TSDPL Silver Jubilee Scholarship 2024: टाटा स्टील द्वारे ITI, डिप्लोमा विद्यार्थ्यांना 50,000 रुपये

TSDPL Silver Jubilee Scholarship 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला टाटा स्टील द्वारे सुरू करण्यात आलेल्या स्कॉलरशिप प्रोग्राम विषयी सविस्तर अशी माहिती देणार आहे.

टाटा स्टील डाऊन स्ट्रीम प्रोडक्ट लिमिटेड द्वारे सिल्वर जुबली स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे.

आयटीआय आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. एका वर्षासाठी ही स्कॉलरशिप असणार आहे, पन्नास हजार रुपयांचे आर्थिक मदत या स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केली जाणार आहे.

जर तुम्हाला या स्कॉलरशिप साठी अर्ज करायचा असेल तर हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा, आणि आर्टिकल मध्ये जशी प्रक्रिया सांगितली आहे त्या प्रकारे फॉर्म भरून घ्या.

TSDPL Silver Jubilee Scholarship 2024

स्कॉलरशिप चे नावTSDPL Silver Jubilee Scholarship
स्कॉलरशिप ची सुरुवातTata Steel Downstream Products Limited
उद्देशउच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
लाभार्थीITI, Diploma चे शिक्षण घेणारे विद्यार्थी
लाभ50,000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

TSDPL Silver Jubilee Scholarship 2024 Eligibility Criteria

  • अर्जदार उमेदवार हे आयटीआय, डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी असावेत.
  • उमेदवारांना दहावी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळालेले असावेत.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असावे.
  • या स्कॉलरशिप साठी जमशेदपूर, कालीनगर, पंतनगर, फरीदाबाद, पुणे, चेन्नई, ताडा आणि कोलकाता येथील विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.

TSDPL Silver Jubilee Scholarship 2024 Benefits

टाटा स्टील स्कॉलरशिप साठी अर्जदार उमेदवारांना 50 हजारांची आर्थिक मदत केली जाणार आहे. ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी केली जाणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, स्टेशनरी, हॉस्टेल फी, मेस आणि इतर जे खर्च आहेत ते सर्व खर्च इंक्लुड असणार आहेत.

TSDPL Silver Jubilee Scholarship 2024 Documents List

या स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील त्या कागदपत्रांची लिस्ट खालील प्रमाणे आहे.

  • दहावीचा मार्क मेमो
  • आधार कार्ड
  • चालू वर्षाची ॲडमिशन पावती
  • बँक पासबुक
  • सध्याचा पासपोर्ट फोटो
  • उत्पन्न प्रमाणपत्र

TSDPL Silver Jubilee Scholarship 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
अर्जाची शेवटची तारीख03 डिसेंबर 2024
  • बडी 4 स्टडी या अधिकृत स्कॉलरशिप पोर्टलवर या.
  • तिथे तुमची नोंदणी करून घ्या त्यानंतर लॉगिन करा.
  • मग टाटा स्टील TSDPL Silver Jubilee Scholarship च्या पेज वर या.
  • त्यानंतर Apply Now वर क्लिक करा.
  • स्कॉलरशिप साठीचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • स्कॉलरशिप चा फॉर्म तपासा काही चुकलं असेल तर ते दुरुस्त करा.
  • शेवटी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा.

नवीन स्कॉलरशिप अपडेट:

TSDPL Silver Jubilee Scholarship FAQ

Who is eligible for TSDPL Silver Jubilee Scholarship?

आयटीआय आणि डिप्लोमा चे शिक्षण घेणारे उमेदवार या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात.

How to apply for TSDPL Silver Jubilee Scholarship?

बडी 4 स्टडी या पोर्टल वर जाऊन तुम्ही ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरू शकता.

What is the last date to apply for TSDPL Silver Jubilee Scholarship?

स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 डिसेंबर 2024 आहे.

Leave a comment