PDCC Bank Peon Bharti 2026: PDCC बँकेत शिपाई पदांसाठी भरती! 12वी पास मुले/मुली लगेच इथून अर्ज करा

PDCC Bank Peon Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून/इतर जिल्ह्यातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे (PDCC Bank) ही पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख सहकारी बँक आहे. या बँकेने शिपाई पदाच्या तब्बल 289 जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणजे ही भरती फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठीच खुली आहे, त्यामुळे स्पर्धा तुलनेने मर्यादित राहणार आहे.

जे उमेदवार 12वी (HSC) पास आहेत आणि पुणे जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत, त्यांच्यासाठी ही सरकारी/सहकारी बँकेतील नोकरीची उत्तम संधी आहे. चला तर मग सविस्तर माहिती पाहूया.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

PDCC Bank Peon Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती संस्थापुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे (PDCC Bank)
पदाचे नावशिपाई (Peon)
एकूण जागा289
अर्ज पद्धतऑनलाईन अर्ज, ऑफलाईन लेखी परीक्षा
पात्रता (वयोमर्यादा)18 ते 38 वर्षे (दि. 01/08/2026 रोजी)
निवड प्रक्रियाऑफलाईन OMR परीक्षा + कागदपत्र पडताळणी + मुलाखत
पगार (प्रोबेशन)₹12,000/- दरमहा (6 महिने)
अर्ज सुरू04/08/2026, सकाळी 11:00 वा.
शेवटची तारीख10/08/2026, रात्री 11:59 वा.
अधिकृत वेबसाइटpdcc.bank.in आणि punedccbank.com

PDCC Bank Peon Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिपाई पदाच्या एकूण 289 जागा ऑफलाईन सरळसेवा भरतीद्वारे भरण्याचे जाहीर केले आहे.

पदाचे नावएकूण जागा
शिपाई289

👉 या भरतीमध्ये पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांसाठी 100% पदे प्राधान्याने भरली जाणार आहेत.

👉 बँकेने स्पष्ट केले आहे की या भरतीस कोणत्याही प्रकारचे समांतर (Horizontal) आरक्षण लागू नाही.

⚠️ नोट: शिपाई पदांची संख्या कमी-जास्त करण्याचा अधिकार बँकेने स्वतःकडे राखून ठेवला आहे.

PDCC Bank Peon Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच.एस.सी. – इयत्ता 12वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • किंवा 12वी समकक्ष पदविका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता दि. 01/08/2026 रोजी ग्राह्य धरण्यात येईल.

इतर आवश्यक अर्हता

  • उमेदवार पुणे जिल्ह्याचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • उमेदवाराचे पुणे जिल्ह्यात किमान 15 वर्षांचे वास्तव्य असणे आवश्यक आहे.
  • सक्षम प्राधिकरणाने दिलेला अधिवास दाखला (Domicile Certificate, सन 2018 नंतरचा) सादर करणे बंधनकारक आहे.

PDCC Bank Peon Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

सर्वसाधारण वयोमर्यादा: किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे (दि. 01/08/2026 रोजी).

👉 बँकेत कंत्राटी तत्वावर विविध एजन्सीमार्फत नियुक्त असलेल्या आणि दि. 01/08/2026 अखेर सलग एकाच संस्थेत किमान 3 वर्षे कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

⚠️ वयाची गणना दि. 01/08/2026 नुसार केली जाईल.

👉 जाहिरातीनुसार या भरतीस इतर कोणत्याही प्रवर्गासाठी (SC/ST/OBC/PwBD) स्वतंत्र वयोमर्यादा सवलत लागू नाही, कारण बँकेने कोणतेही समांतर आरक्षण लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे.

PDCC Bank Peon Bharti 2026: पगार (Salary)

निवड झालेल्या पात्र उमेदवारांना सुरुवातीला 6 महिन्यांच्या तात्पुरत्या परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) कालावधीसाठी नेमणूक दिली जाईल.

  • प्रोबेशन कालावधीत पगार: ₹12,000/- (रुपये बारा हजार फक्त) दरमहा एकवट (Consolidated) पगार
  • प्रोबेशन कालावधीनंतर उमेदवारास बँकेच्या नियमित वेतनश्रेणीनुसार पगार लागू होईल.

