खालील निवड प्रक्रियेनुसार इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये भरती केले जाणार आहे.

  • Physical efficiency test
  • Physical standard test
  • Written examination
  • Document verification
  • Medical examination
  • Final Selection
ITBP Bharti 2024 Selection Process

सुरुवातीला उमेदवारांना शारीरिक चाचण्या द्याव्या लागतील, जे उमेदवार या टेस्ट मध्ये पास होतील त्यांना लेखी परिक्षेसाठी बोलवले जाईल. त्यानंतर जे उमेदवार पास झाले आहेत त्यांचे कागदपत्रे पडताळणी केली जाईल, नंतर मेडिकल तपासणी पार पडेल मग नंतर अंतिम निवड प्रक्रियेतून पात्र उमेदवारांना निवडले जाईल.

नवीन भरती अपडेट:

ITBP Bharti 2024 FAQ

Who is eligible for ITBP Bharti 2024?

ज्या उमेदवारांनी किमान 10वी, 12वी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलेले आहे त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

How to apply for ITBP Bharti 2024?

ITBP च्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for ITBP Bharti 2024?

या भरतीसाठी उमेदवारांना 14 डिसेंबर 2024 आगोदर फॉर्म भरायचा आहे.

Leave a comment