राज्य शासनाकडून वृद्ध नागरिकांसाठी एक अभिनव अशी योजना राबवली जात आहे, Sanjay Gandhi Niradhar Yojana अंतर्गत वृद्ध लोकांना ठराविक स्वरूपात पैसे दिले जाणार आहेत, 900 रुपये पर्यंत आर्थिक मदत वृद्ध लोकांना केली जाणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोणाला मिळणार? कोणते व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत? निकष काय काय आहेत? अर्ज कसा करायचा? अशी संपूर्ण माहिती या आर्टिकल च्या माध्यमातून मी दिली आहे.
जर तुम्ही वृद्ध नागरिक असाल, किंवा तुमच्या ओळखीत कोणी वृद्ध नागरिक असेल तर त्यांना या योजनेचा मोठा फायदा मिळू शकतो. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि इतरांसोबत शेअर देखील करा.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024
योजनेचे नाव | Sanjay Gandhi Niradhar Yojana |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश | वृध्द लोकांना आर्थिक सहाय्य करणे |
फायदा | 600 ते 900 रुपये लाभ |
पात्रता | महाराष्ट्रातील 65 वर्षाचे नागरिक |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://sjsa.maharashtra.gov.in/ |
Sanjay Gandhi Niradhar Yojana Qualification Details
संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्रता निकष या पुढील प्रमाणे आहेत:
- उमेदवार 65 वर्षापेक्षा कमी वयाचा असावा.
- उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21,000 पेक्षा कमी असावे.
निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रू.
या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेले सर्व पात्र व्यक्ती देखील योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत.
Sanjay Gandhi Niradhar Yojana Benifits
- संजय गांधी निराधार योजना द्वारे पात्र व्यक्तीला प्रतिमाह 600 रुपये दिले जातात.
- लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबात दोन व्यक्ती योजनेचा फायदा घेत असल्यास दोन्ही व्यक्तींना एकत्रित 900 रुपये प्रति महिना मिळणार.
वर सांगितल्याप्रमाणेच सर्व पात्र व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते. रक्कम ही 600 रुपये प्रत्येकी दिली जाते, फक्त जर दोन व्यक्ती एका कुटुंबातील लाभ घेत असतील तर त्यांना मात्र एकत्रित नऊशे रुपये दिले जाणार आहेत. एक महिन्याला या आर्थिक मदत केली जाणार आहे, त्यामुळे वार्षिक 7,200 रुपये एवढी मदत मिळणार आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana Application Process
संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्जदार उमेदवार ऑफलाइन स्वरूपात अर्ज सादर करू शकतात. उमेदवारांना योजनेचा फॉर्म खालील प्रमाणे दिलेल्या सूचनांचे पालन करून भरायचा आहे, आणि संबंधित अधिकृत कार्यालयात जमा करायचा आहे.
- सर्वात प्रथम तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म मिळवायचा आहे.
- फॉर्म मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर जाऊ शकता आणि तेथून अर्ज घेऊ शकता.
- अर्ज मिळाल्यानंतर तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे.
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरायची आहे, चुकीची माहिती आढळल्यास व्यक्तीला पैसे मिळणार नाही.
- अर्ज भरून झाल्यावर संबंधित कार्यालयात योजनेचा फॉर्म जमा करायचा आहे.
- कार्यालयामध्ये अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील.
- संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार/ तलाठी कार्यालय
- वृध्द लोकांना मिळणार फ्री उपकरणे! मोठा फायदा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- विदेशात शिकण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये! जाणून घ्या संपूर्ण माहिती
- 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप! 400 रूपया पर्यंत, फायदा घ्या
Sanjay Gandhi Niradhar Yojana FAQ
Who is eligible for Sanjay Gandhi Niradhar Yojana?
संजय गांधी निराधार योजनेसाठी 65 वर्षा खालील व्यक्ती पात्र असणार आहेत, पात्रता निकष वर सांगितले आहेत.
How to Apply for Sanjay Gandhi Niradhar Yojana?
योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकता, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात तुम्ही फॉर्म भरू शकता.
What is the Benifit of Sanjay Gandhi Niradhar Yojana?
संजय गांधी निराधार योजनेद्वारे पात्र व्यक्तींना महिन्याला 600 रुपये दिले जाणार आहेत, सोबतच एका कुटुंबातील दोन व्यक्ती लाभ घेत असतील तर त्यांना 900 रुपये प्रति महिना मिळणार आहे.
Mla changla vatli Seva mi apang ahe