SAMEER (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research) मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. SAMEER Bharti 2026 अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून ITI, डिप्लोमा आणि पदवी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी घेतली जाणार नाही. (अद्याप फी नमूद केली नाहीये)
या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. SAMEER ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी संस्था असल्याने येथे नोकरी मिळाल्यास स्थिर आणि विश्वासार्ह करिअरची संधी उपलब्ध होते. तांत्रिक आणि नॉन-तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांसाठी ही भरती आहे.
SAMEER भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा साधारण ₹34,000 पर्यंत पगार दिला जाणार आहे. यामध्ये सरकारी संस्थेत काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. तसेच कामाच्या दरम्यान नवीन कौशल्ये शिकण्याची संधी देखील मिळते.
SAMEER Bharti 2026 साठी अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. ITI, डिप्लोमा किंवा पदवी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी नक्कीच अर्ज करू शकतात. पुढे आपण या भरतीची पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया सविस्तर पाहणार आहोत.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
SAMEER Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) |
| भरतीचे नाव | SAMEER Bharti 2026 |
| पदाचे नाव | प्रोजेक्ट इंजिनिअर सह विविध पदे |
| रिक्त जागा | 147 |
| वेतन | 34,000 रु. |
| नोकरी ठिकाण | मुंबई |
| शैक्षणिक पात्रता | ITI/ डिप्लोमा/ पदवी पास |
| वयोमर्यादा | 18 ते 25/28/30 वर्षे |
| अर्जाची फी | माहिती नाही |
| अर्ज प्रक्रिया | Online |
SAMEER Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 71 |
| 2 | प्रोजेक्ट असोसिएट | 06 |
| 3 | प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट (A) | 57 |
| 4 | प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (B) | 13 |
| – | Total | 147 |
SAMEER Bharti 2026: Salary (पगार)
| पदाचे नाव | मासिक पॅकेज |
|---|---|
| प्रोजेक्ट इंजिनिअर/ प्रोजेक्ट असोसिएट | 34,000 रु. |
| प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट (A) | 23,500 रु. |
| प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (A) | 21,000 रु. |
| प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (B) | 23,500 रु. |
SAMEER Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. | पदाचे नाव | शिक्षण |
|---|---|---|
| 1 | प्रोजेक्ट इंजिनिअर | अर्जदार 55% गुणांसह B.E./ B.Tech (Electronics &Telecommunications / Electronics/ Instrumentation & Controls/ Microwave/ Electrical/ Electrical/Mechanical/Civil) मध्ये पदवीधर असावे. |
| 2 | प्रोजेक्ट असोसिएट | अर्जदार 55% गुणांसह ME/ M.Tech (Electronics & Telecommunications/ Electronics/ Instrumentation & Controls/ Microwave) किंवा M.Sc (Physics/(Atmospheric Sciences /Space Science/Ocean Science /Meteorology/Climate Science /Geophysics-Meteorology /Physics /Mathematics) किंवा B.Tech. (Engineering Physics) मध्ये पदवीधर असावे. |
| 3 | प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट (A) | अर्जदार 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/Microwave/Biomedical Engineering / Medical Electronics/Electrical/Mechanical) किंवा B.Sc. (Electronics/Physics/Chemistry) मध्ये पदवीधर असावे. |
| 4 | प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (B) | अर्जदार 55% गुणांसह NCTVT-ITI (Electronics/Electronics-Mechanic/Fitter/Electrician/ Electroplater/Chemical/Turner/Machinist) मध्ये पदवीधर असावे + 03 वर्षे अनुभव असावा. |
SAMEER Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
Step 1: Screening Test –
- सर्वप्रथम उमेदवारांची Screening Test घेतली जाईल.
- या परीक्षेच्या आधारे पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल.
Step 2: Admit Card (ओळखपत्र) डाउनलोड –
- जे उमेदवार पात्र असतील त्यांना SAMEER च्या वेबसाईटवरून Identity Card / Admit Card डाउनलोड करण्याची परवानगी दिली जाईल.
- हे Admit Card Screening Test आणि Interview वेळी प्रिंट करून सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
Step 3: Personal Interview (मुलाखत) –
- Screening Test मध्ये शॉर्टलिस्ट झालेले उमेदवार Personal Interview साठी बोलावले जातील.
- मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण हे ऑनलाईन जाहीर केले जाईल.
- उमेदवारांनी नियमितपणे SAMEER च्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
Step 4: Final Selection (अंतिम निवड) –
उमेदवाराची अंतिम निवड ही पूर्णपणे मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. मुलाखत Admit Card मध्ये दिलेल्या ठिकाणी घेतली जाईल, अन्यथा बदल असल्यास स्वतंत्र सूचना दिली जाईल.
महत्त्वाची टीप: फक्त Screening Test, Document Verification किंवा Interview ला हजर राहिल्या उमेदवारांची निवड होईलच असे नाही. उमेदवाराने सर्व पात्रता अटी पूर्ण करणे आणि प्रत्येक टप्प्यावर समाधानकारक कामगिरी करणे आवश्यक आहे.
SAMEER Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | जानेवारी, 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 25 जानेवारी, 2026 |
| परीक्षेची तारीख | 01 फेब्रुवारी 2026 |
SAMEER Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
SAMEER Bharti 2026: Step-by-Step Application Process
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – SAMEER च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- नवीन नोंदणी (Registration) करा – भरतीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
- लॉगिन करा – नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या ID आणि पासवर्डने लॉगिन करा.
- अर्ज फॉर्म भरा – वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक तपशील नीट भरा.
- कागदपत्रे अपलोड करा – फोटो, सही आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा (जाहिरातीत दिल्याप्रमाणे).
- अर्ज फी भरा – SAMEER भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
- फॉर्म सबमिट करा – सर्व माहिती एकदा तपासून अर्ज सबमिट करा.
- प्रिंट काढा – भरलेल्या अर्जाची प्रिंट किंवा PDF कॉपी सेव्ह करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा
Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती, 19500 रु. महिना, 10वी पास अर्ज करा
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
SAMEER Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट (A) आणि प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (B) पदांची भरती केली जाणार आहे.
SAMEER Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा 147 आहेत.
SAMEER Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 25 जानेवारी 2026 आहे.
SAMEER Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि Shortlist आणि पर्सनल मुलाखती च्या माध्यमातून होणार आहे.
SAMEER Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 34000 रु. मिळणार आहे.

5 thoughts on “SAMEER Bharti 2026: SAMEER मुंबई मध्ये नोकरी! फी नाही, 34000 रु. पगार, ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा”