AAI Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
Airports Authority of India (AAI) ही भारत सरकारच्या अखत्यारीतील Mini Ratna Category-1 दर्जाची PSU संस्था आहे, जी देशातील विमानतळांचे बांधकाम, अपग्रेडेशन आणि व्यवस्थापन पाहते. या भरतीत Manager आणि Junior Executive अशा एकूण 15 वेगवेगळ्या पदांसाठी तब्बल 389 जागा निघाल्या असून, पगार थेट ₹21 लाख प्रतिवर्षापर्यंत आहे.
Engineering, Finance, Law, IT, Architecture, Fire Services, Operations, Commercial, Corporate Communications अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
AAI Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | Airports Authority of India (AAI) |
| जाहिरात क्रमांक | 12/2026/CHQ/DR-CBT |
| पदाचे नाव | Manager (विविध शाखा) आणि Junior Executive (विविध शाखा) |
| एकूण जागा | 389 |
| अर्ज पद्धत | Online |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत (कुठेही पोस्टिंग शक्य) |
| निवड प्रक्रिया | Computer Based Test + Application Verification + Interview (Post Code 1-11 साठी) |
| पगार | Manager ₹60,000-₹1,80,000 (CTC ₹21 लाख), JE ₹40,000-₹1,40,000 (CTC ₹14 लाख) |
| अर्ज सुरू | 08.08.2026 |
| शेवटची तारीख | 07.09.2026 |
| अधिकृत वेबसाइट | www.aai.aero |
AAI Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)
एकूण 389 जागांसाठी ही भरती असून, पदनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:
Manager पदे (Post Code 1 ते 11)
| Post Code | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| 1 | Manager (Engg-Civil) | 145 |
| 2 | Manager (Engg-Elect) | 16 |
| 3 | Manager (Finance) | 34 |
| 4 | Manager (Information Technology) | 05 |
| 5 | Manager (Architecture) | 04 |
| 6 | Manager (Law) | 02 |
| 7 | Manager (Fire Services) | 14 |
| 8 | Manager (Operations) | 28 |
| 9 | Manager (Commercial) | 09 |
| 10 | Manager (Corporate Planning & Management Services) | 01 |
| 11 | Manager (Corporate Communications) | 02 |
Junior Executive पदे (Post Code 12 ते 15)
| Post Code | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| 12 | Junior Executive (Finance) | 36 |
| 13 | Junior Executive (Law) | 06 |
| 14 | Junior Executive (Operations) | 79 |
| 15 | Junior Executive (Survey & Cartography) | 08 |
👉 आरक्षण UR, EWS, OBC (NCL), SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.
⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते, हे AAI च्या पूर्ण अधिकारात आहे.
AAI Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव खालीलप्रमाणे आहे:
Manager (Engg-Civil) — Post Code 1
Bachelor’s Degree in Engineering/Technology (Civil) + 3 वर्षांचा Civil Engineering क्षेत्रातील post-qualification अनुभव आवश्यक.
Manager (Engg-Elect) — Post Code 2
Bachelor’s Degree in Engineering/Technology (Electrical) + 3 वर्षांचा Electrical Engineering क्षेत्रातील अनुभव.
Manager (Finance) — Post Code 3
MBA (Finance) / PGDM (Finance) / Cost Accountant / Chartered Accountant / CFA + 3 वर्षांचा Finance & Accounts क्षेत्रातील अनुभव (SAP सारख्या ERP चा अनुभव आवश्यक).
Manager (Information Technology) — Post Code 4
B.E./B.Tech (CS/IT/Electronics) किंवा Full-time MCA + 3 वर्षांचा Database/Data Centre/ERP/Data Analytics/Software Development क्षेत्रातील अनुभव.
Manager (Architecture) — Post Code 5
Bachelor’s Degree in Architecture (Council of Architecture नोंदणीकृत) + 3 वर्षांचा अनुभव.
Manager (Law) — Post Code 6
Professional Law Degree (3 वर्ष/5 वर्ष Integrated) + Bar Council नोंदणी पात्रता + 3 वर्षांचा Law क्षेत्रातील अनुभव.
Manager (Fire Services) — Post Code 7
B.E./B.Tech (Fire/Mechanical/Automobile Engineering) + 3 वर्षांचा Fire Services अनुभव.
Manager (Operations) — Post Code 8
Science Graduate + Full-time MBA (2 वर्ष) किंवा B.E./B.Tech + 3 वर्षांचा Airport/Airline/Ground Handling Operations अनुभव.
Manager (Commercial) — Post Code 9
Graduate + Full-time MBA (Marketing) किंवा B.E./B.Tech + 3 वर्षांचा Marketing/Sales/Business Development अनुभव.
