SBI Apprentice Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
State Bank of India (SBI) — भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक — हिनी Apprentices Act 1961 अंतर्गत तब्बल 7,150 Apprentice जागांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. SBI ने यावर्षी Economic Times Human Capital Awards 2026 मध्ये 4 कॅटेगरीमध्ये Gold जिंकला आहे — म्हणजे ही संस्था किती दर्जेदार आहे हे वेगळे सांगायला नको. ग्रेजुएशन झालेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे — देशातील नंबर एक बँकेत एक वर्ष काम करण्याचा अनुभव मिळणार, दरमहा ₹15,000 Stipend मिळणार आणि भविष्यात Junior Associate परीक्षेत Weightage पण मिळणार.
ही भरती All India स्तरावर आहे आणि महाराष्ट्रातून 504 जागा आहेत. Graduation पूर्ण केलेले आणि वय 20 ते 28 च्या दरम्यान असलेले सर्व उमेदवार अर्ज करू शकतात.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
SBI Apprentice Bharti 2026: संपूर्ण माहिती
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | State Bank of India (SBI) |
| पदाचे नाव | Apprentice |
| एकूण जागा | 7,150 |
| जाहिरात क्रमांक | CRPD/APPR/2026-27/07 |
| अर्ज पद्धत | Online |
| नोकरी ठिकाण | All India (राज्यनिहाय) |
| निवड प्रक्रिया | Online Written Test + Local Language Test + Medical |
| पगार (Stipend) | ₹15,000/- प्रति महिना |
| Training कालावधी | 1 वर्ष |
| अर्ज सुरू | 19 मे 2026 |
| शेवटची तारीख | 08 जून 2026 |
| परीक्षा | जुलै 2026 (Tentative) |
| अधिकृत वेबसाइट | sbi.co.in |
SBI Apprentice Bharti 2026: एकूण जागा
या भरतीमध्ये देशभरातून एकूण 7,150 Apprentice जागा आहेत. सर्व जागा SC, ST, OBC, EWS आणि UR प्रवर्गानुसार विभागलेल्या आहेत.
राज्यनिहाय महत्त्वाच्या जागा
| राज्य | एकूण जागा |
|---|---|
| महाराष्ट्र | 504 |
| उत्तर प्रदेश | 561 |
| आंध्र प्रदेश | 709 |
| तेलंगणा | 491 |
| केरळ | 403 |
| तामिळनाडू | 396 |
| पश्चिम बंगाल | 460 |
| असम | 368 |
| पंजाब | 345 |
| राजस्थान | 350 |
महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय जागा
| प्रवर्ग | जागा |
|---|---|
| SC | 50 |
| ST | 44 |
| OBC | 135 |
| EWS | 50 |
| UR (General) | 225 |
| एकूण | 504 |
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जागा
| जिल्हा | जागा |
|---|---|
| Mumbai + Mumbai Suburban | 90 |
| Thane | 35 |
| Nashik | 16 |
| Pune | 20 |
| Raigad | 15 |
| Aurangabad (Chhatrapati Sambhaji Nagar) | 14 |
| Latur | 12 |
| Nagpur | 13 |
| Kolhapur | 13 |
| Sangli | 13 |
| Amravati | 12 |
| Nanded | 12 |
| Akola | 12 |
| Palghar | 7 |
| Sindhudurg | 3 |
| Ratnagiri | 4 |
👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी सरकारी नियमाप्रमाणे लागू आहे.
⚠️ नोट: पदसंख्या बँकेच्या प्रत्यक्ष गरजेनुसार कमी किंवा जास्त होऊ शकते.
SBI Apprentice Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
किमान शिक्षण
✅ कोणत्याही मान्यताप्राप्त University किंवा Institute मधून Graduation — हे 01.04.2026 पर्यंत पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
म्हणजेच BA, B.Com, B.Sc, BCA, BBA, BE, B.Tech — कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
⚠️ नोट: Final Year मध्ये शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत. Graduation 01.04.2026 पूर्वी पूर्ण असणे बंधनकारक आहे.
SBI Apprentice Bharti 2026: वयोमर्यादा
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 28 वर्षे (UR/EWS साठी)
- वयाची गणना: 01.04.2026 नुसार
म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 एप्रिल 1998 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान असणे आवश्यक आहे (दोन्ही तारखा समाविष्ट).
प्रवर्गनिहाय वयोमर्यादा सवलत
| प्रवर्ग | वयोमर्यादा सवलत |
|---|---|
| OBC (Non-Creamy Layer) | +3 वर्ष (म्हणजे 31 वर्षे) |
| SC / ST | +5 वर्ष (म्हणजे 33 वर्षे) |
| PwBD (General) | +10 वर्ष |
| PwBD (OBC) | +13 वर्ष |
| PwBD (SC/ST) | +15 वर्ष |
⚠️ वयाची गणना 01.04.2026 नुसार केली जाईल.
SBI Apprentice Bharti 2026: पगार
₹15,000/- प्रति महिना Stipend — हे 1 वर्षाच्या Apprenticeship Training Period साठी दिले जाईल.
महत्त्वाचे
⚠️ Apprentice म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना इतर कोणतेही Allowances किंवा Benefits मिळणार नाहीत. DA, HRA, Medical — यापैकी काहीही लागू नाही.
👉 मात्र Training यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर SBI च्या Junior Associate भरतीमध्ये Weightage मिळेल — हा सर्वात मोठा फायदा आहे.
👉 Training पूर्ण झाल्यानंतर SBI-NSDC / BFSI-SSC Joint National Apprenticeship Certificate मिळेल जे भविष्यात नोकरीसाठी उपयुक्त ठरेल.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.
ही All India Recruitment आहे त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून उमेदवार अर्ज करू शकतात. महाराष्ट्रासाठी 504 जागा आहेत.
महाराष्ट्रातून परीक्षा देण्यासाठी Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Chandrapur, Dhule, Jalgaon, Kolhapur, Latur, Mumbai / Thane / Navi Mumbai / MMR, Nagpur, Nanded, Nashik, Pune, Solapur, Sangli, Satara या शहरांमध्ये Exam Centers आहेत.
महाराष्ट्रासाठी परीक्षेचे माध्यम: English, Hindi आणि Marathi उपलब्ध आहे.
मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?
✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. पात्र असलेले सर्व उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
SBI Apprentice Bharti 2026: निवड प्रक्रिया
SBI Apprentice निवड तीन टप्प्यांत होते:
1️⃣ Online Written Exam (Objective Type)
| विषय | प्रश्न | Marks | वेळ |
|---|---|---|---|
| General / Financial Awareness | 25 | 25 | 15 मिनिटे |
| General English | 25 | 25 | 15 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 25 | 25 | 15 मिनिटे |
| Reasoning Ability & Computer Aptitude | 25 | 25 | 15 मिनिटे |
| एकूण | 100 | 100 | 60 मिनिटे |
⚠️ Negative Marking: चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी 1/4 mark वजा केला जाईल. त्यामुळे अंदाजाने उत्तर देणे टाळा.
👉 General English वगळता इतर सर्व विषयांचे प्रश्न Marathi भाषेत उपलब्ध असतील.
👉 SC/ST/OBC/PwBD उमेदवारांना Qualifying Marks मध्ये 5% सवलत मिळेल.
2️⃣ Local Language Test
- महाराष्ट्रासाठी Marathi भाषा परीक्षा घेतली जाईल.
- ज्या उमेदवारांच्या 10वी किंवा 12वी च्या Marksheet मध्ये Marathi विषय आहे त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार नाही.
- Language Test मध्ये नापास झालेल्या उमेदवारांची Apprentice म्हणून निवड होणार नाही.
3️⃣ Medical Examination
- Online Written Exam आणि Language Test पास झाल्यानंतर Medical Fitness तपासणी होईल.
- बँकेच्या Medical Requirements नुसार Fit असणे आवश्यक आहे.
SBI Apprentice Bharti 2026: अर्ज फी
| प्रवर्ग | फी |
|---|---|
| General / OBC / EWS | ₹300/- |
| SC / ST / PwBD | फी नाही (NIL) |
👉 फी Online पद्धतीनेच भरावी लागेल (Debit Card / Credit Card / Internet Banking).
👉 फी Non-refundable आहे — एकदा भरली की परत मिळणार नाही.
SBI Apprentice Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
✔️ पासपोर्ट साइज फोटो (4.5cm × 3.5cm, 20-50 KB)
✔️ स्वाक्षरी (Black Ink, White Paper, 10-20 KB)
✔️ Left Thumb Impression (Black/Blue Ink, 20-50 KB)
✔️ Handwritten Declaration (English मध्ये, 50-100 KB)
✔️ 10वी प्रमाणपत्र व मार्कशीट
✔️ 12वी प्रमाणपत्र व मार्कशीट
✔️ Graduation Degree / Provisional Certificate व मार्कशीट
✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी)
✔️ Non-Creamy Layer Certificate (OBC उमेदवारांसाठी — 01.04.2026 नंतर काढलेले)
✔️ Income & Asset Certificate (EWS उमेदवारांसाठी — FY 2025-26 साठी)
✔️ PwBD Certificate (लागू असल्यास)
✔️ Aadhaar Card (Engagement च्या वेळी अनिवार्य)
SBI Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐
❗ हे Employment नाही — Apprenticeship आहे
SBI Apprentice म्हणून निवड झाली म्हणजे तुम्ही SBI चे Employee नाही होत. तुम्हाला Employee ला मिळणारे कोणतेही Benefits — DA, HRA, Medical, Pension — मिळणार नाहीत. 1 वर्षाच्या Training नंतर तुम्हाला Relieve केले जाईल.
❗ आधी कुठेही Apprenticeship केलेली नसावी
जर तुम्ही यापूर्वी SBI मध्ये किंवा इतर कोणत्याही संस्थेत Apprenticeship केली असेल, तर तुम्ही या भरतीसाठी अपात्र आहात.
❗ Graduation नंतर 1 वर्षाचा Job Experience असेल तर अपात्र
Graduation पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कुठे काम केले असेल, तर तुम्ही या भरतीसाठी पात्र नाही.
❗ फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करता येतो
एक उमेदवार फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त राज्यांसाठी अर्ज करण्याची परवानगी नाही.
❗ जिल्हा वाटप बँकेच्या निर्णयानुसार
तुम्ही Application मध्ये 3 पसंतीचे जिल्हे निवडू शकता — मात्र Final Allotment बँकेच्या Administrative गरजेनुसार होईल. तुमची पसंती 100% मान्य होईलच असे नाही.
❗ OBC Certificate नवीन असणे आवश्यक
OBC (Non-Creamy Layer) Certificate 01.04.2026 ते Joining च्या तारखेदरम्यान काढलेले असणे आवश्यक आहे. जुने Certificate चालणार नाही.
❗ CIBIL Default असेल तर अपात्र
कोणत्याही Bank / NBFC कडे Loan, Credit Card चा Dues थकवलेला असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. Joining पूर्वी हे Regularize करणे अनिवार्य आहे.
❗ एकापेक्षा जास्त Application टाकू नका
Multiple Applications असतील तर फक्त शेवटचा Valid Application ग्राह्य धरला जाईल आणि इतर Application ची Fee Forfeit होईल.
SBI Apprentice Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
Step 1
आधी NAPS Portal वर जाऊन Registration करा 👉 apprenticeshipindia.gov.in — हे Mandatory आहे.
Step 2
NAPS Registration पूर्ण झाल्यावर SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा 👉 sbi.co.in/careers किंवा sbi.bank.in/careers
Step 3
“Current Openings” मध्ये “Engagement of Apprentices in SBI – CRPD/APPR/2026-27/07” वर क्लिक करा.
Step 4
Online Application Form भरा:
- Personal Details (नाव, DOB, Address)
- Educational Details (Graduation Info)
- Category Information (SC/ST/OBC/EWS/UR)
- State आणि 3 पसंतीचे District निवडा
- Local Language निवडा
Step 5
Documents Upload करा:
- Passport Photo, Signature, Left Thumb Impression, Handwritten Declaration
Step 6
Application Fee Online भरा — Debit Card / Credit Card / Internet Banking द्वारे.
Step 7
Final Submit करा आणि Application Form ची Printout काढून ठेवा.
⚠️ Application Submit केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
SBI Apprentice Bharti 2026: Job Benefits
मुख्य फायदे
- ✅ देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत काम करण्याचा अनुभव
- ✅ दरमहा ₹15,000/- Stipend
- ✅ National Apprenticeship Certificate (SBI-NSDC / BFSI-SSC Joint)
- ✅ SBI Junior Associate भरतीमध्ये Weightage — हा सर्वात मोठा Career Benefit
- ✅ Banking Sector मध्ये Professional Exposure
- ✅ Resume मध्ये SBI चे नाव — Private Sector मध्येही मूल्यवान
SBI Apprentice Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?
- ✅ Graduation नुकतेच पूर्ण केलेले उमेदवार (2024/2025 Batch)
- ✅ Banking Sector मध्ये Career करू इच्छिणारे विद्यार्थी
- ✅ SBI Junior Associate / Clerk परीक्षेची तयारी करणारे उमेदवार
- ✅ Government Job Exam ची तयारी करत असताना Stipend हवी असलेले उमेदवार
- ✅ महाराष्ट्रातील BA, B.Com, B.Sc, BCA, BBA, BE, B.Tech पदवीधर
SBI Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 19 मे 2026 |
| शेवटची तारीख | 08 जून 2026 |
| Call Letter Download | जून 2026 (Tentative) |
| Online Exam | जुलै 2026 (Tentative) |
| Local Language Test | Online Exam नंतर |
| Medical Exam | Language Test नंतर |
SBI Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Online अर्ज (NAPS Portal) | इथे क्लिक करा |
| Online अर्ज (SBI) | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
SBI Apprentice Bharti 2026: FAQs
SBI Apprentice Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
कोणत्याही मान्यताप्राप्त University मधून Graduation पूर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतील (BA, B.Com, B.Sc, B.Tech इ.) पदवीधर अर्ज करू शकतात.
SBI Apprentice Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
देशभरात एकूण 7,150 जागा आहेत. महाराष्ट्रासाठी 504 जागा आहेत.
SBI Apprentice Bharti 2026 वयोमर्यादा किती आहे?
01.04.2026 रोजी वय 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे. OBC साठी +3, SC/ST साठी +5 वर्षे सवलत आहे.
SBI Apprentice Bharti 2026 ला पगार किती मिळतो?
₹15,000/- प्रति महिना Stipend मिळतो. इतर कोणतेही Allowances मिळत नाहीत.
निवड प्रक्रिया काय आहे?
Online Written Exam (100 प्रश्न, 100 Marks, 60 Minutes), त्यानंतर Local Language Test आणि Medical Examination अशा तीन टप्प्यांत निवड होते.
SBI Apprentice नंतर Job मिळते का?
SBI Apprenticeship म्हणजे Regular Job नाही. मात्र Training यशस्वीपणे पूर्ण केल्यावर SBI Junior Associate भरतीमध्ये Weightage मिळतो जो भविष्यातील संधी वाढवतो.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो. महाराष्ट्रासाठी 504 जागा आहेत आणि Exam Marathi भाषेत देता येते.
महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. कोणताही Gender Restriction नाही.
शेवटची तारीख कधी आहे?
SBI Apprentice Bharti 2026 साठी Online Registration ची शेवटची तारीख 08 जून 2026 आहे.
Negative Marking आहे का?
✅ हो, Negative Marking आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 mark वजा केला जाईल.
इतर भरती अपडेट्स
