SSC CHSL Bharti 2025: 12वी पास विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CHSL कडून 3131 जागांसाठी मेगाभरती, संधी सोडू नका!

SSC CHSL Bharti 2025: केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. कर्मचारी निवड आयोगामार्फत म्हणजेच SSC मार्फत CHSL भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 12वी पास उमेदवारांना विविध विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध आहे.

या भरती अंतर्गत Lower Division Clerk (LDC), Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO) आणि DEO Grade ‘A’ अशा पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी कोणतीही पदवी आवश्यक नाही, फक्त 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. काही विभागांसाठी Science Stream किंवा Maths विषय आवश्यक आहे.

जर तुम्ही सध्या सरकारी नोकरीसाठी योग्य संधी शोधत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी योग्य आहे. पुढे या लेखात आपण या भरतीसंबंधी संपूर्ण माहिती जसे की, पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SSC CHSL Bharti 2025

ही संधी आणि भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SSC CHSL Bharti 2025 भरतीची थोडक्यात माहिती

घटकमाहिती
विभागाचे नावकर्मचारी निवड आयोग (SSC)
भरतीचे नावSSC CHSL भरती 2025 (Combined Higher Secondary Level Exam)
पदसंख्या3131 (अंदाजित)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीसामान्य व ओबीसी : ₹100
SC, ST, महिला, दिव्यांग : फी नाही
शिक्षण पात्रता12वी उत्तीर्ण (Science Stream आवश्यक काही DEO पदांसाठी)
निवड प्रक्रियाTier-I (CBT) + Tier-II (CBT + Skill/Typing Test)
पगार व भत्ते₹25,000 ते ₹35,000 पर्यंत (पद व विभागानुसार)
DA, HRA, Transport Allowance, इ.

SSC CHSL Bharti 2025 पदे आणि जागा (Post & Vacancy)

एकूण जागा (Tentative): 3131

पदाचे नावएकूण जागा (Tentative)
Lower Division Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA)उपलब्ध नाही
Data Entry Operator (DEO)उपलब्ध नाही
Data Entry Operator, Grade ‘A’उपलब्ध नाही
एकूण जागा (Tentative): 3131

SSC CHSL Bharti 2025 Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदानुसार

1. Data Entry Operator (DEO) – काही मंत्रालयांमध्ये (उदा. Ministry of Consumer Affairs, Ministry of Culture, SSC Office):

  • 12वी उत्तीर्ण (Science Stream) आणि गणित विषय आवश्यक आहे.

2. Data Entry Operator (DEO) – इतर सर्व विभागांसाठी:

  • कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.

3. Data Entry Operator, Grade ‘A’:

  • कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.

4. Lower Division Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA):

  • कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.

SSC CHSL Bharti 2025 Age Limit & Relaxation – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलमाहिती
वयाची अट18 ते 27 वर्षे (जन्मतारीख 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान असावी)
सवलतीSC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे, PwD: 10 ते 15 वर्षे (शासन नियमांनुसार)
प्रवर्गवयोमर्यादेत सूट
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST)5 वर्षे
इतर मागासवर्ग (OBC)3 वर्षे
दिव्यांग उमेदवार (PwBD) – सामान्य10 वर्षे
PwBD – OBC13 वर्षे
PwBD – SC/ST15 वर्षे
माजी सैनिक (Ex-Servicemen)सेवा कालावधी + 3 वर्षे
केंद्र सरकारी कर्मचारी – सामान्य40 वर्षे पर्यंत
केंद्र सरकारी कर्मचारी – SC/ST45 वर्षे पर्यंत
विधवा/ घटस्फोटित महिला – सामान्य35 वर्षे पर्यंत
विधवा/ घटस्फोटित महिला – SC/ST40 वर्षे पर्यंत

RRB Technician Bharti 2025: 10वी, ITI आणि डिप्लोमा पाससाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती! पगार ₹80,000 पर्यंत, संधी सोडू नका!

SSC CHSL Bharti 2025 पगार, भत्ते आणि फायदे Salary, Allowances & Benefits

पदाचे नावपगार श्रेणी (Pay Level)वेतनश्रेणी (₹)
Lower Division Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA)Level-2₹19,900 ते ₹63,200
Data Entry Operator (DEO)Level-4₹25,500 ते ₹81,100
Data Entry Operator, Grade ‘A’Level-4₹25,500 ते ₹81,100
काही DEO पदांसाठीLevel-5₹29,200 ते ₹92,300

SSC CHSL Bharti 2025 निवड प्रक्रिया Selection Process & Stages

पदानुसार निवड प्रक्रिया :-

1. Lower Division Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA):

निवड प्रक्रिया:

  1. Tier-I परीक्षा (CBT – Objective Type)
  2. Tier-II परीक्षा:
    • CBT (Maths, Reasoning, English, GK, Computer Knowledge)
    • Typing Test:
      • इंग्रजी: 35 शब्द प्रति मिनिट
      • हिंदी: 30 शब्द प्रति मिनिट

टीप: Typing Test qualifying आहे, म्हणजे अंतिम मेरिट फक्त CBT च्या गुणांवर ठरेल.


2. Data Entry Operator (DEO):

निवड प्रक्रिया:

  1. Tier-I परीक्षा (CBT – Objective Type)
  2. Tier-II परीक्षा:
    • CBT (Maths, Reasoning, English, GK, Computer Knowledge)
    • Skill Test:
      • सामान्य विभागासाठी: 8000 Key Depressions प्रति तास
      • काही विभागासाठी: 15000 Key Depressions प्रति तास (Science + Maths असलेल्या विभागांसाठी)

टीप: Skill Test qualifying आहे, अंतिम निवड CBT च्या गुणांवर आधारित असेल.


3. Data Entry Operator, Grade ‘A’:

निवड प्रक्रिया:

  1. Tier-I परीक्षा (CBT – Objective Type)
  2. Tier-II परीक्षा:
    • CBT (Maths, Reasoning, English, GK, Computer Knowledge)
    • Skill Test (8000 किंवा 15000 Key Depressions, विभागानुसार)

टीप: ही प्रक्रिया DEO प्रमाणेच आहे.


सर्व पदांसाठी सामान्य सूचना:

✔ Tier-I आणि Tier-II या दोन्ही परीक्षा Online असतील.
✔ CBT मध्ये मराठी भाषा पर्याय नाही, इंग्रजी/हिंदी आणि इतर काही भाषांमध्ये पेपर असेल.
✔ Skill Test / Typing Test qualifying स्वरूपाचा आहे.
✔ अंतिम निवड Tier-I आणि Tier-II च्या गुणांवर आधारित असेल.

SSC CHSL Bharti 2025 परीक्षा अभ्यासक्रम Exam Syllabus

Tier-I परीक्षा सिलेबस (CBT – Computer Based Test)

एकूण 4 विषय असतील, प्रत्येक विषयाला 25 प्रश्न, एकूण 100 प्रश्न, 200 गुण.

विषय:

  1. General Intelligence (सामान्य बुद्धिमत्ता):
    • Analogies
    • Coding-Decoding
    • Series (Number, Alphabetical)
    • Puzzle
    • Direction Sense
    • Blood Relation
    • Syllogism
    • Venn Diagram
    • Data Sufficiency
  2. Quantitative Aptitude (गणित):
    • Number System
    • HCF, LCM
    • Simplification
    • Ratio & Proportion
    • Percentage
    • Average
    • Profit & Loss
    • Time & Work
    • Speed, Time & Distance
    • Simple & Compound Interest
    • Mensuration
    • Geometry
    • Trigonometry
    • Statistics & Data Interpretation
  3. English Language (इंग्रजी):
    • Grammar (Noun, Verb, Tense, Prepositions)
    • Vocabulary
    • Synonyms & Antonyms
    • Spotting Errors
    • Sentence Improvement
    • Cloze Test
    • Reading Comprehension
    • Fill in the Blanks
  4. General Awareness (सामान्य ज्ञान):
    • भारताचा इतिहास
    • भूगोल
    • राज्यघटना
    • चालू घडामोडी (Current Affairs)
    • सामान्य विज्ञान
    • अर्थव्यवस्था
    • संगणक मूलतत्त्वे

नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.50 गुण कपात.


Tier-II परीक्षा सिलेबस (CBT + Skill/Typing Test)

Section-I: गणितीय क्षमता आणि General Intelligence
Section-II: इंग्रजी भाषा आणि General Awareness
Section-III: संगणक ज्ञान (Computer Knowledge)
Section-IV: Skill Test किंवा Typing Test (पदावर आधारित)

➡️ Skill/Typing Test: qualifying स्वरूपाचा असतो.
➡️ अंतिम मेरिट ही फक्त CBT परीक्षेच्या गुणांवर ठरते.

SSC CHSL Bharti 2025 महत्वाच्या तारखा (Important Dates)

घटनातारीख व वेळ
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख23 जून 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख18 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख19 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
अर्जामध्ये दुरुस्तीची सुविधा23 जुलै 2025 ते 24 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
Tier-I परीक्षा (CBT)08 सप्टेंबर 2025 ते 18 सप्टेंबर 2025
Tier-II परीक्षा (CBT)फेब्रुवारी – मार्च 2026 दरम्यान (अपेक्षित)

SSC CHSL Bharti 2025 अर्ज करायची लिंक Apply Links

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDF इथे क्लिक करा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

SSC CHSL Bharti 2025 अर्ज करायची प्रक्रिया स्टेपनुसार How to apply

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:

SSC CHSL Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो करून अर्ज करावा.

1️⃣ सर्वप्रथम SSC च्या अधिकृत वेबसाईटवर जा: https://ssc.gov.in

2️⃣ जर तुम्ही या वेबसाईटवर नवीन युजर असाल, तर “Register Now” या पर्यायावर क्लिक करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

  • नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख इत्यादी माहिती अचूक भरावी.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल किंवा ई-मेलवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

3️⃣ नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करा.

4️⃣ लॉगिन केल्यानंतर “SSC CHSL Examination 2025” हा पर्याय निवडा.

5️⃣ अर्जामध्ये खालील माहिती काळजीपूर्वक भरा:

  • वैयक्तिक माहिती (Personal Details)
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
  • पत्ता व संपर्क माहिती (Address & Contact Details)
  • कॅटेगरी, दिव्यांगत्व, आरक्षण यासंबंधीची माहिती

6️⃣ पासपोर्ट साइज फोटो आणि सही (Signature) स्कॅन करून अपलोड करा.

  • फोटो सध्याचा आणि स्पष्ट असावा.
  • सही योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करावी.

7️⃣ आवश्यकतेनुसार ऑनलाईन फी भरा.

  • General व OBC: ₹100
  • SC, ST, महिला व दिव्यांग उमेदवारांसाठी फी नाही.
  • फी नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI द्वारे भरता येईल.

8️⃣ सर्व माहिती नीट तपासून “Submit” करा.

9️⃣ अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट काढा किंवा पीडीएफ सेव्ह करून ठेवा.


महत्वाच्या सूचना:
✔ अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य व सत्य असावी.
✔ चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
✔ अर्ज करण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज करावा.

इतर भरती

SSC CGL 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL मेगाभरती, तब्बल 14,582 जागा! पगार 1 लाख पेक्ष्या जास्त! लगेच अर्ज करा!

Indian Coast Guard Bharti 2025: 10वी आणि 12वी पासवर भारतीय तटरक्षक दलात पर्मनेंट भरती! पगार 46 हजार पर्यंत! संधी गमावू नका!

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: 12वी पासवर इंडियन नेवीची ऑफिसर भरती,ट्रेनिंग सोबत डिग्री करायची संधी, पगार 80 हजार पर्यंत!

SSC CHSL Bharti 2025 साठी पात्रता काय आहे?

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही DEO पदांसाठी Science Stream व गणित विषय बंधनकारक आहे.

SSC CHSL Bharti वयोमर्यादा किती आहे?

18 ते 27 वर्षे वयोमर्यादा आहे. SC/ST प्रवर्गाला 5 वर्षे, OBC प्रवर्गाला 3 वर्षे व अन्य शासन नियमानुसार सूट लागू आहे.

SSC CHSL Bharti selection process?

कूण दोन टप्प्यात परीक्षा होते — Tier-I (CBT) आणि Tier-II (CBT + Typing/Skill Test).

SSC CHSL Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 आहे.

SSC CHSL Bharti 2025 education qualification ?

12वी उत्तीर्ण

Leave a comment