नियमित वेतनश्रेणी (Pay Scale)

शिपाई पदाची वेतनश्रेणी: 195-10-225-12-285-14-345-16-435-19-530-24-650-29-795-34-965-34-1000-34-1170

अतिरिक्त फायदे

बँकेच्या नियमानुसार लागू असणारे भत्ते व सुविधा मिळणार आहेत.

👉 ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील स्थिर व चांगल्या पगाराची नोकरी मानली जाते.

पुणे जिल्ह्याबाहेरील/महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील उमेदवार अर्ज करू शकतात का?

❌ नाही, ही भरती फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठीच आहे.

पुणे जिल्ह्याबाहेरील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. उमेदवाराचे पुणे जिल्ह्यात किमान 15 वर्षांचे वास्तव्य आणि सक्षम प्राधिकरणाचा अधिवास दाखला (Domicile Certificate) असणे बंधनकारक आहे.

👉 अपवाद: पुणे जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवारांना, त्यांच्या पतीचे पुणे जिल्ह्यातील मूळ अधिवास प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकरणाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्यास अर्ज करता येईल.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पात्रता निकष पूर्ण करणारे पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

जाहिरातीमध्ये स्पष्ट Gender Restriction नमूद केलेले नाही, मात्र पुणे जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिलांसाठी वर नमूद केल्याप्रमाणे विशेष अट लागू आहे.

PDCC Bank Peon Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

1️⃣ ऑफलाईन लेखी परीक्षा (OMR पद्धत)

  • परीक्षा पद्धत: OMR (Optical Mark Recognition)
  • एकूण गुण: 70
  • प्रश्न संख्या: 70 (प्रत्येकी 1 गुण)
  • प्रश्नपत्रिका: वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची
  • माध्यम: मराठी
  • कालावधी: 75 मिनिटे

विषयनिहाय गुणविभागणी:

अ.क्रविषयाचे नावगुण
1शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती20
2बँकिंग व सहकार15
3सामान्य ज्ञान व चालू घडामोडी15
4कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था10
5बुद्धिमापन चाचणी10
एकूण70

2️⃣ कागदपत्रे पडताळणी

लेखी परीक्षेत प्राप्त गुणांच्या गुणानुक्रमे रिक्त पदांच्या 1:3 प्रमाणात मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी (आसन क्रमांक निहाय, गुण क्रमांक निहाय नाही) बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्रे बँक अधिकाऱ्यांमार्फत तपासली जातील.

3️⃣ मुलाखत

  • एकूण गुण: 30
  • मूल्यांकन निकष: उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व, शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य, बँकेची प्राथमिक माहिती, पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान, सहकारातील मूलभूत तत्वे व शिष्टाचार

⚠️ मुलाखतीस गैरहजर राहिल्यास उमेदवार अंतिम निवडीसाठी अपात्र ठरेल.

अंतिम निवड

लेखी परीक्षेतील गुण व मुलाखतीतील गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांच्या गुणानुक्रमे अंतिम निकाल जाहीर केला जाईल. रिक्त पदांच्या 20% प्रमाणात प्रतीक्षा यादी तयार केली जाईल, जी अंतिम निवड यादी जाहीर झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षापर्यंत वैध राहील.

👉 दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास प्राधान्यक्रम: 1) वयाची ज्येष्ठता, 2) अनुभव, 3) आडनावाच्या इंग्रजी अक्षरांनुसार क्रम.

PDCC Bank Peon Bharti 2026: अर्ज फी

तपशीलफी
परीक्षा शुल्क (सर्व उमेदवार)₹1,650/- + 18% GST व सर्व्हिस चार्ज

👉 फी फक्त Online पद्धतीने भरावी लागेल — UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट (Gpay, PhonePe, BHIM App इ.) द्वारे.

👉 एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीखाली परत केले जाणार नाही, तसेच ते पुढील परीक्षेसाठी राखीव ठेवले जाणार नाही.

