10 वी पास वर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू! अर्ज करा | SAIL Bharti 2024

SAIL Bharti: नमस्कार मित्रांनो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT) या पदासाठी भरती निघाली आहे. Sail द्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, एकूण रिक्त जागा या 314 आहेत, ज्या या भरती प्रक्रिया मार्फत भरल्या जाणार आहेत.

या भरतीची एका विशेष बाब म्हणजे ही भरती 10 वी पास वर होणार आहे, त्यामुळे जे उमेदवार बेरोजगार आहेत आणि ज्यांचे किमान शिक्षण हे 10 वी पास झाले आहे, त्यांना या भरतीअंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.

उमेदवारांना केवळ ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येणार आहे, इतर कोणतेही मार्ग नाहीत, केवळ आणि केवळ ऑनलाईन अधिकृत वेबसाईट वरून दिलेल्या देय मुदतीत अर्ज सादर करायचा आहे.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, त्यामुळे जर तुम्ही या भरती साठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर कृपया ही महत्वाची अशी माहिती आवाश्य वाचा.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत त्यांच्या करियर विभागाद्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यांदा अर्ज सादर करण्यापूर्वी एकदा जाहिरात वाचून घ्या.

SAIL Bharti 2024

📢 भरतीचे नाव – SAIL Bharti

✅ पदाचे नाव – ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT)

🚩 एकूण रिक्त जागा – 314 जागांसाठी भरती

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा किमान 10 वी पास असावा, तसेच त्याने कोणताही एखादा इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – 38,920 रुपये प्रति महिना (वेतन श्रेणी बदलू शकते)

💵 परीक्षा फी – 

  • Open, OBC, EWS प्रवर्गासाठी 500 रुपये परीक्षा फी भरायची आहे.
  • SC, ST, PWD, ExSM साठी 200 रुपये परीक्षा फी भरायची आहे. (300 रुपये माफ असणार आहेत)

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असावे, तसेच वयाची मर्यादा ही 28 वर्षे आहे.

📍 वयोमर्यादा सूट –

  • SC, ST प्रवर्गासाठी एकूण 05 वर्षांची वयोमर्यादा सूट आहे.
  • OBC प्रवर्गासाठी एकूण 03 वर्षांची वयोमर्यादा सूट आहे.

📆 फॉर्मची Last Date – 18 मार्च, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळभेट द्या
🖥️ जाहिरात PDFDownload करा
📝 ऑनलाईन अर्जयेथून करा

SAIL Bharti Apply Online

SAIL भरती साठी तब्बल 314 रिक्त जागांवर भरती निघाली आहे, 10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची Link ही Active करण्यात आली आहे.

उमेदवार हे वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करू शकतात, किंवा उमेदवार येथून पण ऑनलाईन अर्ज करू शकतात. निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करून खालील स्टेप प्रमाणे अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला तेथे सर्वात प्रथम तुमची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, नोंदणी केल्याशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. तसेच Apply Online चा Option पण येणार नाही.

अधिकृत वेबसाईट वर नोंदणी करून झाल्यावर वेबसाईट मध्ये लॉगिन करायचे आहे. त्यासाठी नोंदणी करताना वापरलेले Credentials आवश्यक असणार आहे.

एकदा लॉगिन करून झाल्यावर तुमच्या समोर एक नवीन Apply Online चा Option दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. तुमच्या समोर भरतीचा फॉर्म उघडेल.

फॉर्म open झाल्यावर तो तुम्हाला काळजीपुर्वक भरायचा आहे, फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती द्यायची आहे, पण चुकीची माहिती देऊ नका, तपासणी करताना आढळले तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.

सोबतच पुढे आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, कोणते कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर माहिती लिस्ट जाहिराती मध्ये दिलेली आहे, तुम्ही त्याची मदत घेऊ शकता.

कागदपत्रे हे Soft Copy स्वरूपात अपलोड करायचे आहेत, पण त्यांनतर कागदपत्रे पडताळणी पण होते, त्यामुळे याच वेळी सर्व कागदपत्रे Orignal Hard Copy मध्ये तयार करून ठेवायची आहेत.

कागदपत्रांसोबत भरतीसाठी परीक्षा फी भरणे देखील आवश्यक आहे, परीक्षा फी ही सर्व प्रवर्गासाठी वेगवेगळी आहे, Open, OBC, EWS प्रवर्गासाठी 500 रुपये तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये सूट देऊन 200 रुपये परीक्षा फी भरायची आहे.

अशा रीतीने पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर एकदा शेवटी Recheck करून घ्यायचा आहे. सूचनेनुसार आवश्यक ते बदल करायचे आहेत, चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे. कारण नंतर एकदा अर्ज सबमिट केला की तो Edit करता येणार नाही.

SAIL Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च, 2024 ठरवण्यात आली आहे. देय तारखे नंतर सादर केलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे मुदती आगोदर अर्ज करावे. 

नवीन भरती अपडेट:

SAIL Bharti FAQ

SAIL Bharti साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये एकूण 314 रिक्त जागांसाठी भरती सुरू झाली आहे.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया भरती साठी अर्ज कसा करावा?

भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे, याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

SAIL Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 18 मार्च, 2024 आहे. या मुदती नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

2 thoughts on “10 वी पास वर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू! अर्ज करा | SAIL Bharti 2024”

Leave a comment