Tata Capital Pankh Scholarship 2026: टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप – 11 वी/ 12 वी/ ITI/ डिप्लोमा/ Graduation/ Post Graduation, 1 लाख रु. पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार

Tata Capital Pankh Scholarship 2026 ही टाटा कॅपिटल फाउंडेशनकडून दिली जाणारी एक महत्त्वाची शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करणे हा आहे. शिक्षणात पुढे जायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप एक मोठा आधार ठरते.

टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप 2026 अंतर्गत 11 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा, पदवी (Graduation) आणि पदव्युत्तर (Post Graduation) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी ₹1 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते, ज्यामुळे फी, पुस्तके, स्टेशनरी आणि इतर शैक्षणिक खर्च भागवणे सोपे होते.

ही शिष्यवृत्ती विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. अनेक हुशार विद्यार्थी केवळ पैशाअभावी आपले शिक्षण अर्धवट सोडतात, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत यासाठी टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप महत्त्वाची भूमिका बजावते.

या पोस्टमध्ये आपण Tata Capital Pankh Scholarship 2026 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पात्रता, शिष्यवृत्ती रक्कम, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा याबाबत सविस्तर माहिती पुढे दिली आहे, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Tata Capital Pankh Scholarship 2026: टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप – Complete Information

स्कॉलरशिपचे नावटाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप
स्कॉलरशिप देणारी संस्थाTata Capital
पात्रता (शैक्षणिक)11 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा, पदवी (Graduation) आणि पदव्युत्तर (Post Graduation)
शिष्यवृत्ती रक्कम1 लाख रुपया पर्यंत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Tata Capital Pankh Scholarship 2026 Eligibility Criteria: (शैक्षणिक पात्रता निकष)

Common Eligibility Criteria (सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू)

  • अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी भारतामधील मान्यताप्राप्त बोर्ड / कॉलेज / विद्यापीठ / तांत्रिक संस्थेत शिक्षण घेत असावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • Tata Capital मधील कर्मचार्‍यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.

Course-Wise Specific Eligibility

Class 11th & 12th Students –

  • विद्यार्थी सध्या 11वी किंवा 12वी मध्ये शिक्षण घेत असणे आवश्यक.
  • मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळवलेले असावेत.

Graduation / Diploma / Polytechnic / ITI Students –

  • विद्यार्थी Graduation (BA, BSc, BCom इ.) किंवा Diploma / Polytechnic / ITI कोर्समध्ये शिकत असणे आवश्यक.
  • मागील वर्ग / सेमिस्टर / शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण असणे आवश्यक.

Specialised Discipline Programme Students –

  • विद्यार्थ्याने प्रोफेशनल Graduation किंवा Post-Graduation अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.
  • मागील परीक्षेत किमान 80% गुण आवश्यक.
  • पात्र अभ्यासक्रमांमध्ये खालील कोर्स समाविष्ट असावेत:
    • Medicine, Veterinary Medicine
    • Architecture, Aerospace Engineering
    • Quantum Physics, Astrophysics
    • Biology, Botany, Zoology, Genetics
    • Nuclear Science, Molecular Chemistry
    • Economics, International Relations, Anthropology इ.

Tata Capital Pankh Scholarship 2026: टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप द्वारे मिळणारी आर्थिक मदत (Benefits)

11वी / 12वी विद्यार्थ्यांसाठी –

टक्केवारी (%)मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम
60% ते 80%अभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹10,000 (जे कमी असेल ते)
81% ते 90%अभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹12,000 (जे कमी असेल ते)
91% व त्यापेक्षा जास्तअभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹15,000 (जे कमी असेल ते)

General Graduation / Polytechnic / Diploma / ITI Students विद्यार्थ्यांसाठी –

टक्केवारी (%)मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम
60% ते 80%अभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹12,000 (जे कमी असेल ते)
81% ते 90%अभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹15,000 (जे कमी असेल ते)
91% व त्यापेक्षा जास्तअभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹18,000 (जे कमी असेल ते)

Professional Graduation Students विद्यार्थ्यांसाठी –

टक्केवारी (%)मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम
NANअभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹1,00,000 (जे कमी असेल ते)

Tata Capital Pankh Scholarship 2026 Documents List (आवश्यक कागदपत्रे)

  • फोटो ओळखपत्र (आधार कार्ड)
  • अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला (Form 16A / शासकीय उत्पन्न प्रमाणपत्र / पगार स्लिप इ.)
  • प्रवेशाचा पुरावा (कॉलेज / संस्थेचे ओळखपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट इ.)
  • चालू शैक्षणिक वर्षाची फी पावती
  • अर्जदाराचे बँक खाते तपशील (रद्द केलेला चेक किंवा पासबुकची प्रत)
  • मागील वर्गाची गुणपत्रिका / ग्रेड कार्ड
  • अपंगत्व प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

Tata Capital Pankh Scholarship 2026: Important Links & Dates – महत्त्वाच्या लिंक्स आणि तारखा

अधिकृत वेबसाईटtatacapital.com
ऑनलाईन अर्जApply Online
स्कॉलरशिपची शेवटची तारीख11 जानेवारी, 2026 15 फेब्रुवारी 2026
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Tata Capital Pankh Scholarship 2026 Apply Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम Tata Capital Pankh Scholarship 2026 ची अधिकृत वेबसाईट उघडा.
  • New Registration वर क्लिक करून नाव, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरून नोंदणी करा.
  • नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करा.
  • Scholarship application form उघडा.
  • वैयक्तिक माहिती भरा (नाव, जन्मतारीख, पत्ता इ.).
  • शैक्षणिक माहिती भरा (वर्ग / कोर्स, कॉलेजचे नाव, मागील वर्षाचे गुण).
  • कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती भरा.
  • बँक खात्याची माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • भरलेली माहिती नीट तपासून Submit करा.
  • अर्ज यशस्वी झाल्यानंतर confirmation message मिळेल

फॉर्म कसा भरायचा व्हिडीओ लिंक

Tata Capital Pankh Scholarship 2026 Selection Process – निवड प्रक्रिया

  • सर्व अर्जांची प्राथमिक तपासणी केली जाते.
  • अर्जदार पात्र आहे की नाही हे तपासले जाते.
  • अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुण तपासले जातात.
  • कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा विचार केला जातो.
  • पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी (Merit List) तयार केली जाते.
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ई-मेल किंवा मेसेजद्वारे कळवले जाते.
  • आणि मगच शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

इतर भरती अपडेट्स

FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Tata Capital Pankh Scholarship 2026 कोणासाठी आहे?

Tata Capital Pankh Scholarship ही 11वी, 12वी, ITI, डिप्लोमा, Graduation, Post Graduation आणि विशेष प्रोफेशनल अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

Tata Capital Pankh Scholarship 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?

टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप साठी भारतीय नागरिक असलेले, मान्यताप्राप्त संस्थेत शिक्षण घेत असलेले आणि उत्पन्न मर्यादेत येणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

Tata Capital Pankh Scholarship साठी उत्पन्न मर्यादा किती आहे?

टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप साठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सर्व स्रोतांमधून ₹2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.

Tata Capital Pankh Scholarship 2026 साठी किमान किती टक्के गुण आवश्यक आहेत?

टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप साठी सामान्य अभ्यासक्रमांसाठी किमान 60% गुण आणि विशेष प्रोफेशनल अभ्यासक्रमांसाठी किमान 80% गुण आवश्यक आहेत.

Tata Capital Pankh Scholarship साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 आहे.

Leave a comment