PDCC Bank Peon Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ स्कॅन केलेले फोटो (3.5 सें.मी. x 4.5 सें.मी., 20 KB ते 50 KB, JPG/JPEG)
✔️ स्कॅन केलेली स्वाक्षरी (1.5 सें.मी. x 3.5 सें.मी., 10 KB ते 20 KB, JPG/JPEG)
✔️ अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate, सन 2018 नंतरचे) - JPG/JPEG, 20 KB ते 50 KB
✔️ आधार कार्ड - JPG/JPEG, 20 KB ते 50 KB
✔️ 12वी (HSC) प्रमाणपत्र व गुणपत्रिका
✔️ डिप्लोमा प्रमाणपत्र (लागू असल्यास)

PDCC Bank Peon Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ पुणे जिल्ह्याचे 15 वर्षांचे वास्तव्य बंधनकारक

फक्त मूळ रहिवासी असून चालणार नाही — उमेदवाराचे पुणे जिल्ह्यात किमान 15 वर्षांचे सलग वास्तव्य असल्याचा सक्षम प्राधिकरणाचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. सन 2018 नंतरचे अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

❗ खोटी माहिती दिल्यास तात्काळ अपात्र

अर्जात भरलेली माहिती किंवा जोडलेली कागदपत्रे खोटी, बनावट अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास किंवा महत्त्वाची माहिती लपवल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवारी/नियुक्ती तात्काळ रद्द केली जाईल.

❗ शिफारस/दबावाचा प्रयत्न केल्यास थेट अपात्र

भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही पदाधिकारी/अधिकारी यांच्याकडून शिफारस किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करून निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.

❗ आधीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत

यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी (ऑनलाईन, ई-मेल, टपाल किंवा हस्तपोहोच) अर्ज केले असतील तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

❗ अर्जातील माहिती एकदा भरल्यावर बदलता येणार नाही

ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही चूक झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला जाऊ शकतो, आणि याबाबत तक्रार करता येणार नाही. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यासही उमेदवार अपात्र ठरेल.

❗ शारीरिक सक्षमता आवश्यक

शिपाई पदाचे शारीरिक हालचालींचे कामकाज करण्याकरिता उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम/सुदृढ असणे आवश्यक आहे.

❗ बनावट कोचिंग क्लास/चॅनेलपासून सावधान

बँकेने या भरती प्रक्रियेसाठी किंवा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शनासाठी कोणत्याही पब्लिकेशन एजन्सी, यूट्यूब चॅनेल किंवा टेलिग्राम चॅनेलची नियुक्ती केलेली नाही. अशी कोणतीही जाहिरात किंवा माहिती बेकायदेशीर समजावी.

❗ लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन बंधनकारक

उमेदवारास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 नुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे बंधनकारक आहे.

❗ वाद-तक्रारीसाठी फक्त पुणे न्यायक्षेत्र

भरती प्रक्रियेबाबत कोणताही वाद उद्भवल्यास त्याचे अधिकारक्षेत्र फक्त पुणे न्यायालय (Pune Jurisdiction) हेच राहील.

PDCC Bank Peon Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या — pdcc.bank.in/careers किंवा punedccbank.com

Step 2

संकेतस्थळावरील विस्तृत माहिती व सूचना काळजीपूर्वक वाचा.

Step 3

“NEW REGISTRATION” या बटणावर क्लिक करा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details (शैक्षणिक अर्हता)
  • ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक (अचूक भरणे बंधनकारक)

Step 5

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा — फोटो, स्वाक्षरी, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड (सूचनेनुसार विहित साईज मध्ये).

Step 6

Online Payment Gateway द्वारे परीक्षा शुल्क भरा.

Step 7

अर्ज Final Submit करून त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ जतन करून ठेवा (भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आवश्यक).

PDCC Bank Peon Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • सहकारी बँकिंग क्षेत्रातील स्थिर सरकारी/निमसरकारी स्वरूपाची नोकरी
  • Job Security
  • नियमित वेतनश्रेणी व बँकेच्या नियमानुसार भत्ते व सुविधा
  • पुणे जिल्ह्यातच नोकरीची संधी (स्थानिक पातळीवर काम)

PDCC Bank Peon Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • 12वी (HSC) पास किंवा समकक्ष डिप्लोमाधारक उमेदवार
  • पुणे जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले व 15+ वर्षे वास्तव्य असणारे उमेदवार
  • शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले, सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तरुण-तरुणी
  • कमी स्पर्धेत स्थानिक पातळीवर सरकारी/सहकारी नोकरी शोधणारे उमेदवार

PDCC Bank Peon Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरणे सुरू04/08/2026, सकाळी 11:00 वा.
ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख10/08/2026, रात्री 11:59 वा.
ऑफलाईन परीक्षा तारीखबँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर होईल
प्रवेशपत्र डाउनलोड तारीखबँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर होईल
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत तारीखऑफलाईन परीक्षा निकालानंतर संकेतस्थळावर जाहीर होईल

PDCC Bank Peon Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइट 1इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 2इथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लि करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

👉 अर्ज भरताना काही अडचण आल्यास help@punedccbank.com या ई-मेलवर किंवा 8793675904 या हेल्पलाईन क्रमांकावर (सकाळी 07:00 ते सायं. 07:00) संपर्क साधावा.

PDCC Bank Peon Bharti 2026: FAQs

PDCC Bank शिपाई पदासाठी पात्रता काय आहे?

उमेदवार 12वी (HSC) पास किंवा समकक्ष डिप्लोमाधारक असावा, तसेच पुणे जिल्ह्याचा मूळ रहिवासी असून जिल्ह्यात किमान 15 वर्षांचे वास्तव्य असणे आवश्यक आहे.

किती जागा आहेत?

शिपाई पदाच्या एकूण 289 जागांसाठी ही भरती आहे.

वयोमर्यादा किती आहे?

सर्वसाधारण वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे. सलग 3 वर्षे कंत्राटी अनुभव असलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 43 वर्षांपर्यंत शिथिल आहे.

पगार किती आहे?

प्रोबेशन कालावधीत (6 महिने) ₹12,000/- दरमहा एकवट पगार मिळेल. त्यानंतर बँकेच्या नियमित वेतनश्रेणीनुसार पगार लागू होईल.

निवड प्रक्रिया काय आहे?

ऑफलाईन OMR लेखी परीक्षा (70 गुण) + कागदपत्रे पडताळणी + मुलाखत (30 गुण) अशा तीन टप्प्यांत निवड होईल.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून अर्ज करता येतो का?

नाही. ही भरती फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठीच आहे. पुणे जिल्ह्याबाहेरील विवाहित महिलांना पतीच्या पुणे अधिवास प्रमाणपत्रावर विशेष सवलत आहे.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे?

ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 10/08/2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.

परीक्षा शुल्क किती आहे व ते परत मिळते का?

परीक्षा शुल्क ₹1,650/- + 18% GST व सर्व्हिस चार्ज इतके आहे. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

परीक्षेचे माध्यम व स्वरूप काय आहे?

परीक्षा OMR पद्धतीने, मराठी माध्यमातून, 70 गुणांची, 70 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असेल. कालावधी 75 मिनिटे आहे.

इतर भरती अपडेट्स

RCF Management Trainee Bharti 2026: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती! BE/B.Tech पास, लगेच इथून अर्ज करा

PNB LBO Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेत भरती! पगार ₹85,920, Graduate पास, लगेच इथून अर्ज करा

Deloitte Bharti 2026:Deloitte मध्ये Associate Analyst पदांची भरती! Freshers मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

IBPS Clerk Bharti 2026: IBPS मार्फत 11,403 जागांची मेगा भरती! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026: भारतीय वायुसेनेत अग्निवीरवायु भरती! 10वी पास मुलांनी, लगेच इथून अर्ज करा

HAL Bharti 2026: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती! पगार ₹1,60,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Accenture Freshers Hiring 2026: Accenture AI/ML Associate पदाची भरती! Freshers मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम भरती! Diploma पास मुल/मुली लगेच इथून अर्ज करा

ISRO URSC Bharti 2026: ISRO U.R. राव सॅटेलाइट सेंटर मध्ये भरती! इंजीनियरिंग/डिप्लोमा पास मुल मुली, लगेच इथून अर्ज करा

Tech Mahindra Bharti 2026: टेक महिंद्रा मध्ये Hiring! पगार ₹6 LPA पर्यंत, Freshers लगेच इथून अर्ज करा

SPMCIL Bharti 2026: सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती! पगार ₹1,60,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

RRB JE Bharti 2026: भारतीय रेल्वेत 4098 जागांची मेगा भरती! फक्त CBT परीक्षा, लवकरच अर्ज सुरू

Concentrix Recruitment 2026: Concentrix फ्रेशर्स Hiring! ग्रॅज्युएट मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

ISRO Bharti 2026: इस्रो(ISRO) भरती 2026! ग्रॅज्युएशन पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment