SBI SCO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती! पगार ₹1,05,820 पर्यंत, B.E.(Fire)/B.Tech (Safety) मुले/मुली, लगेच इथून अर्ज करा

SBI SCO Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

State Bank of India (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. Global Finance, New York यांनी SBI ला “Best Bank in India 2026” आणि “World’s Best Consumer Bank 2026” म्हणून गौरवले आहे. याच SBI च्या Central Recruitment & Promotion Department (CRPD), मुंबई यांनी 04 नोव्हेंबर 2026 रोजी Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी दोन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या भरतीत Manager (Security), Deputy Manager (Security) आणि Assistant Manager – Engineer (Fire) अशी एकूण 77 पदे Regular म्हणजे कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहेत.

ही भरती दोन प्रकारच्या उमेदवारांसाठी आहे. पहिला प्रकार म्हणजे Army, Navy, Airforce किंवा Para-military forces मध्ये अधिकारी म्हणून सेवा केलेले उमेदवार, ज्यांच्यासाठी Security पदे आहेत. दुसरा प्रकार म्हणजे Fire Engineering किंवा Fire Safety मध्ये शिक्षण आणि अनुभव असलेले उमेदवार, ज्यांच्यासाठी Fire Engineer पद आहे. बँकेत अधिकारी पदावर कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही उत्तम सुवर्णसंधी आहे.

SBI SCO Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती संस्थाState Bank of India (SBI), CRPD, Corporate Centre, Mumbai
जाहिरात क्रमांकCRPD/SCO/2026-27/28 (Security) आणि CRPD/SCO/2026-27/29 (Fire)
पदाचे नावManager (Security), Deputy Manager (Security), Assistant Manager – Engineer (Fire)
एकूण जागा77 (Security 60 + Fire 17)
भरती प्रकारRegular (कायमस्वरूपी)
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
निवड प्रक्रियाOnline Written Test + Interview
पगार (Basic)₹48,480 ते ₹1,05,820 (पदानुसार)
अर्ज सुरू04 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख25 नोव्हेंबर 2026
अधिकृत वेबसाइटsbi.bank.in

SBI SCO Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

या भरतीत एकूण 77 जागा आहेत. दोन्ही जाहिरातींचा प्रवर्गनिहाय तपशील खाली दिला आहे.

1️⃣ Manager (Security) / Deputy Manager (Security)

SCSTOBCEWSURएकूण
941662560

👉 अधिकृत जाहिरातीत Manager आणि Deputy Manager या दोन्ही पदांसाठी एकत्रित 60 जागा दिल्या आहेत. पदनिहाय वेगळी विभागणी दिलेली नाही.

2️⃣ Assistant Manager – Engineer (Fire)

प्रकारSCSTOBCEWSURएकूण
Regular21111116
Backlog–1–––1
एकूण17

👉 आरक्षण SC, ST, OBC (Non-Creamy Layer) आणि EWS उमेदवारांसाठी भारत सरकारच्या नियमांनुसार लागू आहे.

⚠️ नोट: पदसंख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त होऊ शकते.

SBI SCO Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

Manager (Security) आणि Deputy Manager (Security)

या दोन्ही पदांसाठी शासनमान्य विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) असणे आवश्यक आहे. मात्र फक्त पदवी पुरेशी नाही, खाली दिलेला संरक्षण दलातील अनुभवही लागतो.

पदआवश्यक अनुभव (31.10.2026 रोजी)
Manager (Security)Indian Army मध्ये Major किंवा Navy/Airforce मधील समकक्ष रँकपेक्षा कमी नसलेला अधिकारी, आणि किमान 10 वर्षे Commissioned Service. किंवा Para-military forces मध्ये Deputy Commandant रँकपेक्षा कमी नसलेला अधिकारी, आणि अधिकारी म्हणून किमान 10 वर्षे सेवा.
Deputy Manager (Security)Indian Army मध्ये Captain किंवा Navy/Airforce मधील समकक्ष रँकपेक्षा कमी नसलेला अधिकारी, आणि किमान 5 वर्षे Commissioned Service. किंवा Para-military forces मध्ये Assistant Commandant रँकपेक्षा कमी नसलेला अधिकारी, आणि अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा.

