Yuva AI for All हा भारत सरकारच्या IndiaAI Mission अंतर्गत एक फ्री बेसिक AI कोर्स आहे, ज्याचा उद्देश प्रत्येकाला AI ची ओळख आणि उपयोग करणे सोपे करणे आहे. हा कोर्स खास करून विद्यार्थ्यांसाठी तर आहेच पण यासाठी सर्वच लोक अर्ज करू शकणार आहेत.
हा कोर्स पूर्णपणे Online आणि Self-Paced आहे, म्हणजे तुम्ही हवे तेव्हा ते सुरू करू शकता आणि कोणत्याही वेळात पूर्ण करू शकता. साधारण 4.5 तासांचा छोटा कोर्स आहे आणि कोणीही, कोणत्याही अडचणी शिवाय शिकू शकतो, विद्यार्थी, कर्मचारी, गृहिणी, शिक्षक, व्यापारी — सगळ्यांसाठीच हा कोर्स उपयोगी आणि कामाचा आहे.
कोर्समध्ये तुम्हाला AI ची मूलभूत माहिती दिली जाते, AI म्हणजे काय, Generative AI साधने कशी वापरायची, AI चा दैनंदिन जीवनात उपयोग कसा करायचा, आणि सुरक्षित व नैतिक पद्धतीने AI वापरण्याचे नियम काय आहेत हे शिकायला मिळते. हे सर्व भाग सोप्या उदाहरणांसह शिकवले जातात जेणेकरून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सहज समजू शकेल.
कोर्स पूर्ण केल्यानंतर Government of India द्वारे अधिकृत सर्टिफिकेट हे देखील दिले जाते. यामुळे तुमच्या CV किंवा future career मध्ये AI skill दाखवणे सोपे होते. हा कोर्स भारतातल्या डिजिटल परिवर्तनाचा भाग असून भविष्यातील AI literacy साठी महत्वपूर्ण आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Yuva AI for All Course Complete Details Overview
| कोर्सचे नाव | Yuva AI for All (Artificial Intelligence) |
| Course Provider | भारत सरकार |
| कोर्सची भाषा | English |
| कोर्स फी | पूर्णपणे मोफत (Free) |
| पात्रता | पात्रता निकष नाहीत |
| कोर्स प्रकार | कौशल्य विकास प्रशिक्षण |
| प्रशिक्षण पद्धत | Online |
| मुख्य विषय | Artificial Intelligence |
| कोर्सचा उद्देश | Ai नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे. |
| अर्ज प्रक्रिया | Online अर्ज |
| सर्टिफिकेट | Joint Participation Certificate |
Artificial Intelligence (AI) म्हणजे काय?
Artificial Intelligence (AI) म्हणजे अशी संगणकीय तंत्रज्ञान प्रणाली जी माणसासारखा विचार करू शकते, शिकू शकते आणि निर्णय घेऊ शकते. साध्या शब्दांत सांगायचे तर, जे काम माणसाच्या बुद्धीने केले जाते तेच काम संगणक किंवा मशीन स्वतः शिकून आणि समजून करतात, यालाच Artificial Intelligence म्हणतात. मोबाईलमधील Voice Assistant, Chatbot, Face Unlock, YouTube-Netflix च्या Recommendation हे AI ची रोजची उदाहरणे आहेत.
आज AI चा वापर शिक्षण, आरोग्य, बँकिंग, शेती, व्यवसाय, मोबाईल Apps अशा अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होत आहे. AI मुळे काम जलद, अचूक आणि सोपे होते. भविष्यात AI चे महत्त्व आणखी वाढणार असल्याने, AI बद्दलची मूलभूत माहिती आणि कौशल्ये शिकणे विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे.
Yuva AI for All Course Benefits (कोर्सचे फायदे)
- AI ची मूलभूत माहिती सोप्या पद्धतीने शिकता येते.
- Generative AI टूल्स कसे वापरायचे ते शिकता येते.
- दैनंदिन जीवनात AI चा उपयोग करता येतो.
- सुरक्षित आणि जबाबदार AI वापरण्याबद्दल शिकता येते.
- भविष्यातील करिअर किंवा पुढील शिक्षणासाठी फायदा होतो.
- कोर्स पूर्ण केल्यानंतर अधिकृत सर्टिफिकेट मिळण्याची संधी असते.
- कोर्स पूर्णपणे मोफत (Free) आहे.
- Online असल्यामुळे घरबसल्या शिकता येते.
Yuva AI for All: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
How To Apply For Yuva AI for All Course
- प्रथम वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- त्यानंतर Registration करून घ्या, आणि लॉगीन करा.
- मग Learner / Participant पर्याय निवडा.
- Course Page वर “Enroll / Apply Now” वर क्लिक करा.
- त्यानंतर कोर्ससाठी अर्ज करण्याचा फॉर्म ओपन होईल, त्यात माहिती भरा आणि अर्ज Submit करा.
- एकदा अर्ज सबमिट केला कि मग तुम्ही तुमच्या सोयी नुसार कधी पण हा कोर्स पाहू शकता आणि AI शिकू शकता.
इतर भरती
UPSC NDA Bharti 2026: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा भरती, 177500 रु. पगार, 12वी पास अर्ज करा
BDL Bharti 2025: भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये भरती! 40,000 रु. पगार, B.E/B.Tech पास अर्ज करा
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये भरती! फी नाही, 12वी पदवीधर अर्ज करा
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा
OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा
Yuva AI for All Course FAQs (नेहमी विचारलेल जाणारे प्रश्न)
Yuva AI for All कोर्स काय आहे?
हा सर्वांसाठी उपलब्ध असलेला फ्री Online AI कोर्स आहे, ज्यातून Artificial Intelligence ची मूलभूत माहिती दिली जाते.
Yuva AI for All कोर्स पूर्णपणे फ्री आहे का?
होय, हा कोर्स 100% मोफत आहे. कोणतीही फी घेतली जात नाही.
Yuva AI for All कोर्ससाठी कोण अर्ज करू शकतो?
विद्यार्थी, तरुण, कर्मचारी, गृहिणी, सर्वजण या कोर्स साठी अर्ज करू शकतात.
Yuva AI for All कोर्स Online आहे की Offline?
हा कोर्स पूर्णपणे Online आहे.
Yuva AI for All कोर्स पूर्ण केल्यानंतर Certificate मिळेल का?
होय, कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट मिळते.
