डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2024 | Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana

महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालन मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana संबंधी सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्षासाठी सुरू करण्यात आलेली आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जात आहे.

तुम्हाला देखील शिक्षणासाठी शासनाच्या या शिष्यवृत्ती योजना चा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही कृपया या लेखामध्ये दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. जेणेकरून तुम्हाला शिक्षणसाठी आर्थिक मदत होईल.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2024

पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना ही गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांना वर्षातील एकूण 10 महिन्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, म्हणजे केवळ शैक्षणिक कालावधी मध्येच ही योजना लागू असणार आहे. 30,000 रुपये ते 2,000 रुपये एवढी स्कॉलरशिप भेटणार आहे.

यामध्ये मेट्रो सिटी, Urban Areas आणि ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे योजनेचा फायदा घेण्याची संधी सर्वांना आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका, जे तुम्ही पात्र असाल, तर लगेच अर्ज करून टाका.

पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना साठी या चालू शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करणे सुरु आहे, अर्जाची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. आता नवीन माहिती नुसार फॉर्म भरण्याची Last Date 30 एप्रिल 2024 असणार आहे.

Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana Highlights

योजनेचे नावडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
उद्देशविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
फायदा30,000 ते 2,000 रुपये एवढी आर्थिक सहाय्यता.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळMahaDBT Portal

Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana Qualification Details

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी नागरिक असावा.
  • अर्जदार कोणतीही नोकरी करत नसावा.
  • अर्जदार शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत नसावा.
  • विद्यार्थी हा बाहेरगावी वसतिगृहात राहून शिक्षण घेत असावा.
  • जर विद्यार्थी त्याच्या गावातील किंवा शहरातील वसतिगृहात राहून शिक्षण घेत असेल, तर असा विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र असणार नाही.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांचे असेल, तर विद्यार्थ्याला वसतिगृह निर्वाह भत्ता मिळतो.
  • जर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख ते 8 लाख दरम्यान असेल, तर अशा विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळते.

Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana Benifits

पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी 30,000 ते 2,000 रुपये एवढी आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे, यामध्ये निर्वाह भत्ता आणि व्यवसायिक अभ्यासक्रम साठी मदत केली जाणार आहे.

खाली आपण शासनाद्वारे या योजनेसाठी आर्थिक मदत कशी दिली जाणार याची माहिती टेबल स्वरूपात दिली आहे. माहिती वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला किती रुपये मिळतील, हे समजून जाईल.

प्रकारवार्षिक उत्पन्न मर्यादावसतिगृह ठिकाणशिष्यवृत्ती रक्कम
अल्पभूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत मजूरकोणतीही मर्यादा नाहीमुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र30,000 रुपये
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी20,000 रुपये
इतर विद्यार्थी1 लाख रुपयेमुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र10,000 रुपये
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी8,00० रुपये
इतर विद्यार्थी1 लाख ते 8 लाख रुपयेमुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र10,000 रुपये
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी8,00० रुपये
बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम विद्यार्थी1 लाख रुपये2,000 रुपये

Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana Document List

  • अर्जदार विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र (महाराष्ट्र)
  • कुटुंबाचे रेशनकार्ड
  • गॅप असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (1 लाख ते 8 लाख)
  • विद्यार्थ्याचे पालक शेतकरी असतील, तर अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
  • पालक मजूर असतील तर, नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र
  • दोन मुले असल्याचे पालकांचे घोषणापत्र

वर सांगितलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना ही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे अनिवार्य आहे. बाकी या व्यतिरिक्त इतर काही कागदपत्रे देखील लागू शकतात, त्यामुळे तुम्ही एकदा MahaDBT पोर्टल वर जाऊन त्याची माहिती जाणून घ्या.

Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana Application Form

योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा; आणि तुमचा स्कॉलरशिप फॉर्म भरून घ्या.

  1. सर्वप्रथम MahaDBT पोर्टल वर तुम्हाला जायचे आहे, त्यासाठी येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट वर पोहचू शकता.
  2. पोर्टल वर गेल्यानंतर सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्या, त्यांनतर Username, Password द्वारे Login करून घ्या.
  3. Dashboard वर आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला Aadhar Bank List check करून घ्यायचे आहे, जर तुमच्या बँकेला आधार लिंक असेल तर तुम्हाला काही पण करण्याची गरज नाही, आणि नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यायचे आहे.
  4. त्यानंतर तुम्हाला तुमची Personal Information विचारली जाईल, ती तुम्हाला भरायची आहे. मग Address आणि Other Information देखील फॉर्म मध्ये टाकायची आहे.
  5. पुढे तुम्हाला तुमचे शैक्षणिक Qualification Details भरायची आहे, त्यांनतर तुम्ही ज्या वसतिगृहात राहत आहेत, त्याची पण माहिती भरायची आहे.
  6. त्यानंतर शिष्यवृत्ती ची माहिती समोर येईल, तुम्हाला एकदा फॉर्म तपासून घ्यायचा आहे. त्यानंतर I Agree या बटणावर क्लिक करून submit करायचे आहे. शेवटी तुमचा Success चा मॅसेज येईल, अशाप्रकारे तुमचा फॉर्म ऑनलाईन भरला जाईल.

टीप: डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना साठी दरवर्षी फॉर्म Renew करावा लागतो. त्यामुळे फॉर्म चा Application ID Number नोंदवून ठेवा.

Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana FAQ

पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार?

महाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना या पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा फायदा मिळणार आहे.

पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

ऑनलाईन स्वरूपात MahaDBT पोर्टल वरून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याची सविस्तर माहिती लेखामध्ये दिली आहे.

पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेद्वारे किती रुपये मिळणार?

विद्यार्थांना वसतिगृहात राहण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी 30,000 ते 2,000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाणार आहे.

3 thoughts on “डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2024 | Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana”

Leave a comment