Assistant Manager – Engineer (Fire)

खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे:

  • National Fire Service College (NFSC), Nagpur येथून B.E. (Fire)
  • B.E. / B.Tech (Safety & Fire Engineering)
  • B.E. / B.Tech (Fire Technology & Safety Engineering)
  • UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा AICTE मान्य संस्थेतून Fire Safety मधील समकक्ष 4 वर्षांची पदवी
  • Graduate Member of Institution of Fire Engineers (India / UK)
  • NFSC, Nagpur येथून Divisional Officers Course

अनुभव (31.10.2026 रोजी):

शिक्षणआवश्यक अनुभव
B.E.(Fire) NFSC / B.E./B.Tech (Safety & Fire Engg) / B.E./B.Tech (Fire Technology & Safety Engg) / समकक्ष 4 वर्षांची पदवीकोणत्याही नामांकित संस्थेत Fire Safety क्षेत्रात किमान 2 वर्षांचा composite अनुभव
Graduate Member IFE (India/UK) किंवा Divisional Officers Course, NFSC NagpurCity Fire Brigade / State Fire Brigade मध्ये Station Officer किंवा समकक्ष पदावर, किंवा Corporates / मोठ्या Industrial Complexes मध्ये In-Charge Fire Officer म्हणून, किंवा State Govt संस्था / PSU मध्ये Fire Officer म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव

👉 Fire पदासाठी Fire Pumps, Fire Hydrant System, Fire Detection & Alarm System, Fire Sprinkler System, Building Evacuation Procedure आणि Fire Safety Audit यांचे चांगले ज्ञान अपेक्षित आहे.

⚠️ जाहिरातीत दिलेली पात्रता ही किमान पात्रता आहे. शिक्षण आणि Full-time अनुभव दोन्ही 31.10.2026 पर्यंत पूर्ण असणे आवश्यक आहे.

SBI SCO Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

पदकिमान वयकमाल वय
Manager (Security) / Deputy Manager (Security)25 वर्षे40 वर्षे
Assistant Manager – Engineer (Fire)21 वर्षे40 वर्षे

👉 दिलेली कमाल वयोमर्यादा UR (Open) प्रवर्गासाठी आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना भारत सरकारच्या नियमांनुसार वयात सवलत मिळेल. जाहिरातीत प्रवर्गनिहाय वर्षे स्वतंत्रपणे दिलेली नाहीत, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर एकदा तपासून घ्या.

👉 एकापेक्षा जास्त सवलती एकत्र (Cumulative) मिळणार नाहीत. वयात सवलत हवी असल्यास संबंधित प्रमाणपत्र Interview च्या वेळी सादर करावे लागेल.

⚠️ वयाची गणना 31 ऑक्टोबर 2026 नुसार केली जाईल.

SBI SCO Bharti 2026: पगार (Salary)

पदग्रेडPay Scale
Manager (Security)MMGS-III₹85920-2680/5-99320-2980/2-105820
Deputy Manager (Security)MMGS-II₹64820-2340/1-67160-2680/10-93960
Assistant Manager – Engineer (Fire)JMGS-I₹48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920

म्हणजेच Manager (Security) पदाचा सुरुवातीचा Basic पगार ₹85,920, Deputy Manager (Security) पदाचा ₹64,820 आणि Fire Engineer पदाचा ₹48,480 आहे.

अतिरिक्त फायदे

Basic पगाराशिवाय बँकेच्या नियमांनुसार खालील भत्ते आणि सुविधा मिळतील:

  • DA (महागाई भत्ता)
  • HRA (घरभाडे भत्ता)
  • CCA (City Compensatory Allowance)
  • Provident Fund
  • NPS (Contributory Pension Fund)
  • LFC (Leave Fare Concession)
  • Medical Facility
  • इतर Perquisites

👉 ही Banking क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची आणि कायमस्वरूपी सरकारी स्वरूपाची नोकरी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातील पात्र भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

अधिकृत जाहिरातीनुसार महाराष्ट्रात खालील ठिकाणी Online परीक्षा केंद्रे आहेत:

अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर आणि मुंबई / ठाणे / नवी मुंबई / MMR.

⚠️ SBI ला परीक्षा केंद्र रद्द करण्याचा किंवा उमेदवाराने निवडलेल्या केंद्राऐवजी दुसरे केंद्र देण्याचा अधिकार आहे. परीक्षा केंद्र, तारीख किंवा Session बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction दिलेला नाही. फक्त पदानुसार दिलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वैद्यकीय पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

SBI SCO Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

दोन्ही भरतींसाठी निवड खालील टप्प्यांत होईल:

1️⃣ Online Written Test

2️⃣ Interview (100 गुण)

3️⃣ Final Merit List

👉 कोणत्याही परीक्षेत Negative Marking नाही.

Security पदांसाठी परीक्षा पद्धत

विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning Ability*502530 मिनिटे
English Language*505030 मिनिटे
General Awareness*502525 मिनिटे
Professional Knowledge5010035 मिनिटे
एकूण2002002 तास

* Reasoning, English आणि General Awareness हे विषय फक्त Qualifying आहेत. या विषयांचे गुण Merit साठी धरले जाणार नाहीत, पण यात किमान गुण मिळवणे आवश्यक आहे. किमान गुण बँक ठरवेल.

Security Merit List:

टप्पाकमाल गुणNormalized गुण
Online Test (Professional Knowledge)10070
Interview10030
एकूण200100

Security Professional Knowledge अभ्यासक्रम (15 घटक): Security च्या मूलभूत संकल्पना, Security Management, Risk Assessment, Security Hardware, Security Software (SOPs, Drills), Fire Safety, CCTV, Manpower Management, Executive Protection, Disaster Management व BCP, Information Security, IT Security, Organizational Relationship Management व Liaison, Security Management in Banks (Cash, Vault, ATM, Cash Transit) आणि Administration.

Fire Engineer पदासाठी परीक्षा पद्धत

विषयप्रश्नगुणवेळ
English Language505040 मिनिटे
Professional Knowledge757580 मिनिटे
एकूण1251252 तास

Professional Knowledge मध्ये येणारे घटक:

  • Fire Engineering [Divisional Officers Course, Graduate Member IFE (India/UK), BE/B.Tech (Fire & Safety Engg) स्तर]
  • Fire Service Administration
  • Fire Service Regulatory Acts / By-laws

Fire Merit List:

टप्पाकमाल गुणNormalized गुण
Written Test12570
Interview10030
एकूण225100

👉 Merit List प्रवर्गनिहाय तयार होईल. Cut-off वर एकापेक्षा जास्त उमेदवारांचे गुण समान आल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला वरचा क्रमांक मिळेल.

👉 सध्या निवड प्रक्रिया “Online Test + Interview” अशी आहे. मात्र गरज पडल्यास बँक फक्त Shortlisting आणि Interview द्वारे निवड करू शकते.

SBI SCO Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / UR / EWS / OBC₹750
SC / STफी नाही

👉 फी Online पद्धतीने (Debit Card / Credit Card / Internet Banking इत्यादी) भरावी लागेल. Security जाहिरातीत UPI चा पर्यायही दिला आहे.

👉 फी Non-refundable आहे. पुढील कोणत्याही परीक्षेसाठी ती Adjust केली जाणार नाही.

👉 Online Transaction चार्जेस असल्यास ते उमेदवाराला भरावे लागतील.

SBI SCO Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ अलीकडचा Passport size फोटो (20–50 KB, 200×230 px)
✔️ स्वाक्षरी (10–20 KB, 140×60 px)
✔️ डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (Left-Hand Thumb Impression)
✔️ हाताने लिहिलेले Declaration (50–100 KB, 800×400 px)
✔️ Brief Resume
✔️ ID Proof आणि जन्मतारखेचा पुरावा
✔️ पदवी प्रमाणपत्र आणि मार्कशीट
✔️ अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
✔️ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✔️ OBC Non-Creamy Layer प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✔️ EWS Income & Asset Certificate (लागू असल्यास)
✔️ Form-16 / Offer Letter / Latest Salary Slip
✔️ NOC (लागू असल्यास)
✔️ फक्त Security पदासाठी: Medical Category चा पुरावा (निवृत्त उमेदवारांसाठी Discharge Book चे संबंधित पान, सेवेत असलेल्यांसाठी Latest Medical Board Document) आणि Commanding Officer ने signed केलेले Service Certificate

👉 सर्व कागदपत्रे PDF मध्ये, A4 साईजमध्ये आणि 500 KB पेक्षा कमी असावीत. फोटो, सही, अंगठा आणि Declaration jpg/jpeg मध्ये असावे.

👉 Declaration इंग्रजीत, पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहायचे आहे. त्याचा मजकूर असा आहे:

“I ______ (Name of the candidate), ______ (Date of Birth) hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. The signature, photograph and left-hand thumb impression is of mine.”

SBI SCO Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ Security पदासाठी SHAPE-1 Medical Category बंधनकारक

जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवशी उमेदवाराकडे SHAPE-1 किंवा समकक्ष Medical Category असेल तरच Security पदासाठी अर्ज करता येईल. ही Category अर्जात लिहावी लागेल आणि त्याचा पुरावा upload करावा लागेल. Medical Category कमी असल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

❗ अनुभव प्रमाणपत्रात क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख हवा

अनुभव प्रमाणपत्रात उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील अनुभव आहे असे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणपत्र नसल्यास बँक कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करू शकते.

❗ Security साठी फक्त Professional Knowledge चे गुण Merit ला

Reasoning, English आणि General Awareness फक्त Qualifying आहेत. त्यामुळे खरी स्पर्धा Professional Knowledge च्या 100 गुणांवरच होणार आहे. अभ्यासाचे नियोजन त्यानुसार करा.

❗ OBC प्रमाणपत्राची तारीख महत्त्वाची

OBC Non-Creamy Layer प्रमाणपत्र Central Government च्या format मध्ये असावे आणि ते 01.04.2026 ते Interview च्या तारखेदरम्यान जारी झालेले असावे. Creamy Layer मधील उमेदवारांनी UR म्हणून अर्ज करावा.

❗ EWS साठी FY 2025-26 चे प्रमाणपत्र

EWS उमेदवारांकडे आर्थिक वर्ष 2025-26 च्या उत्पन्नावर आधारित आणि 2026-27 साठी वैध Income & Asset Certificate असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास UR म्हणून अर्ज करावा लागेल.

❗ प्रवर्ग नंतर बदलता येणार नाही

अर्ज सादर केल्यानंतर प्रवर्ग (Category) बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे फॉर्म भरताना प्रवर्ग काळजीपूर्वक निवडा.

❗ भारतात कुठेही Posting आणि Transfer

निवड झालेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतात कुठेही होऊ शकते. बँक SBI च्या Associates/Subsidiaries मध्येही Depute करू शकते. ठराविक ठिकाणी Posting ची विनंती स्वीकारली जाणार नाही.

❗ 6 महिन्यांचा Probation

तिन्ही पदांसाठी 6 महिन्यांचा Probation Period आहे. नियुक्ती वैद्यकीय तंदुरुस्तीच्या अधीन राहील.

❗ सरकारी / PSU कर्मचाऱ्यांसाठी NOC

सरकारी, निमसरकारी, PSU, राष्ट्रीयीकृत बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये कार्यरत उमेदवारांनी Interview च्या वेळी NOC सादर करणे आवश्यक आहे. NOC नसल्यास उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही आणि प्रवास खर्चही मिळणार नाही.

❗ Discharge Book आणि Criminal Case माहिती

निवड झाल्यास रुजू होताना योग्य Discharge Book सादर करावे लागेल. Interview च्या वेळी प्रलंबित Criminal Cases ची माहिती द्यावी लागेल आणि बँक Police Verification करू शकते.

❗ एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास

एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास फक्त शेवटचा पूर्ण अर्ज ग्राह्य धरला जाईल. आधीच्या अर्जांची फी परत मिळणार नाही.

❗ Fire पदासाठी फक्त 3 वेळा Edit

Fire Engineer पदाचा Save केलेला अर्ज फक्त तीन वेळा Edit करता येतो. फी भरल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.

❗ Signature आणि Declaration CAPITAL मध्ये नको

Signature किंवा Hand-Written Declaration CAPITAL LETTERS मध्ये असल्यास ते स्वीकारले जाणार नाही. फोटो, सही, अंगठा आणि Declaration चुकीच्या जागी upload केल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

❗ Live Photo आणि Biometric तपासणी

अर्ज भरताना Webcam किंवा Mobile ने Live Photo काढावा लागेल. परीक्षेच्या वेळी IRIS (डावा डोळा) आणि Biometric तपासणी होऊ शकते. त्यामुळे हातावर मेहंदी, शाई किंवा केमिकल लावू नका.

SBI SCO Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://sbi.bank.in/web/careers/current-openings

Step 2

खाली Scroll करा आणि जाहिरात क्रमांक CRPD/SCO/2026-27/28 (Security) किंवा CRPD/SCO/2026-27/29 (Fire) वर क्लिक करा.

Step 3

जाहिरात Download करून काळजीपूर्वक वाचा.

Step 4

“Apply Online” वर क्लिक करून Registration करा. Provisional Registration Number आणि Password लिहून ठेवा.

Step 5

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details
  • Experience Details
  • Category Information
  • Medical Category (Security पदासाठी)

Step 6

फोटो, सही, अंगठा, Declaration, Live Photo आणि सर्व कागदपत्रे Upload करा. Preview करून सगळे नीट दिसते का ते तपासा.

Step 7

Application Fee Online भरा (SC/ST साठी फी नाही).

Step 8

Final Submit करून Application Form आणि e-Receipt ची Print घ्या.

👉 शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. वेबसाइटवर गर्दी झाल्यास अर्ज न झाल्याची जबाबदारी SBI घेणार नाही.

SBI SCO Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत कायमस्वरूपी अधिकारी पद
  • MMGS-III, MMGS-II आणि JMGS-I सारख्या Officer Grade मध्ये थेट नियुक्ती
  • DA, HRA, CCA, PF, NPS, LFC आणि Medical Facility सारखे भत्ते
  • Job Security
  • संरक्षण दलातून निवृत्त अधिकाऱ्यांसाठी दुसरी उत्तम Career संधी
  • All India Exposure आणि Career Growth
  • Interview साठी बाहेरगावच्या उमेदवारांना Economy Class विमान भाडे किंवा प्रत्यक्ष प्रवास खर्च, यापैकी जो कमी असेल तो (कमाल ₹10,000, जाणे-येणे)

SBI SCO Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • Army, Navy, Airforce मधील Captain / Major किंवा समकक्ष रँकचे अधिकारी (सेवेत किंवा निवृत्त)
  • Para-military forces मधील Assistant Commandant / Deputy Commandant रँकचे अधिकारी
  • B.E./B.Tech (Fire / Safety & Fire Engineering) झालेले आणि 2 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार
  • Fire Brigade मध्ये Station Officer म्हणून काम केलेले उमेदवार
  • Industrial Complexes किंवा PSU मध्ये Fire Officer म्हणून काम करणारे उमेदवार
  • Banking क्षेत्रात High Salary असलेली कायमस्वरूपी नोकरी शोधणारे उमेदवार

SBI SCO Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू04 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख (अर्ज व दुरुस्ती)25 नोव्हेंबर 2026
फी भरण्याची शेवटची तारीख25 नोव्हेंबर 2026
Admit Card (Call Letter)डिसेंबर 2026
Online परीक्षाडिसेंबर 2026 / जानेवारी 2027
Interviewजानेवारी / फेब्रुवारी 2027
अंतिम निकालफेब्रुवारी 2027

⚠️ या तारखा तात्पुरत्या (Tentative) आहेत. बदल झाल्यास अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जातील.

SBI SCO Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDF (Security – CRPD/SCO/2026-27/28)इथे क्लिक करा
जाहिरात PDF (Fire – CRPD/SCO/2026-27/29)इथे क्लिक करा
Online अर्ज (Security – CRPD/SCO/2026-27/28)इथे क्लिक करा
Online अर्ज (Fire – CRPD/SCO/2026-27/29)इथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

SBI SCO Bharti 2026: FAQs

SBI SCO Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

एकूण 77 जागा आहेत. Manager (Security) / Deputy Manager (Security) साठी 60 जागा आणि Assistant Manager – Engineer (Fire) साठी 17 जागा आहेत.

Security पदासाठी पात्रता काय आहे?

कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. त्यासोबत Manager पदासाठी Major / Deputy Commandant रँक आणि 10 वर्षे सेवा, तर Deputy Manager पदासाठी Captain / Assistant Commandant रँक आणि 5 वर्षे सेवा आवश्यक आहे. SHAPE-1 Medical Category पण आवश्यक आहे.

Fire Engineer पदासाठी पात्रता काय आहे?

B.E.(Fire) NFSC Nagpur, B.E./B.Tech (Safety & Fire Engg / Fire Technology & Safety Engg), समकक्ष 4 वर्षांची Fire Safety पदवी, IFE Graduate Member किंवा NFSC चा Divisional Officers Course यापैकी एक पात्रता आणि 2 किंवा 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती आहे?

Security पदांसाठी 25 ते 40 वर्षे आणि Fire Engineer पदासाठी 21 ते 40 वर्षे. वयाची गणना 31.10.2026 नुसार होईल. राखीव प्रवर्गांना भारत सरकारच्या नियमांनुसार सवलत मिळेल.

पगार किती आहे?

Manager (Security) चा सुरुवातीचा Basic ₹85,920, Deputy Manager (Security) चा ₹64,820 आणि Fire Engineer चा ₹48,480 आहे. याशिवाय DA, HRA आणि इतर भत्ते मिळतील.

निवड प्रक्रिया काय आहे?

Online Written Test आणि त्यानंतर 100 गुणांचा Interview. अंतिम Merit मध्ये Written Test ला 70 आणि Interview ला 30 गुणांचे वजन आहे.

परीक्षेत Negative Marking आहे का?

❌ नाही, कोणत्याही परीक्षेत Negative Marking नाही.

अर्ज फी किती आहे?

General/UR, EWS आणि OBC साठी ₹750. SC/ST उमेदवारांसाठी फी नाही.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो. ही All India भरती आहे आणि पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर यांसह महाराष्ट्रात अनेक परीक्षा केंद्रे आहेत.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

✅ हो, महिला उमेदवार अर्ज करू शकतात. कोणताही Gender Restriction नाही.

शेवटची तारीख कधी आहे?

Online अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2026 आहे.

इतर भरती अपडेट्स

Leave a comment