SSC GD 2026 Exam Slot Booking ही परीक्षा लाखो उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची आहे. कॉन्स्टेबल (GD) पदासाठी होणारी ही भरती केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी देते. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व इतर टप्प्यांतून जावे लागते. त्यामुळे प्रत्येक टप्प्याची माहिती वेळेत असणे गरजेचे आहे.
SSC GD 2026 परीक्षेसाठी Exam Slot Booking हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये उमेदवारांना आपली परीक्षा तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्र निवडण्याची संधी दिली जाते. वेळेत स्लॉट बुकिंग न केल्यास परीक्षा देण्यात अडचण येऊ शकते, त्यामुळे ही प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करणे आवश्यक आहे.
बर्याच उमेदवारांना स्लॉट बुकिंग कसे करायचे, लॉगिन कुठे करायचे, कोणती माहिती लागते याबाबत गोंधळ असतो. त्यामुळे अनेक वेळा शेवटच्या क्षणी अडचणी निर्माण होतात. योग्य पद्धतीने आणि वेळेत स्लॉट बुकिंग केल्यास परीक्षा देण्याची तयारी अधिक सोपी होते.
या पोस्टमध्ये SSC GD 2026 Exam Slot Booking कशी करायची याची संपूर्ण अशी सविस्तर माहिती सोप्या भाषेत दिली आहे. फक्त 2 मिनिटांत तुम्ही स्लॉट बुकिंगची प्रक्रिया समजून घेऊ शकता. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा, माहिती काळजीपूर्वक वाचा म्हणजे कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही.
SSC GD 2026 Exam Overview: Complete Details
| परीक्षा नाव | SSC GD 2026 |
| परीक्षा आयोजित करणारी संस्था | Staff Selection Commission (SSC) |
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल (GD) |
| विभाग | BSF, CISF, CRPF, ITBP, SSB, Assam Rifles, NCB |
| भरती वर्ष | 2026 |
| परीक्षा पद्धत | ऑनलाइन (CBT) |
| परीक्षा स्तर | राष्ट्रीय स्तर |
| परीक्षेचे टप्पे | लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (PET/PST), वैद्यकीय तपासणी |
| लेखी परीक्षेचे विषय | सामान्य बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी / हिंदी |
| Exam Slot Booking | ऑनलाइन |
| Admit Card | ऑनलाइन उपलब्ध |
| अधिकृत वेबसाइट | ssc.gov.in |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
SSC GD 2026 Exam Slot Booking कशी करायची? (Step-by-Step Guide)
SSC GD परीक्षेसाठी उमेदवार स्वतःहून Exam Slot Selection करू शकतात. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे, SSC GD 2026 Exam Slot Booking साठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहजपणे स्लॉट निवडू शकता.
Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या –
- सर्वप्रथम Staff Selection Commission (SSC) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Step 2: SSC GD Slot Selection लिंकवर क्लिक करा –
- होमपेजवर उपलब्ध असलेल्या SSC GD Exam Slot Selection लिंकवर क्लिक करा.
Step 3: लॉगिन करा –
- आता तुमचा Registration ID आणि Password टाकून लॉगिन करा.
Step 4: परीक्षा तारीख आणि शिफ्ट निवडा –
- लॉगिन झाल्यानंतर उपलब्ध असलेली परीक्षा तारीख (Exam Date) आणि वेळ/शिफ्ट (Shift) तुमच्या सोयीप्रमाणे निवडा.
Step 5: स्लॉट Confirm करा –
- निवडलेली माहिती एकदा तपासून Confirm / Submit बटणावर क्लिक करा.
Step 6: स्लॉटची पावती जतन करा –
- स्लॉट बुकिंग पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर दिसणारी माहिती Screenshot किंवा Printout करून ठेवा.
📌 महत्वाची सूचना:
- स्लॉट बुकिंग First Come First Serve तत्त्वावर असू शकते.
- एकदा स्लॉट Confirm केल्यानंतर बदलाची संधी मर्यादित असू शकते.
- शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकर स्लॉट बुक करा.
SSC GD Bharti 2026 संपूर्ण माहिती इथून वाचा
SSC GD Tier 1 Exam Date 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | |
| अर्जाची शेवटची तारीख | |
| Tier I परीक्षेची तारीख | 23 फेब्रुवारी 2026 (Tentative) |
| Admit Card तारीख | 19 फेब्रुवारी 2026 (अंदाजे) |
SSC GD 2026 Exam Slot Booking: Important Links – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | |
| परीक्षा Slot Booking | इथून स्लॉट बुक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
SSC GD Tier 1 Admit Card Date 2026: SSC GD परीक्षेचे हॉलतिकीट कधी येईल? (प्रवेशपत्र तारीख)
SSC GD Tier 1 Admit Card 2026 हा परीक्षेच्या अंदाजे 4 दिवस आधी जारी केला जाऊ शकतो. प्रवेशपत्र (Admit Card) फक्त ऑनलाईन पद्धतीनेच उपलब्ध असेल. उमेदवारांना पोस्टाने किंवा इतर कोणत्याही मार्गाने Admit Card मिळणार नाही.
Admit Card डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी Registration ID आणि Password / Date of Birth वापरून SSC च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करणे आवश्यक आहे. लॉगिन केल्यानंतर Admit Card डाउनलोड करून प्रिंट काढावी.
Admit Card मध्ये उमेदवाराची परीक्षा तारीख, परीक्षा वेळ (Shift) आणि परीक्षा केंद्राचा पत्ता दिलेला असेल. त्यामुळे Admit Card काळजीपूर्वक वाचणे खूप महत्वाचे आहे.
📌 महत्वाची सूचना: Admit Card शिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. Admit Card डाउनलोड केल्यानंतर त्यावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्र, तारीख इत्यादी सर्व तपशील नीट तपासावेत. कोणतीही चूक आढळल्यास तात्काळ SSC शी संपर्क साधावा.
SSC GD 2026 Exam Slot Booking
इतर भरती अपडेट्स
Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा
Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती, 19500 रु. महिना, 10वी पास अर्ज करा
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
SSC GD 2026 Exam Slot Booking FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
SSC GD Exam Slot Booking म्हणजे काय?
SSC GD Exam Slot Booking ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये उमेदवार स्वतःची परीक्षा तारीख, वेळ (शिफ्ट) आणि काही वेळा परीक्षा केंद्र निवडतात.
SSC GD 2026 Exam Slot Booking करणे बंधनकारक आहे का?
होय, SSC कडून Slot Booking सुरू केल्यास ती प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. स्लॉट बुक न केल्यास परीक्षा देण्यात अडचण येऊ शकते.
SSC GD 2026 Exam Slot Booking कधी सुरू होते?
Exam Slot Booking साधारणपणे परीक्षेच्या काही दिवस आधी SSC च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू केली जाते.
SSC GD 2026 Exam Slot Booking कशी करायची?
SSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Registration ID आणि Password वापरून लॉगिन करून Exam Date आणि Shift निवडून स्लॉट Confirm करावा.
एकदा SSC GD Exam Slot Booking केल्यानंतर बदल करता येतो का?
बहुतांश वेळा एकदा स्लॉट Confirm केल्यानंतर बदलाची परवानगी दिली जात नाही, त्यामुळे स्लॉट निवडताना काळजी घ्यावी.
