Indian Navy Agniveer Bharti 2026 अंतर्गत भारतीय नौदलात Agniveer (SSR), Agniveer (MR) आणि SSR (Medical) या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय नौदलात काम करण्याची प्रतिष्ठा, आकर्षक वेतन, सरकारी सुविधा आणि भारताच्या सागरी सुरक्षेत योगदान देण्याची संधी या भरतीमुळे मिळणार आहे.
या भरतीमध्ये 12वी पास आणि 10वी पास उमेदवारांसाठी स्वतंत्र पदे उपलब्ध आहेत, त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळते. Agniveer योजनेअंतर्गत 4 वर्षांची सेवा, Seva Nidhi पॅकेज, प्रशिक्षण आणि भविष्यात कायमस्वरूपी नोकरीची संधी देखील दिली जाते.
ही भरती संपूर्ण भारतासाठी खुली आहे आणि महाराष्ट्रातील उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या लेखामध्ये आपण Indian Navy Agniveer Bharti 2026 संदर्भातील सर्व महत्वाची माहिती – शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत, शारीरिक पात्रता, अर्ज पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि Hidden Conditions – सविस्तर जाणून घेणार आहोत.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Navy Agniveer Bharti 2026: भरतीची संपूर्ण माहिती
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती करणारी संस्था | Indian Navy |
| भरती वर्ष | 2026 |
| योजना | Agniveer Scheme |
| पदे | पद 1 – Agniveer (SSR) पद 2 – Agniveer (MR) पद 3 – SSR (Medical) |
| अर्ज पद्धत | Online |
| परीक्षा | INET (Indian Navy Entrance Test) |
| परीक्षा फी | ₹550 + GST |
| नोकरी ठिकाण | भारतात कुठेही |
| अधिकृत वेबसाइट | https://www.joinindiannavy.gov.in |
Indian Navy Agniveer Bharti 2026: महत्वाच्या तारखा
| क्र. | कार्यक्रम | तारीख / कालावधी |
|---|---|---|
| 1 | Online Application सुरू | 14 मार्च 2026 |
| 2 | Online Application अंतिम तारीख | 06 एप्रिल 2026 (सायं. 5 वाजेपर्यंत) |
| 3 | Application Correction Window | 10 – 11 एप्रिल 2026 |
| 4 | INET (Indian Navy Entrance Test) परीक्षा | मे 2026 |
| 5 | INET Result | मे – जून 2026 |
| 6 | Stage II Call Letter (Batch 01/2027) | सप्टेंबर 2026 |
| 7 | Stage II Physical / Medical (Batch 01/2027) | ऑक्टोबर 2026 |
| 8 | Training सुरू (Batch 01/2027) | डिसेंबर 2026 – INS Chilka |
| 9 | Stage II Call Letter (Batch 02/2027) | फेब्रुवारी 2027 |
| 10 | Stage II Physical / Medical (Batch 02/2027) | मार्च 2027 |
| 11 | Training सुरू (Batch 02/2027) | मे 2027 – INS Chilka |
टीप:
- वरील सर्व तारखा तात्पुरत्या (Tentative) आहेत.
- अंतिम तारीख आणि अपडेट्स Indian Navy च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केल्या जातील.
Indian Navy Agniveer Bharti 2026: पदांची माहिती
| क्र. | पदाचे नाव | पदाचे स्वरूप | सेवा कालावधी | मुख्य काम |
|---|---|---|---|---|
| 1 | Agniveer (SSR) | Senior Secondary Recruit | 4 वर्षे (Agniveer Scheme) | जहाजावरील तांत्रिक कामे, उपकरणे हाताळणे, ऑपरेशनल सहाय्य |
| 2 | Agniveer (MR) | Matric Recruit | 4 वर्षे (Agniveer Scheme) | Cook, Steward, मेस व्यवस्थापन आणि स्टोअर संबंधित काम |
| 3 | SSR (Medical) | Medical Branch Sailor | अंदाजे 20 वर्षे सेवा | नौदलातील वैद्यकीय सहाय्य, प्राथमिक उपचार आणि आरोग्य सेवा |
Indian Navy Agniveer Bharti 2026: एकूण जागा
अधिकृत जाहिरातीत जागांची संख्या स्पष्टपणे नमूद केलेली नाही.
भारतीय नौदलाला आवश्यकतेनुसार जागांची संख्या वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार आहे.
Indian Navy Agniveer Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
| क्र. | पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता | किमान गुण |
|---|---|---|---|
| 1 | Agniveer (SSR) | 12वी पास (Physics आणि Mathematics विषय आवश्यक) किंवा 3 वर्षांचा Engineering Diploma | किमान 50% गुण |
| 2 | Agniveer (MR) | 10वी पास | किमान 50% गुण |
| 3 | SSR (Medical) | 12वी पास (Physics, Chemistry, Biology – PCB) | एकूण 50% आणि प्रत्येक विषयात 40% |
टीप:
- 2025–26 मध्ये 10वी किंवा 12वी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
- अंतिम निवडीसाठी मूळ मार्कशीट सादर करणे आवश्यक आहे.
Indian Navy Agniveer Bharti 2026: वयोमर्यादा
| क्र. | पदाचे नाव | बॅच | जन्म तारीख (Eligible DOB) |
|---|---|---|---|
| 1 | Agniveer (SSR) | Batch 01/2027 | 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2009 |
| 2 | Agniveer (SSR) | Batch 02/2027 | 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 |
| 3 | Agniveer (MR) | Batch 01/2027 | 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2009 |
| 4 | Agniveer (MR) | Batch 02/2027 | 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 |
| 5 | SSR (Medical) | Batch 02/2027 | 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 |
टीप:
- उमेदवाराचा जन्म वरील दिलेल्या तारखांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- दोन्ही तारखा (From आणि To) समाविष्ट (inclusive) मानल्या जातील.
Indian Navy Agniveer Bharti 2026: शारीरिक पात्रता
पुरुष उमेदवार
- उंची: 157 सेमी
- 1.6 किमी धाव: 6 मिनिट 30 सेकंद
- Squats: 20
- Push-ups: 15
- Sit-ups: 15
महिला उमेदवार (SSR / MR)
- उंची: 157 सेमी
- 1.6 किमी धाव: 8 मिनिटे
- Squats: 15
- Push-ups: 10
- Sit-ups: 10
Indian Navy Agniveer Bharti 2026: परीक्षा पद्धत
| क्र. | पदाचे नाव | प्रश्नांची संख्या | वेळ | विषय |
|---|---|---|---|---|
| 1 | Agniveer (SSR) | 100 प्रश्न | 1 तास | English, Science, Mathematics, General Awareness |
| 2 | Agniveer (MR) | 50 प्रश्न | 30 मिनिटे | Science, Mathematics, General Awareness |
| 3 | SSR (Medical) | 100 प्रश्न | 1 तास | English, Science, Biology, General Awareness |
टीप:
- परीक्षा Computer Based Online (INET) पद्धतीने घेतली जाईल.
- प्रश्न Objective Type (MCQ) स्वरूपाचे असतील.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 Negative Marking लागू आहे.
Indian Navy Agniveer Bharti 2026: निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होईल:
Stage 1 – INET Online Exam
Stage 2 – Physical Fitness Test
Stage 3 – Written Exam
Stage 4 – Medical Examination
Stage 5 – Final Merit List
Final Merit List Stage II Written Exam + Medical Fitness यांच्या आधारे तयार केली जाईल.
Indian Navy Agniveer Bharti 2026: वेतन संरचना
Agniveer Salary Package
| वर्ष | पगार | हातात |
|---|---|---|
| 1 वर्ष | ₹30,000 | ₹21,000 |
| 2 वर्ष | ₹33,000 | ₹23,100 |
| 3 वर्ष | ₹36,500 | ₹25,580 |
| 4 वर्ष | ₹40,000 | ₹28,000 |
Seva Nidhi Package
4 वर्षांनंतर उमेदवारांना सुमारे ₹10 लाख Seva Nidhi दिले जाते.
Insurance
- Life Insurance Cover: ₹48 लाख
Indian Navy Agniveer Bharti 2026: अर्ज फी
Application Fee: ₹550 + 18% GST
पेमेंट पद्धती
- UPI
- Net Banking
- Debit / Credit Card
Indian Navy Agniveer Bharti 2026: अर्ज प्रक्रिया (How to Apply Online)
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- Registration करा
- Login करून प्रोफाइल तयार करा
- संबंधित पद निवडा
- अर्ज फॉर्म भरा
- फोटो आणि कागदपत्रे अपलोड करा
- परीक्षा फी भरा
- अर्ज Submit करा
- अर्जाची प्रिंट घ्या
⚠ एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
Indian Navy Agniveer Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
- 10वी प्रमाणपत्र
- 12वी प्रमाणपत्र
- Diploma Certificate (लागू असल्यास)
- Domicile Certificate
- Caste Certificate
- Aadhaar Card
- Passport Size Photo
- NCC Certificate (लागू असल्यास)
Indian Navy Agniveer Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | SSR: इथे क्लिक करा MR: इथे क्लिक करा MR (Med) : इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात का?
होय.
ही भरती संपूर्ण भारतासाठी खुली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
निवड झाल्यास भारतामध्ये कुठेही पोस्टिंग स्वीकारावी लागेल.
महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात का?
- Agniveer SSR → होय
- Agniveer MR → होय
- SSR Medical → फक्त पुरुष
Indian Navy Agniveer Bharti 2026: Hidden Conditions (महत्वाच्या अटी)
- Permanent Tattoo फक्त हाताच्या आतील बाजूवर चालतो
- चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द
- Multiple Application केल्यास Reject
- Medical मध्ये Unfit झाल्यास Selection रद्द
- Training दरम्यानही Reject होऊ शकता
- Police Verification आवश्यक आहे
Indian Navy मध्ये कामाचे स्वरूप
| पद | जबाबदारी |
|---|---|
| Agniveer SSR | तांत्रिक आणि ऑपरेशनल काम |
| Agniveer MR | Cook / Steward |
| SSR Medical | वैद्यकीय सहाय्य |
तयारी कशी करावी?
- 10वी / 12वी स्तराचा अभ्यास करा
- Current Affairs वाचा
- Physical Fitness सुधारवा
- Running सराव करा
- Mock Tests सोडवा
स्पर्धा किती असेल?
- देशभरातून अर्ज
- सरकारी नोकरीची प्रतिष्ठा
- आकर्षक वेतन
म्हणून स्पर्धा खूप जास्त असण्याची शक्यता आहे.
निष्कर्ष
Indian Navy Agniveer Bharti 2026 ही भारतीय नौदलात काम करण्याची मोठी संधी आहे. Agniveer SSR, MR आणि SSR Medical या पदांद्वारे तुम्हाला सन्माननीय नोकरी, प्रशिक्षण, आकर्षक वेतन आणि भविष्यातील उत्तम करिअरची संधी मिळू शकते.
जर तुमच्याकडे आवश्यक पात्रता, वय आणि शारीरिक क्षमता असेल तर ही संधी नक्की गमावू नका. योग्य तयारी करून अर्ज करा आणि भारतीय नौदलात देशसेवेचे स्वप्न पूर्ण करा.
Indian Navy Agniveer Bharti 2026: FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Indian Navy Agniveer Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होणार?
Indian Navy Agniveer Bharti 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 मार्च 2026 पासून सुरू होणार असून 06 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करता येईल.
Indian Navy Agniveer Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. Registration करून अर्ज फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून परीक्षा फी भरावी.
Indian Navy Agniveer Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
Agniveer SSR साठी 12वी (Physics आणि Mathematics) आवश्यक आहे.
Agniveer MR साठी 10वी पास आवश्यक आहे.
SSR Medical साठी 12वी PCB (Physics, Chemistry, Biology) आवश्यक आहे.
Indian Navy Agniveer Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
या भरतीसाठी उमेदवाराचा जन्म 01 डिसेंबर 2004 ते 31 ऑक्टोबर 2009 या कालावधीत असणे आवश्यक आहे (पदानुसार बदलू शकते).
Indian Navy Agniveer Bharti 2026 साठी महिला अर्ज करू शकतात का?
होय. Agniveer SSR आणि MR पदांसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. मात्र SSR Medical पदासाठी फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत.
Indian Navy Agniveer Bharti 2026 साठी परीक्षा कशी घेतली जाते?
या भरतीसाठी INET (Indian Navy Entrance Test) ही ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. परीक्षा Computer Based असते आणि प्रश्न MCQ स्वरूपात असतात.
Indian Navy Agniveer Bharti 2026 मध्ये पगार किती मिळतो?
Agniveer योजनेनुसार पहिल्या वर्षी ₹30,000 मासिक पगार दिला जातो आणि चौथ्या वर्षी पगार ₹40,000 पर्यंत वाढतो.
Agniveer योजनेनुसार 4 वर्षांनंतर किती पैसे मिळतात?
Agniveer सेवेनंतर उमेदवारांना Seva Nidhi Package सुमारे ₹10 लाख दिले जाते.
Indian Navy Agniveer Bharti 2026 साठी शारीरिक पात्रता काय आहे?
पुरुष उमेदवारांसाठी 1.6 किमी धाव 6 मिनिट 30 सेकंद मध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच Squats, Push-ups आणि Sit-ups यांची चाचणी घेतली जाते.
महाराष्ट्रातील उमेदवार Indian Navy Agniveer Bharti 2026 साठी अर्ज करू शकतात का?
होय. ही भरती संपूर्ण भारतासाठी खुली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात.
इतर भरती अपडेट्स