Manager (Corporate Planning & Management Services) — Post Code 10
PG in Statistics/Operation Research/Economics with Statistics/Mathematics with Statistics + 3 वर्षांचा अनुभव.
Manager (Corporate Communications) — Post Code 11
Bachelor’s in Mass Communication/Journalism/Literature (Hindi/English) + PG Degree/Diploma (Journalism/Mass Communication) + 3 वर्षांचा PR/Corporate Communication अनुभव.
Junior Executive (Finance) — Post Code 12
MBA (Finance)/PGDM (Finance)/CA/CFA/Cost Accountant. अनुभवाची गरज नाही.
Junior Executive (Law) — Post Code 13
Professional Law Degree + Bar Council पात्रता. अनुभवाची गरज नाही.
Junior Executive (Operations) — Post Code 14
Science Graduate + Full-time MBA (2 वर्ष) किंवा B.E./B.Tech. अनुभवाची गरज नाही.
Junior Executive (Survey & Cartography) — Post Code 15
B.E./B.Tech (Civil) किंवा M.Sc. Geography/Remote Sensing & GIS/Geo-informatics/Geomatics. अनुभवाची गरज नाही.
👉 Manager पदांसाठी 3 वर्षांचा अनुभव compulsory आहे, तर सर्व Junior Executive पदांसाठी अनुभवाची अट नाही (Nil).
👉 अनुभव Central/State Government, PSU, किंवा मोठ्या Private कंपनीतील (250+ कर्मचारी किंवा ₹250 कोटी+ turnover) असणे आवश्यक आहे.
AAI Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)
वयाची गणना 07.09.2026 या cut-off तारखेनुसार केली जाईल.
| पद | कमाल वयोमर्यादा |
|---|---|
| Manager | 32 वर्ष |
| Junior Executive | 27 वर्ष |
वयोमर्यादेत सवलत
| प्रवर्ग | वयोमर्यादा सवलत |
|---|---|
| OBC (Non-Creamy Layer) | +3 वर्ष |
| SC/ST | +5 वर्ष |
| PwBD (Permanent Disability) | +10 वर्ष |
| Ex-Servicemen (5+ वर्ष सेवा) | +5 वर्ष |
| AAI मधील नियमित कर्मचारी (probation पूर्ण) | +10 वर्ष |
⚠️ वयाची गणना 07.09.2026 नुसार केली जाईल. Matriculation/10वी प्रमाणपत्रावरील जन्मतारीखच ग्राह्य धरली जाईल, त्यानंतर बदलाची विनंती स्वीकारली जाणार नाही.
AAI Bharti 2026: पगार (Salary)
Manager (Group-A, E-3 Level)
Pay Scale: ₹60,000 – 3% – ₹1,80,000 अंदाजे CTC: ₹21 लाख प्रतिवर्ष
Junior Executive (Group-B, E-1 Level)
Pay Scale: ₹40,000 – 3% – ₹1,40,000 अंदाजे CTC: ₹14 लाख प्रतिवर्ष
अतिरिक्त फायदे
- Dearness Allowance (DA)
- Perks @ 35% of Basic Pay
- House Rent Allowance (HRA)
- CPF (Contributory Provident Fund)
- Gratuity
- Social Security Schemes
- Medical Benefits
- अन्य CPSE/State PSU/सरकारी विभागातून येणाऱ्या उमेदवारांना DPE Guidelines नुसार Pay Protection
👉 ही PSU क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मानली जाते.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.
ही All India Recruitment आहे त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून उमेदवार अर्ज करू शकतात.
Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Ahilyanagar आणि इतर शहरांमधून परीक्षा देता येऊ शकते. निवड झाल्यानंतर उमेदवाराला भारतात कुठेही पोस्टिंग दिली जाऊ शकते.
मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?
✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. महिला उमेदवारांना अर्ज फी मधून सूटही देण्यात आली आहे.
AAI Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)
1️⃣ Computer Based Test (CBT)
सर्व पदांसाठी Objective Type CBT परीक्षा होणार. या परीक्षेत Negative Marking नाही. परीक्षा Hindi आणि English अशी bilingual असेल (भाषा विषयाची परीक्षा सोडून).
2️⃣ Application Verification / Subsequent Tests
CBT मधील गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना Application Verification साठी बोलावले जाईल.
3️⃣ Interview (फक्त Post Code 1 ते 11 साठी)
Manager पदांसाठी (Post Code 1-11) CBT आणि Application Verification नंतर Interview होणार. Junior Executive पदांसाठी (Post Code 12-15) Interview नाही.
4️⃣ Manager (Fire Services) साठी विशेष टेस्ट
Application Verification नंतर Physical Measurement Test, Driving Test आणि Physical Endurance Test (Running, Casualty Carrying, Pole Climbing, Rope Climbing, Ladder Climbing & Descending) द्यावी लागेल. हे सर्व पास झाल्यावरच Interview साठी पात्र ठरतील.
❌ Junior Executive पदांसाठी कोणताही Interview घेतला जाणार नाही.
AAI Bharti 2026: अर्ज फी
| प्रवर्ग | फी |
|---|---|
| General / OBC / EWS | ₹1,000 (GST सह) |
| SC / ST / PwBD / महिला / AAI Apprentice (1 वर्ष पूर्ण) | फी माफ |
👉 फी फक्त Online पद्धतीने भरावी लागेल (Debit Card, Credit Card, Net Banking, IMPS, Wallets).
👉 फी एकदा भरल्यावर कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. फक्त duplicate payment झाल्यास शेवटच्या तारखेनंतर परतावा मिळेल.
AAI Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
✔️ पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (स्कॅन केलेली) ✔️ डावा अंगठ्याचा ठसा (Left Thumb Impression) ✔️ हाताने लिहिलेली Declaration (इंग्रजीत) ✔️ 10वी प्रमाणपत्र (जन्मतारखेसाठी) ✔️ शैक्षणिक पदवी/पदव्युत्तर प्रमाणपत्र व गुणपत्रिका ✔️ अनुभव प्रमाणपत्र (Manager पदांसाठी compulsory) ✔️ जात प्रमाणपत्र SC/ST/OBC (NCL) (लागू असल्यास, FY 2026-27 साठी वैध) ✔️ EWS प्रमाणपत्र (FY 2026-27 साठी वैध, लागू असल्यास) ✔️ PwBD Disability Certificate (Swavalamban/UDID Portal द्वारे, लागू असल्यास) ✔️ Ex-Servicemen Discharge Certificate (लागू असल्यास) ✔️ Light Motor Vehicle License (Manager Operations/Commercial आणि Fire Services साठी compulsory)
AAI Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐
❗ अनुभवाची अट काटेकोर आहे
Manager पदांसाठी फक्त सरकारी/PSU किंवा 250+ कर्मचारी असलेल्या/₹250 कोटींपेक्षा जास्त turnover असलेल्या कंपनीतील अनुभवच ग्राह्य धरला जाईल. लहान कंपनी किंवा unlisted छोट्या फर्ममधील अनुभव चालणार नाही.
❗ Colour Blindness Rejection Criteria
Post Code 3 (Manager Finance) आणि Post Code 12 (JE Finance) सोडून बाकी सर्व पदांसाठी Colour Blindness आणि Night Blindness असल्यास उमेदवार अपात्र ठरतो. Medical Examination चा खर्च उमेदवाराला स्वतः करावा लागेल.
❗ Light Motor Vehicle License Compulsory
Manager (Operations), Junior Executive (Operations) आणि Manager (Fire Services) साठी वैध Permanent LMV License असणे आवश्यक आहे. Temporary/Learning License स्वीकारले जाणार नाही. Fire Services साठी निवड झाल्यावर 2 वर्षांत Heavy Vehicle License घेणे compulsory आहे, अन्यथा प्रमोशन आणि वेतनवाढ अडकेल.
❗ Fire Services साठी Surety Bond
Manager (Fire Services) पदासाठी निवड झाल्यास प्रशिक्षणानंतर ₹5 लाखांचा Surety Bond भरावा लागतो — प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षे AAI मध्ये सेवा देणे बंधनकारक आहे.
❗ NOC आवश्यक
सध्या Central/State Government, Autonomous Body किंवा PSU मध्ये कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना Application Verification वेळी सध्याच्या नियोक्त्याकडून “No Objection Certificate” सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा उमेदवारी रद्द होईल.
❗ एकदाच CBT संधी
एका पदासाठी उमेदवार फक्त एकदाच CBT परीक्षा देऊ शकतो. एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा दिल्यास उमेदवारी रद्द होईल.
❗ Specialization Clarification Certificate
पदवीमध्ये specialization स्पष्टपणे नमूद नसल्यास, University कडून विशेष Specialization Clarification Certificate सादर करावे लागेल.
AAI Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
Step 1
अधिकृत वेबसाइट www.aai.aero ला भेट द्या.
Step 2
“CAREERS” टॅबमध्ये जा आणि AAI Bharti 2026 (Advt No. 12/2026/CHQ/DR-CBT) ची लिंक शोधा.
Step 3
Online Registration करून वैध Mobile Number आणि Email ID नोंदवा (हे बदलता येणार नाहीत).
Step 4
Application Form भरा:
- वैयक्तिक माहिती (Personal Details)
- शैक्षणिक माहिती (Educational Details)
- अनुभवाची माहिती (Experience Details, लागू असल्यास)
- Category माहिती (SC/ST/OBC/EWS/PwBD)
Step 5
फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि Hand-written Declaration स्कॅन करून विहित size मध्ये अपलोड करा.
Step 6
Application Fee ऑनलाइन पद्धतीने भरा (लागू असल्यास).
Step 7
सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून Final Submit करा आणि Application Form व e-Receipt ची Printout काढून ठेवा.
AAI Bharti 2026: Job Benefits
मुख्य फायदे
- Mini Ratna Category-1 PSU मधील प्रतिष्ठित नोकरी
- ₹14 लाख ते ₹21 लाख पर्यंतचा आकर्षक CTC
- Job Security आणि सरकारी दर्जाचे फायदे
- All India Exposure आणि उत्तम Career Growth
- CPF, Gratuity, Medical Benefits सारख्या सुविधा
AAI Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?
- Civil/Electrical Engineering पदवीधर उमेदवार
- MBA (Finance/Marketing/Operations) आणि CA/CFA/Cost Accountant उमेदवार
- Law पदवीधर उमेदवार
- IT/Computer Science इंजिनिअर आणि MCA उमेदवार
- Mass Communication/Journalism पदवीधर
- Fire/Mechanical Engineering मधील उमेदवार
- High Salary सरकारी नोकरी शोधणारे तरुण उमेदवार
- Government Job ची तयारी करणारे विद्यार्थी
AAI Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 08.08.2026 |
| शेवटची तारीख | 07.09.2026 |
| CBT परीक्षा तारीख | AAI वेबसाइटवर जाहीर होईल |
| Admit Card | परीक्षेपूर्वी वेबसाइटवर जाहीर होईल |
AAI Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Online अर्ज | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
AAI Bharti 2026: FAQs
AAI Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
पदानुसार Bachelor’s/Master’s Degree किंवा Professional Qualification (CA/CFA/Law Degree) आवश्यक आहे. Manager पदांसाठी 3 वर्षांचा अनुभव compulsory आहे, तर Junior Executive पदांसाठी अनुभवाची गरज नाही.
AAI Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
एकूण 389 जागा आहेत — 15 वेगवेगळ्या Manager आणि Junior Executive पदांसाठी.
AAI Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
Manager साठी कमाल 32 वर्ष आणि Junior Executive साठी कमाल 27 वर्ष (07.09.2026 नुसार), आरक्षित प्रवर्गांना सवलत लागू.
AAI Bharti 2026 चा पगार किती आहे?
Manager पदासाठी अंदाजे ₹21 लाख प्रतिवर्ष आणि Junior Executive पदासाठी अंदाजे ₹14 लाख प्रतिवर्ष CTC आहे.
AAI Bharti 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
Computer Based Test → Application Verification → Interview (फक्त Manager पदांसाठी, Post Code 1-11). Fire Services साठी अतिरिक्त Physical Test आहे.
महाराष्ट्रातून AAI Bharti 2026 साठी अर्ज करता येतो का?
हो, ही All India Recruitment असल्याने महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात.
महिला उमेदवार AAI Bharti 2026 साठी अर्ज करू शकतात का?
हो, महिला उमेदवार अर्ज करू शकतात आणि त्यांना अर्ज फी मधूनही सूट देण्यात आली आहे.
AAI Bharti 2026 अर्जाची शेवटची तारीख कधी आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07.09.2026 आहे.
AAI Bharti 2026 साठी अर्ज फी किती आहे?
General/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹1,000 फी आहे. SC/ST/PwBD/महिला उमेदवारांना फी माफ आहे.
AAI Bharti 2026 मध्ये Negative Marking आहे का?
नाही, CBT परीक्षेत कोणतीही Negative Marking नाही.
इतर भरती अपडेट्स
Indian Army JAG Bharti 2026: भारतीय सेनेत JAG भरती! पगार ₹1,50,000 रुपये, लगेच इथून अर्ज करा
NFR Bharti 2026: नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेमध्ये मेगाभरती! 10वी/ITI पास, लगेच इथून अर्ज करा
Arogya Vibhag Bharti 2026: सार्वजनिक आरोग्य विभागात 7195 जागांची लवकरच मेगा भरती! लगेच इथून बघा
Cotton Corporation of India Bharti 2026: CCI मध्ये भरती! पगार ₹1,40,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा
