SBI Clerk Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
State Bank of India (SBI) ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. SBI च्या Central Recruitment & Promotion Department, Corporate Centre, Mumbai यांनी Junior Associate (Customer Support & Sales) या क्लर्क संवर्गातील पदासाठी 1538 जागांची Special Recruitment Drive जाहीर केली आहे. ही भरती खास SC/ST/OBC Backlog Vacancies साठी आहे, त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
पदवीधर असलेले आणि सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे SC/ST/OBC प्रवर्गातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
SBI Clerk Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | State Bank of India (SBI) |
| पदाचे नाव | Junior Associate (Customer Support & Sales) |
| जाहिरात क्रमांक | CRPD/CR/SPLDRIVE/2026-27/16 |
| एकूण जागा | 1538 (SC/ST/OBC Backlog) |
| अर्ज पद्धत | Online |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत (State/UT निवडीनुसार) |
| निवड प्रक्रिया | Prelim + Main परीक्षा + Local Language Test |
| पगार | ₹26,730 (Basic) + भत्ते, एकूण ~₹46,000 |
| अर्ज सुरू | 07.08.2026 |
| शेवटची तारीख | 27.08.2026 |
| अधिकृत वेबसाइट | sbi.bank.in |
SBI Clerk Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)
या भरतीमध्ये एकूण 1538 जागा आहेत. ही भरती फक्त SC, ST आणि OBC Backlog Vacancies साठीच आहे.
| Circle | State/UT | Language | SC | ST | OBC | Total |
|---|---|---|---|---|---|---|
| Amaravati | Andhra Pradesh | Telugu/Urdu | — | 88 | — | 88 |
| Bengaluru | Karnataka | Kannada | 85 | 35 | — | 120 |
| Bhopal | Madhya Pradesh | Hindi | — | 134 | — | 134 |
| Bhopal | Chhattisgarh | Hindi | — | 26 | — | 26 |
| Bhubaneswar | Odisha | Odia | — | 111 | — | 111 |
| Chandigarh | Chandigarh UT | Hindi/Punjabi | — | — | 22 | 22 |
| Chandigarh | Jammu & Kashmir UT | Urdu/Hindi | — | 42 | — | 42 |
| Chandigarh | Himachal Pradesh | Hindi | 11 | — | — | 11 |
| Chandigarh | Punjab | Punjabi/Hindi | — | — | 18 | 18 |
| Chennai | Tamil Nadu | Tamil | 65 | — | — | 65 |
| Hyderabad | Telangana | Telugu/Urdu | — | 32 | — | 32 |
| Jaipur | Rajasthan | Hindi | 20 | 86 | — | 106 |
| Kolkata | West Bengal | Bengali/Nepali | — | — | 55 | 55 |
| Lucknow | Uttar Pradesh | Hindi/Urdu | — | 31 | — | 31 |
| Maharashtra/Mumbai Metro | Maharashtra | Marathi | — | 165 | — | 165 |
| New Delhi | Delhi | Hindi | — | — | 17 | 17 |
| Gandhinagar | Gujarat | Gujarati | — | 289 | — | 289 |
| Guwahati | Assam | Assamese/Bengali/Bodo | — | 39 | — | 39 |
| Guwahati | Tripura | Bengali/Kokborok | — | 22 | — | 22 |
| Patna | Bihar | Hindi/Urdu | 12 | — | — | 12 |
| Patna | Jharkhand | Hindi/Santhali | 14 | 119 | — | 133 |
| एकूण | 207 | 1219 | 112 | 1538 |
👉 आरक्षण SC, ST आणि OBC (Non-Creamy Layer) उमेदवारांसाठी लागू आहे. PwBD आणि Ex-servicemen त्यांच्या मूळ प्रवर्गाखाली अर्ज करू शकतात.
⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते, ती बँकेच्या प्रत्यक्ष गरजेनुसार बदलू शकते.
⚠️ महत्त्वाचे: उमेदवार फक्त एका State/UT साठीच अर्ज करू शकतो आणि या भरतीअंतर्गत फक्त एकदाच परीक्षा देऊ शकतो.
SBI Clerk Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता (31.12.2026 पर्यंत):
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) आवश्यक आहे. Integrated Dual Degree (IDD) असलेल्या उमेदवारांची पदवी 31.12.2026 पूर्वी पूर्ण झालेली असावी.
👉 Final Year/Semester मध्ये असलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, मात्र निवड झाल्यास त्यांना 31.12.2026 पूर्वी पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.
भाषा पात्रता
उमेदवाराला ज्या State/UT साठी अर्ज करायचा आहे, त्या राज्याच्या विशिष्ट स्थानिक भाषेत (वाचन, लेखन, बोलणे व समजणे) प्रवीण असणे आवश्यक आहे. 10वी किंवा 12वी मध्ये संबंधित भाषा शिकलेल्या उमेदवारांना वेगळी Language Test द्यावी लागणार नाही.
SBI Clerk Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)
सामान्य वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे (01.04.2026 नुसार) — म्हणजे उमेदवाराचा जन्म 02.04.1998 ते 01.04.2006 दरम्यान (दोन्ही तारखा धरून) झालेला असावा.
| प्रवर्ग | वयोमर्यादा सवलत |
|---|---|
| OBC | +3 वर्ष |
| SC/ST | +5 वर्ष |
| PwBD (OBC) | +13 वर्ष |
| PwBD (SC/ST) | +15 वर्ष |
| Ex-Servicemen/Disabled Ex-Servicemen | सेवा कालावधी + 3 वर्ष (कमाल वय 50 वर्षे) |
| विधवा/घटस्फोटित/विभक्त महिला (पुनर्विवाह न केलेल्या) | +7 वर्ष (OBC साठी कमाल 38, SC/ST साठी कमाल 40 वर्षे) |
| SBI चे Trained Apprentice | OBC – 4 वर्ष, SC/ST – 6 वर्ष, PwBD(OBC) – 14 वर्ष, PwBD(SC/ST) – 16 वर्ष |
⚠️ वयाची गणना 01.04.2026 नुसार केली जाईल.
⚠️ Cumulative वयोमर्यादा सवलत मिळणार नाही, म्हणजे एकापेक्षा जास्त सवलती एकत्र जोडता येणार नाहीत.
SBI Clerk Bharti 2026: पगार (Salary)
Pay Scale: Rs. 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480
Starting Basic Pay: ₹26,730/- (₹24,050 + पदवीधर उमेदवारांना मिळणाऱ्या दोन Advance Increments सह)
अतिरिक्त फायदे
- Metro शहरात (उदा. मुंबई) पोस्टिंग असल्यास एकूण सुरुवातीचे वेतन DA आणि इतर भत्त्यांसह अंदाजे ₹46,000/- प्रति महिना
- पोस्टिंगच्या ठिकाणानुसार भत्ते बदलू शकतात
- Provident Fund
- New Pension Scheme (Defined Contribution Benefit)
- Medical सुविधा
- Leave Fare Concession आणि इतर सुविधा
👉 ही Banking क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची आणि स्थिर सरकारी नोकरी मानली जाते.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.
महाराष्ट्र राज्यासाठी स्वतंत्र 165 जागा (Maharashtra/Mumbai Metro Circle अंतर्गत, फक्त ST प्रवर्गासाठी) राखीव आहेत आणि परीक्षेचे माध्यम मराठी आहे. Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Dhule, Jalgaon, Kolhapur, Latur, Mumbai/Thane/Navi Mumbai, Nagpur, Nanded, Nashik, Pune, Sangli, Satara, Solapur, Ratnagiri, Chandrapur या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उपलब्ध आहेत.
⚠️ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी SBI च्या वेबसाइटवरील Branch Locator मधून आपल्या भागाचा Circle (Maharashtra Circle किंवा Mumbai Metro Circle) तपासून घ्यावा.
मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?
✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही.
SBI Clerk Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)
निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्पे असतील — Preliminary Exam, Main Exam आणि Local Language Proficiency Test.
1️⃣ Phase-I: Preliminary Examination (100 गुण, 1 तास)
| विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| English Language | 30 | 30 | 20 मिनिटे |
| Numerical Ability | 35 | 35 | 20 मिनिटे |
| Reasoning Ability | 35 | 35 | 20 मिनिटे |
| एकूण | 100 | 100 | 1 तास |
⚠️ प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील (Negative Marking).
👉 Prelim चे गुण अंतिम निवडीसाठी गणले जाणार नाहीत — फक्त Main Exam साठी शॉर्टलिस्ट करण्यासाठी वापरले जातील (साधारण जागांच्या 10 पट उमेदवार शॉर्टलिस्ट होतील).
2️⃣ Phase-II: Main Examination (200 गुण, 2 तास 40 मिनिटे)
| विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| General/Financial Awareness | 50 | 50 | 35 मिनिटे |
| General English | 40 | 40 | 35 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 50 | 50 | 45 मिनिटे |
| Reasoning Ability & Computer Aptitude | 50 | 60 | 45 मिनिटे |
| एकूण | 190 | 200 | 2 तास 40 मिनिटे |
⚠️ इथेही प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा होतील.
👉 फक्त Main Exam चे गुण अंतिम Merit List साठी विचारात घेतले जातील.
3️⃣ Phase-III: Local Language Proficiency Test (LLPT)
ज्या उमेदवारांनी 10वी/12वी मध्ये संबंधित स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला नाही, त्यांना ही चाचणी द्यावी लागेल — Non-Verbal Test (30 गुण) + Verbal Test (20 गुण).
❌ या भरतीमध्ये कोणताही Interview घेतला जाणार नाही.
SBI Clerk Bharti 2026: अर्ज फी
| प्रवर्ग | फी |
|---|---|
| SC / ST / PwBD / XS / DXS | फी नाही (Nil) |
| OBC | ₹750/- |
👉 फी Online पद्धतीने Debit Card/Credit Card/Internet Banking द्वारे भरावी लागेल.
👉 फी Non-refundable आहे, कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
SBI Clerk Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
✔️ स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र ✔️ 10वी प्रमाणपत्र (जन्मतारखेच्या पुराव्यासाठी) ✔️ Graduation मार्कशीट/प्रमाणपत्र ✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST साठी, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले) ✔️ OBC Non-Creamy Layer प्रमाणपत्र (लागू असल्यास) ✔️ PwBD Certificate (लागू असल्यास) ✔️ Photo ID Proof (Passport/Aadhar/PAN Card/Driving License/Voter’s Card इ.)
SBI Clerk Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐
❗ सध्या SBI क्लर्क म्हणून काम करणारे पात्र नाहीत
जे उमेदवार सध्या SBI मध्ये Clerical cadre मध्ये कार्यरत आहेत, ते या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत. तसेच जे उमेदवार पूर्वी SBI मध्ये क्लर्क म्हणून काम करून राजीनामा दिला आहे, तेही अपात्र आहेत.
❗ Inter-Circle/Inter-State Transfer नाही
या भरतीअंतर्गत नियुक्त झालेल्या Junior Associates ना Inter-Circle किंवा Inter-State Transfer मिळणार नाही. फक्त Delhi Circle व Lucknow Circle (उत्तर प्रदेश राज्यामध्ये) आणि Mumbai Metro Circle व Maharashtra Circle (महाराष्ट्र राज्यामध्ये) यांच्यातील Intra-State Transfer ला परवानगी आहे.
❗ फक्त एका State/UT साठी अर्ज करता येईल
उमेदवार या भरतीअंतर्गत फक्त एकाच State/UT साठी अर्ज करू शकतो आणि परीक्षा फक्त एकदाच देऊ शकतो.
❗ Adverse Character Report असलेले उमेदवार अपात्र
ज्या उमेदवारांविरुद्ध चारित्र्य व पूर्ववृत्त (Character & Antecedents), Moral Turpitude याबाबत प्रतिकूल अहवाल आहे, ते या पदासाठी अपात्र आहेत.
❗ निवड झाल्यानंतरही Medical Fitness आणि KYE पडताळणी बंधनकारक
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही Medical Fitness आणि Know Your Employee (KYE) पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम होईल.
SBI Clerk Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
Step 1
https://sbi.bank.in/web/careers/current-openings या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Step 2
“Special Recruitment drive for Junior Associates 2026” या जाहिरातीवर क्लिक करा.
Step 3
जाहिरात पूर्ण वाचून Online Registration करा.
Step 4
Application Form भरा:
- Personal Details
- Educational Details
- Category Information (SC/ST/OBC)
- Opted State/UT आणि Local Language
Step 5
Photograph, Signature, Left Hand Thumb Impression आणि Hand-written Declaration Upload करा.
Step 6
Application Fee भरा (OBC उमेदवारांसाठी ₹750, SC/ST साठी Nil).
Step 7
Final Submit करून Application Form ची Printout घ्या (SBI कडे पाठवण्याची गरज नाही).
SBI Clerk Bharti 2026: Job Benefits
मुख्य फायदे
- भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह सार्वजनिक बँकेत नोकरी
- Job Security आणि स्थिर करिअर
- Provident Fund, Pension, Medical यासारखे सरकारी फायदे
- Banking क्षेत्रात Growth आणि Promotion च्या संधी
- Metro शहरांत चांगले वेतन
SBI Clerk Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?
- कोणत्याही शाखेतील Graduate SC/ST/OBC उमेदवार
- Banking क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे उमेदवार
- Government Job ची तयारी करणारे विद्यार्थी
- स्थिर आणि चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधणारे उमेदवार
- Customer Service आणि Marketing मध्ये आवड असणारे उमेदवार (कारण या पदासाठी Customer Calls, Cross-Selling यासारखी कामे करावी लागतात)
SBI Clerk Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 07.08.2026 |
| शेवटची तारीख | 27.08.2026 |
| Preliminary Exam | Sep 2026 (तात्पुरती) |
| Main Exam | Oct/Nov 2026 (तात्पुरती) |
| Admit Card | परीक्षेच्या 10 दिवस आधी उपलब्ध |
SBI Clerk Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Online अर्ज | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
SBI Clerk Bharti 2026: FAQs
SBI Clerk Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. Final year विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
किती जागा आहेत?
एकूण 1538 जागा आहेत (SC-207, ST-1219, OBC-112), महाराष्ट्रासाठी 165 जागा आहेत.
वयोमर्यादा किती आहे?
01.04.2026 नुसार 20 ते 28 वर्षे. SC/ST साठी +5 वर्ष, OBC साठी +3 वर्ष सवलत आहे.
पगार किती आहे?
Starting Basic Pay ₹26,730/- असून Metro शहरात एकूण वेतन अंदाजे ₹46,000/- प्रति महिना आहे.
निवड प्रक्रिया काय आहे?
Preliminary Exam, Main Exam आणि आवश्यक असल्यास Local Language Proficiency Test — Interview नाही.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
हो, महाराष्ट्रासाठी स्वतंत्र 165 जागा (ST प्रवर्ग) आहेत आणि परीक्षेचे माध्यम मराठी आहे.
महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात, कोणताही Gender Restriction नाही.
शेवटची तारीख कधी आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27.08.2026 आहे.
अर्ज फी किती आहे?
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी फी नाही. OBC उमेदवारांसाठी ₹750/- आहे.
सध्या SBI मध्ये क्लर्क असलेले उमेदवार अर्ज करू शकतात का?
नाही, सध्या SBI क्लर्क संवर्गात कार्यरत असलेले किंवा पूर्वी राजीनामा दिलेले उमेदवार अपात्र आहेत.
इतर भरती अपडेट्स
PDCC Bank Peon Bharti 2026: PDCC बँकेत शिपाई पदांसाठी भरती! 12वी पास मुले/मुली लगेच इथून अर्ज करा
PNB LBO Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेत भरती! पगार ₹85,920, Graduate पास, लगेच इथून अर्ज करा
HAL Bharti 2026: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती! पगार ₹1,60,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा
BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम भरती! Diploma पास मुल/मुली लगेच इथून अर्ज करा
RRB JE Bharti 2026: भारतीय रेल्वेत 4098 जागांची मेगा भरती! फक्त CBT परीक्षा, लवकरच अर्ज सुरू
Concentrix Recruitment 2026: Concentrix फ्रेशर्स Hiring! ग्रॅज्युएट मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा
ISRO Bharti 2026: इस्रो(ISRO) भरती 2026! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा
