West Central Railway Bharti 2024: पश्चिम मध्ये रेल्वे विभागात मोठी बंपर भरती निघाली आहे, यासंबंधी भारतीय रेल्वे द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.
तब्बल 3,317 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे, भरती ही फक्त अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी होणार आहे. दहावी बारावी आणि आयटीआय ट्रेड नुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ये भरती संबंधी एक मोठी विशेष बाब म्हणजे फी अगदी नाममात्र आकारली जात आहे, आणि नोकरी साठी उमेदवारांची निवड ही थेट केली जात आहे. कोणतीही परीक्षा, मुलाखत न घेता भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
मोठी मेगा भरती आहे, त्यामुळे रेल्वेत जर जॉब करायचा असेल तर हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि जशी माहिती दिली आहे, त्या प्रकारे ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरून घ्या.
West Central Railway Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) |
रिक्त जागा | 3317 |
नोकरीचे ठिकाण | पश्चिम-मध्य रेल्वे |
वेतन श्रेणी | 7,000 रू. + महिना |
वयाची अट | 18 ते 24 वर्षे |
भरती फी | साधारण प्रवर्ग: 141 रुपये (SC/ST/PWD/महिला: 41 रुपये) |
West Central Railway Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या | वेतन श्रेणी |
---|---|---|
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 3317 | 7,000 रुपये महिना |
Total | 3317 | – |
West Central Railway Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | ट्रेड | शिक्षण |
---|---|---|
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | मेडिकल लॅब टेक्निशियन | उमेदवार हा किमान 12 वी पास असावा त्याने बारावी मध्ये (Physics, Chemistry & Biology) हे तीन विषय निवडलेले असावेत. सोबत उमेदवाराचा NCVT/SCVT ट्रेड टेस्ट झालेला असावा. |
– | उर्वरित ट्रेड | उमेदवार हा 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असावा, आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा. |
West Central Railway Bharti 2024 Age Limit
पश्चिम मध्य रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे वय हे किमान 15 वर्षे असणे आवश्यक आहे, कमाल वयाची अट ही 24 वर्षे आहे. मात्र मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या अटी मध्ये सूट देण्यात आली आहे.
- साधारण प्रवर्ग: 15 ते 24 वर्षे
- SC, ST प्रवर्ग: 15 ते 29 वर्षे (5 वर्ष सूट)
- OBC प्रवर्ग: 15 ते 27 वर्षे (3 वर्ष सूट)
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | 07 ऑगस्ट 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 04 सप्टेंबर 2024 |
Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
West Central Railway Bharti 2024 Apply Online
पश्चिम मध्य रेल्वे मध्ये निघालेल्या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचे आहेत, ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी पश्चिम रेल्वे द्वारे अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले आहे. उमेदवारांना केवळ अधिकृत वेबसाईट वरूनच फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही वेबसाईटवरून सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर भारतीय रेल्वेचे अधिकृत पोर्टल उघडेल, त्या पोर्टलमध्ये तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- आयडी पासवर्ड सोबत लॉगिन केल्यानंतर, Apply Now या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या. माहिती अचूक आणि बरोबर असणे आवश्यक आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
- सोबतच कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे भरतीची फी भरून घ्यायची आहे, भरतीसाठी केवळ नाममात्र फी आकारली जात आहे, महिला आणि मागासवर्गीय उमेदवारांना तर केवळ 41 रुपये फी लावण्यात आली आहे.
- फी भरून झाली की पुढे तुम्हाला भरतीचा फॉर्म एकदा तपासून पाहायचा आहे, माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यास नंतरच मग सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
West Central Railway Bharti 2024 Selection Process
पश्चिम मध्य रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही काही टप्प्यानुसार केली जाणार आहे. जे उमेदवार पात्रता निकषात बसतील त्यांना निवडले जाणार आहे.
- मेरिट लिस्ट
- कागदपत्रे पडताळणी
- मेडिकल चाचणी
सुरुवातीला ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांची दहावी बारावी आणि आयटीआयचे मार्क तपासले जाणार आहेत. त्यानंतर ज्या उमेदवारांना जास्त मार्क आहेत त्यांची यादी बनवून मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाणार, त्यानंतर मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासली जाणार, शेवटी मेडिकल चाचणी करून अर्जदार उमेदवारांना पश्चिम मध्ये रेल्वेत अप्रेंटिस या पदावर नियुक्त केले जाणार आहे.
- Ratnagiri DCC Bharti 2024: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10 वी पास वर भरती! येथून लगेच अर्ज करा
- IOCL Apprentice Bharti 2024: इंडियन ऑइल कंपनीमध्ये 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा
West Central Railway Bharti 2024 FAQ
Who is eligible for West Central Railway Bharti 2024?
पश्चिम मध्य रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवार आहे किमान 10वी, 12वी आणि ITI उत्तीर्ण असावेत. सोबत इतर निकष पण आहेत, त्याची माहिती आपण वर आर्टिकल मध्ये सविस्तर सांगितली आहे.
How do I apply for West Central Railway Bharti 2024?
West Central Railway Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात NTPLRRC या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया लेखात सांगण्यात आली आहे.
What is the last date of the West Central Railway Bharti 2024 Application Form?
पश्चिम मध्ये रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 सप्टेंबर 2024 आहे. मुदतवाढ मिळेल या आशेने राहू नका, आता संधी आहे, अर्ज करून टाका.