SBI SCO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती सुरू! या पोरांना अर्ज करता येणार

SBI SCO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेमध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर या पदासाठी भरती निघाली आहे. यासंबंधी एसबीआय द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.

ऑनलाइन स्वरूपात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, जी उमेदवार इच्छुक आहेत त्यांना बँकेच्या अधिकृत पोर्टल वरूनच फॉर्म भरायचा आहे.

या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधारक अर्ज करू शकणार आहेत. सोबतच चांगला गलेलठ्ठ पगार मिळणार आहे, त्यामुळे एवढी चांगली संधी सोडू नका. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर भरतीसाठी अर्ज करून टाका.

या भरतीसाठी एकूण 150 जागा सोडण्यात आल्या आहेत, ज्या केवळ ऑफिसर पदासाठी आहेत. बाकी इतर कोणतेही पद यामधे समाविष्ट नाही, त्यामुळे एकाच पदासाठी SBI Bharti राबवली जात आहे.

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा? कोणते उमेदवार पात्र असणार? नोकरीची ठिकाण कोणते आहे? वयाची अट काय आहे? अशा सर्व महत्वाच्या बाबी मी आर्टिकल मध्ये नमूद केल्या आहेत, त्यामुळे नक्की माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या, आणि मग सर्व काही क्लिअर झाल्यावर मग फॉर्म भरा.

SBI SCO Bharti 2024

पदाचे नावट्रेड फायनान्स ऑफिसर
रिक्त जागा१५०
नोकरीचे ठिकाणहैदराबाद आणि कोलकता
वेतन श्रेणी६९,८१० रू. पासून सुरू
वयाची अट23 ते 32 वर्षे
भरती फीGeneral/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

SBI SCO Bharti 2024 Education Qualification

भारतीय स्टेट बँकेमध्ये निघालेले या नवीन भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे अनिवार्य आहे. बँकेद्वारे जे निकष जारी केले आहेत त्या निकषांमध्ये जर उमेदवार बसत असतील तरच त्यांना फॉर्म भरता येणार आहे अन्यथा उमेदवारांना बाद केले जाणार आहे.

  • या भरतीसाठी अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी धारक असावा.
  • अर्जदाराने IIBF द्वारे जारी करण्यात येणारे फॉरेक्स प्रमाणपत्र मिळवलेले असावे.
  • तसेच उमेदवाराला कामाचा किमान 02 वर्षांचा अनुभव असावा.

SBI SCO Bharti 2024 Selection Process

SBI SCO भरती साठी उमेदवारांची निवड ही दोन टप्प्यांमध्ये होणार आहे.

  • Shortlisting
  • Interview

भरती साठी अर्ज सादर केलेल्या पात्र उमेदवारांना ईमेल द्वारे किंवा मोबाईल SMS मार्फत Interview साठी बोलावले जाईल.

Shortlisting

शोर्टलिस्टिंग मध्ये अर्जदार उमेदवारांची निवड ही SBI बँके द्वारे अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.

Shortlisting मध्ये अर्जदार उमेदवारांचे शिक्षण आणि अनुभव तपासला जाणार आहे. जर उमेदवार पदा साठी योग्य असेल तरच त्याला Shortlist केले जाणार आहे.

Interview

Shortlisting केलेल्या उमेदवारांना SBI बँके द्वारे मुलाखती साठी बोलावले जाईल.

मुलाखती साठी 100 मार्क असतील, जे उमेदवार Interview मध्ये पास होतील त्यांना SBI SCO भरती अंतर्गत मेरीट लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाईल.

Merit List

मुलाखत पार पडल्यानंतर ज्या उमेदवारांनी जास्त गुण घेतले आहेत, त्यांचे नाव मेरिट लिस्ट मध्ये Add केले जाईल.

मुलाखती मध्ये जास्त प्रमाणात उमेदवार पास झाले, तर त्यांना Cut Off Mark आणि Age नुसार प्राधान्य दिले जाणार आहे.

SBI SCO Bharti 2024 Application Form

भारतीय स्टेट बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपाची सुविधा देण्यात आलेली नाही. अधिकृत पोर्टलवरूनच फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज सादर करताना विशेष काळजी घ्या आणि ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करून फॉर्म भरा.

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख०७ जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख27 जून 2024
  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून दिलेल्या लिंक्स मधून जाहिरातीच्या लिंक वर क्लिक करून एकदा पूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  2. जाहिरात वाचून झाली की नंतर तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधूनच ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  3. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पोर्टल ओपन होईल, तेथे तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करून तुम्हाला भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे.
  4. फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानुसार अचूक माहिती भरायची आहे. माहिती भरताना विशेष काळजी घ्यायची आहे, अर्जामध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती तसेच इतर माहिती देखील भरून घ्यायची आहे.
  5. जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक असे सर्व कागदपत्र देखील फॉर्म सोबत सॉफ्ट कॉपी स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  6. त्यानंतर भरतीसाठी जी फी आकारण्यात आली आहे ती भरून घ्यायची आहे. फी भरण्यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड चा वापर करू शकता.
  7. फी भरल्यानंतर एकदा भरतीचा फॉर्म तपासून घ्या, फॉर्म तपासून झाल्यावर त्याची वेरिफिकेशन पूर्ण करा आणि त्यानंतर शेवटी फॉर्म ला सबमिट करून टाका.

SBI SCO Bharti 2024 FAQ

What is the Eligibility Criteria of SBI SCO Bharti 2024?

SBI SCO Bharti साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान पदवी परीक्षा पास एवढे झालेले असावे. तसेच उमेदवाराला कामाचा अनुभव देखील असावा, यासोबत काही अनिवार्य प्रमाणपत्र देखील उमेदवाराकडे असणे आवश्यक आहेत, त्याची माहिती वर शैक्षणिक पात्रता निकषांमध्ये दिलेली आहे.

How to apply online for SBI SCO Bharti?

SBI SCO Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे, भरती साठी जे पोर्टल जारी केले आहे केवळ त्याच पोर्टल वरून अर्ज सादर करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत, जी स्टेप दिली आहे त्यानुसारच अर्ज करायचा आहे.

What is the last date of the SBI SCO Bharti Application Form?

SBI SCO Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2024 आहे, मुदत संपल्यावर अर्ज करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला तात्काळ फॉर्म भरावा लागणार आहे, अजून वेळ वाया घालू नका लगेचच अर्ज करून टाका.