Sukanya Samrudhi Yojana Marathi: सरकारने मुलींसाठी सुरू केलेल्या अभिनव अशा योजनापैकी एक विशेष अशी योजना, ज्याद्वारे मुलींच्या शिक्षणाची तसेच लग्नासाठी पालकांना आर्थिक तरतूद करता येते.
आजच्या या पोस्ट मध्ये आपण Sukanya Samrudhi Yojana संबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. यामधे योजनेसाठी कोण पात्र असणार? लाभ कसा मिळणार? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? अशी सर्व माहिती दिलेली आहे, जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर कृपया हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचून घ्या.
Sukanya Samrudhi Yojana Marathi
योजनेचे नाव | Sukanya Samrudhi Yojana |
योजनेची सुरुवात | केंद्र शासन |
उद्देश | मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक बचत करणे. |
लाभार्थी | मुलीचे पालक |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
Sukanya Samrudhi Yojana Elegibility Criteria
- मुलीचे वय हे 10 वर्षा पेक्षा कमी असावे.
- मुलीच्या नावे तिच्या पालकांना अर्ज करावा लागतो.
- एका मुलीच्या नावे केवळ एकच खाते सुरू करता येते.
- एका कुटुंबातील केवळ दोन मुलींसाठी Sukanya Samrudhi Yojana Account Open करता येईल.
- कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुली असतील तर पहिल्या दोन मुलीच्या नावे या योजनेचा फायदा घेता येईल, बाकी मुलींना योजनेत सहभागी होता येणार नाही.
- मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर Sukanya Samrudhi Yojana Account मध्ये बचत केलेली रक्कम व्याजासह काढता येते.
- मुलीचे वय 21 वर्षे झाले परंतु तुम्ही जर खात्यातून रक्कम काढली नाही, तरी पण रक्कमेवर व्याज मिळत राहते.
- अनाथ मुलीला दत्तक घेतले तरी देखील तुम्हाला सुकन्या समृध्दी योजनाचा लाभ घेता येतो.
Sukanya Samrudhi Yojana Benefits
- मुलीचे पालक सुकन्या योजना खात्यात 250 रुपये ते 1,50,000 रुपये पर्यंत किमान ठेव बचत करू शकतात. तसेच दरवर्षी तुम्ही बचत ठेव 250 ते 1,50,000 पर्यंत वाढवू शकता.
- 21 वर्षांचा Maturity Period असणार आहे, म्हणजे 21 वर्षा पर्यंत तुम्ही खात्यात पैसे ठेव स्वरूपात गुंतवणूक करू शकता.
- केवळ 15 वर्षे तुम्हाला खात्यात पैसे भरावे लागतात, त्यानंतर 15 ते 21 पर्यंत पैसे भरण्याची कोणतीही गरज नसते.
- तुम्ही गुंतवणूक केलेली एकूण रक्कम आणि त्यावर मिळणारा व्याज दर यामधे 35.27% तुमची गुंतवणूक तर 64.73% रक्कम व्याज स्वरूपात असते.
- बँकेच्या Saving Account अथवा FD ऐवजी या सुकन्या समृध्दी योजनेत मिळणारे व्याज दर हे जास्त असते, 8.0% एवढा वार्षिक व्याजदर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर मिळतो.
- योजनेत जमा केलेले पैसे हे शासनाच्या वतीने 100% सुरक्षित असतात, त्यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी घेण्याची गरज नाही.
Sukanya Samrudhi Yojana Account Details
मुलीच्या 10 वर्षा पर्यंत | Sukanya Samrudhi Yojana खाते उघडा |
मुलीचे वय 18 वर्षे झाल्यावर | खात्यातून 50% रक्कम काढता येते. |
खाते उघडून 15 वर्षे झाल्याव | प्रती वर्षी केली जाणारी गुंतवणूक बंद करता येते. |
मुलीचे वय 21 वर्षे झाल्यावर | खात्यातून पूर्ण 100% रक्कम काढता येते. |
1000 रुपये गुंतवणुकीवर 5.54 लाख रुपये
तुम्ही जर Sukanya Samrudhi Yojana Account मध्ये महिन्याला 1000 रुपये जमा केले तर तुम्हाला 5.54 लाख रुपये मिळतात.
मुलीच्या लग्नासाठी मिळणार 51,000 रुपये! जाणून घ्या माहिती
सध्या योजनेसाठी व्याजदर हा 8.2% देण्यात येत आहे, म्हणजे बघा तुम्ही महिन्याला 1000 जमा केले तर ते वर्षाचे 12,000 होतील.
केवळ 15 वर्षे पैसे भरावे लागणार आहेत, म्हणजे एकूण तुमची गुंतवणूक होईल 1,80,000 रुपये. 15 ते 21 वर्षे पैसे भरण्याची गरज नाही. 21 वर्षा नंतर तुम्हाला पूर्ण मॅच्युरिटी रक्कम ही 5.54 लाख रुपये मिळतील.
Sukanya Samrudhi Yojana Document List
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांचे ओळखपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- KYC Documents (Pan Card, Voter ID)
- SSY Account Opening Form
- दोन पेक्षा जास्त मुली असतील तर मेडिकल सर्टिफिकेट (Order Of Birth)
Sukanya Samrudhi Yojana Account Opening Process
ऑफलाईन स्वरूपात सुकन्या समृध्दी योजना खाते उघडता येते, त्यासाठी तुम्ही पोस्टात किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन अर्ज करू शकता.
- सुरुवातीला तुम्हाला पोस्टाच्या बँकेत किंवा इतर कोणत्याही बँकेत जायचे आहे, त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांना सुकन्या समृध्दी योजना खाते उघडण्यासाठी विचारणा करायची आहे.
- योजनेचा फॉर्म मिळाल्यानंतर तो काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे, फॉर्म सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे Hard Copy स्वरूपात झेरॉक्स प्रती जोडायच्या आहेत.
- त्यानंतर योजनेचा फॉर्म हा Documents सोबत बँक अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे, बँकेचे अधिकारी तुमचा फॉर्म Verify करतील, त्यानंतर तुमचे Sukanya Samrudhi Yojana Account खाते बँकेत उघडले जाईल.
- खाते उघडल्यानंतर तुम्हाला वार्षिक 250 ते 1,50,000 या मर्यादेत खात्यामध्ये गुंतवणूक करायची आहे. Account उघडताना तुम्हाला सुरुवातीला काही रक्कम Deposit करावी लागेल.
नवीन सरकारी योजना:
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रू.
- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपयांची स्कॉलरशिप! लगेच अर्ज करा
Sukanya Samrudhi Yojana FAQ
Who is eligible for opening Sukanya Samrudhi Account?
मुलीचे पालक सुकन्या समृध्दी योजना खाते मुलीच्या नावे उघडू शकतात, आणि गुंतवणूक करून मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक तरतूद करू शकतात.
How to open Sukanya Samrudhi Account?
Sukanya Samrudhi Account तुम्ही Post Bank मधून किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून उघडू शकता. खाते कसे उघडायचे? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.
What is the interest rate of the Sukanya Samrudhi Account?
Sukanya Account साठी सध्या चालू वार्षिक व्याजदर हा 8.2% एवढा आहे, या व्याजदरा नुसार अर्जदार मुलीला गुंतवणुकीवर लाभ मिळणार आहे.
2 thoughts on “Sukanya Samrudhi Yojana: या मुलींना मिळत आहेत 5 लाख रुपये! तुम्हाला मिळतील का? चेक करा Free मध्ये”